सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राज्यांतर्गत प्रश्न वर ,येथील समस्येवर ,अडी अडचणी वर,लोकांच्या प्रश्नावर .
सडकून टीका करा .
टीका योग्य असेल तर कोणी सरकार ची बाजू घेणार नाही.
पण कोण कुढले बाजार बसवे maharastra var टीका करणार,आमच्या mukhymantra ना आरोपी च्या पिंजऱ्यात उभे करणार ज्यांच्या स्वतःच्या राज्यात कायदा नावाची चीज अस्तित्वात च नाही ते.
केंद्र सरकार राज्याच्या हिताला बाधा येईल असे वागणार तर महाराष्ट्र सरकार च्या पाठी उभा राहणारच.

BLACK CAT तुम्ही भाजप विरोधी आणी कट्टर कॉंग्रेसची आहात हे माहितेय.सर्वसामान्य जनता म्हणून जे वाटलं ते लिहीलं.मला हे सरकार पटत नाही आणी ह्या 10 महीन्यात ते कसं योग्य नाही हे कळलंय.

यूपीत ढेकणे मेल्यागत साधू मेलेत , कधी बातमी नाही झाली. पण पालघरची झाली >>>>>
खरंच की !
तब्लिकी मात्र महिना सगळ्या न्यूज चॅनल वर भर छा गये थे Happy

118884911_3950947298278253_4645751003084761130_n.jpg

महाराष्ट्रात कोविड ची साथ आहे बरे का, सोशल distancing पाळा म्हणून सगळे जण घसा खरवडून सांगतायत,
आता या सगळ्या सर्कशीत कोरोना पसरला तर परत महाराष्ट्र शासनाच्या नावे गळा काढून ओरडायला मोकळे लोक.

कंगना बोलली ते अयोग्यच पण ती बोलली म्हणून किती महत्व द्यायचे.कंगनाला खरंतर ठाकरे सरकार बद्दल बोलायचे होते पण बोलली पोलिसांबद्ल.खोरोनावर राऊत बोलत नाहीत.तसंही किती बॉलीवूड करांना मुंबई व महाराष्ट्राबद्दल आपुलकी आणी कृतज्ञता आहे.

पयला न आहे की महाराष्ट्राचा !
अजुन किती करोना पसरायचा बाकी राहिला आहे ?
उठा ला दावूद ने धमकीचा फोन केला असं वाचण्यात आले !
दाऊद सतत आजारी असतो , बहुतेक कँपोडर ना विचारायला सांगितले असेल कोणत्या गोळ्या घेऊ Happy

शिवसेने ने जनतेला फसवून सत्ता घेतली हे खरेच आहे पण आधी फडणवीसांनी रात्रीतुन ज्याला तुरुंगात डांबायची भाषा केलती त्या अजित पवारबरोबर काय सोंग रचलं होतं मग ? ही सुद्धा फसवणूकच होती मत देणाऱ्यांची. त्यावेळी जर राष्ट्रवादी फुटली असती तर आज कोण मंडळी दिसली असती सत्तेत ?

एकवेळ लग्न करणार नाही पण राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही असे फडणवीस म्हणाले होते पुर्वी - https://youtu.be/kXo5XQSYQNA
ड्रग निगडित पुढे येणारी नावे बहुतेक भाजपशी संबंधित आहेत. पोरगी भगाव राम कदम ड्रग वर बोलतो म्हणजे मोठा विनोदच आहे. राहुल महाजन - विवेक मोईत्रा- कदम हे कनेक्शन विसरला राम बहुतेक.
रच्याकने नको ते उद्योग केल्याने प्रमोदची गेम झाली आणि लोढा- कदम यांचे नशीब फळफळले. लोढा तर आता रिचेस्ट इंडियन लिस्ट मध्ये आहे. कदम फक्त दहीहंडी- फालतु न्यूजबाईट-बोलबच्चन टाकणे इथपर्यंतच पोचला. या प्रकरणाचाही शोध घ्यावा मीडियाने जमल्यास.

सर्वसामान्य जनता म्हणून जे वाटलं ते लिहीलं.

मतदान झाले की जनतेला कुणी कुत्रे विचारत नाही.

