भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आणखी एक व्हॉटसअप forward.
<<

खोटं बोलू नको, मोदी"मय" सेवक क्षूद्रा.

असला कोणताही फॉर्वर्ड नाहिये, अन तुझ्या सारख्या २ ४ मंद लोकांशिवाय कुणी ही हे मान्य करील.

आररा परफेक्ट जागी लिहिलंस भावा... तुझं सगळं लिहिण च भोंदू असतं....

मिरची लागली काय? आता जाळ पण लागेल 5 तारखेला

-------------------------------------

आत्ताच अमेरिकेत असलेल्या धाकट्या मुलाचा फोन आला होता . खुप वेळ चर्चा चालू होती .

अमेरिकेत माझी दोन्ही मुले जवळजवळ गेली वीस एक वर्षे रहात आहेत .
त्यांना नोकरीचा  प्रॉब्लेम अजिबात नाही . ते दोघेही त्यांच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन रिसर्च कन्सल्टंट आहेत . 
आत्ताच्या परिस्थितीत त्यांचे अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे योगदान आहे .

पण माझा मुलगा सांगत होता ...

अमेरिकेत लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत . विशेष करून जे भारतीय आहेत त्या काही नविन आणि जून्या लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत .
त्यांना अमेरिका सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे . ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे त्यांना अमेरिकेत यापुढे रहाणे शक्य होणार नाही . 

काही जणांसमोर तर प्रचंड मोठी गंभीर समस्या उभी राहिली आहे .
बहुतेक जणांची लहान मुलं अमेरिकेत जन्माला आल्यामुळे त्या मुलांना जन्माप्रमाणे अमेरिकन सिटीझनशीप मिळाली असल्याने मुलांना अमेरिकेत ठेवून आई वडिलांना अमेरिका सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे . त्या मागे राहिलेल्या लहान मुलांना तिथल्या शेल्टर होम्स मध्ये ठेवण्यात येणार आहे .
आणि भारत सरकार त्यांच्या मुलांना येथे आणण्यास तयार नाही कारण ती मुले अमेरिकेची सिटीझन्स आहेत .

आहे की नाही भयानक समस्या ! 
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय !

हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या असल्याने ते अमेरीका सोडून जाण्याच्या तयारीत आहेत .पण इंडियात परत येताना तिथली घेतलेली सर्व कर्जे एकहाती फेडल्यावरच भारतात परत जाण्याची परवानगी मिळणार आहे . 

काही लोकांना अमेरिका सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
येथेच रहा सांगत आहे .
पण नोकऱ्या गेलेल्यांना 
आता अमेरिकेत राहून खर्च झेपणेच शक्य होत नाही . सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे .

अमेरीकन सरकारने भारत सरकारला तुमच्या माणसांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे . आणि त्या लोकांना भारतात आणण्यासाठी भारत सरकार अवाच्या सव्वा किंमत आकारते आहे . तिकिटांचे पैसे चार पट आणि भारतात आल्यावर सरळ हॉटेल मध्ये चौदा दिवस बंद अवस्थेत .

हॉटेलचा पर्याय - पंचतारांकित , तीन तारांकित , दोन तारांकित आणि सामान्य . या चौदा दिवसांचे पैसे विमानाच्या तिकिटाबरोबर आगाऊ भरले तरच भारतात जाण्याची परवानगी दिली जाणार आहे . हॉटेलचे दरही चार पटीने जास्त .

कित्येक आई वडील भारतातून आपल्या मुलांकडे रहायला गेलेली होती ते अमेरिकेत अडकून पडलेले आहेत .
व्हिसा संपलेला आहे .
आणि भारत सरकार नेण्याची काय सोय करत आहे इकडे त्यांचे डोळे लागले आहेत . दररोज अमेरिका ते भारत अशा विमानांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत . अमेरिकेत असलेले आपल्या देशाचे खुद्द राजदूतच काल अमेरिका सोडून भारतात परत ( पळून ? ) आलेले आहेत हे विशेष .
आता तिथल्या भारतीय नागरीकांची काळजी घेणार कोण हा खरा प्रश्न आहे .

सर्वच प्रकार अत्यंत लांच्छनास्पद आहे !

