हा खेळ बाहुल्यांचा! - भाग १०

Submitted by अज्ञातवासी on 13 April, 2020 - 14:01

भाग ९
https://www.maayboli.com/node/74135

भाग ८
https://www.maayboli.com/node/71963

भाग ७
https://www.maayboli.com/node/71844

भाग ६
https://www.maayboli.com/node/70390

भाग ५
https://www.maayboli.com/node/70293

भाग ४
https://www.maayboli.com/node/70257

भाग ३
https://www.maayboli.com/node/70202

भाग २
https://www.maayboli.com/node/70182

भाग १

https://www.maayboli.com/node/70130

विशाल आकाशाखाली, एका काळ्या कातळावर ते दोघे पहुडले होते.
"तुसुद्धा वैद्यकीच करणार?" तिने विचारले.
"नाही. मला पराक्रम गाजवायचाय, सरदार व्हायचंय."
"मग तलवारबाजी शिकायला हवी."
"शिकेन."
"तू ना, तू फक्त बोलत राहा. आबा माझं लग्न लावून देतील, तेव्हा..."
"त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला..."
"असं बोलू नकोस राधे. तू फक्त माझी आहेस."
कितीतरी वेळ ते तसेच पडून होते, हळूहळू सूर्य कलायला लागला, आणि त्यांना शेवटी उठावच लागलं, व ते घराकडे निघाले.
-----
"मधुकर, आलास बाबा, आईने आवाज दिला."
"हो आई."
"जरा सरदार साहेबांकडे जाऊन ये."
"काय झालं?" त्याच्या कपाळावर आठी पडली.
"भाऊ केव्हाचे गेलेत, काळजी वाटतेय."
"बरं." तो तसाच उठला.
तेवढ्यात बाहेर गलका ऐकू आला.
तो घाईघाईने बाहेर गेला.
भलामोठा जमाव एका माणसाला दांड्याला बांधून घेऊन येत होता. त्या माणसाच्या अंगावर माराचे अनेक वळ होते. कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते.
"भाऊ..." त्या तरुणाने हाक मारली. तो त्या जमावाकडे धावला.
"व्हय मागला," त्यातील एकाने त्याला मागे ढकलले.
तो कळवळून मागे पडला. पण तरीही तो उठला आणि त्वेषाने जमावावर चालून गेला.
...कित्येक लाठ्या व दगड खाऊन तो बेशुद्ध पडला...
कितीतरी वेळ तो पडून होता. कितीतरी वेळ.
त्याला जाग आली, तेव्हा राधा त्याच्या उशाशी बसून होती.
त्याने डोळे किलकिले केले...
"आबा," म्हणून ती बाहेर पळाली.
तो आता पूर्ण शुद्धीवर आला होता. डोकं अजूनही ठणकत होतं.
"आई, भाऊ...?" त्याने विचारले.
"मधुकर, तू शांत हो. आराम कर."
"आबा, आई, भाऊ? मला घरी जायचंय." तो कळवळून म्हणाला.
"जा, नंतर जा, आता आराम कर."
"नाही!!!"
तो उठला आणि घराकडे पळाला.
आबांच्या नोकराने त्याला धरले. मात्र तो शांत व्हायला तयार नव्हता.
आणि अतिश्रमाने तो पुन्हा बेशुद्ध पडला.
-----
"भाऊ, तुझी आई, दोघांसहित घर दाभाडेच्या आज्ञेनुसार भस्मसात झालं." आबा डोळ्यात अश्रू आणून बोलत होते.
तो शांत होता, निश्चल होता.
"सरदार दाभाडेनी भाऊना बोलावलं. त्यांच्या मोठ्या पत्नीची तब्येत बरी नव्हती. तिची एकांतात चिकित्सा करत असताना तिने भाऊंवर नाही नाही ते आरोप केले. संतापलेल्या दाभाडेनी भाऊंना घरादारासहित जाळण्याचा हुकूम दिला." आबा शक्य तितक्या कोरड्या आवाजात बोलत होते. पण त्यांच्या आवाजातला कंप जाणवत होता.
