मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
मानव,
मानव,
एक सूचना आहे.
नवसदस्यांना गूढ कोडी सोपी जाण्यासाठी ती उभ्या आडव्या चौकटींत दिल्यास फायदा होतो. आता इथे तसे software नसावे.
समजा कोडे चौकटी आखून वर्डमध्ये केले आणि मग त्याचा jpeg इथे चढवला तर कसे ?
शोधसूत्रे स्वतंत्र लिहीता येतील.
अर्थात तुम्हीच तद्न्य. बघा विचार करून.
चांगली कोडी बनवायला वेळ लागतो
चांगली कोडी बनवायला वेळ लागतो. मी जेव्हा सुचले तेव्हा एक लिहून ठेवतो. सुरवातीला पुर्वीची आठवून दिली होती म्हणून लौकर लौकर दिली. गेल्या वेळेस ९ च दिली, दहावे चांगलेसे सुचत नव्हते.
सांगण्याचे तात्पर्य हे की चौकटीत द्यायची तर उभे आणि आडवे प्रत्येकी दहा हवेत किमान, म्हणजे एकूण २०.
फक्त १० कोडी चौकटीत नीट बसणार नाहीत.
तरी पुढल्या वेळेस बघतो वीस कोडी होत असतील तर चौकटीत देता येतील का ते.
छान,
छान,
12 / 14 अशीही करता येतील
जरा लहान
पण चौकटीत इथे दिले तरी
पण चौकटीत इथे दिले तरी चौकटीचा उपयोग व्हायला सोडवणाऱ्यांना कागद पेन्सिल घेऊन ती चौकट कागदावर काढुन सोडवावे लागेल, तर त्याचा फायदा.
एवढं कोण करेल?
ते ही खरेच !
ते ही खरेच !
याचे सॉफ्टवेअर अवघड असते काय
नाही, पण तशी सोय माबोवर देणे
नाही, पण तशी सोय माबोवर देणे म्हणजे माबोचे सॉफ्टवेअर।बदलणे, ते सोपे नसावे.
>> गूढ कोडी सोपी जाण्यासाठी
>> गूढ कोडी सोपी जाण्यासाठी ती उभ्या आडव्या चौकटींत दिल्यास फायदा होतो. आता इथे तसे software नसावे.
खूपच चांगली कल्पना आहे. बसल्या बसल्या यावर थोडा शोध घेतला.
१. शब्दकोडी बनवायला मदत करणाऱ्या ऑनलाईन वेबसाइट्स आहेत. त्यांनी सोपे केले आहे. प्रत्येक ओळीत एक असे शब्द द्यायचे आणि प्रत्येक शब्दानंतर त्या ओळीत त्या शब्दासाठीची हिंट द्यायची. असे दहाबारा शब्द देऊन सबमिट केले कि कोडे बनवून मिळते
ज्याची लिंक आपण शेअर करू शकतो. पण समस्या एकच आहे कि या साईट्स अद्याप इंग्लिश आणि इतर युरोपियन भाषांसाठीच मर्यादित आहेत. मराठी/हिंदी शब्द दिले तर काहीतरी विचित्र (म्हणजे अक्षर एका चौकटीत आणि काना/मात्रा/वेलांटी पुढच्या चौकटीत) प्रकार होतो. थोडक्यात, आपल्या भाषांसाठी अजून अशी साईट निदान मला तरी आढळली नाही. बनवावी लागेल.
२. गुगल शीट्स वापरून मराठी शब्दकोडी बनवता येऊ शकतात (आपण पेपर मध्ये पाहतो तशी). त्याची लिंक सर्वांशी शेअर करता येते व सोडवणाऱ्यांना ती आपापले गुगल लॉगीन वापरून किंवा न वापरता सुद्धा ती सोडवता येतील. इथे समस्या अशी आहे कि शब्दकोडी बनवणाऱ्याच्या दृष्टीने हे तसे खूप क्लिष्ट आहे. गुगल ने तसे टेम्पलेट दिलेले नाही. बनवता येते का माहिती नाही. टेक्नोसाव्ही किंवा सॉफ्टवेअर मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हे तुलनेने सोपे आहे पण वेळखाऊ आहे.
अजून काही सोपा मार्ग सापडला तर शेअर करतो.
अतुल,
अतुल,
धन्यवाद.
manogat.com वर चौकटींची मराठीत संगणकीय प्रणाली असून ती सुंदर आहे. ऑनलाईनच सोडवता येते. पुन्हा सोडविणाराच स्व-परीक्षक. अक्षर बरोबर/चूक नुसार दोन रंग उमटतात.
