घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खिडकीबाहेर शिडी असेल.

किंवा आयर्न मॅन सारखी तरंगत असेल (तारेत नाही म्हटलं मी)

काय हे
भूतासारखं भूत. त्याने आधी दम लागत हाशहुश करत शिडी उचलून घेऊन यायची. मग साडी आणि केस सावरुन खिडकीबाहेर टेकवायची. डुगडुगत नाहीये ना बघायचं. मग साडी सावरत शिडीवर चढायचं. चपला खाली काढून ठेवायच्या. मग खिडकीत डोकावायचं. भूताला काही डिग्नीटी बिग्नीटी हवी का नको?

खिडकीबाहेर केस सोडलेली बाई उभी होती ना? फ्लॅट च्या खिडकीबाहेर कशी उभी राहील?

बाई जमीनीवरच होती. खीडकीत पेरिस्कोप होता.

अरे लोकहो, या म्याड्म पुन्हा आल्या धाग्यावर तर त्यांना वाटेल त्यांच्या खिडकीत भूत दिसलेय लोकांना. आधीच लाल मुंग्यांचा त्रास कमी होता का.

नवीन धागा निघेल:
खिडकीबाहेर प्रचंड प्रमाणात केस सोडून उभ्या असलेल्या बाया झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

ता. क. प्रचंड प्रमाण केसांचे आहे की बायांचे हे ज्या. त्या. ठ.

२०१

बाई दवे टीव्हीवरच्या मुंग्या गेल्या!!
नॅशनल जॉग्राफिक लागलं होतं. त्यातल्या एका सरड्या ने सगळ्या मुंग्या खाऊन टाकल्या Happy

माझ्याकडे क्वचित लाल मुंग्या येतात, मी आधी काळे हिट मारते, त्याने मरतात लगेच. मग उगमस्थान शोधते आणि तिथे लक्ष्मणरेखा ओढते, जो उपाय काही जणांनी आधी सांगितला आहे.

या ताई निदान अधून मधून दार उघडतात. ' बाईचे घर ' वाल्या ताईंच्या बंगल्याबाहेर तर दंगल पेटली आहे आणि त्या एकदाही दिसल्या नाहीत Happy कुलूप लावून गावाला गेल्या बहुतेक.

एकोळी धागा अन त्याला दोनशेच्यावर प्रतिसाद.
दोनशे ओळींचा धागा अन त्याला एकही प्रतिसाद नाही.

बहोत ना इन्साफी हय ये I

Pages