भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकं उलट अधिक धार्मिक, अंधश्रद्ध होत आहेत असे दिसते. शिक्षण घेतल्याने विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागतो असे चित्र दिसत नाही.

मराठी कुटुंबही सकाळीच स्वैपाक आटपून आलं होतं. >> अहो सकाळी स्वयंपाक रोजच करत असतील. ग्रहण बघण्यात वेळ जाईल आणि मग भूक भूक करुन भूकबळी जायला नको म्हणुन केला असेल. Biggrin

@फिल्मी
ओह असं आहे का! मग सहमत.

>>आजही 70- 75 % जनतेमध्ये ह्या अपसमजुती आहेत.<<
कारण त्या खोडुन काढणारे, त्या मागचा जुना रेलवंस (रादर इर्रेल्वंस) समजाउन सांगणारे उपलब्ध नाहित. आहेत ते केवळ टर उडवणारे, ज्याचा उलटा परिणाम होत जातो. दुर्दैवाने, अनिस हि यातुन सुटलेले नाहित...

अंनिसचे लोक टर उडवत नाहीत. आणि जे टर उडवतात ते अंनिसचे लोक खात्रीने नसतात. अंनिसचे कार्यकर्ते समाजात वावरतात, तिथे वल्गना अथवा राणा भीमदेवी भाषणे न देता लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्यातलेच होऊन गैरसमजुतीतला फोलपणा समजावून सांगतात. अंनिसचे कार्य two pronged असते. साधनासारख्या नियतकालिकांत लिहून बौद्धिक वादावादी करून मुद्दा सिद्ध करणे आणि समाजात वावरून प्रत्यक्ष प्रयोग करून आत्मीयतेने त्यांना पटवून देणे.

>>अंनिसचे लोक टर उडवत नाहीत.<<
मान्य. पण ते लोकांचा विश्वास संपादन करण्यात कमी पडतात असं सर्वसाधारण निरिक्षण आहे. "टर" शब्द अनिस करता न्हवता, तो खास सोशल मिडियावरच्या अर्ध हळकुंडवाल्यांकरता होता... Wink

हिरा +१
मला तर अनिस च्या लोकांचे कौतुकच वाटते.

मलाही लोक जास्त अंधश्रद्ध होत आहेत असेच चित्र दिसते. कदाचित माझा सँपल सईझ लहान आसेल.
पस्तीस वर्षापूर्वी मी एका टिअर २ शहरात रहात असताना ग्रहण आले होते तर आम्ही शाळकरी मुले उत्साहाने वेल्डिंग ची काच, काजळी लावलेली काच, खोक्याला लहान छिद्र पाडून केलेला पिन होल कॅमेरा, असे साहित्य गोळा करून पाहिले होते,. माझ्या गरोदर बहिणीनेही पाहिले होते.

आज मात्र काहीच्या काही फोर्वर्ड्स ! अमूक केल्याने तमूक होईल याच्या भल्या मोठ्या यादीत "ग्रहणकालात सं*ग करू नये, पुढचा जन्म डुक्कराचा येतो असेही होते. गॄप मध्ये लहान मुले आहेत याचीही तमा न बाळगत बिनधास्त पाठवत होते.

विज्ञानाचा प्रसार वाढत असला तरी अगदी संथगतीने वाढत आहे dy/dx कमी असला तरीही चालेल पण तो निगेटिव्ह आहे कि काय अशी शंका येते.

विज्ञानाचा प्रसार वाढत असून काय उपयोग? विवेक बुद्धी हवी (कॉमनसेन्स हवा). अगदी ६०-७० वर्षापूर्वी पर्यंत ग्रहणात सैपाक करायचा नाही हे घरात लहान मोठ्या सर्व महिलांच्या गळी उतरवायचे असेल तर असली "अग्गबाई" छाप कारणं सांगून परातीत मुसळ उभा करावा. ५०% रेसिप्या आपोआप बाद होतील नि सैपाक करायचं मोटीव्हेशन पण जाईल. हल्ली अशा वागण्याने काय साधतं हा प्रश्न विचारायला फार शिक्षणाची /विज्ञानाचा प्रसार इ इ ची गरज नसावी.
भन्साळीची नजर ह्या फॉर्वर्ड वर पडली नसेल आणि पुढच्या सिनेमात सारा-जान्हवीचे "डोला रे" छाप मुसळगीत नसेल एवढीच या निमित्ताने शनिदेवाला प्रार्थना.....