गूढ कोडी सोपी जाण्यासाठी ती
गूढ कोडी सोपी जाण्यासाठी ती उभ्या आडव्या चौकटींत दिल्यास फायदा होतो. >>>> हे कसे काय? कळले नाही.
गूढकोड्यात दिलेल्या शोधसूत्रातील शब्द समूहांचा अर्थ लावणे (अपेक्षित शब्दाचा समानार्थी, अपेक्षित शब्दाचे वर्णन करणारे तुकडे, सरमिसळ / जोडतोड कृतीसाठी हिंट) याने उत्तर मिळते.
चौकटीतल्या कोड्यात शब्द + शोधसूत्र + छेदणार्या शब्दांतील सामायिक अक्षरे --- याची मदत होते.
चौकटी वापरल्या तर मग गूढकोड्यातील शब्दही असे निवडावे लागतील, ज्यात सामायिक अक्षरे असतील ?
कोडे रचायला वेळ लागेल. की मी चुकतेय समजण्यात ?
कारवी
कारवी
बरोबर. समाईक घ्यावे लागतील.
इथे एक चक्कर टाका.
http://www.manogat.com/node/24466
नवसदस्यांना सोपे जाते.
>> manogat.com वर चौकटींची
>> manogat.com वर चौकटींची मराठीत संगणकीय प्रणाली असून ती सुंदर आहे.
कुमार सर, आत्ताच मी पाहिली तिथे काही आधीच बनवलेली कोडी. खूपच छान. मला हे माहित माहित नव्हते. अशी सोय मायबोलीवर सुद्धा द्यायला हरकत नाही. पण नवीन कोडे बनवताना ते कसे बनवतात त्याबाबत मला तिथे कुठे सुविधा दिसली नाही.
नवीन कोडे बनवताना ते कसे
नवीन कोडे बनवताना ते कसे बनवतात >>> ते मलाही गूढ आहे.
कदाचित ते काम संपादक करत असावेत.
तेरा वर्षांपूर्वी मी जेव्हा
तेरा वर्षांपूर्वी मी जेव्हा ती प्रथम मनोगतवरती पाहिली तेव्हाचा अनुभव सांगतो.
सुरुवातीला पूर्ण बधीरून जायचे ! जाम सुधरायच नाही. नंतर जसा अनुभव येत गेला, तसे मग सुटलेल्यां एका शब्दाचा अन्य शब्द शोधताना जो काही फायदा होतो, तो नवीन माणसाला हवाहवासा वाटतो.
>> कदाचित ते काम संपादक करत
>> कदाचित ते काम संपादक करत असावेत.
कदाचित हो. तसा उल्लेख आहे तिथल्या एका प्रश्नाच्या उत्तरात. अर्थात त्याला सुद्धा सात वर्षे झालीयेत.
योगायोगाने मी सुद्धा तेरा वर्षांनी आज लॉगीन झालो तिथे, ते सुद्धा या निमित्ताने
तेरा वर्षांनी आज लॉगीन झालो
तेरा वर्षांनी आज लॉगीन झालो तिथे, >>>
बिगर सभासदालाही कोडी सोडवता येतात, हाही फायदा.
मी सभासद नाही तिथे.
http://www.manogat.com/node
http://www.manogat.com/node/24466
नवसदस्यांना सोपे जाते. >>>>> आले लक्षात. नेहमीचे शब्दकोडे + गूढकोडे एकत्र.
पण त्याला सॉफ्टवेअर मधील जाणकार / बदल लागेल. वेमांना विचारावे लागेल हे किती सोपे / कठीण असेल तांत्रिकदृष्ट्या. सध्या आहे तेच चालू ठेवू.
व्यसनी लोकांना काय माल मिळाल्याशी मतलब.
मला (व्यक्तिशः) धडपडून उत्तर शोधायला जास्त आवडते. सोपे झाले, उत्तर हातात मिळाले की चार्म कमी होतो.
*****हिंदी गाणी गूढ कोडी*****
*****हिंदी गाणी गूढ कोडी******
सहा हिंदी गाणी ओळखायची आहेत.
त्या गाण्यांच्या मधल्याच कुठल्यातरी ओळींच्या शब्दांची भेळपुरी केली आहे. सगळे शब्द लागतील तितके दिलेत म्हणून कधी कधी एकापेक्षा जास्त आहेत. सगळी गाणी अत्यंत प्रसिद्ध आणि कर्णमधुर आहेत. कोडेबाज मित्रमंडळींना ध्रुव पद/गीताचे शीर्षक ओळखायचे आहे किंवा ज्या ओळीने हे गाणे प्रसिद्ध आहे ती ओळ.