अमित शहा सरकारे पाडताना जनतेला विचारून पाडतो का ? अमित शहाने लफडी करून किरकोळ राज्ये गिळली अन त्याच पापाचे फळ म्हणून महाराष्ट्र गमावला

किसीं के बाप का हिंदुस्थान थोडी है- राहत इंदोरी
कंगना महाराष्ट्र किसीं के बाप का नही म्हणाली,

राईट विंगर्स ना त्यांचा राहत इंदोरी मिळाला Lol

राणावत आणि राउत जाम फुटेज घेत रहातात.

मुळात कंगनाला धमक्या येत होत्या तर तिने सरळ तक्रार करायला हवी होती, ही गंभीर गोष्ट होती. उगाच ट्विटर ट्विटर काय खेळत रहायचं आणि मुंबईला वाटेल ते का बोलायचं. बरं ती बोलली तर राऊत आणि सेनेने ते वाक्य केस करता येण्यासारखं असेल तर गप्प बसून तो विचार करायचा. तिला वाटेल ते खालच्या दर्जाचे बोलत रहाणे आणि फिजिकल attack करतील आमच्या महिला सांगणे हे कशाला.

भाजपने त्या वक्तव्यावर अंग काढून घेतल्यावर लगेच कंगनाला मुंबई यशोदामाई वाटायला लागली.

दोघांना प्रसिद्धी आणि फुटेज हवं आहे नुसते, दोन्ही रा रा ना.

तिला केंद्र सुरक्षा देत असेल तर योग्य आहे असं वाटतंय कारण सेनेच्या सरनाईक यांनी ती आल्यावर महीला थोबडवतील तिला असं म्हटलं होतं आणि कदाचित तिला drugs विषयी काही माहिती असेल तर तिची विचारपूस होऊ शकते.

दोघांना प्रसिद्धी आणि फुटेज हवं आहे नुसते, दोन्ही रा रा ना>>> +1
दोघाना पण काम नाही , बरळत राहतात नुसते

ज्या वेळी शिवसेना आणि भाजपा विरोधात होती त्या वेळी कित्येक वेळा सेना भाजप चे नेते एखाद्या शहराचे नाव घेउन हे काय पाकिस्तान आहे काय आस म्हणत असतं. समजा xyz शहरात हिंदू मुस्लिम दंगे झाले आणि त्या वेळच्या आघाडी सरकारने त्यांना भेट देण्या पासून अडवले तर xyz शहर हे काय पाकिस्तान मध्ये आहे काय? असा प्रश्न विचारत असत. रामदास कदमांनी असा प्रश्न कित्येक वेळा विचारला होता.
कंगना पण काय वेगळं नाही बोलली. जर अत्ता महाराष्ट्र चा अपमान होत असेल तर त्या वेळी पण झाला असेल. उलट कंगना तर pok बोलली पाक नाही बोलली.

ताज्या दमाचे नवे भिडू आले वाटतं. स्वागत.

कंगनाला आपण दुसरी स्मृती इराणी होऊ अशी आशा वाटत असेल. तिची दुसरी पायल रोहटगी होऊ नये.

https://twitter.com/Swamy39/status/1302862192404881408

स्वामीजीं नी पण सुशांतला न्याय मिळवून देण्याचा चंग बांधला होता.
यह क्या माजरा है?
तिकडे अक्षयकुमार वि सुशांत फॅन्समध्ये धुमश्चक्री, इकडे हे असं.

हे आघाडी सरकार बनविण्यात नाही म्हटले तरी राऊत रावांचा हात खूप मोठा आहे , म्हणजेच उठा ना मुख्यमंत्री पदी बसविण्यात !
ज्या प्रमाणे म मो मितभाषी असल्या मूळे आणि पं प्र पदी बसवून उपकृत केल्या मूळे काँग्रेस च्या न पटणाऱ्या गोष्टींना कधीच विरोध करू शकले नाही , त्याच प्रमाणे उठांची स राऊत बाबत अवस्था झाली आहे !
त्यामुळे स राउत राव ना वेळीच कान पिचक्या नाही दिल्या गेल्या तर सुशिक्षित समाजाच्या मनात ' सेना हि खळ खट्याक च्या लायकीचा च पक्ष ' हीच राहील !
सर्व मतदार ' जय महाराष्ट्र ' च्या घोषणा देवून सेनेला मतदान करणारे आहेत असा समज करणे सेने ला घातक ठरणार .
महाराष्ट्राचा अभिमान इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असायलाच हवा , पण एखाद्या केस मध्ये कुठ पर्यंत तनावे हेच राऊत रावा ना कळत नाही .
सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने एखाद्या महिलेला हरामखोर म्हणणे / मारहाणीची धमकी देणे हे चुकीचेच आहे ! भले ती महिला कितीही चुकीची विधाने करो .
राज्यसभा खासदारांने तर अशी वेळच येवून दिली नाही पाहिजे . तुमच्या हातात राज्य सरकार आहे , मुंबई पोलीस आहे तर तिला कोर्टात खेटे घाला यला लावा ना !
फाटक्या तोंडाने काय तिला धमक्या देताय !

