घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हळद टाका.
गॅमॅक्झिन पावडर/ मुंगी पावडर मिळेल मेडिकलमधे. लगेच जातील.

घरात खाली, भिंतीवर, ओट्यावर सूक्ष्म निरीक्षण करून, (यासाठी सोफा, कपाट हलवणे, फिक्स्ड कपटांचे सर्व खण उघडून पहाणे, स्वयंपाक घरातील ओट्याखालील ट्रॉल्या काढून पहाणे, इत्यादि सर्व आले) जिथे जिथे फटी आहेत त्या पांढरे सिमेंट मध्ये थोडे गॅमाक्झिन पावडर मिसळुन त्या नीट बंद कराव्यात. आणि मग वरून वर सांगितलेले लक्ष्मण रेषा, गॅमाक्झिन पावडर हे उपाय नियमित करत रहावे.

घर आहे की flat? जर बिल्डिंगलाच मुंग्या लागल्या असतील तर तुमच्याकडे येणारच. आसपास विचारा कॉमन प्रॉब्लेम आहे का. जर असेल तर वेगळी ट्रीटमेंट करता येईल.

मायबोलीच काय होतंय हल्ली Sad
प्रश्न पडले की विचारले,
त्याबद्दल आधी चर्चा झाल्यात का वगैरे विचार पण नाही
आणि एकोळी त प्रश्न विचारला की झालं,

जनरली पाऊस येणार असेल तर आधी मुंग्या होतात आणि पाऊस पडून गेला की जातात हा माझा अनुभव/ निरीक्षण आहे.
मुंग्या कशाला लागल्यात ते आधी चेक करा , ती गोष्ट काढून टाका आणि मग लक्षणरेषा वापरा. 100% फरक पडतो.

पेपरमिंट स्प्रे वापरा...

आदु - हा प्रश्न तुम्हाला एक लेख पाडून हवा होता का एका ओळी ऐवजी Happy

त्या मुंग्यानाही विचारा, कदाचित त्यांच्या जागेवर कोणी अतिक्रमण केले असेल तर त्या तुमच्या घरात जागा शोधत असाव्यात.

माबोकर तर जीवावरच उठलेत मुंग्यांच्या......

त्या मुंग्यानाही विचारा, कदाचित त्यांच्या जागेवर कोणी अतिक्रमण केले असेल >> स्वस्तात वारूळ मिळालं म्हणून आल्या असतील. आता त्यांना (मुंग्यांना) तिथे अमुंगीय आणि अतर्क्य अनुभव यायला लागल्यामुळे पिसाळल्या असाव्यात.

त्या उंदिराचे काय झाले? कुणाच्यातरी घरी उंदीर होता म्हणून धागा होता... असंख्य उपाय होते. ते चालतील की मुंग्यांना. पण गेला का उंदीर??

आदु - हा प्रश्न तुम्हाला एक लेख पाडून हवा होता का एका ओळी ऐवजी >>छान जोक चरम्प Lol
पण मायबोलीवर जी माहिती जरा शोधाशोध करून मिळू शकते त्यासाठी असा सेपरेट धागा काढायची गरज नसावी असं मला वाटत
आणि तरीही धागाच काढून विचारायचं असेल तर एकोळी ऐवजी अगदी लेख नाही पण निदान आपण कुठे राहतो,घरात हा प्रॉब्लम कधीपासून आहे, आधी या प्रॉब्लम साठी काय काय try केलं वगैरे माहिती तर नक्कीच देता येते न.

धागा लेखिका 1 वाक्य लिहून गायब झालेल्या आहेत
पुढे काही अक्नोलेजमेंट नाही, अपडेट नाही, थॅंक्यु नाही करून बघते नाही
आम्हीच येडे लिहिणारे आणि काय Happy

कारण तुम्ही सगळे मुंग्या मारण्यासाठीचे उपाय सुचवत आहात.
पण मुंग्या मारायचेच उपाय हवेत असे त्यांनी कुठेच स्पष्ट म्हटलेले नाही. आता जर रेसिपीज येऊ द्यात.
ह्या दोन माझ्याकडुअनः Wink Light 1
Indian Food: SOUR RED ANTS (Zaling Kathur Kahang) | Manipur, Northeast India
https://www.youtube.com/watch?v=7WvHSqB6DPs

Gordon Ramsay Makes and Eats Ant Chutney
https://www.youtube.com/watch?v=hz7L_DKNDBE

प्रतिसादेवाधिकारस्ये मा दखलेषु कदाचन

हे माबोकरा, तू दखल घेण्याची अपेक्षा न करता प्रतिसाद लिहीत रहा.

Pages