लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.
गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.
लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.
ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.
तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.
जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!
तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.
तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.
शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!
*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/
हो, फारच गोड आहे ती.
हो, फारच गोड आहे ती.
साधना मस्त व्हिडीओ, कसलं
साधना मस्त व्हिडीओ, कसलं घनदाट जंगल आहे, सही एकदम. तुमचा आवाज छान आहे.
साधनाचा व्हिडिओ अजून बघायचाय.
साधनाचा व्हिडिओ अजून बघायचाय.....
मस्त आहे व्हिडिओ. हे काम
मस्त आहे व्हिडिओ. हे काम बायका का करतात? पुरुषांना करायला द्यायचं ना.
कसलं घनदाट जंगल आहे, >>> +१
हे काम बायका का करतात?
हे काम बायका का करतात? पुरुषांना करायला द्यायचं ना.>>>
पुरुष???????? तू ये गावी... पुरुष फक्त कुंकवाचा धनी म्हणून बाळगायचा असतो. मेजर कामे बाया करतात. माझ्या घरी थोडे गवंडीकाम सुरु होते, बायको सिमेंट, रेती वगैरे मिक्स करून मसाला बनवायची, घमेल्यात भरायची आणि उचलून नवरा जिथे बसलाय तिथे आणायची. हे साहेब इतका वेळ तंबाखू मळत बसलेले असायचे, ते तंबाखू तोंडात टाकून मोठ्या कष्टाने थापी उचलून मसाला वापरायचे. नवरे बिनकामाचे आहेत हे तिथल्या स्त्रियांनी स्वीकारले आहे. अर्थात सगळे नवरे असे नाहीत हेही मी पाहिले आहे. लाकडे तोडायला एक बाबा पण आमच्यासोबत आलेला आणि इतर बाया त्याचे बऱ्यापैकी रॅगिंगही करत होत्या

भारा डोक्यावर घेताना कापडाची चुंबळ लागते, लाकडे तोडताना ती कंबरेला मागे बांधून ठेवतात.
बांधलेला भारा डोक्यावर चढवणे व तो घरी घेऊन जाणे खूप कष्टाचे काम आहे. भारा तिरका उभा करतात, बाई थोडे वाकून भाऱ्याचा मध्य पाहून तिथे आपले डोके चुंबळीसकट टेकवते आणि मग हळूहळू सरळ होत भारा सरळ म्हणजे जमिनीला समांतर करते. मी भारा तिरका करण्यासाठी हातभार लावला आणि तेही खूप जड गेले. भारा उचलून चालणे तर अशक्य. भारा इतका जड असतो की एकदा डोईवर चढला की बाया सुसाट निघतात, तुम्ही सगळ्या थांबा, मी फोटो काढते म्हणायला मलाच कसेतरी वाटले, त्यामुळे ह्या प्रोसेसचे फोटो/ विडिओ काहीही काढता आले नाही.
आंबोलीचे जंगल राखीव आहे, तिथे झाडे तोडायला परवानगी नाही. आणि तिथले फॉरेस्ट ऑफिसर्स खूप जागरूक आहेत. जंगलात जाणाऱ्या बायका घाबरून असतात त्यांना. ते सरळ हत्यारेच काढून घेतात. सुकी लाकडेही न देणारे गार्डस येतात अधूनमधून. त्यांची बदली होईपर्यंत बायका देव पाण्यात घालून ठेवतात.
आणि महत्वाचे म्हणजे झाडांची माहिती हे लोक बायकांना देतात, उपयोग सांगतात. हिरवी झाडे का तोडायची नाहीत हे सांगतात. मला या बायांनी दोन चार झाडे दाखवली, ही दुर्मिळ आहेत, गार्डने यांना अजिबात तोडायचे नाही म्हणून सांगितलंय हेही आवर्जून सांगितले. नियम कितीही पाळले तरी आदल्या दिवशी एखादी फांदी तोडून ती सुकी म्हणून घेऊन जायचा मोह सगळ्यांनाच आवरेल असे नाही ना..
आम्बोलीचे forest officer
आम्बोलीचे forest officer चांगले दिसतायेत.
गावात उज्वला योजनेतून gas उपलब्ध नाही का. ह्या तिथल्या बायकांची खूप वणवण होताना दिसतेय इंधन गोळा करण्यासाठी. माफक चूल वापरायला हरकत नाही पण gas उपलब्ध झाला तर त्यांचे जरा कष्ट कमी होतील.
आमच्या गावी काय परिस्थिती आहे माहिती नाही. रायगड जिल्ह्यात पूर्वी रस्तावरून जाताना कित्येक बायका एकावर एक बरेच हंडे पाणी न्यायच्या तेव्हा वाईट वाटायचं. आमच्या सासरच्या गावी अति कष्टाची कामं पुरुषांना करताना बघितलं आहे मी, तंबाखू खात करतात पण करतात. क्वचित एखादा दारूवर सगळे पैसे उडवतो स्वतः कमावलेले आणि त्याची म्हातारी आई राबते आणि बायको घरी पोरांना सांभाळते हे हि बघितलं आहे. बायका जास्त घरगुती कामे करायला हाताखाली असतात बऱ्याच घरात.
पुरुष फक्त कुंकवाचा धनी
पुरुष फक्त कुंकवाचा धनी म्हणून बाळगायचा असतो. >>>> काय वैताग! वरून दारू पीत असतीलच. ह***र
आमच्या गावात पूर्वी भाताची
आमच्या गावात पूर्वी भाताची कापणी बायका करायच्या आणि मळणी पुरुष. आता बायकाच मळणीपण करून टाकतात.
गॅस सगळ्यांकडे आहे,माझ्या
गॅस सगळ्यांकडे आहे,माझ्या घरातही आहे.
पण तरीही लाकडे गोळा करतात कारण आंघोळीचे पाणी तापवायला चूलच लागते. पावसाळ्यात वातावरण प्रचंड थंड होते. त्यावेळेसही घर गरम ठेवायला चूल लागते. चूल नसेल तर घराच्या भिंतीना बुरशी लागते. चूल नसेल तर कपडे आठ आठ दिवस सुकत नाहीत. कधी जोरदार पावसात लाईटीच्या खांबावर झाड बीड कोसळले तर वीज बंद पडते. गावात गिझर, हिटर वगैरे फारसे वापरले जात नाहीत.
वावे, गेल्या उन्हाळ्यात मी
वावे, गेल्या उन्हाळ्यात मी गावी होते व बरीच कामे तेव्हा करून घेतली. बायकाच गोळा केलेल्या कामे करायला आणि त्यांनी कामे चटचट करून दिली. फक्त इलेक्टरीशीयनचे काम राहिले, त्याला हजारदा फोन करूनही तो येत नव्हता. कामाच्या बायका बघत होत्या मी रोज फोन करत होते ते. त्या म्हणाल्या, आम्हाला हे काम आले असते तर आम्ही तेही करून मोकळे झालो असतो, पुरुषांसाठी थांबायची वेळ आणलीच नसती.
असो, विषयांतर खूप झाले.
लिझिकी व देवांशी पण कोणाची वाट न पाहता कामे चतचट अटपतात.

