Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36
आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद
खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के
बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर
जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद
उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह
अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नोटबंदी सारखे जनतेचे हाल होऊ
नोटबंदी सारखे जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून, रविवार चा जनता कर्फ्यू लावण्याचं आवाहन केले गेले तेव्हाच " गरज पडल्यास संपूर्ण देश पुढील काही दिवस लॉकडाऊन करावा लागू शकेल" असा सुचनावजा इशारा दिला असता तर लोक आपापल्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले असते.
अगदी बरोबर. पण असे ही वाटते की लोक सुरक्षित ठिकाणी पोचण्यासाठी खूप सारी mass movement झाली असती आणि त्यातच संसर्ग अजून पसरला असता. सरकार ला लोकांनी आहे तिथेच काही दिवस थांबा असेच सुचवायचे होते.
पण आता लोक पॅनिक होऊन मिळेल
पण आता लोक पॅनिक होऊन मिळेल तसं चोरुन लपून अत्यंत असुरक्षित ( स्वत: व इतरांसाठी देखील) रितीने प्रवास करत आहेत.
या गरीब लोकांचा नाईलाज आहे.
या गरीब लोकांचा नाईलाज आहे. त्यांची कामं संपली आहेत. त्यांच्याकडे आपल्यासारखा पैशांचा आणि सामग्रीचा साठा नसतो. हातावर पैकी असतं.
त्यांच्यासमोर येणारं शासनयंत्रणेचं रूप पोलिसांचं आहे.
ते काय करताहेत?
https://www.telegraphindia.com/india/coronavirus-lockdown-frog-insult-on...
तेच परदेशातून परतणारे लोक का कितीतरी अधिक हाय रिस्क होते. त्यांना या आजाराबद्दल आणि काय करावे , करू नये याबद्दल अधिक माहिती होती.
त्यांनी लपवाछपवी करून, निष्काळजीपणा करून इथे रोग पसरवला.
आजाराला stigmatise करायला नको.
पण वागण्याला नक्कीच करायला हवं.
त्यांच्यासाठी आपण सोयी देऊ शकतो तर गरीब , निरपराध मजुरांसाठी ही द्यायलाच हव्यात.
कायद्याचा बडगा फक्त त्यांच्यावर पडतोय.
माझ्या मुलावर अशीच वेळ आली
माझ्या मुलावर अशीच वेळ आली होती.
दोनशेवर किलोमीटर मोटारसायकल प्रवास जाऊन येऊन करुन माझ्या घरच्यांनी त्याला सुखरूप घरी आणलं जनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी. वाहने मिळत नव्हती गावी यायला. आई-बाप बायको वाटेकडे डोळे लावून बसले असतील अशा लोकांची. पुर्वी गावोगावी धर्मशाळा तरी होत्या.
महाराष्ट्राच्या लेडी गागाची
महाराष्ट्राच्या लेडी गागाची मेरे रुह के परिंदे आणि तत्सम गाणी >>> मग आमच्या ताहीर शाह च्या 'आय टू आय' ला पण घ्या यात.
भरत यांचा शेवटचा (मागचा) प्रतिसाद एकदम पटला.
बस मधून आम्हाला म्हणजे
बस मधून आम्हाला म्हणजे डॉक्टरना अलाउ करत आहेत
पण पेशंट ला नाही
मग आम्ही औषध कुणाला द्यायचे ? भिंतिला?
भरत +1
भरत +1
औषध घ्यायचं स्वत:च्या टिंब
औषध घ्यायचं स्वत:च्या टिंब टिंब वर टोचून. रिकामा कंपौंडर भिंतीला टोची विंजेक्शन असे लोक निदान म्हणणार नाहीत तरी.
Submitted by भरत. on 27 March
Submitted by भरत. on 27 March, 2020 - 07:39
अजिबात हार्षं नाही. मी सुद्धा हेच मत मांडले काल / आज इतर ठिकाणी. या लोकांसाठी मैदाने / स्टेडियम वर तात्पुरते शेल्टर्स उभारायला हवे होते लॉकडाऊन करतानाच राज्य आणि केंद्र सरकारे यांनी सोबत असे शेल्टर्स उभारण्यात येतील, अन्न पुरवल्या जाईल अशी घोषणा करायला हवी होती.
सध्या सोसायटीमध्ये तीन केसेस
सध्या सोसायटीमध्ये तीन केसेस डोळ्यासमोर आहेत, ज्यामुळे इथे येऊन व्यक्त होणं आवश्यक वाटलं.
