घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काळा मुंगळा पण रक्त निघेपर्यंत चावतो.. मी लहान असताना एकदा माझ्या पायाच्या अंगठ्याला चावला... काही केल्या निघेना... अक्शरशः रक्त आलं तरीही निघेना.. मग आईने त्याला ओढुन काढला तर त्याचं तोंड अंगठ्याला चिकटुन राहिलेलं.. फार भयानक आठवण आहे ती Uhoh

मग आईने त्याला ओढुन काढला तर त्याचं तोंड अंगठ्याला चिकटुन राहिलेलं >> आमच्या इथे एक वैद्य कोल्हटकर होते, ते मुंगळे वापरून जखमा शिवायचे. असंच काहीसं होत असावं. मी लहानपणी घाबरल्यामुळे कधी गेलो नाही.

मला पण चावलेला मुंगळा2 लहानपणी, रक्त आलेलं..

माझ्या बहिणीला भुंगा चावला होता, हात सुजला बिचारीचा टम्म

इथे खुप जण मुंगी तद्न्य दिसतात. माझे काही प्रश्न..
काळ्या मुंग्या चांगल्या असतात म्हणे. नक्की कोणत्या प्रकारच्या काळ्या मुंग्या? त्या असल्यावर नेमका काय फायदा होतो?

माझ्या साबा म्हणतात काळ्या मुंग्या आल्या तर धनलाभ असतो.. जिथे काळ्या मुंग्या आल्या आहेत.. तिथे गुप्तधन असतंय..

खरं कि काय श्रवू.. आमच्या हॉलमध्ये झाल्या होत्या एकदा..
गुप्तधन शोधायचे कसे..खोदकाम केले तर आम्ही खालच्या मजल्यावर राहणाऱ्यांच्या घरात पडु....हा आता त्यांच्या घरात मिळु शकेल कि गुप्त धन Proud

तुम्ही एक टाईल लूज आहे त्या कोपर्‍यात खणले तर शांती करताना पुरलेली वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा हे १००% गॅरंटीड गुप्तधन मिळू शकेल. Happy

काय विधी असतो विचारून बघते साबा ना.. नरबळी वैगरे असेल तर प्लॅन कॅन्सल हा..गुप्तधनाच्या पाठी जेल मध्ये चक्की पीसींग अँड पीसींग.. करत बसावे लागेल..

नरबळी नको Happy एखाद्या फ्लॉवर चा बळी देऊन मस्त गोबी मांचुरियन किंवा नारळाचा बळी देऊन मस्त सुरळी वड्या किंवा खोबरा बर्फी पण चालेल Happy

घर मुंग्यांंच असतं , घर भुताचं असतं , म्हणून ते बाईचं रहात नाही. एकदा भूत आणि मुंग्या गेल्या की घर बाईचच !!!

देवा काय हे.
हा धागा शनैंशनैं अनिळजी, बोकलतजी टुवार्डस सरकत आहे.

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

तुम्ही जर पापभीरु असाल तर.....
१. घरात गोडधोडाची सांडलवंड थांबवा. (तुम्ही सांडलवंड करताय अस मला म्हणायचं नाही)
२. उष्टखरकटं लगेच साफ करा. (तुम्ही उष्ट पाडताय अस मला म्हणायचं नाही)
३. खाण्यापिण्याच्या डब्यात ठेवलेल्या डब्यांचे झाकणं घट्ट लावत चला.
४. जिथुन मुंग्या येताय तिथे हळद कुंकु शिंपडा (पाण्यात कालवुन)
५. त्यांचे दळणवळणाचे रस्ते साधारण पणे सिमेंट, वॉलपुट्टी पीओपीने वगैरे बंद करा.

तुम्ही जर पापभीरु नसाल तर.....
१. लालहिटची बाटली आणुन त्यांच्या दळणवळणाच्या रस्त्यावर फवारणी करा.
२. लक्ष्मणरेखा म्हणुन एक खडु मिळतो त्याने रेषा मारुन ठेवा.
३. झुरळांसाठी एक ईंजेक्शन मिळते त्याचे ठिपके ठेवा जिथुन मुंग्या निघताना दिसतील. एकात दोन फायदे.
४. एक्स्ट्रीम म्हणजे चटणी बनवु शकता (सिरीयस्ली)
५. फिनाईलचा हायडोस वापरुन घराच्या सगळ्या जमिनी धुवुन काढा. अनायसे दिवाळीची सफाई आलेलीच आहे

किल्ली, मला मुंगीचं नाही माहीत पण रिदीतला डास चावला की मी त्या जागेवर vicks किंवा बाम लावते त्याला. त्यातल्या कापराने डंख मरतो.

मुंगी खाल्ली तर* पुढच्या जन्मी राणी होत असं सांगून कोणाला लहानपणी फसवलय का , बहुतेक आज्जी तिचा बरणीभर साखरांबा वाया जाऊ नये म्हणून सांगत असेल
* हे खाण चुकून पाहिजे

रिदीतला डास चावला की मी त्या जागेवर vicks किंवा बाम लावते त्याला. त्यातल्या कापराने डंख मरतो.
डास चावताना डंख सोडत नाही हो शरीरात. तो पोकळ सोंड खुपसुन रक्त शोषुन सोंड पुन्हा काढुन घेतो.(ईंजेक्शनच्या सुईसारखं)

Pages