यात भर ती महापौर , म्हणे शहराची प्रथम नागरिक !
महापौर पदा ला भेटणारा सन्मान कसा टिकवायचा हेच त्यांना कळत नाही . शिवाय स्वतः एक महिला असून कंगना ला मारहाण करण्याची भाषा !
अरे देवा कसं व्हायचं या राज्याचं !

काही प्रश्न
1) सुशांत ची आत्महत्या झाल्यानंतर काहीच तासात सुशांत जो नातेवाईक bjp चा आमदार की खासदार आहे त्याने सीबीआय चोकशी ची मागणी केली.आणि मुंबई पोलिस वर अविश्वास दाखवला.
2) मुंबई पोलिस प्राथमिक माहिती गोळा करत असताना न्यूज चॅनल वरती मुंबई पोलिस आणि सरकार ह्या अनेक प्रश्न उपस्थित करत गेले ,इथे आयटी सेल कार्यान्वित होता.
3) बिहार मध्ये fir नोंदवून आणि त्यांचे पोलिस इथे येवून गोंधळ निर्माण केला
आणि ह्या काळात आयटी सेल kahi news chanel ni ase chitr unhe केले जी बिहारी सुशांत का महाराष्ट्र न्याय देणार नाही.
4) सर्वोच्च न्यायालय नी सर्व तपास सीबीआय कडे सोपवला कायदा आणि सू व्यवस्था हा संबंधित राज्याची जबाबदारी आहे असे घटनेत स्पष्ट लिहले आहे तरी राज्याच्या अधिकार वर बलात्कार केला गेला.
5) सीबीआय सोडून कोणती च संस्था ह्या केस ची चोकशी करू शकत नाही असा आदेश होता.
6) आज पर्यंत सीबीआय नी काय चोकशी केली,कोणाची चोकशी केली,त्यांची काय प्रगती आहे केस मध्ये हे प्रश्न ना bjp chya it cell ni विचारले ना मीडिया नी.
सीबीआय ची प्रगती 0 आहे आज पर्यंत.
7)ncb ही केंद्र शासनाची संस्था आहे ड्रग विषयी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्यांना राज्याच्या परवानगी ची गरज नाही मग आताच ते active ka झाले.
आणि पकडले कोण तर कूक,आणि काही किरकोळ लोक.
8) ड्रग चा आणि सुशांत च्या केस चा काही संबंध असेल तर सीबीआय शांत का बसून आहे.

भाउंचा मुद्दा फारच बोचलेला दिसतोय अनेकांना कारण लगेच अ‍ॅग्रेसिव होऊन लेबलं लावणं, पर्सनल लेवला जाणं वगैरे नित्य नैमित्तिक प्रकार अपेक्षित आयडिंकडून झालेत. चिल माडी लोक्स! Lol

Submitted by मामी on 7 September

भाऊंच्या व्हिडियोजना रिलीज होऊन एक-दोन दिवसात लाखभर व्ह्यूज मिळतात याचा काहींना त्रास होत असेल.
भाऊ संथ बोलतात पण analysis मुद्देसूद असतं. आजोबानी गोष्ट सांगावी असा टोन असतो. सुशांतला न चुकता राजपूत ऐवजी रजपूत म्हणतात. शौविकबद्दल बोलताना 'तो शौविक चॅटर्जी/आपलं मुखर्जी- नाही चक्रवर्ती -" असं त्याला एकदम बिनमहत्वाचा करून टाकलं. Proud मी हल्ली नियमित बघतेय प्रतिपक्ष.

सुशांत केस म्हणजे bjp चा राजकिय तमाशा होवू नये तर सुशांत ला न्याय मिळावा अशीच सर्वांची इच्छा आहे.

एखाद्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतात यावर त्याचे मूल्यमापन करतात का ? आजकाल सुशांत निमित्ताने अनेक कॉन्स्पिरेसी थेअरी वाले कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवले आहेत. त्यांनाही लाखभर व्ह्यूज मिळत असतील. या संख्येला फार महत्व देऊ नये.

