अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा एक प्रसंग आठवला, मागच्या वर्षीचा.
मला माहेर आणि सासर दोन्ही दूर,आम्ही फ्लाईट/ट्रेन किंवा बसने जायचं म्हटलं तरी लगेज सांभाळा,मुलांना सांभाळा त्रासदायक आणि खर्चिक पण.
मग आधीची सेकन्ड हैन्ड घेतलेली कार विकून आम्ही दूरच्या प्रवासासाठी म्हणून नवीन कार घेतली.
आणि आम्ही होसुर हून, सासरी गुंटुरजवळ गावी जायला निघालो पहिल्यांदा कारने, अंतर 750किमी.
पहाटे 5.30 ला निघालो, गुगल अम्माच्या मदतीने.
कर्नुल पर्यंत अगदी हाय वे ने वेगात गेलो. 2वाजता पोचलो.
3वाजता शॉटकर्ट म्हणून, नल्लामल्ला फोरेस्टमधुन आत शिरलो. सिंगल मातीचा रस्ता. रहदारी नाहीच.
तुरळक मोठीमोठी वाहने येत होती, त्यावेळी कार पुर्णपणे रस्त्याच्या कडेला घेऊन गाड्यांना जागा द्यावी लागत होती.
एक तास झाला, दोन तास झाले, मातीचा रस्ता संपेचना,कुणी माणूस दिसेना,एखादे होटेल पण दिसेना. मुलगी दिड वर्षांची तीही त्रास देऊ लागली.
पुढे 30-40 घरे दिसली, काही माणसे दिसली. मनात आले, कार थांबवून लुटणारे तर नसतील ना.
मला जाम टेन्शन आले होते पण काही बोलले नाही, नवरा एकटाच पहाटेपासून ड्रायव्हिंग करत होता.
तब्बल साडेतीन तासांनतर आम्ही त्या जंगलातून बाहेर पडलो.पुढचा रस्ता हि छोट्या छोट्या गावांतून होता,जपून गाडी चालवावी लागत होती.लंचनंतर आम्ही कुठेही थांबलो नव्हतो.
शेवटी रात्री 9.30वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनाही दिवसभर काळजी लागली होती.
त्यानंतर मला कुणीही विचारले प्रवास कसा झाला कि मी हा किस्सा सांगायचे.
मुलगा मला चिडवायला लागला, आम्मा सब को नल्लामल्ला फोरेस्ट,नल्लामल्ला फोरेस्ट बताती है।

हो चकवाच. तुम्ही कार मध्ये सगळे बसला होतात म्हणून शेवटी तुम्हाला रस्ता दिसला. उभे असता तर अजुन कितीवेळ फिरत राहिला असता कुणास ठाऊक.

नंतर पुन्हा जानेवारी त आम्ही गावी गेलो होतो पण नल्लामल्ला फोरेस्टमधुन न जाता , हाय वे ने गेलो.
सकाळी 6 ला निघून संध्याकाळी5.30 ला पोहोचलो.

चकवा नाही लागला. Proud

श्रीशैलमवरून हैद्राबादला परतताना एकदा आम्हालापण चकवा लागला होता. गुगल मॅपने भलते वळण घ्यायला लावले आणि आम्ही भलत्या रस्त्याला लागलो. हा गुगल मॅप चकवा होता. फिरत फिरत पुढे नल्लामला जंगल लागले, त्यातून पुढे बाहेर पडलो आणि कर्नुल हैद्राबाद हाय वे वरील भूतपुर या गावी पोचलो. तिथुन हायवे ने घरी आलो. तीन तास वाया गेले. रस्त्यात एका बाबाने आमच्या गाडीला लिंबू मिरची लावून धूप सोडला होता म्हणुन थोडक्यात बचावलो असू.

एकंदरीतच चकव्यामुळे भरपूर लोक्स हैराण झालेले दिसताहेत. चकवा लागणार हे कसं ओळखायचं आणि चकवा लागलाच तर ते ओळखून त्याच्या तावडीतून कसं सुटायचं याच्या टिप्स लवकरच मी इथे टाकणार आहे.

.

करे हे काय
धागा पण झपाटला.मला नुसताच डॉट दिसतोय.
लिहिलेले दिसतच नाहिए.

आम्हाला वेताळ टेकडीवर चकवा लागला होता. संध्याकाळी ६:३० - ७:०० ची वेळ असेल. मला व मित्राला खाली उतरण्याचा मार्गच सापडतं नव्हता. साधारण एक दीड तास नुसताच इकडे तिकडे फिरत होतो परंतु खाली उतरण्याचा मार्गच दिसत नव्हता. शेवटी दमून एक दगडावर बसलो आणि समोरच गोखले नगरच्या बाजूने उतरण्याचा मार्ग दिसला. तो मार्ग अगदीच समोर होता पण आधी आम्हाला तो दिसलाच नाही... जितका वेळ चढायला लागला नाही त्याच्या दुप्पट वेळ परतीचा मार्ग शोधण्यात गेला ..

टेकडी वेताळ आणि निभावलं फक्त चकव्यावर. नशीबच म्हणायचं.

आपण खाली बसलो तरी आपले डोके/डोळे आपल्या कमरेच्या वरच असतात. याचा अर्थ चकव्याचा प्रभाव हा जमीनी पासून मनुष्याच्या कमरे एवढ्या उंची पर्यन्त म्हणजे जमिनीपासून साधारण ३ फूट उंची पर्यन्त असावा.
म्हणजेच ३ फूट पेक्षा कमी उंचीच्या मुलांना/बुटक्यांना चकवा लागत नाही असा आपण निष्कर्ष काढू शकतो.
तसेच कुत्रा पाळून त्याला सोबत घेऊन गेले तर कुत्र्याला चकवा लागणार नाही आणि तो आपल्याला रस्ता दाखवू शकतो.

बरेचसे अनुभव वाचियचे राहीलेत पण आताच वडील गेलेत आण सतत काही ना काही अनूभव येतायत म्हणुन अगदी निवांतपणे वाचेन आणि अनुभव शेअर करेन म्हणते.

मला मायबोली चकवा लागला आहे महिनाभरापासून.
एक्सेल, पॉवरपॉइंट, वर्ड, आउटलूक, कुठेही फिरले तरी परत मायबोली विंडोच येते सारखी.

हो ना. Proud
आता उद्या पासून मांडी बसून घालून लॅपटॉप चौरंगावर ठेऊन बघायला हवं.

Pages