Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36
आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद
खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के
बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर
जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद
उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह
अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>आता सरकार जे प्रयत्न करत
>>आता सरकार जे प्रयत्न करत आहे त्याला बैल गेला आणि झोपा केला असे च म्हणावे लागेल.>>>> बेजबाबदार विधान
मला श्री उद्धव ठाकरे यांची
मला श्री उद्धव ठाकरे यांची टीव्हीवर संदेश देण्याची आणि आवाहन पद्धत आवडली. समोरच्याशी थेट बोलताहेत असे वाटते. आवेश नाही, आवाजात कृत्रिम चढउतार नाहीत, उपदेश आणि पेट्रनाय्झिंगचा डोस नाही. उंच पट्टीत बोलणे नाही. >>>> सहमत.
आणि तरीही आज दादर, ठाणे मधील लोकांनी भाजी बाजारात उडवलेली झुंबड पाहून धाबे दणाणले.
कसं समजणार / समजावणार या लोकांना?
मला काल डॉक्टरांकडे जायचे होते काही कारणास, सकाळी गेलो तेव्हा वाटेत लागलेल्या तिन्ही सुपरमार्केट मध्ये चांगलीच गर्दी दिसली. भाजी आणायला जाणे कमी करता यावे म्हणुन मला उसळीसाठी मटकी, मूग वगैरे घ्यायचे होते.बाहेरूनच गर्दी पाहून मी थांबलो नाही. दुपारी जेवल्यावर गेलो गर्दी कमी असते त्यावेळी म्हणून. गर्दी अजिबातच नव्हती. पण सुपरमार्केट लुटून नेल्यासारखे रिकामे झाले होते, ते दारातून आत जाताच दिसले. पुन्हा दारातूनच परतलो.
मानव अहो अफवा पसरली आहे की
मानव अहो अफवा पसरली आहे की खाद्यसामुग्रीची दुकानं पण बंद होणार आहेत. लोक पॅनिक होऊन साठेबाजी करत सुटलेत. सगळीकडे असेच चित्र आहे.
https://twitter.com
https://twitter.com/MumbaiPolice/status/1242129489179504642
इथे संचारबंदी बद्दलच्या सगळ्या सूचना आहेत.
लोक अफवा पसरवत आहेत त्या योग्य त्या संस्थांच्या ध्यानी आणून द्या.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1242292061925076997
लोकांना भीती आहे.की वाहतूक
लोकांना भीती आहे.की वाहतूक बंद, वेगवेगळ्या शहरातून येणारे दूध-भाजी बंद इत्यादी इत्यादी.करोना चे काही दिवस झालेले असतानाच अमूल चे 6 महिने फ्रीज बाहेर टिकणारे टेट्रा पॅक सुपरडेली वरून गायब झाले.हॉटेल्स बंद, स्विगी झोमॅटो रिस्क, लॉक डाउन झाला तर बाहेर जायला बंदी अश्या अवस्थेत लोक असुरक्षित वाटून भरपूर साठा करत आहेत.आणि या सगळ्यात परत एक्सपोझ होत आहे व्हायरस ला.
साठा केला तरी 1 महिना घरात बसून निभावता येईल इतकाच करावा प्रत्येकाने, सगळ्यांनी बाजार रिकामे करून घरं भरली तर काही लोकांना बेसिक खाण्यापुरतेही रेशन बाकी उरणार नाही.
यावर थोडे व्हॉटसप युनिव्हर्सिटी प्रबोधन होण्याची गरज आहे.
इतक्या पोस्ट(ते ग्रह तारे अमावस्या वगैरे) फिरतात तश्या काही उपयोगी पोस्ट फिरवता येतील.
काल ग्रुपवर एका मैत्रिणीने करोना लागण झालेल्या 41 वर्षीय महिलेचे नाव गाव आणि पूर्ण पेशंट हिस्टरी पाठवली होती.तिला हा भारतीय दंड विधाना नुसार गुन्हा आहे असं सांगितलं.तिने परत पाठवणार नाही पुढे म्हणाली आहे.
41 वर्षीय महिलेचे नाव गाव आणि
41 वर्षीय महिलेचे नाव गाव आणि पूर्ण पेशंट हिस्टरी
>>>>
मी सुद्धा वाचली ती पोस्ट. अगदीच अनावश्यक वाटली.
