कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील महानगरे ३१ मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36

आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद

खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के

बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह

अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर कोणताही धागा बघा जिथे तिथे हिंदु धर्माला नाव ठेवुन डिवचल्याशिवाय एकही प्रतिसाद नसतो.

कुठे कोणता प्रतिसाद आहे ?

प्रबोधन डोकटर्निच करावे असा कायदा नाही , गाडगेबाबा , प्रबोधनकार ठाकरे डॉकटर नव्हते, तुमचे प्रोफेशन काय ह्याचा उल्लेख तरी करा म्हणजे तुम्हास योग्य ते कर्तव्य सुचवले जाईल.

विजय आंग्रे भौ, एकदा परवानगी मिळाल्याचे आदेशपत्र दाखवल असत तर माझा पुढचा प्रश्न ऊस तोडणी बाबतच असणार होता Lol . असो, आजच सकाळी बातम्यांत दाखवले की ऊस तोडणी अजूनही चालूच आहे.

पण बीसी या साखर कारखानदार नेते लोकांची एव्हढी बाजू का घेतोय कळत नाही..

मी कशाला बाजू घेऊ ?
तुम्हीच कोणताही आदेश नसताना बंद आहे म्हणून बोलत आहात , ते मला चुकीचे वाटले , म्हणून मी चौकशी केली आणि मला जे समजले ते लिहिले

की तुमची बाजू पटत नसेल तर खोडणे , हेही आता पाप आहे की काय ?

आणि बाजू तर आता आंगरेनीही घेतली , ते तर तुमच्या पार्टीचे आहेत ,

तुम्हीच कोणताही आदेश नसताना बंद आहे म्हणून बोलत आहात >>

हे वरील सर्व लींकनीच सिद्ध केले. मला काहीही सिद्ध करण्याची गरज पडली नाही. कारण परवानगी अजूनही मागितली जात आहे असेच सगळ्या लिंक्स सांगत आहेत.

की तुमची बाजू पटत नसेल तर खोडणे , हेही आता पाप आहे की काय ? >>

अजाबात नाय. योग्य असे पुरावे असतील मी गप्प बसतो. एवढंच नाही तर एखाद्या भाजप समर्थकांनी दिलेली बातमी फेक आहे म्हणूनही शोधून सांगितलंय. तुमचे परममित्र उदय भौ ना विचारा..

शाहरुख खानचे विशेष अभिनंदन. आता 30 तारखेनंतर वाढलेल्या विशिष्ट कोरोना ग्रस्त लोकांची संख्या पाहून या गोष्टीची नितांत गरज होती.

https://m.economictimes.com/news/economy/agriculture/govt-exempts-farm-a...
The second addendum issued by home secretary Ajay Bhalla on Friday exempted farm workers in the fields and farming operations by farmers, agencies engaged in procurement of agriculture products including MSPs, mandis notified by the state governments, inter and intra-state movement of harvesting and sowing related machines and manufacturing, packaging units of fertilisers, pesticides and seeds, among others

उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात काही लोकांसाठी खरमरीत इशारा दिला आहे.
समाजात दुही पेरणाऱ्या वक्तव्यांना थारा नाही, कायदा त्यांच्याकडे पाहून घेईल, असं म्हटलंय.

त्यामुळे जी काही विधानं कराल ती आपल्या पूर्ण जबाबदारीवर करा.

अगदी अगदी... पण मला वाटतं ते काम वृत्तपत्रे आणि त्यांना मसाला पुरवणारे पुढे चालू ठेवत आहेत.

जे व्हायचं ते होऊन गेलं, आणि सगळ्यांना कोण काय ते माहीत पडलंय.

सुर्य कधीच उगवला , आता कोंबड झाकून काय उपयोग? त्यापेक्षा मस्त रस्सा करून खा... Lol

बादवे भरत, भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांच्या अखत्यारीत मायबोली नाही असे मी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. खरं आहे का ते?

