अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माफीचा प्रश्न नाहीये पाटीलसाहेब, पण एक जण निखळ चेष्टा करत असेल तरी दुसरे त्यापुढे जावून उगीचच दुखावणारे कमेंट करतात. चेष्टा मला ही कळते, पण नको ती चेष्टा मी सहन करत नाही. असो. हा विषय इथेच सोडून देवू. Happy

धागा इतका वर म्हणून कुतूहलाने उघडला.. फुसका बार निघाला...
हे आमच्या मध्ये खूप कॉमन आहे.... पार्टीतून निघाला का असे फोन वर विचारले तर हे काय निघालो निघालो म्हणणे आणि न निघणे.... पार्टीत अजून वेळ घालवणे....
परत फोन आला तर रस्त्यातले एखादे ठिकाण सांगणे की इथपर्यंत पोचलोय. प्रत्यक्ष अजूनही पार्टीत असणे.... जाउ आरामात घरचे झोपले की. असा विचार करणे....
आधी कोणते ठिकाण सांगितले ते विसरून परत फोन आला की तेच परत चुकून सांगणे...

अमेरिकेत Exit चुकल्याने खूपदा समोर दिसतय ठिकाण पण पटकन जाता येत नाही असे झालेय , पण तो मानवनिर्मित चकवा आहे>> Lol तुस्सी बडे मजाकीए हो

कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल माहीती नाही त्याबद्द्ल नको ते कमेंट टाकणे बंद करा. सगळे तुमच्यासारखे खोटे बोलणारे, टेपा लावणारे नसतात.
नाही पटले तर पुढे व्हा.+11111
मी मागच्या पेज वर देखील असंच म्हटलं आहे,इथे लोक हल्ली लगेच जजमेंटल होत आहेत आणि अनुभव सोडून बाकीचीच बडबड करतात असं दिसून येतंय

तुमची आई बोलते ते बरोबर आहे.चकव्याचा प्रभाव फक्त कमरेच्या वर असतो. त्यामुळे चकवा लागला की खाली बसून रस्ता शोधल्यास दिसतो.

अस्मिता, मला पण असच वाटलं होतं हा धागा विरंगुळ्याचा आहे आणि धाग्याचा विषय पण (चेष्टेचा) विरंगुळ्याचाच आहे.
Happy

मी माझ्या लहानपणीचा एक थरारक किस्सा तुम्हाला सांगतो. त्यावेळी आम्ही सगळी लहान मुलं मे महिन्यात दुपारी गावभर उनाडक्या करायला जायचो. त्यावेळी दुपारी सगळी सामसूम असायची. असाच एकदा पकडापकडी खेळताना मी एकटाच एका वाड्यात लपायला गेलो. वाड्यात काही म्हशी होत्या. त्या वाड्यात लपून मला 5 मिनिटे झाली असतील. मला वाड्याच्या दुसऱ्या बाजूला हालचाल जाणवली. मला वाटलं मित्र शोधत आले असतील. आऊट नको व्हायला म्हणून मी तसाच पेंड्याच्या मागे लपून राहिलो. पलीकडे जो कोणी होता त्याची हालचाल मला जाणवत होती. आता तो जो कोणी होता तो माझ्या एकदम जवळ आला होता. महत्त्वाचे म्हणजे तो चालत नसून सरपटत होता. हे मला जरा विचित्र वाटलं. हळूहळू त्याच्या श्वासाचा जोरात आवज यायला लागला. एखादा भुकेला जीव भक्ष्यावर जसा तुटून पडतो तसं काहीसं वाटत होतं. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हे मला समजलं. मी तसाच लपून राहिलो. कोणत्याही क्षणी ते जे काही होतं ते माझा जीव घेणार होतं. पण नशीब बलवत्तर म्हणून त्याच वेळी माझे मित्र मला शोधत त्या वाड्याबाहेर आले. त्यांच्या आवाजाने एखादा साप सळसळत बिळात जावा तसा आवाज करत ते तिथून गायब झालं. मी सगळी ताकद एकवटून तिथून बाहेर पळ काढला. मित्रांना सांगितले की इकडे येत जाऊ नका.

हा वरचा किस्सा माझ्या मित्राच्या शब्दात आहे. मी वाड्याबाहेर आलो म्हणून तो जो कोणी होता तो पळाला. गैरसमज नसावा.

अमेरिकेत Exit चुकल्याने खूपदा समोर दिसतय ठिकाण पण पटकन जाता येत नाही असे झालेय , पण तो मानवनिर्मित चकवा आहे
>>> लगेच पुढचा exit घ्यायचा आणि परत यायचे.. येताना परत exit मिस करायचा... चकवा पार्ट 2..

