कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील महानगरे ३१ मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36

आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद

खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के

बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह

अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुकेने मरण्यापेक्षा व्हायरसने मेलेलं चांगलं असंही वारंवार तो व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
×

जर खरेच भुकेने मरायची वेळ आली तर माणसे काय करणार?
भूकेने मरायची शक्यता जवळपास शंभर टक्के आहे.
व्हायरस मारेल याची खात्री दोन टक्के पाच टक्के दहा टक्के...
तुम्ही काय कराल अश्यावेळी
सरकारने पोटापाण्याची व्यवस्था किमान केली पाहिजे आणि ती होत राहील याची शाश्वती दिली पाहिजे. अन्यथा अराजक माजेल. आपणही सरकारला आर्थिक मदत आपल्या परीने करत राहूया.. एकूणच लोकांमध्ये विश्वासाचे नाते आणि एकजुटीचे वातावरण तयार होणे गरजेचे

ये तो दुबे निकला

Submitted by BLACKCAT on 14 April, 2020 - 23:44 >>

या वाक्याच प्रयोजन?

Maharashtra police arrested @abpmajhatv reporter Rahul Kulkarni from his home town Osmanabad for allegedly spreading fake news that trains will start on April 14, 2020. Such circular was issued by Railway ministry, the details inquiry should happen & culprit should be punished

एक दुबे , एक कुलकर्णीपण निघाला

केंद्रातील मोदी सरकारला उठता बसता सल्ला देणारे घड्याळ काका, सध्या कुठे आहेत ? फार दिवस झाले त्यांचे फेसबुक लाईव्ह ऐकून.

राहुल कुलकर्णी यांनी कोणत्या सोर्सकडून ही बातमी मिळवून पुढे ब्रॉडकास्ट केली ते माहीत नाही पण ते एक प्रामाणिक पत्रकार आहेत. सर्व बड्या नेत्यांना भीड न बाळगता सडेतोड प्रश्न विचारणारे जे थोडेफार पत्रकार आहेत त्यात यांचा निश्चितच वरचा क्रमांक आहे. त्यांच्याकडून झालेल्या चुकीचे जे काही व्हायचे ते होईलच पण यावरून त्यांची होणारी बदनामी पाहता आधीच सर्व काम पुसून जाऊ नये ही अपेक्षा Sad

विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घरोबा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची कास पकडून धार्मिकदृष्ट्या उजव्या राजकारणाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र आपली प्रखर उत्तर भारत विरोधी ओळख काहीशी मवाळ करून लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर भारतीयांच्या एका मेळाव्याला संबोधित केले होते. या मेळाव्याचे संयोजक होते वांद्रे गर्दी प्रकरणी अटक करण्यात आली असलेले विनय दुबे हेच होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला. पण या तिन्ही पक्षांमध्ये घरोबा मात्र होऊ शकला नाही. पण याच निवडणुकीमध्ये दुबे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आपण पण राज ठाकरे यांना सोबत घेऊन कार्यक्रम केल्यामुळे त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्र सैनिक मला आपला माणूस म्हणतात असा त्यांचा त्यावेळेला दावा असला तरीसुद्धा दुबे यांना शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिदे यांनी पराभवाची चव चाखली.

उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष असलेले दुबे हे तसे मूळचे उत्तर प्रदेशातील भदोहीचे आहेत. आपलं बरंच शिक्षण मराठीत झालं असल्याचे सांगणारे दुबे हे ऐरोलीला राहतात. त्यांचा ई-कॉमर्स वेबसाईटना तांत्रिक सहाय्य देण्याचा व्यवसाय आहे. ३४ वर्षांचे दुबे हे राजकारणामध्ये तसे नवखे नाहीत. २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये दुबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उत्तर मतदारसंघातून शड्डू ठोकला होता. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मागील आठवड्यातच दुबे यांचे वडील जटाशंकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून कृतज्ञता म्हणून रुपये पंचवीस हजार इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता सुपूर्द केला होता. जटाशंकर हे गेली पंचवीस वर्ष रिक्षा चालक म्हणून काम करत आहेत.

https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-vinay-dubey-arrest-for-...

जिद्दू, त्यांनी ट्वीटरवर रेल्वेच्या उत्तरेकडल्या एका भागाचं पत्र शेयर केलंय.
पण रेल्वेने हात वर केलेत.
जिथे cabinet secretary lockdown वाढणार नाही असं सांगतो, तिथे हे अपेक्षितच आहे.
शिवाय कुलकर्णींनी पत्राच्या जोरावर पूर्ण माहिती न घेता बातमी चालवली.

