लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.
गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.
लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.
ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.
तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.
जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!
तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.
तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.
शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!
*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/
गेल्या व्हिडिओत सगळे पदार्थ
गेल्या व्हिडिओत सगळे पदार्थ गव्हाचे....
हिरवे टोकेरी काहीतरी फळ , फुल
हिरवे टोकेरी काहीतरी फळ , फुल दोन तीनदा दिसले ते आर्टिचॉक असावेत. प्रत्यक्षात कधी आर्टिचोक बघितले नाहीत पण साधारण 10 वर्षांपूर्वी ऑनलाइन शेती करायचा एक गेम खूप फॉर्मात होता, त्यात मुलीने आर्टिचोकची शेती केली होती

हो मला हा प्रश्न पडतो कि ते
हो मला हा प्रश्न पडतो कि ते सर्व एकाच गोष्टीचे अनेक प्रकार करुन तेच कसं जेवतात.
विशेषतः भोपळा, तिने भोपळ्याचे विविध प्रकार केले एका लंचला. मला आवडत असलेल्या पदार्थाचे पण विविध प्रकार एका वेळी मी खाऊ शकणार नाही त्यामुळे भोपळा लंच मला फार आवडलं नाही, तिने फार कल्पकतेने आणि निगुतीने केलेलं मात्र सर्व.
इतरही प्रकार करत असेल. दाखवत
इतरही प्रकार करत असेल. दाखवत नसेल.
ही एक प्रकारची जाहिरातच असणार. त्यामुळे एवढा साग्रसंगीत स्वैपाक करत असेल. दाखवताना दोघीच दाखवल्या तरी असतील बाकी मंडळी जेवायला. आजी आणि लिझीकी मुख्य कलाकार.
हे चॅनेल चायनीज आहे तेव्हा
हे चॅनेल चायनीज आहे तेव्हा इथे कोणी बॅन china पुरस्कर्ते असाल तर दुसरी कोणते असे soothing चॅनल शोधून त्याचा वेगळा धागा काढला तर, जस्ट a thought. आपला जमेल तेवढा खारीचा वाटा चायनीज लोकांना पैसे आपल्यामुळे मिळू नयेत.
हे चॅनेल चायनीज आहे तेव्हा
हे चॅनेल चायनीज आहे तेव्हा इथे कोणी बॅन china पुरस्कर्ते असाल तर दुसरी कोणते असे soothing चॅनल शोधून त्याचा वेगळा धागा काढला तर, जस्ट a thought. आपला जमेल तेवढा खारीचा वाटा चायनीज लोकांना पैसे आपल्यामुळे मिळू नयेत.>>>>>
काल हाच विचार डोक्यात आलेला.
लिझिकी, डियांशी परक्या वाटत नाहीत.. आता त्यांच्याबद्दल असा विचार करून चॅनेल बघणे बंद करणे खूप कठीण जाणार. पण काल मलाही वाटले की बघायला नकोच.
जग आकुंचन होत आपल्या घरात, हातातल्या मोबाईलमध्ये येऊन बसल्यावर आपपरभाव जपणे खूप कठीण आहे. पण मोठे चित्र पाहता हे गरजेचे आहे.
सर्वच्या सर्व जे चायनीज ते
सर्वच्या सर्व जे चायनीज ते बॅन अशी पॉलिसी राबवणे शक्य नाही. ते तसं होणारही नाही.
एक सर्बियन काका-पुतण्याची
एक सर्बियन काका-पुतण्याची जोडी आहे, अल्माझान हे त्यांचं आडनाव. बाल्कन जंगलात राहतात. त्यांच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा एक घुबड असतं डोकं हलवणारं.
बरेचसे विडिओ अभक्ष्य भक्षणाचे असतात, हरकत नसेल तर पाहून बघा.
https://www.youtube.com/watch?v=eISr0vQhRhc
हे चॅनेल चायनीज आहे तेव्हा
हे चॅनेल चायनीज आहे तेव्हा इथे कोणी बॅन china पुरस्कर्ते असाल तर दुसरी कोणते असे soothing चॅनल शोधून त्याचा वेगळा धागा काढला तर, जस्ट a thought. आपला जमेल तेवढा खारीचा वाटा चायनीज लोकांना पैसे आपल्यामुळे मिळू नयेत.>> इथे राजकारण आणू नका कृपया. धन्यवाद.
