कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>लोकांची, सर्वसामान्यांची, सगळ्यांची गाडी
१५ लाखाला!!!!!!!! Uhoh

वोक्सवॅगन हा त्याचा अमेरिकन उच्चार आहे. भारतात मात्र फोक्सवॅगन असे म्हणतात. Happy

खरे तर एकच ग्रुप, पण आपापली वेगवेगळी उत्पादने घेऊन स्वतंत्रपणे बाजारात अस्तित्व. >>> नाही रे भाऊ, त्यात थोडा फरक सांगतो. प्रत्येक कारचे लक्झरी सेगमेंट वेगळे आहे. त्यांचे मार्केट वेगळे असल्यामुळे उत्पादने एकच नाहीत. लॅम्बी अनेकांनी विकत घेतली आहे. एकेकाळी फेरारी अन लॅम्बी पण एक होउ शकल्या असत्या. पण ख्रायस्लरने बाजी मारली होती. आता ती ऑडी कडे आहे.

रेग्युलर - लक्झरी

वोक्सवॅगन - ऑडी
हॉन्डा - अ‍ॅक्युरा
टोयाटो - लेक्सस
निस्सान - इन्फीनिटी
शेवी - कॅडी
फोर्ड - मर्क्युरी - लिंकन

असे उदा देता येतील. लिंकनवाला फोर्ड घेत नाही. तो लेक्सस किंवा कॅडीचा विचार करतो.

मला वाटतं - ही विचित्र स्पेलिंग ज्याने बनवली असतील ना ...त्याचा शाई बनवायचा कारखाना असेल...
उदा : psychology, Listen,

मध्यंतरी नाही का हेल्मेट सक्ती झाली होती....तसंच

(गाडीचा बीबी (बीबी म्हणजे काय ?) भाषेवर घसरला नाही म्हणजे मिळवलं.....)

(हे '+४' म्हणजे अख्ख्या अंकाला एक कव्हर, अन त्यावरही रीतसर टाईम्स ऑफ इंडियाचा लोगो). २० पानांपैकी खालील पानांवर फोक्सवॅगनच्या जाहिराती (फुल / हाफ किंवा क्वार्टर पेज)..
>> त्याला जॅकेट अ‍ॅड म्हणतात. एक पान =२० लाख रूपये. Proud आणि चारही पाने तुम्हीच घ्यायची म्म्हणजे ८० लाख वर इतर खर्च मिळून एक कोटीपर्यंत.. (हे फक्त एका एडिशनपुरते).

(हे '+४' म्हणजे अख्ख्या अंकाला एक कव्हर, अन त्यावरही रीतसर टाईम्स ऑफ इंडियाचा लोगो). २० पानांपैकी खालील पानांवर फोक्सवॅगनच्या जाहिराती (फुल / हाफ किंवा क्वार्टर पेज)..
>> त्याला जॅकेट अ‍ॅड म्हणतात. एक पान =२० लाख रूपये. फिदीफिदी आणि चारही पाने तुम्हीच घ्यायची म्म्हणजे ८० लाख वर इतर खर्च मिळून एक कोटीपर्यंत.. (हे फक्त एका एडिशनपुरते).>> अगदी अगदी. त्या आधी कार व बाइक शो मध्ये त्यान्च्या जी एम मार्केटिन्ग ने या खर्चा ची कल्पना दिली होती. मी पण तो पेपर बघूनच थक्क झाले. परवा माबो वर माहिती विचारली आणि आज कंपनी ने इत्का खर्च केला? वा वा. सर्व वाचून काढ्ली.
१७ लाख जास्त आहे. पण आटोपशीर वाटते जेट्टा. मर्क/ बीएम ड्ब्ल्यु पेक्षा.

SAJIRA
मारुति SX4 (ZXI) घेण चांगल कि होंन्डा JAZZ?
अजुन काहि ऑप्शन्स सुचवु शकता का?

