खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@म्हाळसा, सुर्यवंशम पारायण झाले का? >> पाफा, सुर्यवंशम नाही पण काल “तारे जमिन पे” लागलेला.. आम्हाला कुठलाही रडका पिच्चर चालतो Happy

वरती नुसती दावत चालू आहे...
बरेच दिवसांनी बाहेरचा आयता पिझ्झा खाण्याचे सुख लाभले.. यम्म यम्म करत खाल्ला Happy

IMG_20201004_221832.jpgIMG_20201004_221821.jpg

लाडू
IMG-20201004-WA0009.jpg

माझ्याकडे मस्त गरमागरम चहा आहे, पण त्याने कोणी जळणार नाही म्हणून मी फोटो देणार नाही Lol

वरचे सगळे पदार्थ बघून खल्लास झाले

किल्ली..टाकच चहाचा फोटो Lol
आईकडे कालपासून माझ्या फरमाईशीचे पदार्थ सुरु झालेत..पण गप्पाटप्पा आणि खाण्यात गुंग आहे सध्या मी...
फोटो काढून टाकायचे कष्ट नाही करणार.... Lol

क्युटि , . उडीद डाळ आणि थोड्या मेथ्या भिजवून ठेवले 2/3 तास . मग कमी पाणी घालून वाटून घेतले . बॅटर हलके होईपर्यंत चमच्याने फेटून घेतले चांगले . त्यात नंतर मीठ , जिरे , कडीपत्ता , आवडत असल्यास खोबऱ्याचे तुकडे घातले. तळले .

बॉम्बे डक म्हणजे बोंबील ना ? मग त्यात वाटते मग ? डिश तोंपासू दिसतेय.

लावण्या, अश्विनी , अनघा , रुन्मेष ,किट्टू , मृणाली , मयुरी, क्यूटी, दिव्यश्री कल्याणी मस्त फोटोज.

Pages