इथे राजकारण आणू नका कृपया.
इथे राजकारण आणू नका कृपया. धन्यवाद. ---- आपण आपल्या ह्या धाग्यावरच्या पोस्ट्स सुरुवातीपासून वाचल्यात तर कृपया, धन्यवाद.
राजसी , साधना अस जर आपण करायच
राजसी , साधना अस जर आपण करायच ठरवल तर काही बघायला उरणार नाही. साधं तुम्ही ज्या मराठी सिरिअल्स बघता (बघत असाल तर) त्यातले कॅमेरे, मेक अप, कपडे बरचसं चायना मधून आल असनार. मग इनडिरेक्टली तुम्ही हातभार लावला आहेच चायनीज इकॉनॉमीला.
[उपहास मोड]
जागतीकीकरणामुळे व व्यावसायीक संबंधांमुळे सामान्य माणसाला सगळेच करणे शक्य नसेल, पण सामान्य माणसाच्या अवाक्यातील जे शक्य आहे ते करण्याची एखाद्याची ईच्छा असेल तर काय हरकत आहे?
इथे राजकारण न आणल्यामुळे
इथे राजकारण न आणल्यामुळे सीमेवरच्या किती जवानांचे जीव वाचतील?
तेच जर राजकारण आणले तर त्यामुळे जी जनजागृती होईल त्याने - इनडायरेक्टली - हळु हळु का होईना - थोडाफार का होईना - पण बदल घडेल ना?
हो सीमा, सहमत आहे. पण विडिओ
हो सीमा, सहमत आहे. पण विडिओ बघून आपण थेट पैसे देतो. अगदीच टोक गाठायचे तर मला हातातला मोबाईल आणि समोरचा लॅपटॉपही बंद ठेवावा लागेल.
Ban Twitter movement सुरू
..
बटाट्याचा एपिसोड अर्धा बघितला
बटाट्याचा एपिसोड अर्धा बघितला मग झोप आली. पण छान आहेत त्यातली बारकी बारकी धिरडी, एकदम करणेबल. फुलांचे शॉट्स एकदम ग्रेट आहेत मोगरा तर फारच बेस्ट. गव्हाच्या एपिसोड मध्ये पण भली मोठी गुलाबाची फुले दाखवली आहेत ती फार सुरेख दिसतात. काही क्लोज अप मध्ये तिने छान से आय लायनर लावले आहे व न्युड शेडची लिप्स्टिक. सुरेखच दिसते. पण तिची राइट साइडची प्रोफाइल म्हणजे चेहर्याची उजवी बाजू कधीच फारशी दाखवत नाहीत असे का असावे?
माझा मोबाईल आणि मोबाईलवरचे
माझा मोबाईल आणि मोबाईलवरचे कुठलेच app चीनी नाही पण नवऱ्याचा आहे चायनीज. मी घेतला तेव्हा मोटो चायनीज नव्हता, आता आहे म्हणतात.
लीझिकी नवीन एपिसोड्स बघितले नाहीत अजून.
लिझिकीचा बटाटा व्हिडिओ मस्तच
लिझिकीचा बटाटा व्हिडिओ मस्तच आहे.
श्रीलंकेच्या लोकांनी
श्रीलंकेच्या लोकांनी लिझिकीवरुन बरीच प्रेरणा घेतलीय, कॉपी केलीय.
https://www.youtube.com/watch?v=SB_fxVRrwcQ
हा एक व्हिडीओ मला आवडला, यातले घटक ओळखीचे आणि जवळचे वाटतात. ती छोटी मुलगी क्युट, मुलावर फार फोकस नाहीये, तोपण क्युट आहे.
सुनिल डीमेलोचा हा व्हिडीओ
सुनिल डीमेलोचा हा व्हिडीओ मस्त आहे, वसईत ऑर्कीड तीन ते चार महीन्यात येतं.
https://www.youtube.com/watch?v=Tp9xrocunXY
|Cherry Picking & Jam Making|
|Cherry Picking & Jam Making|| Kinnaur HP : https://www.youtube.com/watch?v=hws9GYVR5Hc
मी मागे देखिल एकदा या चॅनेलची लिंक दिली होती. या माउंटन फेअरीचा हा चेरीबद्दलचा लेटेस्ट व्हिडिओदेखिल मस्त आहे.
