मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
८ भोगवटा
८ भोगवटा
६. टोपीवाल्या दशकाचा = दही
६. टोपीवाल्या दशकाचा = दही (१० वर वेलांटी)
दहीभात - प्रसाद
हिंदी ... विपरीत.... दही
५ . लखपती >>>> बरोबर कुमार
५ . लखपती >>>> बरोबर कुमार सर
६ इंग्लिश >>>> चूक श्रवु..... आणि फोड काय द्याल उत्ताराची ? ६ इंग्लिश कसे?
2. सुरापान ? >>>>> नाही हो.... मी दारू 'वाढवायला' सांगितली ना..... प्यायला नाही. सूर नीट लावा.... बदलू नका
डोक्यात गुलाबजाम येतयं , जाम मुळे.... >>>> नाही अस्मिता.... कुमार सर बरोबर जाताजाता वळले अचानक
८ भोगवटा >>>> चूक श्रवु.....
८ भोगवटा >>>> चूक श्रवु..... आणि फोड काय द्याल उत्ताराची ? ८ भोगवटा चे स्पष्टीकरण काय?
दिलेल्या क्यूवरून उत्तराचा शब्द कसा जुळवलात तेही सांगायचे आहे फोड करून. आधीची उत्तरे बघा संदर्भ म्हणून
@ कुमार सर ---
६. टोपीवाल्या दशकाचा = दही (१० वर वेलांटी) >>>> इथवर बरोबर
दहीभात - प्रसाद >>>> चूक
हिंदी ... विपरीत.... दही >>>> नाही ही फोड चूक
पण जवळ आहात....
एक गूढकोडे ---
एक गूढकोडे ---
स्पष्टीकरणासह उत्तरे द्यायची आहेत. सगळे शब्द ४ अक्षरी.
काही फक्त शोधसूत्रे आहेत. काहीत शोधसूत्रे + अपेक्षित शब्दाचा समानार्थी शब्दही आहे.
१ सुंदर अचानक उभे ठाकणारे मायबोलीकर
२ दारू भरल्या गोळ्याने लावलेला सूर खाऊ (गोळाच आहे गळा नाही)
३ .......
४. ......
५. .......
६ टोपीवाल्या दशकाचा प्रसाद ...विपरीत अमराठी रंगाचा ? दही??
७ गोड गाणारे विलायती ढवळ्या पवळ्या
८ बोलीभाषेचा ओढलेला सूर वाटपाच्या साधनावर वृथाच फिरून गेला
९ निष्पाप स्वररचनेला घेरून निवडून वेचून स्वच्छ कर
१० -----
९. निरागस
९. निरागस
स्वररचना : राग ,
निवडून वेचून स्वछ कर = निस
(उदा: तांदुळ निसणे - ग्रामीण)
राग ला निस ने घेरून नि{राग}स
६ दहीवडा ?
६ दहीवडा ?
6. दहीकाला
6. दहीकाला
दाही... दही,प्रसाद
काला..अमराठी रंग
८ हकनाक ?
८ हकनाक ?
श्रवु नव्याने सोडवताय ना?
श्रवु नव्याने सोडवताय ना?
तुम्ही उत्तरामागचा विचार प्रवास लिहा. कुमार सर / भरत यांनी दिलाय तसा.
मग मी किंवा दुसरे कोणी सुचवेल काय दिशेने कसे जातात गूढकोड्यासाठी.
शब्द मागेपुढे जोडणे, तोडून एकमेकात गुंफणे, काना / मात्रा / वेलांटी उडवणे किंवा नव्याने जोडणे, अर्धा शब्द मराठी थोडा हिंदी / इंग्रजी अशा खूप तर्हेने रचना बदलते.
९. निरागस >>>> बरोबर !
श्रवु --- मानव यांचे स्पष्टीकरण पहा उदाहरण म्हणून
८ हेलपाटा
८ हेलपाटा
बोलीभाषेचा ओढलेला सूर = हेल
वाटपाचे साधन = पाटा
वृथा फिरुन जाणे = फुकटची झालेली खेप = हेलपाटा
६ दहीवडा ? >>>> चूक
६ दहीवडा ? >>>> चूक
6. दहीकाला >>>> बरोबर !