खरे तर हा श्रद्धा/अंधश्रद्धेचाही मामला नाही. कोणाच्याही श्रद्धेला माझे कसलेही ऑब्जेक्शन नाही. मी स्वतःही नास्तिक, एथिस्ट, रॅशनल वगैरे अजिबात नाही. अनेक धार्मिक कार्यक्रम मला मनापासून आवडतात. अनेक क्षेत्रातील भारतातील पारंपारिक माहिती थक्क करून सोडणारी आहे. पण त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी असतात की पूर्वी अपुर्‍या साधनांमुळे त्या सिद्ध करणे शक्य नसते, किंवा शास्त्रीय कसोटीवर सिद्ध करणे म्हणजे काय हे ही पूर्वी नव्हते (निदान उपलब्ध माहितीनुसार). त्यामुळे अनेक पिढ्या प्रचलित असलेले समज जर शास्त्रीय दृष्ट्या खरे नसतील तर त्याची माहिती काढून मग एक पारंपारिक समज म्हणून ते खुशाल जतन करावेत. आपल्या संस्कृतीचा तो एक भाग असतो.

मला प्रॉब्लेम आहे तो "शास्त्रीय कसोटीवर सिद्ध करणे" म्हणजे नक्की काय याची काडीची माहिती न करून घेता केलेले छातीठोक दावे, ते ही सुशिक्षित लोकांकडून आणि उगाच काहीतरी अर्धवट वापरलेल्या धार्मिक व शास्त्रीय कल्पना एकत्रित कोंबून त्या मागे काहीतरी शास्त्र असल्याचा आभास निर्माण करणे - याचा. अशी काहीतरी पोस्ट आली की दुर्लक्ष करायचे सोडून शिकलेले लोक तेच पुढे आणखी शंभर लोकांना शेअर करतात. यात ना आपल्याकडे असलेल्या जुन्या माहितीचे संवर्धन करण्यात काही हातभार लागतो, ना काही खरोखरच शास्त्रीय रीतीने सिद्ध होते. नुसताच टाइमपास.

वर दिलेली अनिसची बातमी अपुर्ण आहे का याची क्ल्पना नाहि. परंतु, अनिसने प्रयोगाद्वारे सिद्ध करायला हवं होतं कि मुसळ पडतं पण ते पडण्यामागे ग्रहणाचा काडिमात्र संबंध नाहि, तर तो प्रयोग जास्त इंपॅक्टफुल झाला असता. मुसळ उभं करणं इज नो बिग डिल, पण ते ग्रहण संपल्यावरहि उभं रहातं किंवा संपायच्या आधीच पडतं, आणि या मागचं कारण सिजी गेट्स डिस्प्लेस्ड हे आहे बाकि काहि नाहि. हा महत्वाचा मुद्दा यायला हवा होता, हे माझं मत...

मला अजिबातच पटत नसूनही ग्रहणाचे नियम साबावाक्यम् प्रमाणम् म्हणून पाळले गेले. सकाळी आंघोळ करून नाश्ता रांधून खाऊन झाला. ग्रहणातलं अन्न खाऊ नये म्हणून दीडला पुन्हा आंघोळ करून कुकर भाजी कणीक मळून पोळ्या हे सोपस्कार करून अडीच वाजता जेवण वगैरे.... माझ्या नशिबाने ७ वर्षांपूर्वी इतकं मोठं ग्रहण नव्हतं त्यामुळे प्रेग्नन्सी सुखात पार पडली. पण आता नेमका रविवार, सगळे घरात, त्यात लॉकडाऊन वगैरे असल्यामुळे एक दिवस "मरो बाकी सगळं, वाद नकोत" म्हणून सोडून दिलं. हेच कामाच्या दिवशी बाहेर पडायचं असतं तर मी नक्कीच ऐकलं नसतं. किंवा बाहेर पडून दुर्लक्ष आपसूकच झालं असतं.

