साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>>९ व्या स्थानात जर शनी असेल तर तो वयाच्या ३५ शी नंतर भरभराट देतो.>>>>>>>> अतिशय सत्य!!! प्रचीती आहे.

ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी युट्युबवर शरद उपाध्ये यांच्या भविष्यावर बोलू काही शोचे भाग बघावे.
हे राशीचक्र नाही (म्हणजे विनोदी कार्यक्रम नाही). तर शास्त्रानुसार माहिती आहे. साडेसाती, शनी, इतर सर्व ग्रह, महादशा, गुणमेलन सर्व आहे.

कित्येक जुळ्यांचे आयुष्य भिन्न होते. त्यांची जन्मरास एक असली तरी लग्नरास वेगळी असू शकते. पूर्वसंचितामुळे आयुष्यात खूप फरक पडणार पण त्यामुळे लग्नराशी वेगळ्या होऊ शकतात का?>>>>

हे पटतयं.. अजयचापण जुळा भाऊ आहे.. मी ओळखतो दोघांना.. दोघांच्यात खुप फरक आहे.. दिसणं, वागणं, असणं, सगळचं वेगळं..

कधी कधी हे दोघे जुळे तर जाऊ द्या सख्खे भाऊ आहेत हेसुद्धा पटत नाही..

>>>>>>>ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी युट्युबवर शरद उपाध्ये यांच्या भविष्यावर बोलू काही शोचे भाग बघावे.
हे राशीचक्र नाही (म्हण>>>>>>> सर्व भागांचे पारायण झालेले आहे/ अजुनही परत परत ऐकते.
___________________________ सनव यांना दिलेला प्रतिसाद संपला. पुढील विवेचन वेगळे _____________________________

असे वाचलेले ज्ञान खूप तोकडे असते. धोकादायक असते. उदा - आजची उपाध्ये यांची पोस्ट पहा -

https://www.facebook.com/SharadUpadhyeOfficial/posts/184522393088897 -------
कुंडली वरून फलादेश वर्तविणे हा सापशिडी सारखा खेळ असतो.कर्मांचे फासे पडतात तसे प्रारब्ध बदलते.पण तो बुध्दीबळासारखा सावधपणे खेळण्याचाही अष्टावधानी खेळ असतो.गुरु हा ग्रह चांगला विद्यास्थानात धनु राशीत असतो पण त्याला मृतावस्था मिळून तो क्षीण फळ देतो.शुक्र प्रथम स्थानात असतो पण त्याच्यावर शनिची दृष्टी पडून अपेक्षित सौंदर्याचे फळ मिळत नाही.बुध वाचास्थानात मिथुन राशीत असतो म्हणून वरकरणी वाचस्पती होईल असे वाटते पण राहूच्या षडाष्टकामुळे तो तोतरा असतो.मृत्युस्थानात मंगळ असतो म्हणून ज्योतिषी गंभीर अपघाताचे फळ वर्तवून घाबरवतो पण बाल्यावस्थेंतील त्या मंगळावर गुरुची शुभ दृष्टी असल्याने काहीही धोका रहात नाही.विवाह स्थानात तूळेचा शुक्र असल्याने ज्योतिषाकडून विवाहाचे फार शृंगारिक वर्णन केले जाते पण प्रथम स्थानांतील मेष राशीतील शनिची १९ वर्षे यौवनव्यापिनी महादशा येऊन शारीरिक अस्वास्थ्यामुळे संसार सूख मिळत नाही.दशमस्थानात बुध,गुरू युती असल्याने व्यावसायिक भरभराटीचा फलादेश वर्तवला जातो पण दशमेश व्ययात आहे इकडे दुर्लक्ष झाल्याने व्यवसायात मोठा फटका बसणार आहे याची सूचना दिली जात नाही.एकाच ग्रहाला महत्त्व देऊन बाकीच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याने फलादेश चुकतो व जातकाचे अपरीमित नुकसान होऊन त्याचा विश्र्वास उडतो.म्हणून प्रत्त्येक ग्रह, 1)भाव २) राशी ३) नक्षत्र ४) अवस्था ५) दृष्टी ६) योग ७) भावेशत्व या मुद्द्यांवर तोंलावा व नंतर १) महादशा २) अंतर्दशा ३) गोचर भ्रमण या कालनिर्णयाच्या बाजू तपासाव्या.याचसाठी बुध्दीबळाचा अष्टावधानीपणा असावा.फलादेश देणे हे दहा मिनिटांचे काम नाही तर किमान अडीच तासांचा अभ्यास आहे.त्यासाठी उपासनेचीही दृढ बैठक असावी.वाणी शुध्द व ओघवती असावी.फार विश्र्वासाने वेळ आणि पैसा खर्च करून आलेल्या जातकाची दिशाभूल होऊ नये ही काळजी घेतली पाहिजे.****** नमस्कार.

