कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील महानगरे ३१ मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36

आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद

खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के

बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह

अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Heera+1 Uddhavji comes across as a family member.no rhetoric which is a blessing.

मला श्री उद्धव ठाकरे यांची टीव्हीवर संदेश देण्याची आणि आवाहन करण्याची पद्धत आवडली. समोरच्याशी थेट बोलताहेत असे वाटते. आवेश नाही, आवाजात कृत्रिम चढउतार नाहीत, उपदेश आणि पेट्रनाय्झिंगचा डोस नाही. उंच पट्टीत बोलणे नाही. खऱ्याखुऱ्या मुंबई टोनमध्ये ते बोलतात. श्रोते आणि वक्ता यात समपातळी साधल्यासारखे वाटते. कित्येक नेते मैदानावर बोलावे तसेच टीव्हीवर बोलतात. उद्धवजींच्या टीवी अपीअरन्स मध्ये साधेपणा आणि कपड्यांमधे सुटसुटीतपणा दिसतो. +111111111

श्री उद्धव ठाकरे यांची टीव्हीवर संदेश देण्याची आणि आवाहन करण्याची पद्धत आवडली. >> +११

उध्दव ठाकरे माणूस बरा आहे पण देवेंद्र जी म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हे बोलले मी आताच येईन. पुन्हा येईन की नाही ते कुणी पाहिलं आहे. आणि ते आले दोन कुबड्या घेऊन.

हीरा +1.
मा. मुख्यमंत्री आणि मा. आरोग्यमंत्री दोघेही जबाबदार आणि संयत वाटतात.

महाराष्ट्रात विरोधी पक्ष परिस्थिती च गांभीर्य ओळखून उगीचच विरोधाकरता विरोध करत नाहीये. विरोध करायला पुढे भरपूर वेळ आहे.
नाहीतर केंद्रीय विरोधी पक्ष आणि त्यांचे चेले बघा Sad

सत्तेत असताना सतत राजीनामे खिशात आहे म्हणणारे शेवटपर्यंत राजीनामे खिशातून बाहेर काढायला धजावले नाहीत. असले दुतोंडी दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणारे स्वयंप्रकाशी नसतात.

हो मी पण हिराशी सहमत आहे. का कोण जाणे खूप दिवसांनी आपल्याच कुटुंबातले कोणीतरी टिव्हीवर बोलतय का काय असे वाटले.

मला श्री उद्धव ठाकरे यांची टीव्हीवर संदेश देण्याची आणि आवाहन करण्याची पद्धत आवडली. समोरच्याशी थेट बोलताहेत असे वाटते. आवेश नाही, आवाजात कृत्रिम चढउतार नाहीत, उपदेश आणि पेट्रनाय्झिंगचा डोस नाही. उंच पट्टीत बोलणे नाही. खऱ्याखुऱ्या मुंबई टोनमध्ये ते बोलतात. श्रोते आणि वक्ता यात समपातळी साधल्यासारखे वाटते. कित्येक नेते मैदानावर बोलावे तसेच टीव्हीवर बोलतात. उद्धवजींच्या टीवी अपीअरन्स मध्ये साधेपणा आणि कपड्यांमधे सुटसुटीतपणा दिसतो. टिपिकल मुंबईपणा! थोडक्यात आम्हां मुंबईकरांना हा 'आपला माणूस ' वाटतो.
नवीन Submitted by हीरा on 23 March, 2020 - 09:47
हीरा+१.

>>>>

अगदी अगदी +७८६
आमच्या घरीही काल हाच विषय होता. किती छान संयत बोलतात. बातम्यात तेच तेच बोलणे परत चार वेळा दाखवले तरी आम्ही पुन्हा पुन्हा ऐकले. कारण मोजकेच बोलले. कसला फाफटपसारा नाही. तसेच त्यांची ही बोलण्याची पद्धत शिवसेनेची गुंडागर्दीची इमेजही बदलतेय. आणि आता पुढे कठोर निर्णय घेताना त्यांची ही क्वालिटी फार गरजेची ठरणार आहे.

हीरा आणि कमला यांच्याशी सहमत. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री दोघेही छान संयत बोलले. उगा नाटकीपणाचा अभिनिवेश नव्हता.

