सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सडक 2
दोन दिवसात 17 कोटी कलेक्शन

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या गूगल हिस्टरीमध्ये painless death सापडले असे सांगितले होते, सीबीआयने त्याने हिमाचल, कुर्ग इथे properties शोधत होता हे स्पष्ट केले. मुंबई पोलिसांना साफ खोटे पाडले. रियाच्या मते ती ड्रग्स चॅट सुशांत साठी करत होती, सुशांतला लागतात म्हणुन, ती स्वतः घेत नव्हती. हे सगळे चॅट 2017 पासून सापडले आहे, जेव्हा ती आणि सुशांत एकत्र नव्हते. सध्या तीची सीबीआय चौकशी चालू आहे.
त्याचे शव नेणाऱ्या माणसाने त्याच्या बॉडीची कंडिशन सांगितली आहे, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो मर्डर होता, पण पोस्टमॉर्टेममध्ये एवढे बदल का झाले हे त्याला माहीत नाही.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो मर्डर होता, पण पोस्टमॉर्टेममध्ये एवढे बदल का झाले हे त्याला माहीत नाही.

??
पोस्ट मोरतेम दोक्तरच करतात व तेच रिपोर्ट लिहितात. मढे नेणार्याने पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट कुठे वाचला ?

शव नेणाऱ्या म्हणजे कुठून कुठे ? घरून पोस्ट मोरतेंमसाठी हॉस्पिटलकडे ? की पोस्ट मोरतेंम नंतर हॉस्पिटल कडून घरी ? दोन्ही केस मध्ये शव झाकूनच नेतात , नेणार्याला कुठून अन काय दिसले ?

किल्लीवाला म्हणतो , मला आत जाऊ दिले नाही , मढे नेणारा म्हणतो पीएम रिपोर्ट बदलला.

(दाउद)भाई चे मीठ किती लोकांनी खाल्लाय>>> म्हणुन तर काही वर्शापुर्वी दाऊद परत दुबई किम्वा पाकिस्तानात परतल्यावर पोलिस बातम्या द्यायचे की तो नुकताच मुम्बईत येऊन गेला. शरद पवार मुम्बई पोलीसान्ची कितीहि स्तुती करोत मुम्बई पोलिस भ्रष्टाचारा साठी काही दशके प्रसिद्ध आहे. म्हणुन सुशान्तच्या प्रकरणाचा तपास नीट झाला नाही आणि मध्यमवर्गी (?) रियाकडे त्यानी फारसे लक्ष दिले नाही. याबद्दल मुम्बई पोलिसाना कोण पैसे देत आहे याची पण चौकशी झाली पाहिजे.

मला वाटते या धाग्याचे नाव आता बदलून "रियाचे चारित्र्यहनन" असे करायला हरकत नसावी.
आता सारसबागेतील गजरेवाला मेडियाला स्टेटमेंट देईल की रिया व सुशांत सारसबागेत आले होते तेव्हा पाणीपुरीचे पैसे सुशांत ने दिले, शिवाय आपल्या पैशाने गजराही घेऊन दिला. आर्णव बेंबीच्या देठापासून कोकलेल "गजरेवाले ने किया बडा खुलासा" . #GajaraDigger . ई डी पाणिपुरीवाल्याची सहा तास तपासणी करतील.

Lol

IMG-20200830-WA0017.jpg

आता फक्त ऐवढच बाकी राहीलं..

WhatsApp Image 2020-08-29 at 11.09.25 PM.jpeg

एक होता सुशांत, तो खूपच होता अशांत
एक दिवस अचानक झाला त्याचा दुःखांत

एक दोरी, एक गाठ, आयुष्याचा घेई घास
गेला? की घेतला? विचारावं का तिला?
तिचीच तर सोबत होती त्याच्या शेवटल्या श्वासाला

तिनंच तर पाहिलंय सगळं घडताना जवळून
मुकीच ती, बोलेल कशी शेवटी सत्याला स्मरून ?

भुईखालचं जग की घराणेशाहीचा शाप?
लहान वयातलं यश की पैसा वारेमाप?

