चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवगती नव्हे.
गती बरोबर; त्यामध्ये दिलेला शब्द फिरवायचा आहे.

२. नर्तकी >>> कीर्तन ची अदलाबदल करून.

बरोबर भरत!

गणपती बरोबर डॉ. गती मध्ये पण फिरला.

एकच राहिलंय.
३. राना मागे सूर हवा (३)

हिंट: सूर म्हणजे सप्तसूरांपैकीही होऊ शकते.

३ पवन

रान -वन. सूर प
हवा पवन

नवा खेळ : मराठी नाटककार ओळखा.

प्रत्येकाच्या एका नाटकाचे कथानक/विशेष माहिती थोडक्यात दिली आहे. त्यानंतर या नाटकांच्या लेखकाबद्दलची विशेष माहिती दिली आहे. ती नाटकांच्या अनुक्रमानुसार नाही.
मात्र एका नाटकाची जोडी फक्त एकाच वैशिष्ट्याशी जुळली पाहिजे.
.........
नाटकाचे कथानक/विशेष :

१. शहरातील एक सधन डॉक्टर ध्येयापोटी खेड्यात राहायला येतो. अर्थात हे त्याच्या बायकोला पटलेले नाही. पुढे या संसारात वादळ निर्माण होते.
२. याचा नायक विमा प्रतिनिधी आहे. त्याचा नेटका संसार. उपकथानकात एक वेगळी ‘जोडी’ आणि त्यांचे ‘उद्योग’ आहेत. शोकांतिका.

३. नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली आदरणीय, तर अन्य एक हीन दर्जाची.
४. मुलीच्या लग्नासाठी जोडे झिजवण्याचा काळ. ते जमत नसल्याने पालकांची होणारी उलघाल व अत्यंत चिडचिड.

५. एका नाटककाराने प्रेमावर चांगले नाटक लिहावे म्हणून त्याला आग्रह करणारा निर्माता. मानवी नात्यांच्या तकलादूपणावर भाष्य.
६. नवरा बायकोतील विसंवाद. तो एकदम उच्चशिक्षित आणि लफडेबाज. अशाच एका तरुणीमुळे त्यांच्यात झालेला बेबनाव.

७. एका वृद्ध रुग्णाची शुश्रुषा करणारी व्यक्ती. या दोघांच्या सहवासावर झोत. या नाटकाला सामाजिक, राजकीय आणि आपसातले नातेसंबंध असे अनेक पैलू आहेत.

..........................................................

लेखकाची विशेष माहिती (अनुक्रमानुसार नाही) :

• काही प्रक्षोभक नाटकांसाठी गाजलेले लेखक. वादग्रस्त.

• लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग.
• हे ‘डॉक्टर’, अभिनेते व लेखकदेखील. मोजके लेखन. रूढ अर्थाने ‘प्रसिद्ध’ नाहीत.

• अगदी मध्यमवर्गीयांचे आवडते लेखक. प्रसिद्ध. पटकथाकर व स्तंभलेखक देखील.
• प्रख्यात नाटककार. यांचे वडील प्रसिद्ध कवी.

• प्रसिद्ध नाटककार. यांना एका दिग्गज नाटककाराच्या नावाचा मानाचा पुरस्कार.
• अनेक प्रकारचे लेखन. दमदार नाटके. टोपणनावाने वृत्तपत्रलेखन.
.......................................................................................................................................

७. मित्र. डॉ. श्रीराम लागू आणि फैयाज.
नाटककार डॉ शिरीष आठवले (यांच्याबद्दल गूगल केलं)
हे ‘डॉक्टर’, अभिनेते व लेखकदेखील. मोजके लेखन. रूढ अर्थाने ‘प्रसिद्ध’ नाहीत.

१. सूर राहू दे
नाटककार शं ना नवरे
अगदी मध्यमवर्गीयांचे आवडते लेखक. प्रसिद्ध. पटकथाकर व स्तंभलेखक देखील.

प्रख्यात नाटककार. यांचे वडील प्रसिद्ध कवी. - वसंत कानेटकर

अनेक प्रकारचे लेखन. दमदार नाटके. टोपणनावाने वृत्तपत्रलेखन. - जयवंत दळवी

काही प्रक्षोभक नाटकांसाठी गाजलेले लेखक. वादग्रस्त.- विजय तेंडुलकर

नाटक ओळखता येत नाही.

भरत,
तुम्ही अर्धे काम फत्ते केलंय, पुढचे अजून कोणी करेल !

३, ५ दोन्ही चूक .

३. नायक एकापेक्षा अधिक भूमिकांत आहे. त्यातली एक भूमिका समाजातली आदरणीय, तर अन्य एक हीन दर्जाची.
>>>>>>
इथे ‘एकापेक्षा अधिक’ म्हणजे कितीही आकडा असू शकतो ! फक्त ‘तीच’ पंचरंगी भूमिका डोक्यात ठेऊ नका.

अत्रे इथे नाहीत.
असे बघा.
‘तो मी..’ ही भूमिका अजरामर करणारे नायक अन्य लेखकाच्या नाटकात विविधरुपी भूमिका करू शकतात.

Pages