उदाहरण ::
मिलनेका नहीं किसीसे उसपार इकरार
गायक मुकेश शीर्षक/ मुख्य शब्द दोन..
उसपार किसीसे मिलनेका इकरार नहीं
ही रचना आधी शोधून मगं गाण्याची मुख्य ओळख जसे ह्या "आवारा हूं" ह्या मुकेश यांच्या गाण्यातील ओळी आहेत, हे तुमचे उत्तर राहील. गायक व शीर्षकातील शब्दसंख्या दिलेली आहे.
काही हिंट व क्रमासाठी पण क्रम महत्त्वाचा नाही.
१. रफी तीनच शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
२. आशा पाच शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
३. लता तीन शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
४. किशोरदा चार शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
५. मुकेश चार शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
६. रफी तीन शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
******
यात मोहम्मद रफी यांची दोन , लताजींचे एक , आशाजींचे एक , मुकेश यांचे एक व किशोरदा यांचे एक ( रंगीत फक्त हेच
) अशी एकुण सहा गाणी आहेत. बऱ्याच जणांना गाणी पाठ असतात म्हणून हे गूढ कोडे केले आहे तर खाजवा डोके आणि करा सुरू मनात गुणगुणायला
.
जीवन अनजाने हैं बाहें तू दिवाने हलचल नादान झबान किनारे जो मुस्कुराहे मची गलेमे रोले समझो जों राह में हर सायों जारजार वतन डेरा जगह पुछे का डालकर राहों बैठ समझो की समझो हम हैं में
*************
३. लता तीन शब्द ज्याने गाणे
३. लता तीन शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे. -गलेमे रोले जारजार
बाहें गले में डाल के हम रो ले जारजार
लग जा गले के फिर यह हंसी रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो
लग जा गले
अस्मिता अजून थोडे सांगा कि
अस्मिता अजून थोडे सांगा कि काही..
बरोबर भरत .
बरोबर भरत .
लता तीन शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे. .. पण ते मी लग जा गले असे शीर्षक गृहीत धरले होते.
अजून मला नाही गं सांगता येणार
अजून मला नाही गं सांगता येणार , गाणंच येईल मगं
जार जार शब्द असलेलं दुसरं
जार जार शब्द असलेलं दुसरं गाणं नसावं म्हणून आलं.
, तुम्हाला सगळीच कोडी चटकन
प्रत्येक ओळीतले किती शब्द
प्रत्येक ओळीतले किती शब्द दिलेत? लग जा गलेतल्या त्या ओळीतले बाहें पण दिसले आता.
---------
कोई हमद म न रहा आहे का?
---------
एकाक्षरी शब्दांचा उपयोग नाही.
प्रत्येक ओळीतले किती शब्द
प्रत्येक ओळीतले किती शब्द दिलेत? लग जा गलेतल्या त्या ओळीतले बाहें पण दिसले आता.
---------
कोई हमद म न रहा आहे का?
---------
एकाक्षरी शब्दांचा उपयोग नाही.
भेळीतले शब्द रिपीट होणार का?
भेळीतले शब्द रिपीट होणार का?
उदा -- भरतनी लतासाठी "गलेमे रोले जारजार" हे ३ उचलले.
पण भेळीत बाहे // डालकर पण आहेत ---- जे त्या गाण्यात आहेत.
मग सगळे ५ शब्द बाद झाले का?
की बाकीच्या गायकांसाठी ते ५ ही पुन्हा वापरता येतील?
की गलेमे रोले जारजार -- हे ३च बाद झाले, आता उरलेली भेळ वापरायची?
४. सागर किनारे दिल ये पुकारे
४. सागर किनारे दिल ये पुकारे
तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है
हो सागर किनारे
सागर किनारे दिल ये पुकारे
३. लग जा गले लता मंगेशकर
३. लग जा गले लता मंगेशकर
बाहें गलेमें डालकर हम रोले जारजार
हे बाद झाले आता उरलेले घ्या.
पुरेसे शब्द दिलेत कारवी....
1 जीवन ने मची हलचल हे शब्द
1 जीवन ने मची हलचल हे शब्द
दिवाना हुआ बादल हे गाणं
चूक कुमारसर. ते नाही यात. पण
चूक कुमारसर. ते नाही यात. पण कदाचित माझंच चुकले काय की.... पण तुम्ही इतर गाण्यांचे शब्द वापरले तर उरलेली गाणी नाही तयार होत.
Pages