घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तो क्विझ प्रश्न होता.
ये बच्चा बडे चाव से क्या खा रहा है?
मग लोकांनी बरीच उत्तरं पत्राने पाठवली आणि पुढच्या भागात कळले की मुंग्यांची चटणी आहे.

<< धागा लेखिका 1 वाक्य लिहून गायब झालेल्या आहेत
पुढे काही अक्नोलेजमेंट नाही, अपडेट नाही, थॅंक्यु नाही करून बघते नाही >>

कैच्या कै अपेक्षा तुमची. लेखिकेची प्रोफाइल बघितली नाही का तुम्ही? त्यात स्पष्ट लिहीलंय ना.
सध्या मुक्काम (गाव/शहर)
पुणे (पक्के पुणेकर)

ऊंदराचा धागा माझा होता. रिकू राजगुरूचं नशीब कमी वाटेल इतकं त्या धाग्याचं नशीब जोरदार होतं. धाग्यावरचे उदंड उपाय वाचूनच उंदरानं कलटी घेतली असती.

मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना?

काळ्या मुंग्या देवाच्या त्यांना मारू नये, साखर द्यावी

लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा

मा दखलेषु कदाचन >> Rofl
मेधावि Biggrin
काळ्या मुंग्या देवाच्या त्यांना मारू नये, साखर द्यावी>> मग भरमसाठ मुंग्या जमल्या कि इथे धागा काढावा Wink

मुंगीने एकदा केला नाच
तिला मिळाले पैसे पाच
एका पैशाचे आणले पीठ
एका पैशाचे आणले मीठ
मिठापीठाची केली भाकर

नौकरिस ठेवला एक चाकर
तिसरा पैसा त्याला दिला
चौथ्याचा बांधला किल्ला

पाचव्या पैशाचे काय करू
मुंगीने आणला एक घुंगरू
घुंगरू म्हणाले नाच नाच
पुन्हा मिळतील पैशे पाच

मा दखलेषु कदाचन >> अहो त्यांच्या हाताला मुंग्या आल्या असतील. ह्यावर खात्रीशीर घरगुती उपाय म्हणजे अंगठ्याचे नख खाजवणे. मुंग्या जातात.

मुंगीबाय मुंगीबाय
कर टाटा बाय बाय

घरभर फिरुनी
साखर शोधीशी
शेंगदाणे गूळ फिरणी
काहीही न सोडीशी

सोड पिच्छा घराचा
राहा बाहेर दाराच्या

.....
किल्लीच्या काहिच्या काही कविता
पूर्ण करा कुणीतरी
.....

>> प्रतिसादेवाधिकारस्ये मा दखलेषु कदाचन

Lol

>> पूर्ण करा कुणीतरी
>> Submitted by किल्ली on 20 October, 2020 - 13:37

हो नक्की करतो नंतर. आता जरा पायात मुंग्या आल्यात.

"लिंबाला जरा सोलून म्हणजे काही सालं काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी ठेवून द्यावे. काही वेळातच मुंग्या तिथून नाहीश्या होतील"

संदर्भ: https://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/natural-home...

कंबोडियात खातात बाई मुंग्या आणि इतर इन्सेक्ट. तळलेले पाहिले मी. एका मंदिराच्या मागून बाहेर पड ताना मागे जंगलच आहे. तिथे अश्या मोठ्या लाल मुंग्या होता आणि काय चावल्यात त्या. पार जयवर्मन दोन आठ्वला मला तर. अंकोर थोम मध्ये एक शिवमंदीर आहे ते.

लिंबू वाल्या उपायाने मुंग्या गेल्या तरी लिंबावर बसायला चिलटं येण्याची शक्यता आहे.
मागे व्हॉट्सअप वर सांगितल्या प्रमाणे डास येऊ नये म्हणून लवंग टोचून लिंबाचं साल ठेवलं होतं.पण त्यावर डास येऊन बसला Happy

बाप रे..मग त्या लाल मुंग्यांच्या पाककृती खाल्लेल्या लोकांचे काय होत असेल.

laal mungyaa विषारी असतात की नाही ते माहीत नाही पण त्यांच्या शरीराच्या मानाने फारच तीव्र डंख करतात. आणि त्यांची मोठी आवृत्ती तर भयानकच चावते. काळया मुंग्या आणि काळे मुंगळे (डोंगळे) तसे निरुपद्रवी.

बाळाला मुंगी चावली तर काय करावे
रमाला चावली आहे Sad >>>> कोरफडीचे जेल लावून बघा. थोडा थंडावा वाटेल.

लाल मुंग्या भयानक विषारी असतात.
नाही. त्यांच्या शरीरात फॉर्मिक अ‍ॅसिड असते. चावल्यानंतर ते आपल्या शरीरात टोचले जावुन रिअ‍ॅक्शनने आग होते वगैरे.

बाळाला मुंगी चावली तर काय करावे
कपड्यात बर्फ गुंडाळुन फिरवा...जास्त थंड नको.
खोबरेल तेल लावा किंवा किंचित खायचा सोडा टाकलेले पाण्याने धुवा

झोपेत असताना हाता-पायाला रोजच मुंग्या येऊ लागल्या तर स्पायनल डिसॉर्डर उद्भवण्याचे प्रमाण जास्त असते असे म्हणतात ते खरं आहे का..??

मुंगी चावल्यावर मुंगी डान्स करावासा वाटतो की मुंगळा डान्स? त्यासाठी काय काय साहित्य - प्रॉप्स हाताशी ठेवावे?

काळे मुंगळे (डोंगळे) तसे निरुपद्रवी.

>> काहीही. तुम्हाला कधी काळा मुंगळा चावला नाही का आजपावेतो?

Pages