२४ वर्षांपूर्वी सुरभी मालिकेचं ग्रहणविशेष प्रसारण आणि जिथून खग्रास स्थिती होती तिथून थेट प्रक्षेपण झालं होतं असं आठवतंय. अश्र्विन अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजन होतं बहुतेक तेव्हा. की मी काही मिक्स करतेय?

dy/dx कमी असला तरीही चालेल पण तो निगेटिव्ह आहे कि काय अशी शंका येते. >> dy/dx कसाही असला तरी चालेल, dy/dt पॉजिटिव्ह हवा Happy

सकाळी स्वयंपाक रोजच करत असतील. ग्रहण बघण्यात वेळ जाईल आणि मग भूक भूक करुन भूकबळी जायला नको म्हणुन केला असेल>>
नाही, आठच्या आत नाश्ता तयार करून खाऊन झाला होता आणि नेहमीच्या पोळ्यांच्या बाईंना सुट्टी दिली होती. Happy

ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांच्यासमोर बोलताना टर उडवणं मीही टाळते. कारण आपण उपरोधिक किंवा चेष्टेचा सूर लावला की समोरचा माणूस काहीही ऐकून घेत नाही हा अनुभव आहे. (श्रद्धा अंधश्रद्धाच नाही, तर इतरही वादविवादात)

आजही 70- 75 % जनतेमध्ये ह्या अपसमजुती आहेत.<<
कारण त्या खोडुन काढणारे, त्या मागचा जुना रेलवंस (रादर इर्रेल्वंस) समजाउन सांगणारे उपलब्ध नाहित.>>
मला ज्या ग्रुपवर या पोस्ट्स आल्या, तिथे मी अजिबात चेष्टा न करता असं मुसळ उभं करण्यामागचं कारण काय असेल अशीच चर्चा केली. अनिष्ट शक्तीच्या निवारणासाठी असेल का, हे त्यातूनच सुचलं. वर हीरांनी लिहिलंय की मुसळाला बडवायची पद्धत होती. कदाचित त्यासाठी ठेवत असतील. आणि परातीत पाणी ग्रहण पाहण्यासाठी. हे पटण्यासारखं आहे.
पण शिकले सवरलेले लोकही चुंबकीय शक्ती आणि गुरुत्वाकर्षण यांचा समतोल वगैरे वाद घालत होते हे बघून आश्चर्य वाटलं. ते एवढंसं लोखंड आणि त्याच्यावर काय परिणाम होणार! तेसुध्दा पृथ्वीचा चुंबकीय मध्य (?) पृथ्वीच्या केंद्रात असतो! म्हणून ते केंद्राकडे ओढलं जातं. चुंबकीय ध्रुवाकडे ओढलं जाणं ऐकलं होतं. मध्याकडे ओढलं जाणं प्रथमच ऐकलं.
शाळेत विज्ञान हा विषय शिकलो तरी वैज्ञानिक दृष्टिकोन येतोच असं नाही.

"त्यामुळे अनेक पिढ्या प्रचलित असलेले समज जर शास्त्रीय दृष्ट्या खरे नसतील तर त्याची माहिती काढून मग एक पारंपारिक समज म्हणून ते खुशाल जतन करावेत. आपल्या संस्कृतीचा तो एक भाग असतो"
जतन करणे म्हणजे ते समज कायम ठेवणे, त्यानुसार वागणे का?असे असेल तर यात थोडा विरोधाभास आहे. शास्त्रीय दृष्ट्या माहिती काढून त्यात ते खोटे ठरले तरी संस्कृती म्हणून ते जोपासायचे का? कालबाह्य, जाचक आणि गैरसोयीचे ठरले तरी? समाजाचा निम्मा हिस्सा हे जाचक निर्बंध आणि कष्ट निमूट सोसतोय, तक्रार करीत नाही म्हणून ते समर्थनीय ठरतात? शिजवलेले उरलेले अन्न, पाणी अशुद्ध वातावरणामुळे /प्रकाशामुळे दूषित झाले म्हणून फेकून द्यायचे? आजही दिवसभराचे पाणी फार दुरून वाहून आणून सकाळी भरून ठेवावे लागते. रात्रभरात विहिरीत साठलेले पाणी सकाळच्या उपश्यामुळे संपून जाते. शिवाय नंतर उन्हे चढत जातात. वगैरे.
मुख्य म्हणजे संस्कृती जतन करणे म्हणजे काय? मुळात संस्कृती म्हणजे तरी काय? आणि ती अपरिवर्तनीय असते का? असू शकते का? बदल घडतच नाहीत का? घडलेलेच नाहीत का?
आधीच अवांतर झाले आहे, आणखी नको, म्हणून लिहीत नाही.