मामी मस्त विडिओ. बाकीचेही
मामी मस्त विडिओ. बाकीचेही बघेन.
ती किती साधी राहते आणि किती
ती किती साधी राहते आणि किती अकृत्रिम बोलते. चपातीचा जॅमरोल करून खाल्ला.
मला तिच्याकडे धावत जावेसे
मला तिच्याकडे धावत जावेसे वाटले. कधी त्या भागात गेले तर नक्की जाईन.... खूप आवडले ते सगळे वातावरण, परिसर....
या माउंटन फेअरीचा हा
या माउंटन फेअरीचा हा चेरीबद्दलचा लेटेस्ट व्हिडिओदेखिल मस्त आहे. >>> मामी थँक यु. सही चेरी. ती अँकर पण फार क्युट आहे, गोबरी गोबरी आणि स्माईल एकदम स्वीट.
चेरी जाम बघत असताना आठवलं, नवऱ्याने मागे वाळवलेली चेरी बेरी वगैरे फळे आणली आहेत एका दुकानातून, मग ती खात खात बघितला. गोड खूप आवडत नाही पण म्हटलं dry चेरी खात फ्रेश चेरी बघुया.
मला तिच्याकडे धावत जावेसे
मला तिच्याकडे धावत जावेसे वाटले. कधी त्या भागात गेले तर नक्की जाईन.... खूप आवडले ते सगळे वातावरण, परिसर....>>>>>़+१
माऊंटन फेअरीचा हा व्हिडिओ
माऊंटन फेअरीचा हा व्हिडिओ पाहात होते, किन्नूरमधला हिवाळा
त्यात तिने तिच्या आधीच्या व्हिडिओवर लोकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. जंगलातील लाकडे तोडून आणताना सुकी लाकडे तोडून आणतात, ओली नाही. 24 तास वीज नसल्यामुळे हिटर लावता येत नाही, त्यामुळे शून्य अंशाच्या खालील थंडीत लाकडे जाळूनच ऊब मिळवता येते.
माझ्या गावीही डिसेंम्बर जानेवारीत जंगलातून लाकडे आणायचा उद्योग चालतो. मलाही असेच वाटायचे की ह्या बायका लाकडे आणून आणून जंगले संपवणार. पण प्रत्यक्षात ओली लाकडे आणली जात नाहीत तर मोडून पडलेल्या फांद्या, सुकलेली झाडे वगैरे तोडून आणतात.
मी मुद्दाम ह्या बायांबरोबर जंगलात गेले व एक व्हिडिओ शूट केला. जंगलात अर्थातच घनदाट जंगल असल्यामुळे तुटलेल्या फांद्या थेट जमिनीवर पडत नाहीत, वरच्यावर अडकतात. सुकलेली झाडे तोडून काढावी लागतात. जंगलात सहसा मोठी हत्यारे नेता येत नाही, छोटे कोयते नेता येतात. तेही कित्येकदा गार्ड जप्त करतात. वर अडकलेल्या फांद्या तोडण्यासाठी एक आकडा वापरतात. मोठ्या बांबूला वर हा आकडा बांधतात. त्याला बोकलाई म्हणतात. ह्याचा वापर करून फांद्या वगैरे खाली खेचतात.
हा व्हिडिओ नक्की बघा.
मामी, माफे cha व्हिडियो मस्त
मामी, माफे cha व्हिडियो मस्त आहे.अगदी अकृत्रिम आहे.तुलना करू नये पण नादी क्या तुलनेत ही जास्त खरी वाटते.
साधना,व्हिडियो पहिला अस्सल कोकणी ऐकू आल्यावर बरे वाटले.त्या पहिल्या ताई chya मागे कसली वळकटी आहे?
माऊंटन फेअरी मस्त
माऊंटन फेअरी मस्त
माऊंटन फेअरी फारच मस्त
माऊंटन फेअरी फारच मस्त
Pages