नोकऱ्या गेलेल्या या हजारो लाखो लोकांची लाट येथे धडकल्या नंतर भारतात काय होईल याचा विचार करा . आपल्याला भारतात बसून आख्या जगात काय चालले आहे हे अजिबात कळत नाही .
ते तुमच्या पर्यंत पोहचत सुद्धा नाही . आणि ते तुमच्या पर्यंत पोहचू सुद्धा देत नाहीत .

करोनाचे खरे चटके अजून सामान्य जनतेला कळायला बराचसा वेळ लागेल !

' ये तो ट्रेलर चालू है ‌...
अभी तो पिक्चर बाकी है ! '

भारतातली परिस्थिती तर यापेक्षाही भयानक असणार आहे . करोना कधी तरी जाईल आणि सर्व काही सुरळीत होईल या भ्रमात राहू नका .
कित्येक जणांची भविष्यातली स्वप्न धुळीला मिळणार आहेत .

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सरकार कडे आताच पैसे नाहीत . कित्येक जणांना दोन दोन महिन्यांचे पगार मिळालेले नाहीत .
हे सर्व लिहिताना सुद्धा मला अतिशय दु:ख होतं आहे . ही अतिशयोक्ती अजिबात नाही . सत्य परिस्थिती आहे . 

आत्ताच आजूबाजूला
चोऱ्या - फ्लॅट फोडणे - रस्त्यावर अडवून पैसे मागणे
हे सर्व प्रकार चालू झाले आहेत . सावधान !

संपुर्ण जगाची व्यवस्थाच बदलणार आहे . 
या पुढचं आयुष्य जगायला नविन नियम लागू होतील .
जे या आत्ताच्या परिस्थितीने आपल्यावर लादलेले असतील . त्या नियमांशी जुळवून घेणे सगळ्यांनाच जमणार नाही .
विशेष अडचण आणि परिणाम सोसायला आणि भोगायला लागणार आहेत ते लहान मुलांना आणि वयस्कर मंडळींना .

या पुढचं आयुष्य जगताना प्रचंड तडजोड आणि संघर्ष करावा लागणार आहे . याची बऱ्याच जणांना अजून साधी जाणीव सुद्धा झालेली दिसत नाही .

या पुढच्या आयुष्याची वाटचाल संघर्षमय असणार आहे . प्रचंड त्रागा आणि चिडचिड करुन करोनामुळे निर्माण झालेल्या समस्या सुटणार नाहीत तर त्या आणखी वाढतील .

मनाने खंबीर व्हा .
आपल्या कुटुंबातल्या माणसांची काळजी घ्या .
येणाऱ्या परिस्थिती बरोबर जुळवून घेण्याची तयारी करा !

( मी हे सर्व काही लिहिण्यामागचं कारण येवढंच आहे की आपल्या भारतीय मंडळींना जगात कुठे काय चाललंय हे कळायला पाहिजे . नाहीतर इतक्या स्पष्टपणे कोणी कोणाला सांगताना दिसत नाही . )

विवेक देशमुख .

@मीराची पोस्ट. योग्य केलेस इथे टाकून.
हे काय आहे. काही होत नाही असे अफवा आहे. क्षणभर मलाच धडकी भरली ! भोंदू फोरवर्ड !!
का करतात लोकं असे काय माहिती Angry कोण आहेत हे विवेक देशमुख. नुसते थापाडे नाही तर विकृत वाटायला लागले आहेत लोक आता !! Sad

भारतातून अमेरिकेत जायला सहा पट भाडे आकारतात हे खरे आहे
नुकताच माझा एक मित्र गेला, त्याने सांगितले की तीन चार सीट्स वर एक अशी व्यवस्था करून नेले
भारतातल्या लोकांना आणायला जाणारी विमाने रिकामी नकोत म्हणून ज्यांना अमेरिकेत जायचं आहे त्यांना सहापट भाडे आकारात घेऊन जात आहेत
ही 101 टक्के वस्तुस्थिती आहे

@आशुचॅम्प, तुमची माहिती योग्य वाटत नाहीये. माझी बहिण आणि तिची फॅमिली मुंबई ते न्युअर्क फ्लाईटने गेली वंदे भारत अभियानाखाली. पूर्ण फ्लाईट फुल्ल होते. भाडे पण साधारण तिप्पट होते. जे बहुदा सर्व पॅसेंजरना युनिफॉर्म असावे. साधारण 1700 डॉलर प्रत्येकी की जे सहापट नक्कीच नाही. युनायटेड एअरलाईन ची पण सेवा होती एप्रिल मध्ये. त्याचे भाडे मात्र 2400/ 2500 डॉलर होते जेंव्हा त्यांनी दुसऱ्यांदा एअरलिफ्ट केले. पहिल्या वेळी त्यांचं भाडं पण 1500 डॉलरच होतं.