कनक की कांता? काय असेल कारण?
चरस, गांजा, व्यसनांनीच तर रचलं नव्हतं ना सरण?

गरमागरम तव्यावर सगळेच भाजतायत् पोळी
TRP च्या मोहानं भरतायत् आपापली झोळी

राजकारण राहील कसं मागं, ही तर मोठी संधी
जास्तीत जास्त कमवून घ्या यायच्या आधी मंदी

फासावर जातानाही, नसेल इतका घुसमटला
वासे फिरलेले पाहून परत एकदा विस्कटला

कोल्ही कुत्री गिधाडं, लांडगी, बघत राहिली होऊन अवाक
आता, क्रूर माणसाच्या कथांचा, मुलाबाळांना घालतात धाक

खरं आहे मेधावि.
सत्य बाहेर यावं असं अगदी मनापासून वाटतं.
पण नक्की सत्य काय हे सुशांत शिवाय कोणी सांगू शकणार नाही.
रियाला सीबीआय ने क्लिनचीट दिली तर... ज्यांच्या नजरेत ती दोषी आहे ते म्हणणार - काही तरी गडबड आहे. पुरावे नष्ट केले गेले वगैरे वगैरे.
तिला दोषी ठरवले तर काही जण म्हणणार - बडी बडी धेंडं वाचावीत म्हणून तिला बळी दिलं.
आत्महत्या होती हे सिद्ध झाले तर नेपोटिझममुळेच झाले. मग ह्याला बॉयकॉट करा.. त्याला बॉयकॉट करा.
शेवटी प्रत्येकाने आपल्या परीने कोणाला ना कोणाला तरी दोषी ठरवले आहे आणि तेच त्यांच्या साठी सत्य आहे.
या सगळ्यात डिप्रेशन या महत्त्वाच्या मुद्द्याकडे परत नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले जाते आहे.

असो. साधना, विजय कुलकर्णी यांना अनुमोदन.
रिया दोषी असल्याचे सिद्ध झाले तर तिला नक्कीच शिक्षा व्हावी.. पण ते कोर्टात सिद्ध होऊ देत. न्युज चॅनलवर दाखवलेल्या बाईट्स आणि मुलाखतींवरून कन्क्लूजन काढू नका. मी न्युज चॅनल्स बघत नाही पण सध्या सोशल मिडिया वर जे सुरू आहे ते भयावह आहे, दुःखद आहे.

Prachi +1

प्राची +१
शिवाय आजकाल झुंडीची मानसिकता खूप वाढते आहे आणि भयावह म्हणजे ती हिंसक बनते आहे. सामाजिक बहिष्काराचे शस्त्र बेलगामपणे वापरून अर्थव्यवस्था ताब्यात घेऊ पाहात आहे. कोणाला पुढे येऊ द्यायचे आणि कोणाला पडद्याआड करायचे ह्याचा निर्णय ही अर्धसंस्कृत झुंड ठरवते आहे. अशा lumpen elements नी एकंदर व्यवस्थेच्या बाबतीत निर्णय आणि अंमलबजावणीचे अधिकार जबरीने ताब्यात घेऊ पाहाणे हे मला भीतीदायक वाटते.

प्राची,
तुमचे मुद्दे योग्य आहेत. पण ड्रग्जचा अँगल सीबीआयने बाहेर काढला. तो मुंबई पोलिसांना आधी तपास करताना दिसला होता का? ड्रग्ज हा मुद्दा संपूर्ण घटनेत significant आहे की अगदीच दुर्लक्ष करण्याजोगा?
जर मीडियाने, अर्णबने, सोशल मीडियावरील SSRWarriors या सर्वांनी प्रयत्न केले नसते तर केसची फाईल एव्हाना क्लोज झाली असती. पण फाईल ओपन आहे, ड्रग्जचा अँगल समोर आला आहे. सुशांतच्या घरच्यांनी केलेली सीबीआय मागणी, बिहार पोलिसांकडून आलेला दबाव, प्लस अर्णब आणि टाइम्स नाऊ प्लस सामान्य जनता या सर्वामुळे सीबीआयपर्यंत गोष्ट गेली असं नाही का?

