माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिर्याणी बनवताना भांड्याच्या तळाला आधी चमचाभर साजुक तुप लावुन मग त्यावर बटाटाभजीसाठी करतो तसे बटाट्याचे काप पुर्ण तळभर अंथरतो. मग त्यावर लेयरिन्ग करुन शेवटी स्ट्रा घेवुन मधे खुपसुन लहान लहान होल करुन त्यात केशर भिजवलेले वाटीभर दुध टाकतो.
(वाटीभर तांदळाला वाटीभर दुध असा हिशोब धरुन). बिर्याणी मॉइस्ट रहाते, तुपाचा फ्लेवर नी खरपुस तळले/भाजले गेलेले बटाट्याचे काप.
बिर्याणीपेक्षा त्या बटाट्याच्या कापांसाठी मारामार्या.

पहिल्यांदाच ऐकतेय, असंपण करतात?
पुढच्या वेळी केली कि फोटो टाका नक्की, बिर्याणी विथ बटाट्याचे काप.

मी खाली पूर्ण खाली कांदा पसरतो, खाली कांदा बटाटा पसरल्याने भात जळत नाही आणि करपलेला कांदा चांगली चवही आणतो

अर्धा कुकर भाताला किमान पाव लिटर दुध लागते

नारळाचे दुध की चहा/कॉफीचे दुध.
नारळाचे दुध घालून बरा झाला होता एक-दोनदा.
तळाशी कांदे-बटाटे काप , नवीन आहे माझ्यासाठी.
करून बघितलं पाहिजे.

पुढच्या वेळी केली कि फोटो टाका नक्की, बिर्याणी विथ बटाट्याचे काप.
मृणाली, संध्याकाळी टाकतो, घरच्या लॅटॉ वर आहेत.

अनिश्का, हो खरचं त्या क्रिस्पी बटाट्यासाठी स्लर्प... धन्यवाद.

काय हो योकु
आधीच धीर खच्ची होतो ना माकाचु धागा वर काढल्यावर Happy
तो कोण तो द सिक्रेट वाला म्हणतो तसं निगेटिव्ह अट्रॅक्ट्स निगेटिव्ह
तसं या धाग्याचं शीर्षक पाहून मनाला स्वयंसूचना मिळून पदार्थ बिघडला तर?

मी चिरोटे केले होते पहिल्यांदा. खुसखुशीत झाले अणि पदर पण सुटले. पण चिरोटे फुलून नाही आले. चपटे झाले कडाकणी सारखे.
माझे काय चुकले असेल?
चिरोटे मध्ये एक्सपर्ट असलेल्यांनी मदत करा..

साठा भरपुर लावलेला. तुप आणी कॉर्नफ्लोवर चे मिक्स केले होते.
तेजो जाड पातळ सगळ्या प्रकारे लाटून पहिले. पण चिरोटे नाही फुगले.

चिरोटे तळताना त्याला एका हाताने (म्हणजे हातात काहीतरी - पक्षी वीणकामाची सुई घेऊण) दाबून धरत वर्तुळाकार फिरवायचं आणि दुसर्‍या हातातील झार्‍याने (चिरोट्यावरच) तूप उडवायचं म्हणजे पदर छान सुटतात असं मायबोलीवरच्याच कृतीत वाचलेलं आणि आजमावून पाहिलं आहे.

जालावर बघून पाककृती करत होते. कांद्याची पेस्ट करून ती तेलात परतून त्यात टोमॅटो आणि बाकीचे मसाले घातले. नंतर या ग्रेव्हीला कांद्याची उग्र आणि कडू चव आली. इतकी वाईट कि पुन्हा त्यावर काही संस्कार करून वाचवायचीही भीती वाटली. टाकून दिली. मग पुन्हा नव्याने सुरूवात केली. पण यावेळी कांद्याची पेस्ट न करता, बारिक चिरून परतला तर चांगली लागली. असे का झाले असावे?

कच्चा कांदा मिक्सर मध्ये घातला की भयंकर वास येतो.

कांदा चांगला परतून मग मिक्सरमध्ये घातलेला बरा हा स्वानुभव.

अमेरीकेत जो यलो ओनियन मिळतो त्याची कच्ची पेस्ट तेलावर परतली की कडू चव येते. उग्र वास आणि कडू चव घालवायला बरेच परतावे लागते. त्या ऐवजी उकडलेल्या कांद्याची पेस्ट वापरायची किंवा कांदा चिरुन तेलावर परतून मग त्याची पेस्ट करायची.

पेस्ट करून काही वेळाने वापरली का?>>> नाही. लगेच वापरली.
कांद्याची पेस्ट खुप परतावी लागते आणी शिजायला वेळ लगतो. >> हो. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतला होता.
कांदा चांगला परतून मग मिक्सरमध्ये घातलेला बरा हा स्वानुभव.>> नेहमी तसेच करते. पण यावेळी स्वत:चे बदल न करता पाककृती करायला गेले आणि सगळे बिघडले.

अमेरीकेत जो यलो ओनियन मिळतो त्याची कच्ची पेस्ट तेलावर परतली की कडू चव येते. >> फारच बेकार चव येते. नंतर काही केल्या नाणार नाही अशी.

Pages