मुंबई ही corona chi rajdhani झालीय.
मुंबई मुळे महाराष्ट्र चा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होत आहे.
देशभरातील लोक एकडे येतच आहेत ते कमी आहे म्हणून विदेशात नोकरी करणारे सुद्धा family mumbai पुण्यात च ठेवत आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्ती चा नाश वरती सर्वात जास्त रोगी मुंबई मध्येच सापडत आहेत त्या मध्ये ह्या बाहेरच्या लोकांचाच सर्वात मोठा सहभाग आहे

{भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांच्या अखत्यारीत मायबोली नाही असे मी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. खरं आहे का ते?}
वेमांनी याचं स्पष्ट उत्तर दिलं होतं.
वेळ आली तर ते इथल्या कायदा यंत्रणेला पूर्ण सहकार्य करतील, असं ते होतं असं मला आठवतंय.
मी शोधत बसणार नाही.
तुमचं तुम्ही बघा आणि ठरवा

महाराष्ट्रात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला.
किमान ३० एप्रिल...

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आता राशनपाणी घेऊन आलो. समोरच्या भाजीवाल्याकडून फुटकळ खरेदी केली. ५०० रुपये लावले. मागे पुढे रांग त्यात दुकान ५ ला बंद होणार होते. काय कसा हिशोब लावत होता ते कोणी चूक की बरोबर ही करत नव्हते. किमान १०० रुपयाने तरी माझ्या खरेदीचा हिशोब चुकला असेल. की महागच झालेय सारे काही कल्पना नाही..

असो, जोपर्यंत भाजीखरेदीला गर्दी होतेय तोपर्यंत अवघड आहे.

मी माझा, ऑल द बेस्ट! जिऊन घ्या अपली जिंदगी. मग काय!!! आहेतच कठोर परिश्रम.
तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. यापुढे बोलणार नाही.

अमितव , तुझे all the best mala nakot मित्रा, ते तुझ्यासाठी राखून ठेव. बाकी मला all the best कशाला म्हणतोस ते कळलेल नाही..

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली माहिती.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केली आहे..
कोरोनाचे मुंबईत ६१ टक्के रुग्ण असून ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात १० टक्के तर पुणे येथे २० टक्के रुग्ण आढळून आले आहेत.राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ५.५ टक्के आहे. शात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आतापर्यत ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १६५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील एकही रुग्ण सुटता कामा नये याची खबरदारी घेतली जात आहे. उर्वरित ९ टक्के रुग्ण हे राज्याच्या इतर भागातील आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे नसून २५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर पाच टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.राज्यातील जनतेला लॉकडाऊन अधीक गांभीर्याने पाळण्याचे आवाहन केले.
कोरोना चाचण्यांबाबत पूल टेस्टिंग ही नविन संकल्पना आज महाराष्ट्राने पंतप्रधानांसमोर मांडली. त्याद्वारे वेळेची आणि किटची बचत होण्यास मदत होईल.

बोल्ड केलेला भाग महत्त्वाचा वाटतोय.

नक्कीच लक्षणे नसणे ही गंभीर गोष्ट आहे.

पूल टेस्टिंग च्या बातम्या याआधी वाचल्या होत्या.. भारतासाठी योग्य पद्धत आहे.

https://www.google.com/amp/s/www.moneycontrol.com/news/coronavirus/coron...

युपी मध्ये 3 दिवसांपूर्वीच आदेश दिले होते असं दिसतंय. कदाचित त्यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला पुल टेस्टिंग बाबत आणखी मदत मिळू शकेल.

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/coronavirus...

आजची महाराष्ट्र रुग्ण संख्या 1761.
हयो आंकड़ा अन महाराष्ट्र , जुना संबंध आहे
Submitted by BLACKCAT on 11 April, 2020 - 22:23
--
म्हणजे महाभकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रचे पुन्हा एकदा "पानिपत" होणार असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

नाही हो , पराक्रम गाजवा . त्वेशाने लढ़ा व अब्दाली कायमचा गेला तसे घालवा,

आणि महाराष्ट्र लढाईत मोदी , फड़नवीस , गडकरी , जावड़ेकर व राज्यपालही आहेत

आणि महाराष्ट्र लढाईत मोदी , फड़नवीस , गडकरी , जावड़ेकर व राज्यपालही आहेत

नवीन Submitted by BLACKCAT on 12 April, 2020 - 08:21. >>

हे कोण म्हणतंय? मुख्यमंत्री? राज्यकारभार जड व्हायला लागलाय की काय?

Pages