केदार आणि अजय, अधिक माहिती तसेच चुकीच्या दुरुस्तीबद्दल धन्यवाद. 'दास ऑटो' हे टॅगलाईनचे माहिती नव्हते मला. Happy

नंदिनी तु सांगितलेला खर्च तर कमीच आहे. कालची त्यांची फक्त पुणे एडिशनची कँपेन सध्याच्या रेटकार्डप्रमाणे २.५ कोटी रुपयांच्या आसपास असेल. मुंबई एडिशनचे रेट्स तर पुण्याच्या तिप्पट्-चौपट आहेत..!
(अर्थात हे लोक पब्लिकेशन्सशी अ‍ॅन्युअल काँट्रॅक्ट करतात, त्यात रेट पाडून मागतात- हे निराळे).

मामी जेट्टाची किंमतही मर्क/ बीएम ड्ब्ल्यु पेक्षा 'आटोपशीरच आहे की. मर्क ३५ लाखांपासून पुढे, तर बीएमड्ब्ल्यु ४५ लाखांपासून पुढेच तयार होते शोरुमच्या बाहेर निघायला. Happy

हुडाच्या प्रश्नावर बरंच काय काय सुचतं आहे. पण ते सारं इथं नको. Proud

गाडी घेणे चांगलेच, कारण-
१) बायकोची कटकट बंद होते. (जरा मोठी का नाही घेतली, म्हणून काही दिवसांनी पुन्हा सुरु होते; पण ती जरा सहन-करणेबल असते.)
२) रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये तुम्ही किंवा इतरांनी काहीतरी आयटेम केला, तर जे काय व्हायचे ते आधी गाडीला होते. दुचाकीवर असलात आधी तुम्हाला होते, मग गाडीला.
३) हापिसात कंटाळा आला, तर सरळ गाडीत जाऊन सीटाला झोपवून त्यावर झोपून टाकता येते.
४) वेळप्रसंगी लागणारे गरम कपडे, एखादी शाल, वर्तमानपत्रे, एखादी चटई, फर्स्ट एडचे सामान, एखादी प्रवासी बॅग, २-४ कॅरीबॅगा, दाढीचे सामान (हे तुझ्यासाठी नाही. Proud ), सुटे पैसे, स्पेअर गॉगल/चष्मा, टिश्युपेपर्स, २-३ लहान मोठे रुमाल, एखादी वाईनची बॉटल, बियरचे कॅन्स किंवा सरळ क्रेट हे सारे वर्षानुवर्षे गाडीत पडून राहिले तरी कुणाची काहीच हरकत नसते. दुचाकीवर हे सारे कुठे ठेवणार, अन ती जास्तीत जास्त कुठेकुठे नेऊ शकणार?
५) ट्रान्सपोर्ट म्हणून वापरा बिन्धास्त. आमच्या एका मित्राने बहिणीच्या लग्नासाठी त्याच्या इंडिका गाडीची चारही दारे काढून ठेवली होती. सामानाची ने आण करण्यासाठी. लई भारी, बग्गीसारखी दिसत होती ती गाडी. दुचाकीला दारे नसतात, त्यामुळे अशी मज्जा करून बघायचा प्रश्नच येत नाही.
६) ऊन, वारा, पाऊस यापासून सुरक्षित राहता येते; दुचाकी वाल्यांकडे चौकाचौकात तु.क. टाकता येतात- पण हे काही फार महत्वाचे फायदे नाहीत. Proud

मोगरा.केतकी, तुमच्या प्रश्नाला वेगळ्या पोस्टमध्ये (जमेल तसे आणि माझ्या माहितीप्रमाणे) उत्तर देतो. Happy

अरे साजिर्‍या, मी लिहिलेले रेट हे "अधिकृत रेट्स" आहेत. कागदावरचे!!

आणि तुझ्या मुद्द्यातला चौथामुद्दा फार फार आवडला.