दहीकाला = प्रसाद
टोपीवाले दशक = दही
दह्याचा विपरीत (पांढर्याच्या उलट) रंग अमराठी ( हिंदी) भाषेत = काला
८ हकनाक ? >>> चूक
८ हेलपाटा >>>> उत्तर + फोड, बरोबर ! कविन
१ राजदत्त ? राजस + दत्त
१ राजदत्त ?
राजस + दत्त
एक गूढकोडे ---
एक गूढकोडे ---
स्पष्टीकरणासह उत्तरे द्यायची आहेत. सगळे शब्द ४ अक्षरी.
काही फक्त शोधसूत्रे आहेत. काहीत शोधसूत्रे + अपेक्षित शब्दाचा समानार्थी शब्दही आहे.
१ सुंदर अचानक उभे ठाकणारे मायबोलीकर
२ दारू भरल्या गोळ्याने लावलेला सूर खाऊ (गोळाच आहे गळा नाही)
७ गोड गाणारे विलायती ढवळ्या पवळ्या
संपवा पटकन.... ३च राहिली.....२.५ खरे तर.... दुसरे थोडे उलगडले आहे
१ राजदत्त ? >>>>> थोडे
१ राजदत्त ? >>>>> थोडे बरोबर..... फोड?
राजदत्त माबोकर आयडी आहे ? बघितलेला नाही आठवत
हो कारवी माझ्यासाठी हे सगळं
हो कारवी माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे.. आता मराठी शिकतेय..
७. बुलबुल
७. बुलबुल
७ गोड गाणारे - बुलबुल
विलायती बैलांची जोडी बुल + बुल
७. बुलबुल >>>> बरोबर!!
७. बुलबुल >>>> बरोबर!!
आता १ आणि २ पण सांगा...... तुम्हीच अर्धी उकल केलेलीच आहे
१ सुंदर अचानक उभे ठाकणारे मायबोलीकर >>>> राजदत्त नाही
२ दारू भरल्या गोळ्याने लावलेला सूर खाऊ (गोळाच आहे गळा नाही) >>>> रसगुल्ला नाही
पण प्रयत्न दिशा योग्य होती.
१ अचानक उभे ठाकणारे – दत्त
१ अचानक उभे ठाकणारे – दत्त
मायबोलीकर = राज आहेत !
१ राजदत्त ऐवजी दत्तराज असावे
१ राजदत्त ऐवजी दत्तराज असावे ते
दत्तराज आयडी आहे. बाकी वर फोड केलेय तसच
२ रसबुंदी असते का ?
२ रसबुंदी असते का ?
अर्धा मायबोलीकर + अर्धा दत्त
अर्धा मायबोलीकर + अर्धा दत्त नाही......
अर्धा ??? + अर्धा दत्त = मायबोलीकर
१च्या थोड्या शोधसूत्राला विसरताय तुम्ही?
२ रसबुंदी असते का ? >>> नाही. रसमलाई / अंगूरमलई असते
तुमची रसगुल्ला उत्तराची फोड घेणे + सूर न बदलता नीट लावणे + दारूचे प्रमाण वाढवणे
तसाही खाऊ रसाळ बिसाळ नाहीये. नाजूक आहे. निगुतीचा आहे. पाक कौशल्याचा तर आहेच आहे.
चारुदत्त ?
चारुदत्त ? रामतीर्थकर
१च्या थोड्या शोधसूत्राला
१च्या थोड्या शोधसूत्राला विसरताय तुम्ही?>> सुंदर हे सापेक्ष असते म्हणून विसरतेय
पिजे होता हा. शोधते परत
चारु सुन्दर
चारु ( सुन्दर ) + दत्त
दारू भरलेला गोळा : फटका,
दारू भरलेला गोळा : फटका, बॉम्ब या दिशेने?
बारुद / सुरुंग लावावा काय ?
बारुद / सुरुंग लावावा काय ?
स्फोटक चर्चा चालली आहे
स्फोटक चर्चा चालली आहे
चारूदत्त आवडले.
१ . चारुदत्त >>>> चारु (
१ . चारुदत्त >>>> चारु ( सुन्दर ) + दत्त >>>> नक्कीच
--- प्रश्न अर्धा वाचून वरून सापेक्षता सिद्धांत? कुठला पक्ष म्हणायचा?
@ कविन
१ बरोबर का नाय ?
१ बरोबर का नाय ?
Pages