पण सुपरमार्केट लुटून
पण सुपरमार्केट लुटून नेल्यासारखे रिकामे झाले होते, >>>>> हे तुम्ही कालचे म्हणत आहात.मी १६-ते १८ यामधील एके दिवशी सहकारी भांडारमधे आशीर्वाद आट्यासाठी गेले होते तर नुकत्या आलेल्या तूरडाळीखेरीज (चणाडाळ वगळता) धान्य नव्हते.अगदी तेल्,साबणपावडर,पोहे,रवा,कांदे,बटाटे काहीही नव्हते.माझा नवरा म्हणत होता की एकाने तर २ -३ महिने पुरतील इतकी बिस्कीटे घेतली म्हणून.अतिशयोक्तीचा भाग वगळूनही लोक जाम खरेदी करत होते तांदूळ वगैरे.
माझे आटा आटा ऐकून एक बाई म्हणाली की आहे ना आटा! बघते तरकोणीतरी कार्टमधे आट्याच्या १-१ किलोच्या २ बॅग्ज ठेवल्या होत्या.संत्री वगैरेही होती.म्हटले नाही हो कोणाचे तरी असेल सामान्,तर म्हणे अर्ध्या तासापासून कोणी फिरकले नाही तिथे.नवरा नको म्हणत होता,पण मी मग त्या बॅग्ज उचलल्या. परत द्यायची तयारी ठेऊनही कोणी तिथे न आल्याने मग मात्र मी घरी आणल्या.
अगदी २१ तारखेला संध्याकाळी सुपरडेलीवर २ किलो आट्याचा पॅक होता.नंतर मागवूया म्हटले तर शिल्लक नाही.
दूधाच्या बॅगशिवाय तिथे काही शिल्लक नाही.
देवकी, अगदी असंच घडलं
देवकी, अगदी असंच घडलं माझ्याबाबतीत. रविवारी जनता कर्फ्यू मुळे बाहेर पडले नाही म्हणून सोमवारी गव्हाचे पीठ आणायला दाही दिशा फिरत होते. सगळीकडे 'संपलं' हे उत्तर. मग पूर्वीचे दिवस आठवून गहूच विकत घेतले आणि गिरणीत गेले. तर तिथे भलीमोठी पिशव्यांची रांग. तरीही नेटानं तिथे गहू ठेवून वळले तोच बातमी ऐकली की संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मग नंतर गिरण उघडी असेल पण जाणार कसं, या विचाराने गहू परत घेतले. गिरणीवाल्याच्या चेहर्यावर काही भाव असतीलच पण तिकडे दुर्लक्ष केले. पुन्हा एक छोटं किरकोळ सामानाचं दुकान गाठलं. तिथे एक किलो पिठाच्या तीन पिशव्या होत्या त्या पटकन ताब्यात घेऊन हुश्श केले. (अति लांब प्रतिसाद दिला कारण सोमवारी घरी आल्यावर कुणीही माझी ही कहाणी ऐकून घेतली नाही) :फिदी
बापरे या रेटने करोना जाऊ दे
बापरे या रेटने करोना जाऊ दे लोक उपासमारीने मरतील किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतील.आणि 21 दिवसांनंतर परिस्थिती सुधारली नाही तर काय??
For those currently in Pune,
For those currently in Pune, in case there is an emergency n u wish to step out n drive, please take approval of Pune Police on Whatsapp.
In order to request for any other exception, please WhatsApp the following information to us on 8975953100 / 8975283100
Name:
Mobile No.:
Reason for travel:
From:
To:
Vehicle No.:
Vit. D3 च्या गोळ्यांचा
Vit. D3 च्या गोळ्यांचा स्टॉक करून ठेवा. सूर्यप्रकाश मिळणार नाही अजून २१ दिवस, कामावर जायला हाडे टिकली पाहिजे ना?
(No subject)
..
आज बातम्यांमध्ये दाखवले की
आज बातम्यांमध्ये दाखवले की डोंगरी परीसरात बिन्धस्त लोकं फिरत होते. ईतर ठिकाणी बांबूचे फटके देणारया पोलिसांचे ईथे काही चालत नाही. अश्या भागात मिलेट्री घुसवायला हवी. पण हे थांबवायला हवे.
There might finally be an
There might finally be an explanation for why India and Africa haven’t had much cases yet. Looks like all the malaria infected countries have herd immunity and hence fatality rates are lower. This is probably also the reason why chloroquine is working as a treatment. Check out the world infliction maps below for malaria and COVID - mirror image!!!!
हा वरचा नकाशा आताच मघाशी एका
हा वरचा नकाशा आताच मघाशी एका ग्रुप वर पाहिला. इंटरेस्टिंग आहे हे.
