खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

devki .. VB .. thanks..

VB unda mahnje kay.. mala te sukrunde kartat puranche te mahit ahe..

खव्याचे करन्ज्या.. gulabjamun.. ragda patice,, saglech bhari.. मम .
व्हेज बिर्याणी विथ डाळ भजी, रोझ आईस्क्रीम तोँपासू .
आता आमच्याकडे आईस्क्रीम खायचे बंद केले . फक्त नेत्रसुख घ्यायचे.
श्रवू, पातोळ्या मी ऐकल्या होत्या आणि ह मो मराठेंच्या पुस्तकात याचा उल्लेख वाचला होता. त्या हळदीच्या पानात केल्यात का? आणि खाताना ते पान काढून टाकतात ना? आज तुम्ही केलेल्या बघितल्या . खूप छान केल्यात. चव उकडीच्या मोदकाची असते तशीच लागते ना? मी अगदीच बाळबोध प्रश्न विचारतेय खरं तर.
नागपंचमी स्पेशल कडबू
20200725_182147.jpg

व्हेज बिर्याणी ,डाळ भजी छान. वर्णिता कडबु मस्त दिसताएत. मुरड छान घातली गेलीये. मागच्या पानावर म्हळसा नी केलेल्या खव्याच्या करंजापण मुरडीच्याच होत्या. मस्त मुरड घालता तुम्ही लोक. माझी इतकी सुबक रेखीव नाही येत

व्हेज बिर्याणी ,डाळ भजी छान. वर्णिता कडबु मस्त दिसताएत. मुरड छान घातली गेलीये. मागच्या पानावर म्हळसा नी केलेल्या खव्याच्या करंजापण मुरडीच्याच होत्या. मस्त मुरड घालता तुम्ही लोक. माझी इतकी सुबक रेखीव नाही येत...+1

IMG_20200726_184914_037.jpg

नाचणीची भाकरी
भरीत
करंजी
वरण
लाडू

पहिल्यांदा image टाकत आहे.
धपाटे, लसणाची, कांद्याची, शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी सोबत दही आहे.

लाडवाचा फोटो खतरनाक आला आहे म्हाळसा
आमच्या पोरांचेही जीव की प्राण + माझ्याही आवडीचे, त्यामुळे दोन्ही घरात खारी बिस्कीट सापडावे तसे बेसनाचे लाडू असतातच.
पोरांना दाखवतो हा फोटो झरूर

@ उदयगिरी .. धाग्यावर स्वागत
हे धपाटेही आवडीचे.. आमच्याकडॅ बनायचे नाही. त्यामूळे लग्नानंतरच खाल्ले पहिले ते सासुरवाडीला. आता स्पेशली माझ्यासाठी बनवून पाठवले जातात

नाही आमच्याकडेही असे पराठास्टाईलच बनतात.. पराठ्यांपेक्षा कमी सॉफ्ट असतात. आय मीन भाकरीस्टाईल

धपाटे विशेषतः प्रवासासाठी बनवतात, कारण ते प्रवासात दोन दिवस टिकतात आणि त्याची खरी चव दुसऱ्यादिवशी लागते.

बेसन लाडू विक पॉईंट. आता करावेच लागणार. धपाटे , नाचणी भाकरी ताट मस्तच.
ही आजची न्याहारी
20200727_082647.jpg

मानव, इकडे चहा पुरी आवडीने खातात सांगली साईडला. मी लग्नानंतर पहिल्यांदाच बघितले. मला नाही विशेष आवडली . त्यापेक्षा चहा पोळी छान लागते.

Pages