शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनारसा
अनार भुईनळा
सा सूर
काही केलयं

दारू भरलेला गोळा : फटका, बॉम्ब या दिशेने?
बारुद / सुरुंग लावावा काय ?
स्फोटक चर्चा >>>>>

मानव, अस्मिता ---
कुमार सरांनी गुल रचला..... दारू वाढवा म्हणाले तर सुरापान म्हणाले. आता सुरूंग उडवतायत.
सुवर्णमध्य गाठा बंधु -- भगिनींनो...... उत्तर द्या ..... कोडे संपवा........आतषबाजी करू या

१ . चारुदत्त >>>> बरोबर !!
२. अनारसा >>>>> अस्मितांनी न बघता बॅट फिरवली .... पण कोडे सीमापारही केले......

@ कविन --- फोड बरोबर....
कुमार सर, मानव, अस्मिता कविन --- एकसाथ बिंगो

छान होते कोडे. सर्वांचे अभिनंदन !
मुख्य म्हणजे गेले तीन तास त्याच्यामुळे मी त्या बोकांडी बसलेल्या विषाणूला डोक्यातून पूर्ण हद्दपार करू शकलो. अगदी प्रसन्न वाटले !
बाकी आपण सारे या धाग्याचे पक्के व्यसनी आहोत आणि हे व्यसन जितके वाढेल तितके मेंदूला चांगलंच आहे.
धन्यवाद !!!

Happy मस्तच खेळले सगळे....... ३ तासात सुफळ संपूर्ण !!!!!

१ सुंदर अचानक उभे ठाकणारे मायबोलीकर --- चारूदत्त
२ दारू भरल्या गोळ्याने लावलेला सूर खाऊ (गोळाच आहे गळा नाही) ---- अनारसा
३ सगळे किंतु गिळून बाजार काबीज करणारी फिरंगी जीत ------ विपणन
४ लुसलुशीत पाणीदार फळ लाडवागत करण्यापूर्वी मार ---- ताडगोळा
५ दुर्जन नवरा स्वभाव पालटल्यावर श्रीमंतही होतो आपोआप ----- लखपती
६ टोपीवाल्या दशकाचा प्रसाद ...विपरीत अमराठी रंगाचा ? ---- दहीकाला
७ गोड गाणारे विलायती ढवळ्या पवळ्या ---- बुलबुल
८ बोलीभाषेचा ओढलेला सूर वाटपाच्या साधनावर वृथाच फिरून गेला ----- हेलपाटा
९ निष्पाप स्वररचनेला घेरून निवडून वेचून स्वच्छ कर ---- निरागस
१० निवडणुकीत जिंकण्याचे कारण स्निग्धांशयुक्त समुद्रप्रेमी वारे ---- मतलई

बाकी आपण सारे या धाग्याचे पक्के व्यसनी आहोत आणि हे व्यसन जितके वाढेल तितके मेंदूला चांगलंच आहे.+1
रहावतच नाही.
मजेची चटक , thanks कारवी Happy

मला तर काही येतच नाही.. पण मी मधेमधे येऊन लुडबुड करत असते.. पण मला आवडते.. नवीन नवीन शब्द .. शब्दरचना शिकायला मिळतेय..

छान होतं कोडं, मला सगळ्यात सोप्पं तेवढं आलं. नवे भिडू मैदानात आलेले पाहून छान वाटतंय.

अंग उत्तर असलेलं कोडंही भारी होतं.

खरय..... रचायला / सोडवायला.... दोन्हीला मजा येते. डोके ताजेतवाने होते.
कोड्याचे व्यसन लागते नक्की..... आधी मी आद्यक्षरावरून गाणे ओळखा कोड्यात असायचे. हल्ली बंद झाले. मग इथे यायला लागले.

श्रवु तुम्ही फोड लिहीलीत ना तर दिशा देता येते.....
उत्तर चूक तर चूक...... इथे कोण एक्स्पर्ट आहे?
सगळे मजाच करतात..... येत जा जरूर.

>> अनार = दारुगोळा भरलेला फटाका

हा संदर्भ कुठून घेतलाय कळेल का? माझ्या माहितीनुसार अनार हा मुख्यत्वे डाळिंब साठी प्रतिशब्द आहे (मूळ शब्द हिंदी किंवा संस्कृत असेल)

काहीजण अनारला पाऊस म्हणतात. गोल किंवा शंकुच्या आकाराचं असतं आणि त्याला आग लावली की अग्निशलाकांचं कारंज उडतं ते.

उत्तर चूक तर चूक...... इथे कोण एक्स्पर्ट आहे?
सगळे मजाच करतात..... येत जा जरूर.>> अगदी. मी ही नव्यानेच यायला लागलेय इथे. पण कोडी सोडवायला मजा येते.

भुईचक्र नाही. झाडा सारखेच उडणारे, कोनिकल झाडापेक्षा हे स्फेरिकल झाड (अनार) जरा जास्त प्रखर असते आणि जास्त वेळ चालते.

आम्ही भुईनळाच म्हणतो , आणि भुईचक्र ...अनार हिंदी वाटतो , नसेलही.
जमीन सोडत नाही Happy
कुणाचे तयार नसल्यास मी करते उद्याचे कोडे !!

Pages