निदान मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून खाजगी / संगणक व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना wfh सक्तीचे करणे, सर्व शाळा- कॉलेज - विद्यापीठ स्तरावरील परीक्षा रद्द करून सुट्ट्या जाहीर करणे, कंत्राटी व रोजंदारीची सर्व कामे थांबवणे ह्या गोष्टी करता आल्या असत्या. ह्या सर्व उपायांसाठी कोरोना फैलावापासून सुरक्षा हे कारण देता येऊ शकले असते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आजच्या सारखी परिस्थिती गंभीर नव्हती. वाईट गोष्ट म्हणजे, २३ मार्च पर्यंत काही खाजगी कंपन्या सुरूच होत्या. त्यांच्यावर काहीच कारवाई केली गेली नाही. म्हणजे चित्र असं होतं की सरकारी नोकरांना घरी बसवलं आहे आणि क्युबिकल मध्ये बसून आय टी वाले काम करत आहेत. कोरोनाचा फैलाव कोठून जास्त होण्याची शक्यता होती, सरकारी ऑफिसातून की खाजगी/ आय टी कंपन्यांमधून?
वर उल्लेखिलेल्या केसेस म्हणजे, वॉकरच्या साहाय्याने जेमतेम चलनवलन करणारे आजी- आजोबा, नुकतीच मेजर सर्जरी झालेल्या साठीच्या काकू व काका आणि घरात तीन म्हातारी माणसे असणारे एक दाम्पत्य ज्या दादांची गेल्या वर्षी बायपास झाली आहे व वहिनींना पाठ व कमरेचं दुखणं आहे. वरील सर्वजण आर्थिक दृष्ट्या सधन असून घरात नर्स व कामासाठी बायका आहेत. परंतू रविवार पासून कोणीही फिरकत नाही. ह्या परिस्थितीत ईलाज नाही असं म्हणून कसं सोडून द्यायचं? त्यात कितीतरी शे किमी पायी जाणारी लोकं पाहिली आणि वाटलं, नक्कीच ही परिस्थिती टाळता आली असती.
मी नमोभक्त किंवा नमोद्वेश्टी दोन्हीही नाही परंतू एक मात्र नक्की की, महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण जास्त चांगल्या प्रकारे हाताळलं.
महाराष्ट्र सरकारने काय केले?
महाराष्ट्र सरकारने काय केले? अगोदर नागरिकांना फटाकवत होते आणि आता चोवीस तास मोकळीक दिली. त्यापेक्षा. युपीवाल्यांनी घरपोच सुविधा दिल्या.
तसं नागरिक रस्त्यावर येऊ नये यासाठी जागोजागी पोलिस चौकी नेमून खरंच योग्य कारण असेल तर एक प्रमाणपत्र किंवा परवाना देऊन लोकांना रस्त्यावर येऊ दिले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे होती. शरद पवारांचे मतदार उघड उघड नियम धाब्यावर बसवत आहेत. हे तोंडातून शब्द बाहेर काढायला तयार नाहीत.
कोणत्याही सरकारला (महाराष्ट्र
कोणत्याही सरकारला (महाराष्ट्र असो वा भारत वा अमेरिका/ जर्मनी) नीट माहितीच नाहीय की या साथीच्या रोगात कुठल्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील. त्यात WHO नेही परस्पर विधाने करून गोंधळ माजवायाला हातभार लावला.
अशी साथ प्रशासनाच्या सध्याच्या पिढीने ना कधी पाहिली होती ना त्याचा कधी अंदाज केला असेल
त्यात हा रोग अतिशय संसर्गजन्य आहे. त्यामुळे त्याला वेगळ्या उपायांची गरज आहे. मलेरिया/डेंग्यू सारखं नुसतं मच्छरांचा नायनाट केला नी रोग एका वर्षासाठी आटोक्यात आला असला काहिम्प्रकार नाही आणि त्यामुळेच जगभरची सरकारे नामोहरम झालीत.
राज्य सरकार वा केंद्र सरकार जी काही कामे करत आहेत ती सर्व रिअॅक्टीव्ह आहेत, त्यातही लोकांना आणखी दिलासा कसा मिळेल आणि रोगही आटोक्यात राहील याचा तोल त्यांना साधायला लागतोय, जी एक महाकठीण गोष्ट आहे कारण इथे सामना मच्छरांशी नाही तर निष्काळजी माणसांशी आहे.. आशा आहे की आता ही साथ आटोक्यात आली की जगभरची प्रशासने एकत्र येऊन अशा परिस्थितीत काय करायचे याची एस ओ पी बनवतील आणि पुन्हा कधी अशी साथ आली की proactive पद्धतीने कामे करतील.
https://www.thebetterindia
https://www.thebetterindia.com/221785/coronavirus-india-covid19-senior-c...
मी जे लिहिलंय ते आपल्या
मी जे लिहिलंय ते आपल्या एकंदरित समाजाबद्दल आहे. त्यात माझाही समावेश होतो.
पोलिसांनी कोंबडा करून चालायला लावलेल्या लोकांचे व्हिडियो पाहून "मला जोरात हसू आलं" असं शब्दांत लिहिताहेत लोक. (ट्विटरवर_
या लोकांना असंच बडवलं पाहिजे असं म्हणताहेत.
दिल्लीहून येणारे व्हिडियो पाहून पोटात खड्डा पडतोय.
हे जेव्हा संपेल तेव्हा समाज म्हणून आपल्यात काहीतरी बदल होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू व्हावी अशी इच्छा आहे.