थोडक्यात, फर्स्ट वर्ल्ड ला
थोडक्यात, फर्स्ट वर्ल्ड ला झटका आहे सगळा कोविड चा
हे अजून एक फोरवर्ड आलेय. कुणी लिहिलंय याचा शोध घेता "पत्रकार अरूण दीक्षित.खोपोली. २५/३/२०२०" ह्या नावाने खालील ब्लॉगवर सापडले रोचक थियरी आहे:
चीनचे सर्वांत मोठे नाटक
मलाही आलाय हा नाटकवाला
मलाही आलाय हा नाटकवाला फॉरवर्ड. माझा चीनवरचा संशय दृढ होत आहे की त्यांनी पद्धतशीर कारस्थान केले आहे.
अतिशय बिनडोक फॉरवर्ड आहे.
अतिशय बिनडोक फॉरवर्ड आहे. नेन्सी पेलोसी वगैरे काहीही लिहिलंय.
Hopefully इथे जोक चालेल!
Hopefully इथे जोक चालेल!
Racist americans frustrated
India-haters frustrated because india isn't worst performer (yet)

Meanwhile : locked down indians-
हे अजून एक फोरवर्ड आलेय. कुणी
हे अजून एक फोरवर्ड आलेय. कुणी लिहिलंय याचा शोध घेता "पत्रकार अरूण दीक्षित.खोपोली. २५/३/२०२०" ह्या नावाने खालील ब्लॉगवर सापडले रोचक थियरी आहे:
चीनचे सर्वांत मोठे नाटक
Submitted by atuldpatil on 25 March, 2020 - 23:57
>> मला पण आलंय. कितपत तथ्य असेल त्यात??
अमेरीकेने चीनवर तीन ट्रिलियन
अमेरीकेने चीनवर तीन ट्रिलियन की काही डॉलर्सचा दावाही केलय की हे त्यांचे जैविक शस्त्र होते वगैरे... कल बातम्यात पाहिले.
तर मग आणखी एका जैविक
तर मग आणखी एका जैविक हल्ल्यासाठी तयार राहिले.पाहिजे यावेळी तो अमेरिकेकडून चीनवर होईल
यावेळी तो अमेरिकेकडून चीनवर
यावेळी तो अमेरिकेकडून चीनवर होईल
>>>>
हिच भिती वाटते. जर या कोरोना लाटेनंतर अमेरीका आर्थिक महासत्ता म्हणून कोलमडली तर ते मग ईतरांनाही दणका द्यायला बघणार असे वाटते. असे काही होऊ नये. चीनचेही यात काही कारस्थान असू नये. कोणाचा गैरसमजही होऊ नये कोणीही अविचाराने वागू नये...
आपण चिनचे मित्र
आपण चिनचे मित्र
झोपालयावर्ती झुलायचे
*उद्धव ठाकरे यांना अनावृत्त
*उद्धव ठाकरे यांना अनावृत्त पत्र....*
*दीपक मोहिते*
*मा.उद्धवजी,*
*मी गेली ४० वर्षे महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणाचा फार जवळून अभ्यास केला व आजही या क्षेत्रात वॉचडॉग म्हणून सक्रिय आहे.कै.यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,शंकरराव चव्हाण,बाबासाहेब भोसले,शरद पवार,सुधाकर नाईक,सुशीलकुमार शिंदे,मनोहर जोशी,नारायण राणे,विलासराव देशमुख,अशोकराव चव्हाण,देवेंद्र फडणवीस व आता आपण,असे जवळपास १२ ते १३ मुख्यमंत्र्याची कारकीर्द अगदी जवळून पाहिली.पत्रकार म्हणून जवळपास मी सर्वच पक्षांच्या कारभारावर खरपुस टीका टिप्पणी केली.त्यातून तुमची शिवसेनाही सुटली नाही*
*१९६० ते २०२० या पाच तपाच्या काळात महाराष्ट्राच्या वाटचालीत झालेले राजकीय चढउतार,पळवापळवी,अशी ही बनवाबनवी,तर अनुभवलीच,पण राज्यावर आलेली संकटे ( दुष्काळ,१९७० च्या दशकात निर्माण झालेली भीषण अन्नधान्याची टंचाई,१९८४ साली झालेला गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप गँगवॉर,बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत झालेले बाँबस्फोट,मुंबई शहरावर झालेला दहशतवादी हल्ला,*