फार विश्र्वासाने वेळ आणि पैसा खर्च करून आलेल्या जातकाची दिशाभूल होऊ नये ही काळजी घेतली पाहिजे >>> हे उपाध्येबुवा म्हणतात ??? Wink
प्रकाश घाटपांडेजी येतील ही अपेक्षा
http://mr.upakram.org/node/864

बाकी -
" वास्तुपरिक्षा करताना वातावरणांतील लहरी जाणवता आल्यपाहिजेत. उपासनेने ते शक्य होते.एकदा बीडचे मंत्रीमहोदय श्री जयदत्त क्षीरसागर मला वरळीचा एक फ्लॅट तपासण्यासाठी घेऊन गेले.मला एका कोप-यात अत्यंत दूषित लहरी जाणवल-ल्या.तेथे एक पलंग तर फारच अशुभ लहरींनी भारित वाटला. मी विचारल्यावर ते म्हणाले," हो येथे आरोग्यमंत्री विमल मुंदडा कॅन्सरने अत्यवस्थ होत्या व त्यांचा देहांत झाला."

वरील लिखाण बुवांचेच आहे. उपासनेवर बराच भर असतो त्यांचा. उपासनेच्या शक्तीने त्यांना वातावरणातील अत्यन्त दूषित लहरी जाणवल्या. तशा लहरी त्यांना वर नमूद केलेल्या आणि तत्सम इतर ग्राहकांत जाणवतात का ? की फक्त मृतलोकांच्या बाबतीतच जाणवत असतात? अर्थात त्यांची एवढी उपासना असल्याने नक्कीच जाणवत असणार पण तरीही अशा जातकांना ते मार्गदर्शन करतात ? दत्त महाराज काय म्हणत असतील? Happy

शरद उपाध्ये अत्यंत चतुर गृहस्थ आहेत. राशीचक्राला हा करमणुकीचा कार्यक्रम आहे असे सांगून कायदेशीर सुटका करुन घेतात. पुर्वी त्यांचे ज्योतिषाचे क्लासेस होते. नंतर त्यांना राशीचक्राची आयडीया सापडली 2-3 तासात एकपात्री झाले की संपले. भांडवल गुंतवायची गरज नाही. ज्योतिषाला गूढ सदरात टाकले की सिद्ध करायची पण जबाबदारी रहात नाही. 1988 च्या आसपास त्यांच्यावर स्त्रीयांच्या शोषणाच गुन्हा माहिम पोलिस स्टेशनमधे दाखल झाला होता. दृढ श्रद्धा रोपण समिती नावाच्या एका कुठल्यातरी समितीने तो दाखल केला होता. हे मी पेपर मधे वाचले होते.

चंपक , ठकठक मधले जोक्स घ्यायचे... राशींची नावे जोडायची आणि सांगायचे असा तो राशीचक्र प्रकार आहे...

शनि मकरेतून काहीतरी कुंभेत जातोय ना? - असे काहीसे युट्युबवरती सॅम जेप्पीच्या व्हिडिओत, ऐकल्याचे स्मरते.
म्हणजे धनु वाल्यांची संपेल.

साडेसाती म्हणजे मागे केलेल्या चुकांची आणि त्यावेळी दुर्लक्षित झालेल्या भानगडींनी डोके वर काढणे. विरोधी पक्ष आणि परिस्थिती यांचा हल्ला सुरू. अहं सोडून माघार घेण्याचा काळ.

Pages