घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>रिदीतला डास चावला की मी त्या जागेवर vicks किंवा बाम लावते त्याला. त्यातल्या कापराने डंख मरतो.

घरातला किंवा शेतातला डास समजू शकतो पण रिदीतला डास म्हणजे कुठला? बाम लावताना डास उडून जात नाही का? आणि जर त्याला बाम लावलाच तर अख्खा डासच मरेल ना फक्त डंख का?

#मलातबैकैकळतचनै

आणि नर डास रक्त पीत नाही. फक्त मादी डास रक्त पिते. म्हणून चावणाऱ्या डासाचा उल्लेख स्त्रीलिंगी व्हायला हवा.

धागा वरवर रहातोय म्हणून इथेच विचार्तेय.
माबोवर व्यसनाधीन लोकांसाठी काम करणार्या संस्थेसाठी काम करणारे माबोकर कोण आहेत? मला आता अजिबात नाव आठवत नाहीये. मदत करा.

सस्मित,
तुम्हाला कदाचित अरुंधती कुलकर्णी या मदत करु शकतील; किंवा मार्गदर्शन करु शकतील

मग नाग च नुसत नागी का नाही? नागीण का? >> शेवटी अकुहवर्गीय (क ख ग वगैरे) व्यंजन असेल तर त्यांचं स्त्रीलिंगी तद्धित करताना ईण्वन्त (ईण) प्रत्यय लागतो. ल्ऋतुलस.व्यंजनांना ङीप् (ई) प्रत्यय लागतो.

हो. अतुल ठाकुर.
मी अतुल पाटील यांच्या लेखनात शोधत होते.
धन्यवाद वावे.
अरुंधती कुलकर्णी या मदत करु शकतील; किंवा मार्गदर्शन करु शकतील> ओके. बघते. धन्यवाद.

कावळा आणि कावळी होतं. कावळीण सुद्धा होईल. केलं तर. हरीण आणि हरिणी. पण हरिणीण सुद्धा होईल. केलं तर. बोका बोकीण सुद्धा होईल. के त. bdw रेडाचं काय होईल रेडी की रेडीण?
स्वाध्याय : स्त्रीलिंगी रूपे करा: ससा, तरस, कोल्हा, गेंडा, सांबर, नीलगाया, मोर, गोऱ्हा, राघू, कबूतर, कोकीळ, खंड्या, बदक

Happy
गव्हल्यात लाल मुंग्या असतील. नाव घेतलं की येतात.
आपल्या आयडी मनी मोहोर गव्हले एक्स्पर्ट आहेत, त्यांना माहिती असेल.
तुळशीबागेच्या मागे तांबट आळीजवळ अशी रेडीमेड रुखवते वगैरे पाहिली होति. त्यात खाणं मिळतं का माहित नाही.

रेडाचं काय होईल >> ह्यावरून ते गाणं आठवलं - आर यू रेडी इ इ इ इ इ इ... बहुतेक शेवटचा इ हा रेडी होत असल्याचं द्योतक आहे. रेडीण असती तर इण इण इण असं संगीत वाजलं असतं.

पाटलीण, पवारीण, कुलकरीण, भुजबळी, थोरातीण, आपटी, लेली, कांबळी, देशपांडी,वाघमारी, हिरवी, फाशी, चोरमारी, धोंगडी, जगतापीण, देशमुखीण, तुपी, हांडी, ढगी अशा नावाच्या बायांचं महिलामंडळ आमच्या लहानपणी आमच्या एरियात होतं..

>> रिदीतला डास

मला टायपो वाटला. स्थानिक शब्द असेल त्याचा टायपो झाला असेलसे वाटले.

DJ.. च्या वरच्या यादीत देशपांडी अपवाद दिसतोय. शेवटी डकार आल्याचा परिणाम का? (पन इंटेनडेड)

Pages