फोक्सवॅगनला आमची कंपनी इंटेरीयर सप्लाय करते आहे. पोलो साठी Happy
साजिरा यांचे सर्वच पोस्टस छान,माहीतीपूर्ण Happy

मारुति SX4 व होंन्डा JAZZ या दोन गाड्या घेतल्यामुळे तुम्हाला पेट्रोल गाडीच हवी आहे, हे गृहित धरतो.

मारुति SX4 ही नॉचबॅक, तर होंन्डा JAZZ हॅचबॅक प्रकारातली गाडी आहे. (मागे डिकी/बुटचे बुड नसलेली- हॅचबॅक). मुळात नॉचबॅक व हॅचबॅक यांच्या लुक्समध्येच फरक असल्यामुळे लौकिकार्थाने या दोघींची कॅटेगरी वेगळी आहे, असे म्हणता येईल. SX4 ही मिडसाईझ सेदान, तर JAZZ ही प्रिमियम हॅचबॅक गाडी आहे. दोघांच्या युटिलिटीमध्येही फरक आहे. SX4 ही १६०० सीसी इंजिनवाली जरा मोठी, पॉवरफुल, तर JAZZ ही १३०० सीसी, एक मॉडर्न-मल्टियुटिलिटीवाली गाडी आहे. या दोन गाड्यांत एकच गोष्ट जवळपास सारखी आहे, ती म्हणजे किंमत. JAZZ ८ लाख, तर SX4 ८ ते ८.५ लाखांत.

जाझ संदर्भात मागल्या पानांवर १-२ पोष्टी टाकल्या होत्या.

SX4 चे स्पर्धक- होंडा सिटी, ह्युंडाई वर्ना, फियाट लिनिया, फोर्ड फियेस्टा, शेवर्ले अ‍ॅव्हिओ इ.
JAZZ चे स्पर्धक- ह्युंडाई आय-२०, फोर्ड फ्युजन (हिचे दिवस भरत आले आहेत. कोणत्याही क्षणी मार्केटमधनं गायब होईल ही), फियाट पुंटो, स्कोडा फाबिया इ.

महाग सांगतुस ल्येका? >> Lol त्या काय माझ्या घरच्या आहेत काय?

आणि लाखो रुपये लागत नाहीत. पन्नास हजारात गाडी दाराला लागते. (मारुती वगैरे) Happy

दीपू, धन्यवाद. Happy पोलो पण सही आहे, एवढ्यात लाँच व्हायला हवी खरे तर.

मामी, जेट्टा नंतर तुम्ही 'येता' काय म्हणालात. स्कोडाच्या 'येती' बद्दल बोलताय का? ती आली नाही वाटतं अजून.

बरं साजिर्‍या मर्दा, आता लई सांगिटलस बग कंची गाडी घ्यायची ते. आता गब्रू कंची गाडी घेऊ नाही त्ये बी ल्येका एकडाव हुन जाव दे की Proud

वोक्सवॅगन (अमेरिकन उच्चाराची सवय झालीय आता) उर्फ व्हीडब्ल्यू या कंपनीने आता टोयोटा कंपनीला मागे टाकून जगातील सर्वाधिक गाड्या बनविणारी कंपनी असा यावर्षी मान मिळवला आहे. त्यामुळे त्या पेपरभर अ‍ॅड्स काहीच नसतील त्यांच्यासाठी. आणि अलीकडेच Porshe आणि VW ह्यांनी एकमेकांना विकत घेऊन बरीच करमणूक केली. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत.. Wink

जेटा ही अमेरिकेत सिव्हिक, करोला यांच्या लायनीत येते.
जपानी गाड्यांमुळे VW ला अमेरिकेत विशेष यश मिळालेले नाही. जपानी गाड्यांपेक्षा Reliability त्यांची नक्कीच कमी आहे. जेटापेक्षा मला पसाट आवडते जास्त. मस्त आहे. पण ती भारतात अजून विकत नाहीत वाटतं. जास्त महागसुद्धा आहे ती.

