कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील महानगरे ३१ मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36

आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद

खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के

बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह

अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का , तेहि आहेत की , फड़नवीस चौकीदार आहेत , बाकीचे मोदींचे प्रतिनिधि आहेत
फड़नवीसनी 30000 की कितीतरी कुटुम्बियाना कसली तरी पार्सल दिली अशी बातमी होती, लोकशाहीत दोन्ही पक्ष उपयोगी ठरत असतात , किमान त्यांच्या मतदार क्षेत्रात तरी काम करतीलच की, तोहि महाराष्ट्रच आहे ना?

करोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा स्वपक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, त्याचीच सर्वाधिक गरज आहे.' असा टोला महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना लगावला आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/what-is-the-contrib...

मुख्यमंत्र्याचं आजचं हितगूज

आय्ला ,
पंत प्रधानांच्या बोलण्याला मंकी बाथ म्हणुन मायबोलिवर हिणवणार्या जेष्ठ मायबोलीकराला महा मूख्य मंत्र्याच बोलण मात्र "हितगुज" वाटत !!

भाऊ जनाधन मध्ये पैसे केंद्र सरकार देतं. जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचं काम केंद्र सरकारच नाही. आता राज्य सरकार करू शकेल की नाही ते माहीत नाही.

सहमत
उगाचच भावनिक आवाहन नाही
थेट आणि मुद्देसूद

नुसते चांगले बोलून काय फायदा? साधी मुंबई हाताळता येत नाही.
बांद्रया सारखी परिस्थिती आता मुंब्र्यात देखील झाली आहे. आणि हे मात्र फेसबुक लाईव्ह मधे बिझी.

सहमत
उगाचच भावनिक आवाहन नाही
थेट आणि मुद्देसूद
>>>>>>>>>>>>>>
हो आणि तेही लाईव्ह

नुसते चांगले बोलून काय फायदा? साधी मुंबई हाताळता येत नाही.
बांद्रया सारखी परिस्थिती आता मुंब्र्यात देखील झाली आहे. आणि हे मात्र फेसबुक लाईव्ह मधे बिझी
Submitted by समीर.. on 14 April, 2020 - 20:48
>>>>>>>>>>>>>>>>
साधी मुंबई?

"आपले घर म्हणजे आपले गडकिल्ले आणि गडकिल्ल्यांवरच आपण सुरक्षित राहू शकतो हा इतिहास आहे..... मुख्यमंत्री उद्वव ठाकरे.
---

यांना काय वाटते, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडे "मातोश्री 2" आहे कि काय.

पलायन करणारे कामगार हे केंद्र सरकारचे अपयश. आम्ही सांगूनही केंद्र सरकारने चौवीस तासासाठी लांब पल्याच्या ट्रेन चालू केल्या नाहीत. -- आदित्य ठाकरे.
---

24 तासासाठी ट्रेन ??
कसे होणार या महाराष्ट्रातील जनतेचे.

तेंव्हाही कुठे आपल्याला गड़ किल्ले होते ?
आपण आपापल्या घरातच रहात होतो
Submitted by BLACKCAT on 14 April, 2020 - 21:11
--
अगदी.
अजूनही हे मामु इतिहासातून, वर्तमानात यायला तयार नाहीत. तिथे धारावी झोपडपट्टीत, एका 10×10 च्या खोलीत दहा दहा जण राहत आहेत.

या जमलेल्या मजदूरांपैकी एकाकडेही पिशवी/सामान/ बॅग कसं काय नाही ?
हेसगळे कुठून गोळा झाले?

जर ३० एप्रिल पर्यंत ऑलरेडी महाराष्ट्र बंद आहे, जो ५ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे ; आत्तापर्यंत कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता; ३० एप्रिल ते ३ मे या ३ दिवसांच्या वाढीव लॉकडाउन मुळं ही गर्दी उत्स्फूर्त पणे जमली आहे ह्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

SAVE_20200414_211954.jpeg

आमची बिल्डिंग सील केली.
आम्ही आत आहोत.

नोकरिला ये जा करायला परवानगी घेतली आहे , पट्टी सरकवून मांजरासारखे खालून जायचे

एक्चुअली एक व्यक्ति संशयित रुग्ण मिळाला, पण तो इथे दोन तीन महीने आलेलाच नाही, पण शंका नको म्हणून सरकारने सील केली

वांद्रे गर्दी प्रकरण: उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे पोलिसांच्या ताब्यात
वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दी जमवण्यासाठी आवाहन करणाऱ्या विनय दुबे याला ऐरोली येथून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले

https://www.loksatta.com/mumbai-news/uttar-bhartiy-sanghatna-president-v...

ये तो दुबे निकला

Pages