#मुझे_गर्व_है_मै_आपका_बेटा_हुँ_पिताजी.......

जब मै सुबह से दिनभर जरूरतमंद लोगो को #राशन_बाटने निकलता था तो यह देख #पिताजी ने मुझसे कहा......

" #विनय हम लोग #महाराष्ट्र के इस विर भुमि मे #जन्म लिए यही पले बढे, करीब #25_साल_आटो_रिक्षा चलाकर इस विरभुमी ने हमे #भोजन व #आसरा दिया, आज मेरा महाराष्ट्र #कोरोना के वजह से #तकलिफ मे है यह #मेरा_ही_परिवार है, इसलिऐ बैंक चल मेरी जो मेरी #सेविंग है व #FD है उसमे से कुछ पैसे मेरे महाराष्ट्र के परिवार के लिए दे दे....आखिर ये पैसा उनके ही वजह से है.... "

जब पिताजी के #विचारो को मैने महाराष्ट्र के #गृहमंत्री_श्री_अनिल_देशमुख जी तक पहुचाता तो वे बहुत उत्साहित हुए और श्री अनिल देशमुख जी ने कहा मै #खुद_मिलना चाहता हुँ आपके पिताजी से...

वैसे भी मेरा पहले से हि तय बैठक बस सेवा को लेकर था मंत्रालय मे ... मैने पिताजी को साथ लिया और गृहमंत्री जी से मिलाया...

मेरे महाराष्ट्र से जुडे सभी लोगो से निवेदन है भले जो हो सके अपनी भुमि अपने लोगो के लिए मदत जरूर करे !!

#गृहमंत्री_जी ने खुद यह बात अपने #ट्विटर पर #पोस्ट की यह देख मुझे गर्व होता है...

https://twitter.com/AnilDeshmuk…/status/1248573267406770180…

#धन्यवाद मुख्यमंत्री श्री उद्धव बालासाहेब ठाकरे जी व गृहमंत्री श्री अनिल देशमुख जी !!

#दुबे_परिवार_सदैव अपने #महाराष्ट्र के साथ है... #आखरी सांस तक !!

#मी_महाराष्ट्राचा_आणि_महाराष्ट्र_माझा

#जय_हिंद_जय_महाराष्ट्र
#विनय_दुबे

https://www.facebook.com/vinay.dubey.3701/posts/2973790769350835

काहीतरी सनसनाटी बातमी द्यायची असते ह्यांना आणि ती सुद्धा सर्वात आधी. किमान शहानिशा तरी करावी एवढी मोठी बातमी देताना.

– संदीप आचार्य
जगात करोनाची साथ पसरत होती त्यावेळी परदेशातून भारतात आलेल्या ३० ते ४० लाख लोकांची चाचणी केली असती व त्यातील आवश्यक त्यांना लॉकडाऊन केले असते तर आज १३० कोटी भारतीयांवर लॉकडाऊन होण्याची वेळच आली नसती, असा घणाघात विख्यात समाजसेवक डॉ अभय बंग यांनी केला.