मुसळ यादवांचा नाश करून थांबले नाही बहुतेक! >> अरेच्चा! खरंच की. तत्पूर्वी बहुधा अर्जुन-जयद्रथ युद्धाच्या वेळेला जेव्हा सूर्यग्रहण झालं, तेव्हा ते मुसळ युद्धात कोणताही भाग न घेता नुसतं बघत उभं असणार. त्यामुळे पुढे यादवांचा नाश करणार्‍या मुसळाला ग्रहणाच्या वेळी सर्वजण चिडून पाण्यात पाहू लागले. त्याचं प्रतिक म्हणून ग्रहणकाळात मुसळ पाण्यात उभं राहतं, शास्त्र असतं ते!

ही यादवांची मुसळाची गोष्ट मलापण आठवली होती. लव्हाळ्यांची मुसळं झाली होती अशी गोष्ट आहे ना? मी तसापण विचार करून पाहिला की कुठल्या राक्षसाचं प्रतीक वगैरे आहे का हे?
राहू-केतू पैकी केतु शब्दाचा एक अर्थ झेंडा असाही आहे. पण मुसळ म्हणजे काय झेंड्याची काठी नाही हाही विचार करून झाला. काही लॉजिकच लागत नव्हतं.
पण वर हीरांनी लिहिले आहे तसंच असणार. ग्रहण लागलं की मुसळाला बडवायची पद्धत होती म्हणूनच ते उभं करून ठेवत असणार. आता मुसळाला बिचाऱ्याला का बडवायचे काय माहिती!

https://www.facebook.com/1255572986/posts/1480668275439262/?substory_ind...

रणरागिणी : गर्भवती महिलेने दिली अंधश्रद्धांना मुठमाती, भाजी-फळे चिरत ग्रहणही पाहिले
कमेंट्स वाचा.
इथेही काही जणांकडून तशाच प्रतिक्रियांची अपेक्षा आहे

भरत सेम पिंच
अगदी हेच लिहायला आले होते,लोकांच्या प्रतिक्रिया बघून डोळे पांढरे झाले
आमचे पूर्वज खुळे होते का पासून बाळ जन्माला आल्यावर व्यंग दिसेल तेव्हा कळेल इथपर्यंत शे दोनशे कमेंट आहेत

एक पारंपारिक समज म्हणून ते खुशाल जतन करावेत. आपल्या संस्कृतीचा तो एक भाग असतो >>> हीरा, मी लिहीले आहे त्याच्या बरोब्बर उलटा अर्थ तुम्ही काढला आहे Happy "आपल्याकडे असा पारंपारिक समज होता" अशा दस्तऐवजाच्या रूपात ते जतन करावे, इतकाच अर्थ आहे त्याचा Happy जसे आपण वाचतो "प्राचीन काळात ग्रीक लोक असे समजत...." - तसे. हे समज व त्याबद्दलची माहिती हा एक संस्कृतीचा भाग असतो. ते तसेच पाळत राहा असे म्हणत नाहीये.

एकतर मी लिहीताना काही चुकले आहे किंवा तुम्ही वाचताना Happy पण त्या पोस्टमधल्या बाकीच्या मजकुरावरून तरी एकूण रोख लक्षात येइल. प्रथा जतन नव्हे. त्याची माहिती जतन करणे. पण तितकेच.

"प्रथा जतन नव्हे. त्याची माहिती जतन करणे. पण तितकेच."
मग तर छानच. दस्तऐवजीकरण अतिशय महत्त्वाचे आहे.
तुम्हांला अभिप्रेत असलेला अर्थ माझ्यापर्यंत पोचला नाही. क्षमस्व.

नाही आता मी पोस्ट पुन्हा वाचली आणि ती संदिग्ध वाटू शकते. क्षमस्व वगैरेची तर अजिबात गरज नाही Happy

त्यामुळे त्या वरच्या पोस्ट मधे तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्याचे उत्तर "नाही" असेच आहे - व बहुधा त्यात आपली मते सारखीच आहेत.

>>मुसळ का पडायला हवं?<<
दुसर्‍यांदा रामाची सीता कोण? नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, वाचनांत कि आकलनांत?

मूळ दावा - "ग्रहणाच्या वेळी परातीत पाणी घालून त्यात मुसळ उभं केलं तर ते उभं राहतं आणि ग्रहण संपलं की आपोआप खाली पडतं"

यावरुन मुसळीचं उभं रहाणं, पडणं ह्या नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स (कॉन्वर्स रिलेशन्स) आहेत. त्या दोन्हि तपासल्याशिवाय निष्कर्श काढण्याला काहि अर्थ उरत नाहि...

Pages