चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

< व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण. संबंधित व्यावसायिक संस्थेकडून ‘दशकातील **रत्न’ पुरस्कार. मुख्यमंत्रीपद हातातोंडाशी येऊन हुकले. पण पुढे केंद्रीय मंत्री. >
हे पियु ष गोयल का? पण हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, त्यामुळे हे नसणार.

प्रसाद ?
थरुर ?
६ सुरेश प्रभु ? >>>>
नाही. सर्व चूक.

आता फक्त राहिले आहे. त्याचे शोधसूत्र जरा भर घालून लिहितो :

भारतातून अभियांत्रिकी शिक्षण. परदेशातून व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धन पदव्युत्तर शिक्षण. कॉलेज जीवनात वक्तृत्व, नाट्य व क्रीडापटू. रेडीओ उद्घोषकाचे काम .
पाच वर्षांपूर्वी केंद्रात मंत्री होते.

संपादित

खालील सर्व म्हणी ओळखा . काही सामान्य वापरातल्या आहेत काही तितक्या नाही.
या म्हणी 'उ' पासून सुरू होतात. शब्दसंख्या दिलेली आहे. Happy

१.फायद्याची वेळी होणे; पण लाभ न घेता येणे.
६ शब्द

२.मशागत केल्यास चांगले पीक येते.
५ शब्द

३.एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
६ शब्द

४.जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.
५ शब्द

५.दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे
४ शब्द

६.प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे.
४ शब्द

७.अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
४ शब्द

८.एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
६ शब्द

९.अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
४ शब्द

१०.अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.
४ शब्द

११.अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
४ शब्द

१२.जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.
६ शब्द

१३.उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
५ शब्द

१४.श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.

५ शब्द

१५.येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.
५ शब्द

१६.सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.
३ शब्द

५. बरोबर
९.चूक , पण ती म्हण आहे यादीत.
Happy सुप्रभात मंजूताई

९. उतावीळा नवरा गुडघ्याला बाशिंग
११. उथळ पाण्याला खळखळाट फार
१२. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी

बरोबर.
१२. थोडी वेगळी आहे पण तुमची चालेल.

१.फायद्याची वेळी होणे; पण लाभ न घेता येणे.
>>>
उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले

३.एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. >>>>

उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?

४.>>>>
उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती?

Pages