कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील महानगरे ३१ मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36

आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद

खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के

बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह

अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अशी बातमी नाही दिसली ऑनलाईन तरी. कोणाला लिंक माहित असेल तर प्लीज सांगा. 21 फेब्रुवारी ते 12 मार्च भारतवारी आहे.

https://www.loksatta.com/mumbai-news/dont-want-to-lockdown-again-follow-...

https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-health-minister-ra...>>>>>>>सारे जग उलटंपालटं झाले तरी चालेल, पण आम्ही काही फिरायचे, नाचायचे, उडायचे सोडणार नाही. हात धुणार नाही, मास्क लावणार नाही. ( आमच्या घरातल्या एका ज्येष्ठ नागरीकाने आपला ईगो महत्वाचा, दुनिया जाए भाड में असे ठरवल्याने ते मास्क लावत नाहीत, आम्ही सांगुन थकलो, एखादे दिवशी पोलीस पकडुन चुना लावतील तेव्हा बहुतेक ते वठणीवर येतील. )

रामाच्या नावावर चंदा मागत फिरणार्‍यांकडुनही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो.. ऑनलाईन चंदा देणे श्रेयस्कर ठरेल जेणे करून येनकेनप्रकारेण मंदीर बांधले गेलेच तर तिथं जाऊन दर्शन घेण्याचा लाभ घेता येईल. कोरोना होऊन मरण आलं तर दान वाया जाण्याची शक्यता आहे.

बरोबर, कोण ती चढाओढ असते प्रत्येक वेळेस फोटो काढायची.
मास्क तर हनुवटीवर ठेवतात, कठीण आहे.

कोरोनाचे बस्तान पृथ्वीवर आता कायमचे अहे अशीच तयारी ठेवायची

मास्क, दोन व्यक्तीं मधे अंतर... साबणाच्या पाण्याचे स्वच्छ हात धुणे... हात नाका तोंडापासून कायम दुर ठेवणे, शक्यतोवर आपल्या बबल (५, ७, १० लोक) मधे रहावे. मोकळ्या हवेत बिनधास्त फिरावे (अर्थात सोशल डिस्टन्स ठेवा!).
आणि सर्वात मुख्य वैज्ञानिक दृष्टीकोन हेच मानव जातीला तारुन नेतील.

रामदेव बाबा, कुठलेसे काढे, गरम पाण्याच्या घशात वाफा असले काही अघोरी आणि कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेले उपाय कामाचे नाही. उपयोग नाहीच पण हानी मात्र नक्की आहे.

उपयोग नाहीच पण हानी मात्र नक्की आहे.
नवीन Submitted by उदय on 25 February, 2021 - 12:02

--
@थापा,
नक्की काय हानी होते या बद्दल सविस्तर लिहा बरे इथे.

बाकी काळजी घ्यावीच. पण करोनील / काढे यांचा अतिशय फायदा वैयक्तिक रीत्या झाला आहे.

'की वर्कर' असल्यानं प्रवास वगैरे करावा लागतो, पतंजली आयुर्वेदिक गोष्टींचा मला फार चांगला अनुभव आहे.
करोना च्या व्यतितिक्त सुद्धा.
उदा. - सर्दी वर तसं काही औषध नसतं , पण प्दिव्यच दिव्यश्वासारि ( गोळ्या किंवा पातळ ) हे अत्यंत प्रभावी आहे.
त्यांचं सनस्क्रीन बाजारात उपलब्ध असलेल्या सगळ्या सनस्क्रीन मधे बेस्ट आहे .

फक्त पतंजली ला विरोधासाठी विरोध म्हणून चांगल्या औषधांपासून दूर राहू नका.

Pages