मला एकदा गुगलचकवा लागला होता.
गुगलने सांगितलं एक्झिट चुकली.. यु टर्न घे. मागच्या एक्झिटवर आल्यावर 'पुन्हा' सांगितलं, यु-टर्न घे. मी चरफडत आधीच्याच एक्झिटवर आलो तर तिसर्‍यांदा तेच. मग मी मॅप्स बंद केलं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे रस्ता शोधला.

>>> लगेच पुढचा exit घ्यायचा आणि परत यायचे.. येताना परत exit मिस करायचा... चकवा पार्ट 2..
नवीन Submitted by च्रप्स on 1 September, 2020 - 12:२८

>>>>>>>>>>> माझे ऍक्च्युअली असे झाले आहे जेंव्हा मी अमेरिकेत नवीन होतो. पहिल्यावेळी नवीन ड्रायव्हर चुकतात तसा एक्सिट चुकलो....पुन्हा वळून आलो तर रस्त्यावर एक्सिटच्या दुसऱ्या बाजूला होतो आणि मागून येणाऱ्या गाड्यांमुळे एक्सिट घेता आली नाही. तसाच सरळ गेलो एक्सिट च्या पुढे. शेवटी तिसऱ्यांदा योग्य बाजूला गाडी ठेऊन एक्सिट घेतला.

कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल माहीती नाही त्याबद्द्ल नको ते कमेंट टाकणे बंद करा. सगळे तुमच्यासारखे खोटे बोलणारे, टेपा लावणारे नसतात.
> पहिल्या वाक्याशी शंभर टक्के सहमत.
दुसरे वाक्य पहिल्या वाक्याशी काँट्रॅडिक्ट करत आहे. त्या व्यक्तीबद्धल माहीत नसताना तिला खोटे बोलणारे,टेपा लावणारे अशी कमेंट कशी करू शकता तुम्ही?
कृपया ज्या व्यक्तिबद्द्ल माहीती नाही त्याबद्द्ल नको ते कमेंट टाकणे बंद करा.

दुसरे वाक्य पहिल्या वाक्याशी काँट्रॅडिक्ट करत आहे. >> जे इथे खोटे बोलत आहेत, व जे त्यांना ही माहीत आहे, मी ते त्यांना लिहीलेय. तुम्ही कशाला त्रास करुन घेताय Happy पण शेवटी म्हणतात ना, खाई त्याला खवखवे! Happy
....आणि ही ह्या विषयासंदर्भात माझी शेवटची पोस्ट!

कधी कधी रात्रभार कोठे फ़िरत होता या प्रश्नाला चकवा हे उत्तर लागु पडते. विनोद सोडा. या आधी कोणीतरी लिहिले तेही खरे वाटते. रात्री अर्धवट झोपेत असाल तर या गोष्टी होवु शकतात . जर रात्री फ़िरायची सावय नसेल तर परिचीत भाग अगदी अपरीचीत वाटयला लागतो. रस्ता चुकतो.
https://en.wikipedia.org/wiki/Sleep-deprived_driving
"Trouble remembering last few miles driven or missing exits and street signs"

काल मी संध्याकाळी सायकल फिरवायला गेलो होतो. शहर सोडल्यावर एक सुनसान जागा लागली. या जागेत जरा अस्वस्थ वाटत होतं. दोन्ही बाजूला शेती होती. थोडं पुढे गेल्यावर मला एक सायकलवाला जाताना दिसला. 45-50 वय असेल. डोक्याला पांढरं कापड गुंडाळलं होतं आणि बाकीचे कपडे पण पांढरेच होते. मी त्याची साईड काढून पुढे गेलो. काही वेळात तोच माणूस माझ्या पुढे दिसला. तसाच वेष तीच सायकल होती. मी जरा गोंधळून गेलो. एखाद्या शॉर्टकटने आला असेल असं बोलून पुन्हा त्याची साईड काढून पुढे गेलो. काही वेळाने परत तोच माणूस पुढे दिसला. आता हे काहीतरी अमानवीय आहे हे मी समजून चुकलो. चकवा तर लागलेला न्हवता कारण गूगल मॅप व्यवस्थित काम करत होता. हा प्रकार अजून दोन तीन वेळा घडला. पुढे एक मंदिर लागल्यावर हा प्रकार बंद झाला. पुढे एक गाव लागलं तिथे चहा प्यायला थांबल्यावर चौकशी केल्यावर कळलं की काही वर्षांपूर्वी एका माणसाचा सायकलवरून गावात येत असताना अपघाताने मृत्यू झाला तेव्हापासून हा प्रकार तिथे सर्रास घडत असतो.

Pages