शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ शब्द : अंग
त्याचे सर्व अर्थ एकत्रित :

भाग, प्रवृत्ती , मदतनीस, मेद, आकलनशक्ती,
कर्तृत्वसंबंध, वशिला.
(शब्दरत्नाकर मधून )

छान.
मी अंग पर्यन्त पोचलो होतो.
पण त्याचे मेद आणि वशिला या अर्थी संदर्भ सापडले नाहीत, म्हणुन अजून शोधत होतो.

एक सात अक्षरी शब्द ओळखा.

• त्यातील दुसरे व तिसरे अक्षर मिळून एका इंग्लिश शब्दाचा मराठी उच्चार आहे,
• चौथे व पाचवे अक्षर मिळून कठीण प्रसंगासाठीचा शब्द होतो,

• सहावे व सातवे मिळून धनासंबंधी शब्द आहे.
• संपूर्ण शब्द स्त्रीलिंगी आहे

कोडी कठीण होत चाललीत हळूहळू !! पण असू देत.... प्रयत्न करायला मजा येते.

चौथे व पाचवे अक्षर मिळून कठीण प्रसंगासाठीचा शब्द होतो, >>>>> बाका ?

बाका >>> नाही.

पहिल्या अक्षराची काही हिंट >>>
आता भरपूर दिल्यात की !
नंतर बघू Bw

नवीन Submitted by मी_अस्मिता on 2 October, 2020 - 18:59 >>>> Happy मी बरी आहे अस्मिता. लॅपटॉपची दुरूस्ती निघाली. जुना असल्याने स्पेअर्स मिळायला वेळ लागला. तसाही माझा धूमकेतू पॅटर्न आहे इथे यायचा. काही दिवस सलग येणे होते .... मग अधूनमधून वाचनमात्र / पूर्ण गायब.

विघ्न
बाधा >>> दोन्ही नाही.

धूमकेतू पॅटर्न ... Happy >> +१

माया? >>> नाही.
जरा ग्रामीण ढंगाचा.

पैशाच्या व्यवहारातील !

• सहावे व सातवे मिळून धनासंबंधी शब्द आहे. >>>>> जरा ग्रामीण ढंगाचा. + पैशाच्या व्यवहारातील ! >>>>
पैका / टका / बाकी / रोखी / व्याजी

पैका / टका / बाकी / रोखी / व्याजी >>> नाही. प्रयत्न छान.

दुसरे व तिसरे अक्षर मिळून एका इंग्लिश शब्दाचा मराठी उच्चार >>>
हा इंग्लीश शब्द निसर्गचित्रात बऱ्याचदा दिसतो.

ग्रास , मराठीत घास , इंग्रजी गवत /हिरवळ >>>
नाही.
इग्लिश उच्चार फक्त देवनागरीत लिहिलेला. ( उदा. सन, मून ).

बर्ड /
पाथ/ >>>
नाही. पण जरा मान वर करुनच पाहू !

Pages