पोरांना पकडुन शेल्टर( फॉस्टर पण नाही... ) होम्स!!! ... Rofl
उलट या कोविड मध्ये आयटी मधला अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झालाय ऐकलं.

योग्य अयोग्य चा प्रश्नच नाहीये
जे झालं ते सांगतोय
त्याने खरोखरच इतके भरले
त्या आधी त्याला पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी पोलीस पास काढावा लागला
तो येईपर्यंत जीव टांगणीवर
14 तासाची फ्लाईट होती
त्याच्या म्हणण्यानुसार त्याने बिझनेस क्लासेवढे किंवा जास्तच भाडे भरले विमानाचे
गेल्यावर त्याचे स्क्रिनिंग झाले आणि 14 दिवस होम क्वारनंतीन राहायला सांगितले
नक्की किती खर्च आला ते विचारून सांगतो

उलट या कोविड मध्ये आयटी मधला अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झालाय ऐकलं.
-->>€ कुठे ऐकता असल्या न्यूज ? एअरलाईन इंडस्ट्री , हॉटेल इंडस्त्री , अप्परेल , सगळीकडे हायरिंग फ्रीझ आहे . बऱ्याच लोकांना कामावरून काढले आहे . आयटी मध्ये जॉब्स नाहीaआहेत आता जास्त . जे आहे तेच टिकवणे अवघड आहे कारण नवीन प्रोजेक्ट्स किक ऑफ नाही होत आहेत .

नक्की किती खर्च आला ते विचारून सांगतो>> नक्की विचारा आणि कोणती विमान कम्पनी आणि कुठलं फ्लाईट ते पण विचारा.

पोरांना पकडुन शेल्टर( फॉस्टर पण नाही... ) होम्स!!! >>> Lol आणि पालकांना भारतात हाकलून देत आहेत. तसेच कर्जे एकहाती फेडल्याशिवाय जाउ देत नाहीत. पण सुरक्षेच्या कारणास्तव इथेच राहा सांगत आहेत. हे तिन्ही एकाच वर्ल्ड मधे खरे आहे. आणि त्याच वर्ल्ड मधे भारतही भारतीय नागरिकांच्या मुलांना येउ देत नाही.

मुंबई न्यूयॉर्क
एअर इंडिया फक्त वाहतूक करते अन्य बंद आहेत
1.35 लाख खर्च आला
9 मे रोजी इथून निघाला
त्याला रेस्क्यू फ्लाईट्स मध्ये बसवलं असे म्हणत होता

मी त्याच फ्लाईट बद्दल लिहिले आहे आशुचॅम्प . तिकीट युनिफॉर्म होते सर्वांना साधारण रु. १.२४ लाख (म्हणजे इकॉनॉमी वाल्याना) तुमच्या मित्राने पुणे ते मुंबई खर्च पण ऍड केला आहे. आणि हे सहापट नक्कीच नाहीये. वन वे तिकीट तशीही महागच असतात. एअर इंडियाची ही चांगली चालणारी फ्लाईट आहे , डायरेक्तट आहे. इतरवेळीही महागच असते.

वेका योग्य प्रतिसाद होता की . अमेरिकेत आयटी मध्ये covid 19 मुळे अन एम्प्लॉयमेंट रेट कमी झालाय अशी न्यूज असेल तर ते भोंदू फॉरवर्ड च म्हणावं लागेल ना .

छान सुचना वेका . पण त्या धाग्यावर दिलीत तर लोकांना फायदा होईल . मीच हे पुण्य कर्म करतो थांबा .

ती विवेक देश्पांडेची (हे खरं नाव असेल तर), पोस्ट म्हणजे अगदी गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखी, पीठ मिसळलेली आहे. Happy

21 जून 2020 को खत्म हो जाएगी दुनिया? माया कैलेंडर पर चौंकाने वाला खुलासा
>> माया कॅलेंडरचा २१ जून अजून उजाडला नाही.

Pages