सनव, सोशल मिडिया वरून या प्रकरणात तपास व्हावा हा जोर लावून धरणे वेगळे आणि एखाद्याला आरोपी ठरवून टाकणे वेगळे. न्याय मिळावा ही मागणी करताना आपण कुठे अन्याय करत नाही ना हे बघणे महत्वाचे आहे. सीबीआयला नवे धागेदोरे मिळून जर केस सॉल्व्ह होणार असेल तर बरेच आहे की.
पण न्यूज मिडिया कितपत मॅच्युरिटी ने हे हाताळतो आहे याबद्दल मला शंका आहे. सध्याच्या ब्रेकिंग न्यूज च्या शर्यतीत बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी कोणाकडे वेळ आणि इच्छाशक्ती आहे? नंतर त्या चूकीच्या बातमीबद्दल माफीही मागितली जात नाही आणि मागितली तरी तोवर होणारे नुकसान होऊन गेलेले असते.
सुशांत ने आत्महत्या केली हे सांगणारे सगळे खोटे आणि मग तो चावीवाला, डेड बॉडी नेणारा मात्र खरंच बोलत असतील कशावरून. त्यांना पैसे देऊन बोलायला सांगितले नसेल कशावरून..? आपण एवढा विचार करत नाही कारण मिडिया ठसवतेय आपल्या मनावर काय खरं आणि काय खोटं ते

रियाचे चारित्र्यहनन चालू आहे ते चूकच आहे, पण त्याच्या घरच्यांनी तिला आरोपी म्हटले म्हणुन त्यांना नावं ठेवणं तेवढेच चूक. त्यांना जर त्याच्या मृत्यूबद्दल काही शंका (foul play) वाटत असेल तर न्याय मागणे हा त्यांचा देखील हक्क आहेच. शिवाय रियाला नावं ठेवू नका म्हणणारे, सुशांतच्या नावाने मुक्ताफळं उधळतच आहेत, या धाग्यात मागची काही पानं बघा. ती, तिची टीम तिच्या बचावासाठी तरी आहेत, हा गेलेला माणूस तर ते पण करू शकत नाही.
बाकी सोशल मीडिया दुधारी तलवार आहे, जेवढी चांगली तेवढीच वाईट.

मुंबई पोलीस नी जो तपास केला आहे तो त्यांनी मीडिया पुरवला नसेल पण तपास रिपोर्ट सील बंद सर्वोच्य न्यायालयात सादर केला होता.
ड्रग विषयी मुंबई पोलिस नी पण तपास केला असेल ह्या विषयी शंका नाही.
ह्या गोष्टी लपून राहत नाहीत पोलिस ना माहीत असेल.
ड्रग हे सिगारेट बिडी सारखे कॉमन झाले आहे उच्च भृ समाजात त्यात काही नावीन्य नाही.
आणि ह्या angle चा खूनाशी काही संबंध पण नाही(खून असेल तर)
बाकी उंदराचे औषध पिवून आत्महत्या केली म्हणून त्या औषधाची निर्मिती,व्यापार करणारे दोषी नसतात.
सीबीआय नी official तसे स्टेटमेंट दिलेले नाही.
मीडिया वाले चोरून काही तरी ऐकतात त्या मध्ये स्वतःचा मसाला भरतात आणि त्याची न्यूज बनवतात.
जो पर्यंत सीबीआय चा जबाबदार अधिकारी रीतसर पत्रकार परिषद घेवून ह्या केस च्या तपासा बद्द्ल जाहीर माहिती देत नाही तो पर्यंत मूर्ख मीडिया कडे दुर्लक्ष करणे उत्तम.

दोन- तीन लहानसे मुद्दे
मुंबई पोलिसांनी उचललेली पावले चुकीची नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून त्याबद्दल पडताळणी सुरू केली होती. त्या ची परिणती निश्चित झाली नव्हती.