महाराष्ट्रात विरोधी पक्ष परिस्थिती च गांभीर्य ओळखून उगीचच विरोधाकरता विरोध करत नाहीये. विरोध करायला पुढे भरपूर वेळ आहे. >> विरोधासाठी काही ठेवलंच नसेल तर कसा विरोध करतील?

नाहीतर केंद्रीय विरोधी पक्ष आणि त्यांचे चेले बघा >> Lol
विरोधक जानेवारी पासून सांगतायत की करोना धोकादायक होउ शकतो, प्लॅन बनवा, अ‍ॅक्शन घ्या. घेतली का कालपर्यंत?

समाधानी, जाई, कुंतल, स्पार्कल, रश्मी,ऋन्मेष, ऑर्किड धन्यवाद. नाटकीपणा नव्हता... अगदी अगदी.
रेव्यु, उद्धवजींच्या बोलण्यात भावनिक फापटपसारा दिसला नाही. नो नॉनसेन्स शी सहमत.
ऋन्मेष, संयतपणामुळे शिवसेनेची गुंडगिरीची इमेज बदलू शकेल...सहमत

हीरा +1.
मा. मुख्यमंत्री आणि मा. आरोग्यमंत्री दोघेही जबाबदार आणि संयत वाटतात. >>> अगदी अगदी.

हीरा, तुमचे प्रतिसाद सुरेख असतात. >>> मम.

तसं मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आधीपासूनच soft कॉर्नर आहे (मी भाजपची असले तरी), नेहेमीच संयत आणि संयमी, soft spoken वाटतात.

काही नागरीक खरोखर बेजबाबदारपणे वागताना दिसतायेत, ज्यांना खरोखर गरज नाही त्यांनी घराबाहेर पडू नये, आपल्या देशात वेगाने पसरला तर सगळंच कठीण होईल आणि तुमच्यामुळे समाजाला पण त्रास होईल, इतकंही भान नाही का Sad , दुर्दैव खरंच.

चीन मध्ये जेव्हा साथ चालू होती तेव्हाच सर्व विमान सेवा बंद करायला पाहिजे होती.
आता सरकार जे प्रयत्न करत आहे त्याला बैल गेला आणि झोपा केला असे च म्हणावे लागेल.
आता नवीन नवीन लोक कर्फ्यु मान्य करत आहेत आणि त्याला जास्त विरोध करत नाहीत .
पण जास्त वेळ शांततेत कर्फ्यु पाळला जाणार नाही.
संघर्षाची वेळ येवू शकते

विरोधक जानेवारी पासून सांगतायत की करोना धोकादायक होउ शकतो, प्लॅन बनवा, अ‍ॅक्शन घ्या. घेतली का कालपर्यंत?>>> असे अडचणीचे प्रश्न विचारू नयेत. दुर्लक्ष करण्यात येईल Wink

राज्याची एकसाईज ड्युटी वाढली म्हणे

म्हणजे , जी एस टी मधील तुमची 9 % वाटणी देण्यास आम्ही असमर्थ आहोत , एकसाईज ड्युटी खाऊन गप पडा

असेच ना ?

ऋन्मेश, कित्ती असे धागे काढत आहात ? जी माहिती बातम्यांमधून मिळु शकते त्याचे धागे अशा प्रकारे काढण्याचे खरच प्रयोजन आहे का ?
किती गंभीर विषय आहे हा. हे असे धागे सततचे काढून फारवर्डीय मेसेज आणि राजकारण भांडण या शिवाय काय होणार आहे?

काल एक व्हिडीओ बघण्यात आला. बहुतेक करोना ची लागण झालेला तरुण मास्क बाजूला करून बोटानं थुंकी बस की रेल्वेमधील आधाराच्या दांडीला हेतूपुरस्सर लावत होता. कुणाचं लक्ष नाही हे पाहून असे काम करत होता. मी मरणार तर अजून लोकही मरावेत ही मनोवृत्ती दर्शविते. सावध रहा. हात वारंवार साबणाने धुवा.

Look what I shared: Coronavirus Update (Live): 381,761 Cases and 16,558 Deaths from COVID-19 Virus Outbreak - Worldometer @MIUI| https://www.worldometers.info/coronavirus/

ही साईट दोनतीन वेळा चेक केली.
गेल्या दिड दिवसात (३५ तासांत) जगभरात २००० मेले Sad
आणि ईथे लोकं अजूनही संचारबंदी सिरीअसली घेत नाहीयेत....

Pages