लिझिकीचा नवा विडिओ दिसतोय, बहुतेक सोयाबीनवर आहे. पण समहाऊ मला उघडावासा वाटला नाही. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही माहीत आहे, पण सध्यातरी बघावासा नाही वाटला. बघितला तर लिहीन इथे.
पण तरीही लाकडे गोळा करतात
पण तरीही लाकडे गोळा करतात कारण आंघोळीचे पाणी तापवायला चूलच लागते. >>> हो ते आमच्याकडे पण. बाथरूम शेजारच्या खोपीत चूल आहे त्यासाठी, पालापाचोळा वापरतो जास्त करून त्याला पातेरा म्हणतो आम्ही, त्याला जास्त लाकूड लागत नाही.
आमच्या झाडांचीच सुकलेली लाकडे भरून ठेवतो आम्ही. पोळ्या, चहा, धिरडी, थालीपीठ असले प्रकार gas वर पण gas दिरांचा मुंबईत होता तो ट्रान्स्फर केलेला आहे, खूप वर्ष आहे घरात पण सकाळचा चहा आणि आमटी भात चुलीवर करतात स्वयंपाकघरात.
चुलीवरचा चहा माझी मावशी
चुलीवरचा चहा माझी मावशी द्यायची, तो तसा चहा आता गॅसवर होतंच नाही.

नवा झीकीचा विडू मोहरीचा आहे.
नवा झीकीचा विडू मोहरीचा आहे. मोहोरी पेरण्यापासून पदार्थ करे परेंत. रॅपसीड असं नाव आहे खरं टायटल मध्ये पण मला तरी ती राई/मोहोरीच. वाटली.
आता रॅपसीड/ राई/ मोहोरी/ मस्टर्ड/ त्यात पुन्हा लाल काळी हा गोंधळ आला.
सगळेच पदार्थ मोहरीचे
सगळेच पदार्थ मोहरीचे खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी काय झाले असेल??