परदेशातून भारतातील विविध शहरातील विमानतळावर उतरलेल्यांची तेव्हाच खरेतर चाचणी व्हायला हवी होती. कदाचित तेव्हा एवढ्या संख्येने चाचणी करण्याची व्यवस्था नसल्याने चाचणी झालीही नसेल परंतु दोन लाख लोकांच्या हातावर शिक्के मारून घरी क्वारंटाईन व्हायला सांगितले व काही हजारच लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या. तेव्हाच जर परदेशातून आलेल्या लाखो प्रवाशांना क्वारंटाईन करून तपासले असते तर १३० कोटी भारतीयांवर आज लॉकडाऊन होण्याची वेळ आली नसती असे ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत डॉ अभय बंग यांनी सांगितले.
भारत सरकारने त्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायातून लॉकडाऊनचा पर्याय सर्वोत्तम म्हणून निवडला असला तरी काही तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊन हा काही ठोस पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे खरोखर किती फायदा झाला याला ठोस आधार नाही. माझ्या मते लॉकडाऊन ज्याप्रकारे जाहीर करण्यात आला ती आदर्श पद्धती निश्चितच नाही. त्याचे परिणाम आपण उत्तर प्रदेश, बिहार तसेच काल वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ बघितले, बंग यांनी सांगितले.
करोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढले की खरी परिस्थिती कळेल. एप्रिल अखेरीस आपण साथीच्या टोका पर्यंत येऊ त्यावेळी ही साथ किती पसरली याचा नेमका अंदाज येईल. भारतात आपण केवळ परदेशातून आलेले, संपर्कात आलेले तसेच लक्षणे असलेल्यांची चाचणी करत असून तीही पूर्ण क्षमतेने होताना दिसत नाही. आईसलँड या छोट्याशा देशाने तेथील सक्षम व ज्यांचा कोणत्याही प्रकारे कोणाशीही संपर्क आलेला नाही अशा लोकांची रँडम चाचणी केली. या चाचणीत शून्य पूर्णांक आठ टक्के लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले. विचार करा भारतात जर अशाप्रकारे चाचणीचे निष्कर्ष आले तर किमान एक कोटी लोकांना करोना झालेला दिसेल. अर्थात आज अशी स्थिती नसली तरी लाखभर लोकांना तरी करोनाची लागण झाली असावी अशी शक्यता डॉ अभय बंग यांनी व्यक्त केली. आज जे चित्र दिसत आहे ते हिमनगाचे टोक असल्याचेही डॉ बंग यांनी सांगितले.
अमेरिकेत साथीच्या जगभरातील स्थितीचा अभ्यास करणारी एक संस्था आहे. चीनमध्ये जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा या संस्थेने जो निष्कर्ष जाहीर केला त्यात म्हटले होते की, या साथीचा मुकाबला करण्याची क्षमता असलेल्या देशांची वर्गवारी केल्यास अमेरिकेचा पहिला नंबर असेल तर दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक ५१ वा असेल. आज अमेरिकेची परिस्थिती सर्वात वाईट आहे तर ब्रिटनचा पंतप्रधान नुकताच अतिदक्षता विभागातून बाहेर आला आहे. या पार्श्वभूमीवर आपण किती तयार आहोत व तयारी करायला पाहिजे याचा नक्कीच आढावा घेऊन पावल टाकायला हवी, असे डॉ अभय बंग म्हणाले. मुंबई, पुण्यातील पालिका व सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांवर आजच कामाचा प्रचंड ताण आहे. त्यांना करोना किट मास्क आदी साहित्य पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. एक नक्कीच आहे त्यांना आवश्यक ती विश्रांती मिळत नाही. सरकारने यासाठी बाँड वरील डॉक्टरांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचा फतवा काढला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्याची काटेकोरपणे अमलबजावणीही केली पाहिजे. हे एकप्रकारचे युद्धच आहे. यात डॉक्टरांची भूमिका मोलाची आहे. प्रत्येक तरुण डॉक्टरांनी यात स्वत:हून सहभागी झाले पाहिजे. यातून त्यांना मिळणारा अनुभव अनमोल असेल असेही ते म्हणाले. बांगलादेश युद्धात व १९७२ च्या दुष्काळात मी स्वत: स्वयंसेवक म्हणून काम केले असून त्यावेळी मिळालेला अनुभव खूप मोलाचा होता असे डॉ बंग यांनी सांगितले.
मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, मुंबईतील अनेक मोठी रुग्णालये तसेच त्यांचे बाह्यरुग्ण विभाग करोना पेशंटशी डॉक्टर व परिचारिकांचा संपर्क होताच बंद करण्यात आले. हे जर खरे असेल तर या मोठ्या रुग्णालयात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था व अन्य आरोग्य सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत होत्या का हा प्रश्न निर्माण होतो असेही डॉ बंग म्हणाले.
पण एक नक्कीच सांगतो की, अमेरिका, ब्रिटन, इटाली पेक्षा भारतातील व मुंबईतील परिस्थिती कितीतरी चांगली आहे असेही डॉ बंग यांनी म्हटले आहे.

नवी मुंबईतील APMC मधील भाजी मार्केट आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नेहमी प्रमाणे बेशिस्त नागरिकांनी आज तुफान गर्दी केली होती मार्केट मधे भाजी घ्यायला.

इथली जनता किती YZ आहे हे माहित असूनही, महाराष्ट्र सरकार जर असे निर्णय घेत असेल तर लॉकडाऊन 3 मे पर्यंतच काय, पुढील सहा महिने कायम ठेवला तरी कोरोनाला घंटा फरक पडणार नाही.

तिथे बसणाऱ्या भाजीवाल्यांचे दोन गट करून प्रत्येक गटाला alternate दिवशी भाजी विकायची परवानगी देणे व त्या त्या दिवशी मोकळे असलेल्या गटाला गर्दी नियंत्रणात आणायला लावणे यासारखे उपाय सहज करण्यासारखे आहेत. पण प्रशासनाला ते "काही अज्ञात कारणांमुळे" सुचत नाहीत असे वाटतेय.

