खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_5287 (1).jpg

मी केलेले गुलाबजाम

व्हीबी खरंच मज्जा येतेय मराठीत लिहायला..
रताळी साले काढून वरती दिल्याप्रमाणे कापून घ्याचे.. धुतले नाहीत तरी चालतील .. मी धुते.. सवय ..फोडणीला उडदाची डाळ.. मोहरी.. जिरे..हिरवी मिरची .. हिंग .. कडीपत्ता घालून त्यात रताळी घालून .. झाकण ठेऊन ५/७ मिनटात ती शिजतात..नांतर मीठ .. चवीप्रमाणे साखर.. ओले खोबरे..घालून २ मिनिटे परत झाकून ठेवायची कि खायला तयार झ्हाली.... उपवासाला हि चालतील.. हवे तसे बदल करून.. उदाची डाळ... मोहोरी.. हिंग न घालता..खोबरे नसेल तर दाण्याचे कूट चालेल..

मीबी एकदम एग्री आहे बघा. आमी फ्लॉवर म्हंतो, काय ममो Wink>> व्हय ग माज्या मर्दाने ☺ राजा राणी च जोडी मोड ऑफ

अश्विनी एक वाटी तांदूळ , पाव वाटी उडीद डाळ ,एक छोटा चमचा मेथी दाणे, आणि दोन मोठे चमचे मूग डाळ पण घातली होती. डाळ तांदूळ सेपरेट भिजवले आणि सेपरेट वाटून मग एकत्र केलं. वाटलेलं रात्रभर ठेवलं आणि सकाळी डोसे केले.
पण ह्या पेक्षा माझा बिडाचा तवा भारी आहे , खूप वर्ष जुना आणि वापरून वापरून सिझन झालेला. मी निर्लेप तवा कधी ही वापरलेला नाहीये डोसे घावन करायला.

थलिपीठ, गु जा, पनीर भाजी ,खट्टा ढोकळा आणि रताळ्याची भाजी सगळं बेस्ट दिसतय.

झम्पी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. तशीच करतात .. माझा उपवास नाही.. त्यामुळे खोबरेल तेलात केली.. इम्म्युनिटी बुस्टर.

ममो माझ्याकडे पण आहे.. नॉनस्टिक पण.. सुरवातीच्या दिवसात होसेने विकत घेतलेले .. पण आजपर्यत ते बॉक्स च्या बाहेर आलेच नाहीत.. बिडाचा तव्यावरच डोसे.. उत्तमपम..घावणे.. तेल कमी. चवदार..

मानव पृथ्वीकर .. व्ही बी .. पिंकी ..सोनाली..तुम्हा सर्वाना माझ्याकडून धन्यवाद..
मराठीतून जेवढे वक्त्य होता येत.. तितके मला इंग्लिशमधून होता येतच नव्हते.. किंबहुना चपखल शब्द सुचायचे नाहीत..

श्रवु, अभिनंदन मराठीसाठी! आता रेसिपी नावासहित एकाच प्रतिसाद लिहीलं की झाली माबोकरीण Happy
लगे हाथ खट्टा ढोकळा रेसिपी पण टाक

जाई रताळ्याची भाजी हा पर्याय आहे.. बटाट्याच्या भाजीला.. आपण उपवासाला बटाटा भाजी करतो तशीच .. पण मधुमेह असेल तर बटाटा चालत नाही..

Pages