"देवदयेने तू वाचला. तुझं घरदार, काहीही उरलं नाही. आता काय करशील???"
तो शांतपणे उठला, त्याने बाहेरची वाट धरली.
त्याला समोर राधा दिसली.
"राधा, दाभाडेना नष्ट करेन मी." तो शुष्कपणे म्हणाला.
"आपण करू मधुकर. तू कुठे चाललास पण?"
"माहीत नाही, पण तुला माझी शपथ आहे, मला थांबवू नकोस आणि मला विचारुही नकोस."
तेवढ्यात आबा बाहेर आले.
"कुठे चाललास?" आबांनी विचारले.
मात्र त्याच्या कानात शब्द शिरत नव्हता.
तो चालतच राहिला, चालतच राहिला.
दोन वर्षानी राधा मंदिरात गेली असता तिला एक चिठ्ठी कुणीतरी मारून फेकली.ती चिठ्ठी वाचून तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.
इकडे तो तरुण पुरुषत्व आणि स्त्रीचा मध्य शोधत होता.
मधुकर नाव सोडून त्याने नवीन नाव धारण केला होतं.
हंसराज!!!
-----
हंसराज वेगवेगळे मंत्र म्हणत होता, आहुती देत होता.
त्याचा आवाज टिपेला पोहोचला होता.
इकडे अनपेक्षितपणे वाड्यावर एक काळी छाया दाटून आली.
दाभाडेना झोप अशी नव्हतीच, ते सारखे इकडच्या कुशीवरून तिकडे वळत होते.
त्यांचा शरीरात ताप होता. तो ताप आता जास्तच वाढला. हळूहळू सर्वांग जळल्याप्रमाणे ते प्राणांतिक वेदनेने तळमळू लागले.
रक्ताहुती चालली होती, हंसराजाच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान विलासत होतं.
दाभाडेचं सर्व शरीर आगीत होरपळल्यासारखं झालं. जळालेल्या मांसाचा वास सगळीकडे सुटला.
"चंद्रराव..."दाभाडे जिवाच्या आकांताने ओरडले.
चंद्रराव हे दाभाडेचे जवळचे साथीदार. त्यांच्या आवाज ऐकून त्याना जाग आली, व ते खोलीकडे धावले.
समोरचं दृश्य बघून त्यांची मती गुंग झाली.
"तो... हंसराज... आवाज थांबवा..." दाभाडे पुटपुटले.
प्रसंगाच गांभीर्य बघून ते आवाजाच्या दिशेने धावले.
आवाजाची पट्टी वाढत चालली होती.
इकडे राधेलाही अंताकडे पोहोचत असल्याची जाणीव झाली.
तिनेही शांतपणे बाहुली घेतली, तिचा हात हातात घेतला.
आणि विषाची बाटली पिऊन ती निपचित पडून राहिली...
चंद्रराव खोलीजवळ पोहोचले.
स्वाहा...
हंसराजने रक्ताची शेवटची आहुती टाकली, आणि केसही टाकले.
इकडे दाभाडेच्या सर्वांगाची आग होऊन हळूहळू राख झाली...
चंद्ररावानी खोलीला दणका दिला, त्याबरोबर ते दार उघडलं...
"हंसराज, थांबव हे सगळं..." ते कडाडले...
हंसराजने त्यांच्याकडे बघितले. तो भेसूर हसला.
त्याच्या हातात अनेक छोटे दाणे होते... ते दाणे स्फटिकासारखे चमकत होते...
'इति श्री कालसमर्पणयज्ञ संपूर्णम!!!
स्वाहा!!!!!!'
त्याने त्या दाण्यांची यज्ञात आहुती दिली.
हजारो स्फोटके उडावीत तसा आगडोंब उसळून वाडा भस्मसात झाला!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

@प्रज्ञा - धन्यवाद
@उनाडटप्पू - धन्यवाद
@जयश्री - हो नक्कीच! धन्यवाद
@सिद्धी - धन्यवाद!