कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील महानगरे ३१ मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36

आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद

खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के

बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह

अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जनता कर्फ्यूचा धागा रविवारपुरता आहे. सर्वांना त्याबद्दल माहिती द्यायला आणि एकजुट करायला.
हा धागा आता बंद महाराष्ट्राचा आढावा घ्यायला. एक येत चर्चा करायला. अपडेट्स शेअर करायला. योग्य ते हेडरमध्येही अपडेट करता येईल. डॉक्टरांचा धागा करोनाविषयक आहेच. सगळे एकाच धाग्यात चर्चा केली तर फार गोंधळ होईल.

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह
>><<

अफवा पसरवणे फौजदारी गुन्हा आहे बरे.
अजून सरकारने याबाबत कोणतेही अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलेले नाही.

ऋन्मेषचं wfh छान सुरु आहे.

त्याने लिहिलेली बातमी खरी आहे, मीपण tv वर बघितली news. मुख्यमंत्री स्वत: सांगत होते.

रिक्षापण बंद हे मात्र मला समजलं नाही. परत नीट बघेन.

मुंबई MMRDA रीजन त्यात आमची कल्याण डोंबिवली महानगरपालिकापण येते. नवी मुंबई पण बहुतेक. इथेही लागू वरचं, जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व बंद.

पहिली ते आठवी परीक्षा रद्द केल्यात असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावीचे दोन पेपर ठरल्याप्रमाणे होतील. नववी आणि अकरावीची परीक्षा नंतर होईल.

करोना फैलावण्याला जबाबदार आहे ती मुंबईची लोकल ट्रेन सेवा. ही सेवा सर्वात आधी बंद करायला हवी.
रिक्षा बंद करुन काय फायदा ?

करोना फैलावण्याला जबाबदार आहे ती मुंबईची लोकल ट्रेन सेवा. ही सेवा सर्वात आधी बंद करायला हवी.
रिक्षा बंद करुन काय फायदा ?
>>>>>

लोकल ट्रेनमध्ये गर्दी तेव्हाच होणार जेव्हा लोकं कामावर जाणार. तेच बंद केले तर आपसूक गर्दी आटोक्यात.
मुख्यमंत्री म्हणाले तसे जर लोकल ट्रेनच बंद केली तर अत्यावश्यक सेवा देणारेही घरीच अडकतील आणि सारेच कोलमडेल. मला पटले हे.

रिक्षाबद्दल त्यांनी उल्लेख केला नाही. ही बातमी मला ओळखीच्या रिक्षावाल्याकडून आली. तरी मी कन्फर्म करतो. होताच खरे खोटे हेडरमध्ये अपडेट करता येईल. त्याचसाठी हा धागा आहे.
माझ्यामते लोकं कामावर जाणार नसतील तर बस ट्रेन पुरेशी आहे. लोकांना फिरायला का उगाच रिक्षाची सोय द्या. फक्त रिक्षावाल्यांच्या पोटापाण्याचे काय हा प्रश्न राहील. तो तसाही बरेच जणांना भेडसावणारच.

भाग्यश्री वफ्रॉहोचा धागा बघा. मलाही ते आले आहे. आणि घरकाम म्हणाल तर पोरांना भरवण्यापासून आंघोळ असो वा सू शी साफ करणे असो, घरी असतानाची ही माझी रोजची कामे आहेत. आता या शहरात सर्वात जास्त अवघड स्थिती माझीच होणार आहे. Sad

असो, उद्यापासूनच्या बंदला सज्ज झालो आहे. आज संध्याकाळी बरीच महत्वाची कामे ऊरकली. घरासमोरच एक वाणी आणि एक सुपरमार्केट आणि तीन मेडीकल आहेत. हे सारेच चालू राहणार आहेत त्यामुळे बरीचशी चिंता मिटलीय.
फास्ट फूड आणि स्नॅक्स कॉर्नरही तीनचार आहेत. आईसक्रीमवाला एक आहे. ते सुद्धा जीवनाव्श्यक सेवाअंतर्गत उघडे रहतात की बंद होतात हे आता ऊद्याच समजेल.

मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंद !

उत्तम निर्णय, वेळीच घेतला

मला वाटले होते आज माबोवर पुर येईल प्रतीसादांचा.
पण इथेही आज "जनता कर्फ्यू"

रच्याकने आज घराजवळ पुर्ण शांतता आहे. रस्तेही ओस.
एवढ्या शांततेची सवय नाही राहीली. हिल स्टेशन चा फिल येतो आहे.

आज उद्धव ठाकरे महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे अशी न्यूज येतेय.

लॉकडाऊन म्हणजे काय आता आणखी?

फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल, दवाखाने उघडी राहणार आणि सार्वजनिक वाहतूक बंद असा अर्थ असावा.

थाळ्या टाळ्या शंखनाद... उत्स्फुर्त प्रतिसाद.. वेगळाच माहौल अनुभवला आज.. गेले काही दिव्स घरातच कोंडले गेलेल्या पोरांनी आज बाल्कनीतना का होईना फार एंजॉय केले. मला वाटते हे रोज व्हायला हवे जो पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. फक्त काही लोकं मुर्खासारखे रस्त्यावर ऊतरलेले ते टाळायला हवे..

मला वाटते हे रोज व्हायला हवे जो पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. फक्त काही लोकं मुर्खासारखे रस्त्यावर ऊतरलेले ते टाळायला हवे..+111

महाराष्ट्र लॉकडाऊन : काय सुरु राहणार आणि काय बंद?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. म्हणजे 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

काय बंद असेल?
● परदेशातून येणारी वाहतूक बंद.
● मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद.
● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं बंद.
● अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद.
● शाळा, महाविद्यालयं बंद.
● मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद.
● मोठ्या प्रमाणावर कार्यालयं बंद. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सेवा पुरवण्यात याव्यात.
● शासकीय कार्यालयांमध्य फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती.

काय सुरु असेल?
● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु.
● धान्य, किराणा मालाची दुकानं सुरु.
● भाजीपाला वाहतूक सुरु.
● औषधांची दुकानं सुरु.
● बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था सुरु.
● वीजपुरवठा कार्यालयं सुरु.

मुंबई मध्ये बॅंका मध्ये काम करणारे कर्मचारी घरून बँकेत कसे पोचणार?
पेट्रोल पंप चालू असणार का? स्वतःच्या वाहनाने ग्रोसरी ला / बँकेत जाणे चालणार असेल ना?

मला श्री उद्धव ठाकरे यांची टीव्हीवर संदेश देण्याची आणि आवाहन करण्याची पद्धत आवडली. समोरच्याशी थेट बोलताहेत असे वाटते. आवेश नाही, आवाजात कृत्रिम चढउतार नाहीत, उपदेश आणि पेट्रनाय्झिंगचा डोस नाही. उंच पट्टीत बोलणे नाही. खऱ्याखुऱ्या मुंबई टोनमध्ये ते बोलतात. श्रोते आणि वक्ता यात समपातळी साधल्यासारखे वाटते. कित्येक नेते मैदानावर बोलावे तसेच टीव्हीवर बोलतात. उद्धवजींच्या टीवी अपीअरन्स मध्ये साधेपणा आणि कपड्यांमधे सुटसुटीतपणा दिसतो. टिपिकल मुंबईपणा! थोडक्यात आम्हां मुंबईकरांना हा 'आपला माणूस ' वाटतो.

हीरा+१.

थोडक्यात आम्हां मुंबईकरांना हा 'आपला माणूस ' वाटतो.>>> ज्यांच्यात थोडाबहुत सेन्स शिल्लक आहे अशा सगळ्यांनाच यांचं कौतुक आहे आणि आदर दुणावला आहे.

Pages