तिने सर्व पदार्थ लसणाचे
तिने सर्व पदार्थ लसणाचे बनवल्यावर मला असंच धस्स झालं होतं.
(No subject)
नवा झीकीचा विडू मोहरीचा आहे.
नवा झीकीचा विडू मोहरीचा आहे. मोहोरी पेरण्यापासून पदार्थ करे परेंत. रॅपसीड असं नाव आहे खरं टायटल मध्ये पण मला तरी ती राई/मोहोरीच. वाटली.
आता रॅपसीड/ राई/ मोहोरी/ मस्टर्ड/ त्यात पुन्हा लाल काळी हा गोंधळ आला.
>>>> योकु, इथे बघ. डिटेलमध्ये माहिती आहे. https://kvk.icar.gov.in/API/Content/PPupload/k0441_32.pdf
माझ्या सजेशन मध्ये आला हा
माझ्या सजेशन मध्ये आला हा व्लॉग. मस्त आहे.
Northern Heart : https://www.youtube.com/channel/UCvE08bJqdQEbvRH3PxoqEMA
साधना & मी अनू
साधना & मी अनू

इथली चर्चा वाचत असते.. आधी व्हिडीओ बघायचे पण आता बघत नाही.. मी स्वतः गावाकडच वातावरण जास्त अनुभवलेल नाही. त्यामुळे इथल्या मातीशी नाळ घट्ट जोडून ठेवु पाहणाऱ्यांचा खूप हेवा वाटतो..
हा माउंटन फेअरीचा व्हिडिओ
हा माउंटन फेअरीचा व्हिडिओ बघा. त्यात ती स्वतःबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देते. तिची टोपी आणि तिचा कुत्रा, टायसन, दोन्ही मस्त आहेत.
|| Who Am I ? || Q&A : https://www.youtube.com/watch?v=-zKI9RQVWns
इथे माफेनी तिचा हा व्लॉग ज्या व्हिडिओपासून सुरू केला तो तिच्या कझिनच्या किन्नौरी लग्नाचा व्हिडिओ आहे : https://www.youtube.com/watch?v=oB8kU_gCN3s
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=pCnOsWImc8U
हा व्हिडीओ मला आवडला. हे तात्या माहिती पण छान देतात. कसला सुंदर मळा आहे आणि भाजीपाला हिरवागार. त्यांचे रेसिपीज व्हिडीओज पण आहेत, त्यातला एक मी साधना यांच्या बी बी वर शेअर केलाय मागे.
हा कुठे शेअर करायचा समजलं नाही, इथेच करते.
अंजु, कोणत गाव आहे सांगितलय
अंजु, कोणत गाव आहे सांगितलय का कुठल्या इतर व्हिडिओ मध्ये?
मला पद्माळा किंवा कर्नाळ सांगली जिल्हा वाटत आहे. म्हणुन सहज विचारलं.
खाली कमेंट्स असतात ना, त्या
खाली कमेंट्स असतात ना, ह्या व्हिडीओखाली नाही पण ह्यांच्याच दुसऱ्या कुठल्यातरी व्हिडीओखाली कमेंटमधे त्यांनी कोल्हापूर सांगितलं, कोणीतरी विचारलं होतं.
हा एक मालवणी लाईफ विडिओ दिसला
हा एक मालवणी लाईफ विडिओ दिसला. छान वाटला.
अंजु, तात्यांचे विडिओ बघितले,
अंजु, तात्यांचे विडिओ बघितले, मस्त आहेत. माहितीही छान मिळाली.
अंजु, तात्यांचे विडिओ बघितले,
अंजु, तात्यांचे विडिओ बघितले, मस्त आहेत. माहितीही छान मिळाली.
लिझीकीचा नवीन व्हिडिओ पाहिला
लिझीकीचा नवीन व्हिडिओ पाहिला का? लाईफ ऑफ भेंडी
मस्त आहे.
लिझीकीचा नवीन व्हिडिओ पाहिला
लिझीकीचा नवीन व्हिडिओ पाहिला का? लाईफ ऑफ भेंडी Happy मस्त आहे. >> हो कालच पाहीला.. रिफ्रेशिंग

पण ती करते ते सर्व पदार्थ मी खाऊ शकेन असे नाही
पण ती करते ते सर्व पदार्थ मी
पण ती करते ते सर्व पदार्थ मी खाऊ शकेन असे नाही>> छे गं, पण बघायला छान वाटतं.
करण्याची पद्धत किती नीटस आणि सुंदर असते तिची.
करण्याची पद्धत किती नीटस आणि
करण्याची पद्धत किती नीटस आणि सुंदर असते तिची. >> अगदी अगदी...मला पण तसे मोठे सुरे घेवून मिरच्या वगैरे कापाव्या वाटतात
Pages