त्यांचा "निर्लज्जं .." व्हिडिओ पहायचा प्रयत्न केला व दोनेक मिनिटात सोडून दिला. रिटायर्ड पुरुष सायंकाळी एखाद्या कट्ट्यावर बसून आल्यागेल्या महिलांकडे बघून शेरेबाजी करतात तसा वाटला. "आजकालच्या बायकानी ताळतंत्र सोडला आहे, चक्क सहावारी नेसतात, आमच्या वेळी कशा नऊवारी नेसून मर्यादेत रहात असत ... "

कंगना खोटारडी व एविल आहे हे खरे आहे पण तिच्या POK संबंधीत विधानात मुंबईची बदनामी वगैरे होईल असे काहीही नाही. आपले म्हणणे मांडायचा तिचा हक्क आहे. तिच्या फोटोला चपला मारणे निषेधार्ह आहे. आज तिच्या कडे बी एम सी वाले जाऊन तिला हॅरॅस केले. This is fascism. महाराष्ट्रात कोरोना स्थीती अत्यंत गंभीर आहे. लोक अँब्युलंस ची वाट पहत मरत आहेत. ती मिळालीच तर खाटेच्या प्रतिक्षेत मरत आहेत. खाट मिळाली तर अन्नपाण्यवाचून मरत आहेत. गेलेच तर स्मशानात बारा बारा तास वेटिंग आहे. अशावेळी गृहराज्यमंत्री एखाद्या रिटायर्ड whatsapp uncle प्रमाणे तिच्याशी भांडत आहेत. धन्य आहे.

आजकाल सुशांत निमित्ताने अनेक कॉन्स्पिरेसी थेअरी वाले कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवले आहेत. त्यांनाही लाखभर व्ह्यूज मिळत असतील. या संख्येला फार महत्व देऊ नये.///

तसले काही व्हीडियो बनवले आणि त्यात महाराष्ट्र राज्य सरकार व मुंबई पोलीस यांची बदनामी केली तर अटक होते.

https://www.livemint.com/news/india/sushant-singh-rajput-death-case-man-...

भाऊ तोरसेकर न घाबरता व्हिडियो करतात आणि कसलीही सनसनाटी हेडलाईन, ग्राफिक्स नसले तरी त्यांना इतके व्ह्यू मिळतात म्हणून कौतुक.

आज कन्गनाकडे बी एम सी वाले तिला हॅरॅस करण्यासाठी गेले. शिवसेनेने हे मुद्दाम केले आहे. किम्वा जेम्व्हा कन्गनाने तिचे ऑफिस बान्धले तेम्व्हा लाच दिली नसावी म्हनून आता चौकशी करायला गेले असावेत. हे एकतर द्वेशाचे राजकारण किम्वा fascismचा प्रकार. डोन्ही निशिद्धच.

Submitted by मामी on 7 September, 2020 - 14:07>>> Lol Biggrin
दोन्ही पार्टीजना तटस्थपणाचा सल्ला देण्याच्या मुखवटा अखेरीस उघडकीला आला .
गर्वसे कह दो ना हम बीजेपीवाले है .
बाकीचे निदान उघडपणे काँग्रेस , भाजप जी काय बाजू असेल ते घेऊन बोलतात . पण हे तोरसेकरसारखे तटस्थ धोकादायक .
असो . चालू देत .

काल रिया चौकशीला जातानाचे मीडिया कव्हरेजचे फोटो पाहिलेत.
कीव आली अक्षरशः . त्या रियाला घुसमटवून टाकलं होतं सगळ्यांनी .एकाने थेट तिच्या मान आणि खांद्याच्या भागात माईक घुसवून टाकलेला.
रिया दोषी आहे की नाही न्यायालय ठरवेल पण ही मीडियाची गिधाड तिचं लिंचिंग करून टाकणारेत. ज्या SSR साठी हे करत आहेत त्यालाही हे सगळं आवडलं असत का कोणास ठाऊक !!!
आणि काल परवाच एक पत्रकार कोरोनाने गेलाय, तर हे लोकं गर्दी करून सोशल डिस्टटींगच्या तत्वाला पूर्णपणे हरताळ फासतायेत . अश्यावेळी कोरोना झाला तर करणारेत हे लोकं !
कठीण आहे सगळं Sad

Pages