आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी होणार सुपरस्टार मध्ये काल अरु, अनि अनि संजना आले होते. मधुरानीची आई, मुलगी आणि नवराही आले होते. मधुराणीच्या मुलीने गाणं गायलं. तिच्या आईने पासष्ठाव्या वर्षी पीएचडी केली आहे.

अनिरुद्ध दुसरं लग्न कसं करू शकतो एक लग्न झालेलं असताना. अशा बेकायदेशीर गोष्टी का दाखवतात, तिकडे राजा राणी मध्ये ती मुलगी अठराच्या आत लग्न करते Angry अरुच्या मैत्रिणीचं आणि केदारचं काय प्रकरण आहे.

अरुच्या मैत्रिणीचं आणि केदारचं काय प्रकरण आहे.

नवीन Submitted by चंपा >>>> देविका आणि केदारचे college मध्ये अफेअर होते म्हणे.12 तारखेपर्यंत वेळ काढायला हवा ना आता.म्हणून असे काहीतरी नवीन खुस्पट काढले असेल

विशाखा मोघम काहीतरी ऐकलं म्हणून वेगळं राहायचा निर्णय तडकाफडकी घेते, सासू म्हणते हे अरुमुळे झालं आणि देविका घटस्फोट झालेली असल्यामुळे ती असं करूच शकते. अनिरुद्ध केदारच्या मागे धावत जातो तर मला वाटलं की त्याला थांबवेल तर तो म्हणतो केदारला की तुझं अफेर असताना मला बोलायची तुझी हिम्मत कशी झाली. देशमुखांच्या घरात सगळे डोक्यावर पडलेत का, कुणालाच वागा बोलायचं भान नाही, मोठा घर पोकळ वासा आहे.

संजनाने एका देवळात लग्नासाठी नोंदणी केली आहे. त्याचदिवशी त्याचवेळेसाठी अरुंधतीने पण पूजेसाठी त्याच देवळात नोंदणी केली आहे.12 मार्च .लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या दिवशी. घरी त्यांचे पुन्हा लग्न आहे. मोठा गौप्यस्फोट होणार आहे.

एवढ्या यंग कपल च्या लग्नाला २५ वर्ष कशी दाखवू शकतात? त्यांची मुलगीच १०-१२ वर्षाची दाखवली आहे.अरू शी एवढं उद्धट बोलते केदार ची बायको.

मधुराणीची मुलगी दहा-बारा वर्षाची आहे. अनिरुद्धच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली मग विशाखाची मुलगी एव्हडी लहान कशी. तिच्याही लग्नाला वीस बावीस वर्ष झाली असतील. ती आणि केदार फारच लहान दिसतात. नक्की सक्खी बहीणच आहे ना.

अनिरुद्धच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली मग विशाखाची मुलगी एव्हडी लहान कशी.>> उशीरा झाली असेल.
विशाखा अनिरूद्धपेक्शा ८-९ वर्षांनी लहान असेल.

यंग कपल नाहीये ते.त्यांच्या मुलाचे लग्न ठरले आहे.मुलगी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे>>> विशाखा आणि केदार.

अरुंधती ने घरातल्या सगळ्या ला डावलेल्या लोकांना लाईनीत उभ करून फटके मारावेत...पहिला नंबर सासूचा आणि लास्ट नंबर मुली चा.

रंगपंचमी नंतर 2-3 दिवसांनी मेहंदी संगीत हळद आहे म्हणे.मग लग्न. यांची रंगपंचमी कधी येणार आता. Trp stunts Angry Angry अरुंधती भविष्यवाणी विसरली काय Uhoh मी कालचा भाग नाही बघितला.कंटाळा आला आता. बहुतेक गौप्यस्फोटाचा भाग बघेन direct

आताची संजना.. रुपाली भोसले आहे.. मराठी बिग बॉस मधली.. पण तिच्यापेक्षा आताची दिसायला बरी वाटते... विबासं मटेरियल वाटते..

सेम स्टोरीवाली 'अनुपमा' स्टार प्लसवर चालू आहे. तिच्या तुलनेत अरुंधती बरीच सुसह्य आहे.
परवाचा संजनाचा एवढा हाइपवाला कॉल फुकटच गेला की. केवढा तो आंधळा विश्वास सगळ्यांचा अनिरुद्धवर. कैच्याकै.

रुपाली भोसलेने आधीही स्टार प्रवाहच्या दुर्वा मध्ये सेम charactor केलेलं, कंटाळा येत नाही का परत तेच करायला. हिंदी सिरीयलमधे मात्र वेगळी भूमिका केलेली.

संजना बदलली काय, बघायला पाहिजे. विबासं मटेरियल Proud आधीची संजना नाही आवडायची. का ते आत्ता समजले. विबासं मटेरियल नाही वाटायची ती.
Lokdown नंतर काम मिळायची मारामार असेल. मिळेल ते करा, चॉईस नसेल त्यात.

ती रुपाली गांगुली ..साराभाई v /s साराभाई मधली .. >>> हे मी लिहिलेलं हिंदी सिरीयल त्या बाबत का.

रुपाली भोसले सुमित राघवन बरोबर एलियनच्या भूमिकेत होती हिंदी सिरीयलमधे, त्याबद्दल लिहिलं मी.

अंजु..काय करणार .. आधी काम मिळाले पाहिजे आणि त्याचे पैसे सुद्धा...ह्यांचं फील्ड च असे आहे.. वेळीच स्वतःला सावरले नाही.. हात पाय हलवले नाहीत. तर पुढे हलाखीची परिस्थती..

ह्म्म्म खरं आहे, पण शिक्का बसतो आणि त्याच त्या भूमिका मिळत राहतात. हिंदीत वेगळा रोल केल्याने खरंतर कोणी दुसऱ्या भुमिकेसाठी विचार करायला हवा होता. मला फार आवडत नाही ती पण तरी वाटलं. दुर्वा हिच्यामुळे सोडली मी, बोअर रोल एकदम.

Pages