घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही (हे सखाराम गटणे स्टाईल), मुंग्यांच्या डोक्याला झिणझिण्या येवुन त्या पाठीवर पडुन आपले समस्त पाय झाडत आरओएफएल

अरे काय सुटलेत सगळे. Lol
ऑफिसं कामं धंदे काही सुरु झालं का नाही? का जुन लॉकडाउनच साजरा करताय लोक्स?

ऑफिसं कामं धंदे काही सुरु झालं का नाही? का जुन लॉकडाउनच साजरा करताय लोक्स?
बा सस्मित (हे आचार्य बाबा बर्वेंच्या चालीवर), आलटुन पालटुन वफ्राहो नी वफ्राऑ खेळतोय.

मुंग्यांच्या नशिबात जिथले दाना पाणी लिहिले असेल त्या तिथेच राहणार, तुम्हाला चित्रगुप्तला विचारावं लागेल की मुंग्यांच नशीब लिहिलं असेल तर mail kar document

००७, बाई सस्मित Happy
आलटुन पालटुन वफ्राहो नी वफ्राऑ >>> सेम हिअर. Happy
पण सोडा आता हे मुंग्याचं घर म्हणजे धागा.
भुताच्या घरात तर एकदम सिरीयस ग्यान की बाते होरेली है.

सस्मित ऑफिस च्या कामातून थोडा विरंगुळा म्हणून इथे येतो.. नको त्या सिरीयस गोष्टी..त्यातून पण फक्त वाद विवाद होतात.. प्रत्येकजण आपण किती बरोबर आहोत हेच पटवण्याचा प्रयत्न करतो..

माबोवरच नाही सगळीकडे असंच आहे श्रवु.
माणसांची सहनशक्ती, समोरच्याचं नीट ऐकणं, ऐकलचं तर समजुन घेणं, त्याचीही काही बाजु असेल हा विचार करणं, सगळ्या गोष्टी माहित नाही तर जज करु नये हे कळणं हे कमीकमी होत चाललंय. मी पण त्यात आहे.
मला माहित आहे, मला कळतं, काय मोठी सांगतेय/सांगतोय, हा/ही मोठी शहाणी, मी काय वेडी वाटते की काय? हे सगळीकडेच थोड्याफार प्रमाणात दिसतंय. अंहकार्,इगो, गैरसमज्,राग,नैराश्य सगळीकडे आहे.
स्वतःला प्रयत्नपुर्वक सावरावं हे प्रत्येकानं बघावं.

सस्मित म्हणूनच मी फक्त वाचते..लिहीत काहीच नाही.. आपल्याला आपली मते आहेत.. आणि आपण आपल्यला घरात कशी परिस्थिती कशी आहे.. त्यावरूनच कधी.. केव्हा .. आणि कसे वागायचे आणि यातून कसा सुवर्णमध्य काढायचा ते ठरवतो.. आणि परिणाम पण आपणच भोगतो..आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो.. सरसकट सगळीकडे एकाच समीकरण लागू पडत नाही..

बाई सस्मित Happy
ओह. माफ करा.

प्रत्येकजण आपण किती बरोबर आहोत हेच पटवण्याचा प्रयत्न करतो..
ये मारा पापडवाले को ((और उसकाभी पापड तोड दिया) हे आम्ही (हेल मोगँबोच्या चालीवर) बोंबलायचो)
इथे "शेवटचा प्रतिसाद माझा असाव नी त्याला कोणी विरोध करु नये" अशी मनाची अवस्था असणारे काही जन (माणसं- हे भीमराव पांचाळेंच्या गजलांना प्रस्तावना देणार्याच्या चालीत)) आहेत. म्हणुन कोणाचं जास्त मनावर घ्यायचं नाही.

घरावर निबंध
घर ही एक अशी वास्तू आहे की जिच्यावर ताबा मिळवण्यासाठी भूत, मुंग्या आणि बाई हे तीन घटक सतत प्रयत्नशील असतात. घर हे एका वेळी एकाच घटकाचे असू शकते. हे तिन्ही घटक तुल्यबळ आहेत म्हणून त्यांच्यात सतत वर्चस्वाची लढाई सुरू असते. यातील कोणत्याही दोघांची युती होऊ शकत नाही. उदा. भूताला पळवण्यासाठी बाईने मुंग्यांना कामाला लावले आहे इ. इ. तिन्ही स्वतंत्र आहेत.

हे मुंगी
तू रक्तवर्णी आहेस
आमच्यावर कृपा कर आणि हे घर सोडून जा.

हे मुंगी
तू रक्तवर्णी आहेस
आमच्यावर कृपा कर आणि हे घर सोडून जा.

आता घरातिल मुन्ग्या खूप प्रमाणात कमी दिसत आहेत. खुप खुप धन्यवाद सर्वान्चे.
बाकि सगळि धम्माल चालु आहे धाग्यावर. मस्त मस्त

आता घरातिल मुन्ग्या खूप प्रमाणात कमी दिसत आहेत. खुप खुप धन्यवाद सर्वान्चे.
बाकि सगळि धम्माल चालु आहे धाग्यावर. मस्त मस्त

ह्या धम्मालीची कर्णोपकर्णी वार्ता पसरल्याने बऱ्याचश्या मुंग्यांनी इकडचे सदस्यत्व घेतलेय हां धागा निघाल्यानंतर आणि त्या मुक्तपणे खादाडी पासून विविध गप्पांच्या धाग्यावर बागड़तात आहेत... त्यामुळेच खरेतर आता घरात मुंग्यांचा त्रास अतिशय कमी झालाय त्यामुळे आभार मानायचे तर मायबोली प्रशासनाचे मानायला हवेत !

त्रास कमी झाला छान झाले.
आता कुणाच्या उपायाने कमी झाले त्या व्यक्तीचा सत्कार वगैरे काही पद्धत असते की नाही!
आम्ही पुष्पगुच्छ घेऊन तयार आहोत.

विद्याताईंनी घराबाहेर येऊन सर्वांचे आभार मानले.. व सगळ्यांना एन्जॉय करताय ना ? विचारून गेल्या..चहा पाणी पण विचारलं ..

ही म्हणजे सौजन्याची पराकाष्ठा झाली, त्यांनी खूपच खेळीमेळीने घेतलय .
नाहीतर दुसऱ्यांच्या दारात खेळल्यावर किती शिव्या पडतात ते वाड्यात राहिलेल्याना तर नक्की माहित असेल

Pages