मृताचे नातलग बिहारमध्ये राहत असल्याने पैशांच्या अफरातफरी संबंधीची तक्रार बिहार पोलीस नोंदवून घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलं.

सीबीआय चौकशीची मागणी रियाने ही केली आहे. बहुतेक रियाने सर्वप्रथम केली आहे. न्यायालयाने आदेश देताना याचाही उल्लेख केला आहे.

अता सीबीय चौकशी सुरू झाल्यावरही सो कॉल्ड "सुशान्तसाठी न्याय मागणार्‍यांचं " समाधान झालेलं नाही. त्यांना तपास आपण म्हणतो त्याच दिशेने व्हायला हवा. अमुक तमुक लोकांना लगेच अटक व्हायला हवी. शिवाय रियाबद्दल काही चॅनेल्स कडून बोलले जात असताना, तिला आपली बाजू मांडू द्यायलाही त्यांचा विरोध आहे.

हे सगळं फेअर ट्रायलच्या संकल्पनेत बसत नाही.

हे न्यायापेक्षा कुणाच्या तरी रक्तासाठी हपापलेपण झालं.

SSRWarriors
BJPBiharWarriors

There, I corrected it.

भरत +१
ट्युलीप, तुम्ही लिहिलय
"डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो मर्डर होता, पण पोस्टमॉर्टेममध्ये एवढे बदल का झाले हे त्याला माहीत नाही."
याबद्दल जास्त माहिती देऊ शकाल ? कोणत्या डॉक्टरांच्या ?

ट्युलिप +1

येत्या काही दिवसात सुशांत व त्याच्या घरच्यांना रीतसर बदनाम केलं जाईल हा अंदाज मी आधीच वर्तवला होता, त्याप्रमाणेच होतंय.

@प्राची,
ड्रग्जबद्दलचे चॅट समोर आले आहेत ते वाचून त्यासंदर्भात लोक रीयाबद्दल बोलत आहेत. जे समोर आलं आहे तेही बोलायचं नाही का? त्यापलीकडे कोणी बोलत नाहीये कारण रीयाला मिळालेला तगडा सपोर्ट पाहता ती एकटी नाही, मास्टरमाइंड दुसरेच असतील , ते इतके पॉवरफुल आहेत की यातून बहुधा वाचतील हा अंदाज लावता येतोच. रीयाने राजदीपला दिलेल्या मोठ्ठ्या इंटरव्ह्यूत जेव्हा ड्रग्जबद्दल विचारलं तेव्हा तिने त्याबद्दल मात्र बोलायला नकार दिला. का?बाकी तर भरपूर बडबड केली. स्वतः रीया सुशांतच्या बहिणीबद्दल सिद्ध करू न शकणारे आरोप करत आहे. अंकिता लोखंडेबद्दल आक्षेपार्ह बोलत आहे. ते असो.

आता बॉलिवूडवर बहिष्काराबद्दल- हा ज्याचा त्याचा पर्सनल निर्णय असेल ना. कोणी कोणाला फोर्स करत नाहीये. पण निपोटीझम, सुशांतची उडविलेली खिल्ली, ते ब्लाइंड आयटेम्स, सुशांतच्या स्वतःच्या काही पोस्ट्स व व्हिडियोज हे सगळं ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे. कॉफी विथ करणचे व्हिडियो आहेत. शेखर कपूरसारख्या माणसाने काही ट्विट्स केली आहेत. हे सगळं ऑलरेडी समोर आहे. त्याचा त्याच्या डेथशी थेट संबंध असेल वा नसेल पण regardless हे बिहेवीयर योग्य नाही. सो लोकांना मनापासून बॉयकॉट करावंसं वाटलं तर त्यात नेमकं काय चूक आहे?

हा डॉक्टर आहे.
नक्की डॉक्टर आहे की कंपाऊंड आहे.
तपास यंत्रणा सोडून बाकी माडिया,ड्रायव्हर,हेच केस कशी सोडवायची हे जाणतात.
तपास यंत्रणेला काही कळत नाही.

Pages