*शेतकऱ्यांच्या आत्महत्या,कुपोषित बालकांचे मृत्यू,इ.चा या संकटाच्या यादीत समावेश आहे.) मी खूप जवळून पाहिली.ही सर्व परिस्थिती हाताळताना त्यावेळी असलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांची कामाच्या* *शैलीचा मी साक्षीदार आहे.मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सिनेनिर्माते रामगोपाल वर्मा यांच्यासमवेत हॉटेल ताजला भेट देणे,रामगोपाल वर्मा यांना म्हणे त्याघटनेवर सिनेमा काढायाचा होता,अशी त्यावेळी चर्चा होत होती.त्यानंतर सर्वत्र गदारोळ उठला,त्याचवेळी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी परिस्थितीचे भान न राखता केलेले वक्तव्य,( बडे बडे शहरोमे,ऐसी छोटी छोटी वारदाते होती रहती है...) या दोघांना सत्तेतून पायउतार होण्यास कारणीभूत ठरले.महाराष्ट्राच्या राजकारणात अशी एक न अनेक उदाहरणे देता येतील.परिस्थितीचे भान व* *समयसूचकता,या दोन बाबीना राजकारणात अनन्यसाधारण महत्व असते.या दोन्ही बाबी राज्याचे नेते शरद पवार यांच्या ठायी ठायी भरली आहेत.हा उल्लेख येथे करण्याचे कारण असे की गेले १५ दिवस कोरोना या संकटाला सामोरे जाताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी,आपण संयम,पारदर्शकता व समंजसपणाने परिस्थिती हाताळत आहात,त्यास माझा सलाम,गेली ५ वर्षे हतबल नेता म्हणून जी प्रतिमा तुमची निर्माण झाली होती,त्यास छेद देत तुम्ही महाराष्ट्रातील जनतेत एक विश्वास निर्माण केलात.मी व माझे सरकार तुमच्या पाठीशी आहे,व ही लढाई आपण तुमच्या मदतीनेच जिंकणार आहोत,हे सांगताना कुठेही,तुमच्या बोलण्यात दर्प,अहंकार आणि मी,हे तीन शब्द जाणवले नाहीत,राज्याला खऱ्या अर्थाने एक रयतेचा मुख्यमंत्री मिळाल्याचे आम्हाला समाधान आहे.लोकांच्या मनात जेंव्हा एखादा लोकप्रतिनिधी स्थान मिळवतो,तोच राज्याचा गाडा यशस्वीरीत्या हाकू शकतो.*
*या संकटातून आपण सारे नक्कीच बाहेर पडू यात तिळमात्र शंका नाही,पण आम्हाला,एक सुशिक्षित,संयमी व आमचा वाटणारा मुख्यमंत्री मिळाला,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.*
*आज अत्यंत कठीण परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारं नेतृत्व म्हणून तुम्ही नावारूपाला आला आहात.त्यामुळे "मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन" अशी बेंबीच्या देठापासून कोकलण्याची पाळी तुमच्यावर नक्कीच येणार नाही..*
*कठीण काळात तुमच्यासारखं अत्यंत विचारी नेतृत्त्व लाभणं,हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावे लागेल.*
{{{ मुंबईवर झालेल्या
{{{ मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सिनेनिर्माते रामगोपाल वर्मा यांच्यासमवेत हॉटेल ताजला भेट देणे,रामगोपाल वर्मा यांना म्हणे त्याघटनेवर सिनेमा काढायाचा होता,अशी त्यावेळी चर्चा होत होती.त्यानंतर सर्वत्र गदारोळ उठला }}}
सिनेमा सिरियसली अतिशय चांगला होता -
https://en.wikipedia.org/wiki/The_Attacks_of_26/11
https://www.imdb.com/title/tt2635622/
आपण चिनचे मित्र
आपण चिनचे मित्र
झोपालयावर्ती झुलायचे
Submitted by BLACKCAT on 26 March, 2020 - 13:54 >>
Taqiyyaa नावाचा एक concept असतो...तो याच प्रकारात मोडतो.
त्यामुळे "मी पुन्हा येईन,मी
त्यामुळे "मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन" अशी बेंबीच्या देठापासून कोकलण्याची पाळी तुमच्यावर नक्कीच येणार नाही..*>>>>>>>
मी काम केले असेल तरच मला पुन्हा निवडून आणा...असे सांगणारे दुर्मिळच.
मला तरी चांगले वाटायचे फडणवीस
मला तरी चांगले वाटायचे फडणवीस. सुशिक्षित सुसंस्कृत नक्कीच होते. फक्त संपुर्ण रिमोट त्यांच्या हाती नव्हता. सध्याच्या स्थितीत ते असते तर आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य दिल्लीहूनच ठरले असते असे वाटते. असो, माझे तोडकेमोडके नॉलेज. राजकारण हा माझा प्रांत नाही. सध्या जे जिथे आहेत त्यांना सपोर्ट करणे गरजेचे. राज्य आणि केंद्र सरकार जोडले तर सेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्वच पक्षांचे सरकार आपल्याला लाभले आहे हे चांगलेच आहे असे समजूया.
Pages