शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्काय >>> नाही,
इतके उंच नको. जरा आवाक्यातलेच.... फिरायला जातो की तिथे !

2 /3 बीच? बोट?
4/ 5 पेच? कोंडी
6/7 माल? >>>
सर्व नाही.
२ +३ : अन ते इंग्रजांचे एक आडनाव पण हाय !

मंडळी,

संपूर्ण शब्दात फक्त २ वेलांट्या.
बाकी सगळे सपाट.... !
.....
आता भेटू १० तासांनी. शुभेच्छा !

हिल

• सहावे व सातवे मिळून धनासंबंधी शब्द आहे.

आता पहिलटकरीण हे उत्तर बरोबर की चूक हे उद्याच कळेल.

मानव,
छानच !
बरोबर
नंतर लिहितो
४,५ चे स्पष्टीकरण ?

बरोबर!
रीण = कर्ज देणे .
सर्वांचे प्रयत्न उत्तम .
धन्यवाद

हिल पर्यंत आले... बाकी नाही सुचले.
टक = संकट माहीतच नव्हते. उदाहरण दिलेय कोशात? बघते एकदा.
सरांसारखे मानव पण कोश-प्रवीण झाले.

खूप दिवसांनी एक गूढकोडे मी देते ---

स्पष्टीकरणासह उत्तरे द्यायची आहेत. सगळे शब्द ४ अक्षरी.
काही फक्त शोधसूत्रे आहेत. काहीत शोधसूत्रे + अपेक्षित शब्दाचा समानार्थी शब्दही आहे.

१ सुंदर अचानक उभे ठाकणारे मायबोलीकर
२ दारू भरल्या गोळ्याने लावलेला सूर खाऊ (गोळाच आहे गळा नाही)
३ सगळे किंतु गिळून बाजार काबीज करणारी फिरंगी जीत
४ लुसलुशीत पाणीदार फळ लाडवागत करण्यापूर्वी मार
५ दुर्जन नवरा स्वभाव पालटल्यावर श्रीमंतही होतो आपोआप
६ टोपीवाल्या दशकाचा प्रसाद ...विपरीत अमराठी रंगाचा ?
७ गोड गाणारे विलायती ढवळ्या पवळ्या
८ बोलीभाषेचा ओढलेला सूर वाटपाच्या साधनावर वृथाच फिरून गेला
९ निष्पाप स्वररचनेला घेरून निवडून वेचून स्वच्छ कर
१० निवडणुकीत जिंकण्याचे कारण स्निग्धांशयुक्त समुद्रप्रेमी वारे

१० निवडणुकीत जिंकण्याचे कारण स्निग्धांशयुक्त समुद्रप्रेमी वारे - मतलई

निवडणु कीत जिंकण्याचे कारण - जास्त मते - मत लई

जमिनीकडून समुद्राकडे जाणारे वारे

स्निग्धांश - मलई

कारवी,
टक (प्राकृत) = संकट.
...............
२. तोफखाना ?

३. विपणन
पण = किंतु,
विन = फिरंगी जीत
विपणन = बाजारात खपवणे

जास्त मते - मत लई

स्निग्ध: मलई त्यातील अंश स्निग्धांश = लई असावे.

१० - मतलई >>>>> बरोबर भरत, मानव.... Happy

@कुमार सर
२. तोफखाना ? >>>>> नाही हो. एकदम नाजूक खाऊ आहे.
टक (प्राकृत) = संकट >>>> माहीत नाही अजिबातच. वाक्यात उपयोग कसा होतो / होत होता बघावे लागेल.

४. ताडगोळा >>>> बरोबर देवकी Happy

@ कविन --- परवीन नाही, फोड बरोबर पण शब्द चूक.... किंतु गिळायचा होता
कुमार सरांनी गिळला बरोबर.....
३. विपणन >>>> बरोबर

ओके मानव.... वाटत नाही उरेलसं.... ३ तर झटपट गेली.

एक गूढकोडे ---
स्पष्टीकरणासह उत्तरे द्यायची आहेत. सगळे शब्द ४ अक्षरी.
काही फक्त शोधसूत्रे आहेत. काहीत शोधसूत्रे + अपेक्षित शब्दाचा समानार्थी शब्दही आहे.

१ सुंदर अचानक उभे ठाकणारे मायबोलीकर
२ दारू भरल्या गोळ्याने लावलेला सूर खाऊ (गोळाच आहे गळा नाही)
३ .......
४. ......
५ दुर्जन नवरा स्वभाव पालटल्यावर श्रीमंतही होतो आपोआप
६ टोपीवाल्या दशकाचा प्रसाद ...विपरीत अमराठी रंगाचा ?
७ गोड गाणारे विलायती ढवळ्या पवळ्या
८ बोलीभाषेचा ओढलेला सूर वाटपाच्या साधनावर वृथाच फिरून गेला
९ निष्पाप स्वररचनेला घेरून निवडून वेचून स्वच्छ कर
१० -----

2. रसगुल्ला
गुल = दारू भरल्या गोळ्याने
ल्ला लावलेला
स = सूर

५ दुर्जन नवरा स्वभाव पालटल्यावर श्रीमंतही होतो आपोआप
दुर्जन नवरा - खल
पालटल्यावर > लख
लखपती

Pages