माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो गं, मी पाहिले खुप वेळापासून प्रयत्न करते, माझ्या इथे 3च options distayet, upload, thumbnails and delete, insert नाहीए.

Are you trying from phone or pc ? Try the other and see
फोटो साइझ लहान आहे ना ?
नाहीतर admin यांना विचार... काय करणार

साईटवरून केलं, जमलं की. >>> तेच सांगायला आले होते. App वरुन नाही जमत, साईटवरुन करा. असो. जमलं हे छान झालं. चला, आता उद्यापासून छान छान रेसिपीज् आणि फोटू येऊदेत बरं.

चांगला दिसतोय की
मधला भाग फक्त खाता येणार नाही.
मस्त बदाबदा चॉकलेट सॉस मध्ये बुचकळून छान बाऊल मध्ये चोको लावा म्हणून द्यायचा
कानोकान खबर लागणार नाही केक बिघडल्याची.

हा कुस्करून त्यात चाॅकलेट साॅस आणि रम इसेन्स असला तर घालून झकास रम बाॅल्स बनवा. किंवा केकचे तुकडे, व्हॅनीला आईस्क्रीम, जेली, कस्टर्ड, ड्रायफ्रूट्स वगैरेचा मारा करून "बर्थडे ब्लास्ट ट्रीट" वगैरे झोल नावानं खपवा.

मायबोलींच्या सुग्रणींकडून कडून मदत आणि सल्ला पाहिजे. आज वडा सांबार करायचा बेत होता. उडीद डाळ रात्रभर भिजवून, वाटून तयार होती. पण थोडसे पीठ पातळ झाल्यामुळे मी वेळेवर त्यात काही चमचे तांदळाचे पीठ घातले आणि परत एकत्र करून वडे तळू लागले वडे सुरुवातीला छान होत होते, अगदी क्रिस्पी. नंतर दुसऱ्या घाण्यापासून काय झाले माहित नाही. वडे अगदी जोरात फुटायला लागले आणि अक्षरशः इकडे तिकडे उडू लागले नशिबाने कोणाला काही इजा झाली नाही. हे सर्व वेळेवर घातलेल्या तांदळाच्या पिठाने झाले असावे का? कृपया सल्ला द्या. धन्यवाद.

5-6 तास डाळ भिजवावी व लगेच वडे करायला घ्यावे. त्यात मावेल इतकी कणिक व मीठ घालून पुर्या (कचौड़ी) करता येतील.

मी बनवलेला वेज पुलाव/बिर्याणी नेहमी थोडी कोरडी होते.
मी दमवर शिजवते.बाकीच्यांना नाही समजत पण मला वाटतं.
काय चूकत असावं?

तेल तूप कमी पडतंय का?
तांदूळ पाण्यात उकळतांना वेळ कमी घेतला जातो आहे का?
मसाला शिजवतांना पाणी कमी होतंय/ पडतंय का?

एक उपाय करून पाहा - तांदूळ उकळत्या पाण्यातून काढल्यावर (बाकी भाज्या/मांस/मसाले इ. सोबत) नंतर दम देतांना झाकणाला कणकेनी सील करण्यापेक्षा - झाकणाला एक कापड ओलं करून पिळून मग बांधायचं अन हे डँप झाकण वापरून दम द्यायचा. जास्त चांगला इफेक्ट येतो.

तांदूळ पाण्यात उकळतांना वेळ कमी घेतला जातो आहे का?
मसाला शिजवतांना पाणी कमी होतंय/ पडतंय का?
बहुतेक असे होत असावे.
वर सांगितलेले बघेन करून.

मृणाली माझी पण दम बिर्याणी आधी अशीच कोरडी व्हायची .. मग एकदा रणवीर ब्रार च्या रेसिपी मध्ये बघितले त्याने सगळे लेअर लावून झाल्यावर ..वरून थोडे दूध टाकले.. मी हि तसेच करते .. आता मस्त होते माझी दम बिर्याणी..

माझी चिकन/मटण बिर्याणी छान होते.
वेज फक्त मनासारखी होत नाही, पुढच्या वेळी करते वेगवेगळ्या ट्रायल्स.

मृणाली रणवीर ब्रार ..व्हेज दम बिर्याणी रेसिपी बघ.. सगळे नीट समजावून सांगतो तो..मी माझ्या अंदाजाने दूध घातले..

Pages