आरं गब्रु जवाना, पयले म्हनतूस- गाडी काहून घ्याची ते सांग. आता म्हनतूयास- कोनती घ्याची नाय, ते सांग. Uhoh

ह्ये तुजं काय रामलीला चाल्लंय, एक्डाव सांगूनच टाक गड्या आता. एकांद्या गाडीनं तुला लई म्हंजी लईच जोरात उडविल्यालं दिसतंय बग. त्याबिगर नाय असा डुख धरायचा तु. (एमएच ३१ वालीच आस्नार ती गाडी पन नक्की). Proud

जेटा ही अमेरिकेत सिव्हिक, करोला यांच्या लायनीत येते. >>
हम्म. खरे तर त्याच रेंजमध्ये आहे ती. पण सिव्हिक, क्रुझ, करोलापेक्षा (इथेतरी) थोडी महाग आहे ती.

अ‍ॅकॉर्ड, कॅम्री, सोनाटा या जास्त मोठ्या अन महाग आहेत. पसाट यांच्या रेंजमध्ये येईल. इथे विकत आहेत पसाट गाड्या. पुढल्या महिन्यात आणखी दोन नवीन गाड्या येताहेत. त्यातली एक एसयुव्ही प्रकारातली, तर दुसरी बीटल. Happy

अमेरिकेतुन भारतात गाडी नेता येते का (लेफ्ट हँड ड्राइव अलाउड आहे का)?
(समजा जुनी वापरलेली इथुन नेली तर ड्युटी किती पडते?)

अश्विनीमामी | 23 March, 2010 - 12:22
फोर्ड फ्युगो बद्दल काय एक्स्पर्ट ओपिनिअन?

साजिरा | 23 March, 2010 - 13:00
स्मॉल कार वॉर मध्ये या वर्षात धडाधड पडलेल्या उड्यांपैकी ही एक. फोक्सवॅगन, फियाट, होंडा या लोकांनी पहिल्यांदाच 'स्मॉल कार्स' भारतीय बाजारपेठेत सादर केल्या आणि जनरल मोटर्स, टाटा, हुंडाई, मारूती यांनी आपली स्मॉल कार्सची रेंज वाढवली- ती याच वर्षात.

'फिएस्टा'चा सेल उतरणीला लागल्यापासून आणि 'फ्युजन' आणि 'आयकॉन' नावाच्या गाड्या इतिहासजमा व्हायच्या मार्गावर आल्यानंतरचे फोर्डचे हे जरा उशिराचे, पण पहिले पाऊल. १.२ लिटर्स-पेट्रोल इंजिन असलेल्या या गाडीचा बर्‍यापैकी मोठा आकार, आतली बरी स्पेस (शिवाय फिएस्टापेक्षाही मोठा व्हीलबेस) बघून ३.९ लाखांपासून सुरु होणारी किंमत नक्कीच आकर्षक आहे. या किंमतीत आता-आतापर्यंत मारुतीने झेन, वॅगनआर, अल्टो सारख्या गाड्या विकल्या यावर आता विश्वास बसत नाही.

१.४ डिझेल फिगो हाही पर्याय उपलब्ध आहेच. पण अर्थातच जास्त किंमतीत. जास्त मेंटेनन्ससह. रोजच्या रोज वापर नसेल, तर पेट्रोल गाडीच घ्यायला हवी.

१.२ पेट्रोलच्या इतर गाड्यांच्या कमीत कमी किंमती बघा.
मारुती स्विफ्ट- ४.५
मारुती रिट्झ- ४.६
मारुती ए-स्टार- ४.२
शेवर्ले बीट- ४.६
फियाट पुंटो- ४.७
टाटा इंडिका- ४
होंडा जाझ- ८
हुंडाई आय१०- ४
हुंडाई आय २०- ५.३

या किंमती बघता, फोर्डने प्राईस वॉर मध्ये सॉलिड पंच मारला आहे, हे नक्की. लुक्स, पॉवर, इंजिन, स्पेस, पेस बाबतही ती ओके वाटते.

