खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow

वॉव घावणे!
चहा चटणी आणि घावणे..

jaai.. ghavne & chutney bhari.. mazyakde aaj chiken ahe.. tybarobar chhan lagtat.. 4/5 ghavne pathvun de..

khotte हे पहिल्यांदाच ऐकलं ... सविस्तर पाकृ व माहिती द्यानं म्हणजेकुठल्या भागात केली जाते वै...

मोदकांसाठी धन्यवाद सर्वांना.
आज नाश्त्याला, गोयंकराचो पोई.
प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. ख्रिच्च्शनांच्या भट्टीत जरासा वेगळा आहे तर माझ्या मामाच्या भट्टीत असा बनतो.
हा गोवन पोइ , मुंबईच्या लादी पावासारखा बिलकुलच नाही, मुंबईचा लादी पाव भुसभुशीत गोळा असतो व चहात बुडवून लिबलिबीत मैद्याचा गोळा असतो, चवीला काहीच खास नसतो थंड झाल्यावर.
पोई बाहेरून खुसखुशीत, खस्ता तर आतून नरम असतो. नरम असला तरी लिबलिबीत नसून एक बॉडी असते. ती चहात बुडली की, मस्त लागते. आकाराने सुद्धा जरासा चपटा व आयताकृती असतो.
झालं आमचं, गोवन पोई प्रेम... गरमागरम खावून पहा.

60BDB73B-08CF-4162-B657-E959CA449B1A.jpeg5D896F9D-36AF-46D4-A0A1-514E5B948C6F.jpeg

आहाहा, मस्तच सगळं. जाळीदार घावनं,खोट्टे,मटण पाव आन गोयचों पोई. पोई पहिल्यांदा च बघतेय. त्यामुळे चवीचा अंदाज नाही पण देवाला म्हणतेय म्हंजे मस्तच असणार. मुंबईत कुठे मिळणार आम्हाला खायला?

Jui ghavne khup chhan.kase kartat aaila vichar.majhehi nehmi fastat.der veli tawyalach shivya deun wel marun nyawi lagte.

नेटवर पाहून घावणे केले होते पण फसले, पीठ जुने असावे. जाळी मुळीच पडली नाही आणि उलटताना तुटत होते Sad
मी खान्देशातली असल्याने घावणे येत नाहीत. काही खास टीप असतेय का?
नाश्त्यासाठी विविध पर्याय शोधत असते Happy

देवीका, गोवन पोई मस्तच,

रेसिपी द्या न, जर सोपी अन बिनमैद्याची असेल तर करता येईल>>>> +100

आशु , तवा पुरेसा तापला होता का ? गॅस मिडीयम फ्लेमवर होता का ? तव्याला तेल लावलं होत का ?
जाळी पडण्यासाठी थोडं उंचावरून घावणे घालावेत .

Pages