खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी ताई, ड्रायफ्रूट लाडू करायला पप्पांची मदत घेतलीये मम्मा ने, मिक्सर त्यांनी लावले होते ☺️

आजचा नाष्टा, आलू पालक पराठा

IMG_20201010_095236.jpg

मला पावभाजी फार आवडत नाही.. एखादा दुसरा पाव.. पण फालुदा खूप आवडतो.. खासकरून गोरेगाव साई व्हेज वर्ल्डचा ..बदाम केसर फालुदा..

गुलाबजाम दिसत नाहीयेत Wink
@मानव चहा सुरेख झाला आहे. बाकी 'काळा' चहा? तुम्ही रेसिस्ट दिसता <दिवे घ्या> जस्ट किडिंग

अहो विचारायचं काय.. तडक निघायचं .. पण मास्क घालूनच जेवायचं हं >> आमचे येथे खास घास घेण्याची सोय असलेला फॅन्सी मास्क मिळेल. .. एक पुणेरी पाटी. Happy

१८ लोकांची!
बिर्याणी भारीच दिसते आहे, लोक फोटो काढायच्या आत तुटून पडले म्हणजे फर्स्टक्लास झाल्याची पावती आहे.

Pages