खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गटारीचा शिल्लक मटणाचा रस्सा कसा संपवावा? बोकडाला मुक्ती द्यायला मदत करा ! माझ्या एका विंडो मध्ये ओपन आहे...तुमच्याकडे draft नसेल तर सान्गा... पाठवतो...

ड्राफ्ट आहे माझ्याकडे
सुदैवाने वर्क फ्रॉम होम करत असल्याने पीसीवर केलेले.
काम करत करत अध्येमध्ये लिहित. आणि आता फोटोची खटपट करत अपलोड केलेले.
सगळी मेहनत एका फटक्यात वाया गेली.
आता आणखी कुठे टाकता येईल का बघायला हवे

असो, वेबमास्टर यांना विचारले आहे. कारण तरी कळेल. काळजी गेता येईल त्या नियमाची.

आपले आभार आणि धन्यवाद Happy

जाई मि naahi paalat shravan.. ulat naarlipornima zhali ki fish mast. milte.. taaje & swastsudha..u cant imagine evdhe swast astat.. malad la .. rawas.. surmai.. halwa.. ghol..mori..khapri pomfret..hyavarshi jaane honar nahi.. malad fish market la.. hyavarshi saglech no..no.. GSB ganpati phakt online darshan.. Rakshabandhan sudha online..

खव्याच्या करंजी... मस्तच. मला भयंकर आवडतात.
गुजा पण.

——
( स्वगतः. मी इथले पाहून फक्त मनातच ठरवते आणि नंतर वजनाच्या भितीने कॅन्सल करते.
खव्याची करंजी पाहून अगदी वाटलच की, करते एका वाटीच्या पण आरशात स्वतःला पाहून रद्द केलं.
लहानपणीच्या आठवणीत, मस्त तोंडात विरघळणारा पापुद्रा, आतलं मउसुत सारण... अश्या करंजी आई करायची , तेव्हा दोन करंजी खावूनच तृप्त वाटायचं. आता , आई करतही नाही आणि मी खाऊ शकत नाही.)

म्हाळसा, खुप खस्तावाली ( खुसखुशीत पापुद्रा) करंजी मस्त दिसतेय.
माझा आवडता पदार्थ आहे, बेसन लाडुनंतर.

Submitted by ए_श्रद्धा on 24 July, 2020 - 17:5४>>> क्या है ये? ,
क्यों है ये?
जो भी है बडा अच्छा लगता है |
Proud

रोज आईसक्रीम एकदम रक्ताळलेले दिसत आहे... यम्मी Happy
रोज सिरप आहे की जेली?

आणि त्याचावर त्या सगळ्या चटण्या मिळून पॅटीस खायला जमल्यात असे वाटतेय Happy

मस्त फोटो... मला गुलकंद आईस्क्रीम फार आवडते... ते महाराष्ट्राच्या बाहेर मिळत नाही कुठेच...

Pages