#ह्याला_ठासणे_म्हणतात

मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र

माननीय राज्यपालमहोदय , महाराष्ट्र राज्य यांसी –

जय महाराष्ट्र ,

महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही . Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो. जय हिंद , जय महाराष्ट्र .

आपला नम्र

– उद्धव ठाकरे.

Submitted by BLACKCAT on 13 October, 2020 - 13:43

ठासणे म्हणजे काय असते ते येत्या (ज्या कुठल्या नजीकच्या काळात होतील - विधानसभा / महानगरपालिका इत्यादी) निवडणूकांच्या निकालात कळेल. सेव्ह करुन ठेवा माझा हा प्रतिसाद.

ते पत्र मी लिवले नाही

तुमचे 35 वर्षे जुने पार्टनर व विद्यमान मु मंत्री ह्यांनी लिहिले आहे

" सरकार ने परवानगी देवो ना देवो आम्ही मंदिरे १ सप्टेंबर पासून आणि मशिदी २ सप्टेंबर पासून उघडणारच " सरकार ला अशा पद्धतीने सांगण्याची इम्तियाज जलील ची
हीच पद्धत बरोबर आहे .
रुग्ण किती वाढतील ? किती करतील ? याची इम्तियाज ने काळजी केली का ? नाही ना मग भाजप ने तरी का करावी ?
मरु द्या ना सगळेच मरतील तडफडून !!!!

आणि भाजप चे नेते बालिश आहेत हो ! सरळ कायदा धाब्यावर बसवून मंदिरे उघडायची तर पत्र लिहून परवानगी मागत बसले आहेत .

उघडले का मग ?

आणि मग शहा आणि योगी तब्लिघिना का पकडत होते म्हणे ?

पण !
मंदिर आणि मशिदी उघडूच नये असं मला वाटतं .

मंदिर उघडा म्हणून नाचणार्या भाजपयांची अवस्था त्या बाहुबली मधल्या भललाल देव गत झाली आहे , मंदिर उघडावे , मुले मेली तर चालतील

पण आघाडी सरकार , काँग्रेस ह्यांना बाहुबली सारखे व्हायचे आहे , शत्रूचाही नाश व मुलेही जगवली पाहिजेत

मंदिर उघडा म्हणून नाचणार्या भाजपयांची अवस्था त्या बाहुबली मधल्या भललाल देव गत झाली आहे , मंदिर उघडावे , मुले मेली तर चालतील>>>>> मग वंचित आघाडीच्या इम्तियाज जलिल पण पकडा की वो. तो पण नाचत होता. Proud

पण आघाडी सरकार , काँग्रेस ह्यांना बाहुबली सारखे व्हायचे आहे , शत्रूचाही नाश व मुलेही जगवली पाहिजेत>>>>>> Rofl काँगी सत्तेत आल्याच्या अनादी कालापासुन देशात अनेक मेळघाट व कुपोषीत मुले आहेत. आणी म्हणे मुले जगवायची आहेत. Proud

काँगीचा बाहुबली कोण रावल्या का?

मला तर हे कळले नाही, की मंदिरे उघडली तर 'मुले' कशी काय मरतील. देवळात काय फक्त मुलेच जातात का ? बर भारतातील इतर राज्यात गेल्या दोन महिन्यापासून मंदिरे उघडी आहेत, तिथली मुले दगावल्याच्या बातम्या नाहीत मग या पेंग्विन सरकारने मंदिरे उघडली तर मुले कशी काय मरतील ?

मुले म्हणजे मुले नव्हे हो

ते त्या युद्धात झाले होते , शत्रूला मारणे व मुलेही वाचवणे असे 2 टास्क होते

आपल्या समोर देऊल उघडणे व माणसेही मरु न देणे असे 2 टास्क आहेत

पूर्ण लिहायला वेळ नाही , सिनेमा बघा

ट्रेन सर्वांसाठी सुरु करा,मंदिरं उघडा, शाळा सुरु करा म्हणून सर्वत्र बोंबलत फिरणारे फडणवीस आणि त्यांचे भुंकरे सहकारी आता कोरोना रुग्ण वाढू लागल्यावरही पुन्हा सरकारलाच दोष देताहेत..

कसा जमतो यांना इतका डबल ढोलकीपणा, ढोंगीपणा कुणास ठाऊक..

बंद म्हणजे सगळेच बंद असणार का? मला अमेरिकेतून यायचे आहे येत्या २-३ दिवसात काही urgent कारणासाठी, मुंबईहुन गाडीने नाशिकला जात येईल का?

Pages