१.४ लिटर्स च्या फोक्सवॅगन पोलोची किंमत ४.९ पासून सुरू होते हे लक्षात ठेवा.

माझी निवड- शेवर्ले बीट किंवा फोक्स्वॅगन पोलो.

आगाऊ, ऑटोमॅटिक गाडयांमध्ये सगळ्याच कंपन्यांची ऑटोमॅटिक मॉडेल्स आहेत. नुसत्याच नॉचबॅक नाही, तर हॅचबॅक (स्मॉल) कार्स मध्येही ती आहेत. म्हणजे ५-६ लाखांपासून ते पुढे. तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर किंमत, कंपनी, बजेट, गाडीचा आकार, उपयोग अशा अनेक पॅरामीटर्सचे हे फंक्शन आहे.

भारतातले रस्ते, वाहतूक, प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी असलेला स्वतंत्र / डेडिकेटेड लेन्सचा अभाव- यामुळे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रकारच्या वाहनांचा खप फारच कमी आहे.

ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे तुम्हाला गाडीचे इंजिन डिलीव्हर करत असलेली पुर्ण पॉवर संपूर्ण वेळ 'युटिलाईझ' करता येत नाही. गियर्सचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन होण्यामध्ये इंजिनची बरीचशी शक्ती खर्च पडते, आणि त्यामुळे अर्थातच शहरातल्या, गर्दीच्या ठिकाणी ही गाडी चालवल्यामुळे कमी मायलेज मिळते.

फायदे तर सर्वांनाच माहिती आहेत- क्लच आणि गियर यांच्या को-ऑर्डीनेशनचे झंझटच संपते. जे काही वर्षांपासून गियरच्या गाड्या चालवतात, त्यांना हे काहीच वाटत नाही. पण १) या प्रकारामुळेच गाडी शिकणे, चालवणे, सराव करणे राहून गेलेल्यांना २) गाडी अनेक वर्षे चालवली असल्यामुळे, आणि मायलेज वगैरेची चिंता आता फारशी नसणार्‍यांना, जरा आरामाची गरज असणार्‍यांना अशा गाड्या घ्यायला काहीच हरकत नाही. Happy

हे सारे अर्थातच, आगाउने विचारल्याप्रमाणे भारताबद्दल बोलतो आहे. परदेशात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या गाडयांचा सर्रास वापर आहेच.

भारतात फोक्सवॅगन बीटल मिळते. पुण्यातली ऑन-रोड किंमत २५ लाखांच्या आसपास.
newBeetle_salsaRed.jpg
या 'लिजंडरी' गाडीची बरेच जण वाट पाहत होते. आता किंमत बघता, ती मध्यमवर्गींयांची नाही, हे तर नक्कीच. किती लोक घेतात, ते बघावे आता. Happy

'लिजंडरी' >> ?? भारतात लोक कशाचिही वाट पाहतात ( अन इथेही ! )

आगाऊ - साजिर्‍याने फरक विशद केला आहेच. पण तुला गाडीचा परफॉर्मन्स हवा असेल तर गिअर असलेल्या गाडीला पर्याय नाही. ( हायएन्ड स्पोर्टस कार मॅन्युअल गिअर बॉक्स वाल्याच असतात, जर अ‍ॅटो ठेवल्या तर काय मजा? )

>>पुण्यातली ऑन-रोड किंमत २५ लाखांच्या आसपास <<

काय? २५ लाख म्हणजे जवळजवळ $५५,०००. भारतात किंमती एव्हढ्या जास्त कां?

पुण्यातली ऑन-रोड किंमत २५ लाखांच्या आसपास.
>> बापरे!

भारतात लोक कशाचिही वाट पाहतात ( अन इथेही ! )
>> मला पिस्ता रंगाची बीटल प्रचंड आवडते! पडवरणार नाही म्हणून.. नाहीतर नक्की घेतली असती!
(रच्याकने, एक मित्र म्हणतो 'ये गाडी आ रही है या जा रही पता ही नही चलता :D)

Pages