दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फायनली लोकांना भरपूर मदत केल्यावर गाणे ओळखण्यात आले आहे Happy
अर्थात हे उगीच मला न आलेल्या गाण्यांचा सूड घ्यायला. नाहीतर हे गाणं मी चुकून सुद्धा आठवलं नसतं.

90ज च्या सुप्रसिद्ध कम्पोजर जोडीचे गाणे. अलमोस्ट अशीच ट्यून त्यांनी 1996 च्या त्यांच्या खूप गाजलेल्या गाण्यात / इंटरल्युड साठी वापरली आहे. तो चित्रपट पण फ्लॉप पण त्याचा डायरेकटर आज खूपच प्रसिद्ध आहे.

नोप

लंपन,

'बडा दिन'चे गाणे. 'मेरी आंखो मे तुम हो, मेरे सपनो मे तुम हो'.. मार्क रॉबिनसन, तारा देशपांडे(कुणीतरी वर स्टाईल बद्दल उल्लेख केलाय तर त्या अनुषंगाने हिरॉईनबद्दल क्लु देता आला असता. Proud ). यातले 'सुनो जरा..' जास्त पॉप्युलर होते बहुधा, ते जास्त वेळा ऐकलेय.

श्रध्दा सही जवाब.. हो मला ती दोन्ही आवडतात. पण सुनो जरा फ्लॅशबॅक मध्ये आहे इथे ते नीट देता आले नसते Happy वर 21 जून =(साल का सबसे) बडा दिन हा क्लू दिलाय जतीन ललित , खमोशी आज मे उपरचा क्लू आहे . त्यातलया इंटरल्युड पीस चालीसाठी वापरलाय.

मला पण क्लू डोक्यावरून गेले
तारा माहीत आहे..
चूप तुम रहो चूप हम रहो गाण्यात भिंतीवर स्वतःचं डोकं आपटणारी
बडा दिन ची सध्या कोणतीच गाणी आठवत नाहीयेत.गुगल करना मंगता

कोफ्त्याचं गाणं सांगा... म्हणजे कोफ्ते दृश्यात किंवा काव्यात... दोन्हीत चालेल...

कोफ्त्याचं गाणं.....असे पण गाणे आहे का? चिवडा, समोसा, बटाटावडा, हलवा-पूरी ऐकले होते गाण्यात.

दिल ने दस्तरख्वान बिछाया, दावत-ए-इश्क है...

यात अख्खे गाणे हिरोच्या हॉटेलातच चित्रित केले आहे. बिर्याणी, कबाब, फिरनी वगैरे दिसतात. तर कोफ्ते असतीलच असे माझे मत आहे. Proud

Pages