दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून काही क्लुज
1. हा स्टार सन किंवा डॉटर ला लॉंच करायला काढलेला चित्रपट आहे
2. पार्श्वगायनाची गरज घरातच भागलीय
3. पिक्चर आपटलेला आहे

सगळी चिडीचूप शांतता?
अजून एक क्लू
1. नायक किंवा नायिकेचा बाप तुम्हाला विनोदी कलाकार म्हणून खुप चांगला माहीत आहे.

गाणं आणि पिक्चर दोन्ही सर्वश्रुत नाही.
अजून एक क्लु
नायक किंवा नायिकेचा भाऊ नेजल टोन बद्दल प्रसिद्ध आहे आणि सध्या बंगलोर जवळ शेती करतो.तुम्ही याबद्दल बातमी गेल्या १ वर्षात वाचली असेल.

हिरो
IMG_20201018_181230.jpg

पिक्चर बरोबर आहे
गाणं नशा नशा, नशे मे हम, धुवा धुवा ये जिंदगी आहे (त्यात त्याला गुडिया जापानी है च्या आठवणी येत असल्याने त्यात पण हे दृष्य आहे Happy )
फायनली पिक्चर एक्स्पर्ट नी उडी मारली Happy

मी_अनु खंगरी कोडे. हे कॉफी पिऊन सोडवावे लागेल म्हणलं तर श्रद्धाने सोडवलं तोवर. जियो श्रद्धा... (श्रद्धा आणि ए_श्रध्दा वेगळ्या का???)

सीमंतिनी ने उत्तर दिल्यावर बरोबर म्हणणं द्वीरुक्ती होईल Happy
श्रद्धा आणि ए_श्रध्दा वेगळ्या का??? Yooo .. मी ज्युनिअर केजी मध्ये आहे अजून इथे..

20201018_190955.jpg

गणपतीचे गाणे असावे... ७०ज... आता मी देवा हो देवा वर ब्लॉक झाले.... त्यात ती नाही माहिती आहे... पण गणपतीचे गाणे आठवेना...

गणपतीचे नाही.
हिंट: ती हाताने कुठले इंद्रिय दर्शविते, तेच गाउन सांगत आहे.

Pages