होय. दिल्ली आपला जिव्हाळ्याचा
होय. दिल्ली आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. दिल्ली ची काळजी तुम्हाला केजरीवाल यांच्या पेक्षा जास्त आहे हे माबोकरांना ठावूक आहे.
>>या लोकांना असंच बडवलं
>>या लोकांना असंच बडवलं पाहिजे असं म्हणताहेत.<<
बडवण्या ऐवजी त्यांचा मगशॉट रेकॉर्डला ठेवावा आणि हातावर ठळक (न-पुसल्या जाणार्या शाईचे) शिक्के मारावेत. जेणेकरुन हे जेंव्हा करोनाच्या उपचाकरता येतील तेंव्हा त्यांच्या उपचाराची प्रायॉरिटी सगळ्यात खाली असेल...
ते कोंबडा करून चालायला लावलं
ते कोंबडा करून चालायला लावलं तो व्हिडिओ पहा अगोदर.
कोमबड़ा करून चालवले तर तो
कोमबड़ा करून चालवले तर तो रस्त्यावर जास्त वेळ राहिल
मोदीनच्या उद्देश्याचा मर्डर होईल ना ?
विदेशातून परतोनी आलेले आणि
विदेशातून परतोनी आलेले आणि हातावर शिक्के असलेले लोक इथे विमानांत आणि राजधानी एक्स्प्रे समध्ये सापडलेत. त्यांची नावं त्या लिस्टमध्ये कुठे टाकायची ? या पायी जाणार्या इमिग्रंट वर्कर्सच्या वर की खाली?
चांगली बातमी . उ.प्र सरकारने त्यांच्यासाठी बसेस ची सोय केली आहे.
https://twitter.com/scribe_prashant/status/1243759073532588034
विरोधकांना सरकारवर टिका
विरोधकांना सरकारवर टिका करायला,
प्रवासी कामगारांच्या निमित्ताने एक मुद्दा मिळाला होता. मात्र योगी आदित्यनाथ यांनी प्रवासी कामगारांची राहायची, खाण्याची व त्यांना गंतव्य ठिकाणी पोहचवायची सोय तातडीने केल्याने, हा मुद्दा देखील त्यांच्या हातून निघून गेला.
इथे विरोधक मानसिकतेतून बाहेर
इथे विरोधक मानसिकतेतून बाहेर या! कोणी विरोधक नाहीये.
महाराष्ट्रातही कमी प्रमाणात
महाराष्ट्रातही कमी प्रमाणात का होईना असे मजूर् पायी वाटचाल करत आहेत, दुधाच्या टँकरने जाताना पकडले गेले हे वाचून द काइट रनरमधला प्रसंग आठवला.
महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थानीही त्यांच्या निवास आणि निर्वाहाची व्यवस्था करायला हवी.
विजय आंग्रे...
विजय आंग्रे...
भरत वा तत्सम प्रवृत्तींना नेहेमी टीका करण्याचीच सवय लागलेली आहे. ते ज्या पक्षाला समर्थन देतात ते महाराष्ट्रातील सत्तेत भागीदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गरिबांचे जे काही दुःख आहे त्याबद्द्ल ते स्वतः समर्थन देत असणार्या पक्षाचे कान टोचतात असे समजून दुर्लक्ष करावे.
महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत
महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत फ्लोटिंग लोकसंख्या मोठी असते. मुंबईत तर कुटुंबाला मागे मुलुखात ठेवून एकेकटे शहरात राहाणारे फार मोठ्या संख्येने आहेत. ह्या सगळ्या ( म्हणजे कित्येक लाख) लोकांना जेवण आणि निवारा देणे हे एक जगड्व्याळ काम आहे. अनेकांनी मोफत किचन, मोफत थाळ्या असे उपक्रम सुरू केले आहेतच. शिवसेना आहे गुरुद्वारे आहेत, अंबाबाई आणि शिरडी संस्थान आहे. पण आकाशच फाटले तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार?
पण आकाशच फाटले तिथे ठिगळ कुठे
पण आकाशच फाटले तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार?
अगदी बरोबर. आणि हे सगळं आणखीन किती दिवस चालेल आणि ही सर्व सिस्टिमला किती दिवस पेलवेल हे काहीच सांगता नाही येत.
https://twitter.com
https://twitter.com/micnewdelhi/status/1243894953530527746
MAHA INFO CENTRE
@micnewdelhi
Your small contribution is also important to fight #CoronaVirus.
#ChiefMinistersReliefFundCOVID19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
*कोरोनाच्या संकटात मदतीसाठी
*कोरोनाच्या संकटात मदतीसाठी काँग्रेस पक्ष उतरला मैदानात.*
प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा ऑडीओ ब्रिजवरून, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्षांसह ५०० पदाधिकाऱ्यांशी संवाद.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरु करणार.
सोशल डिस्टन्शिंग, सरकारी सूचना पाळत गरजूंना सर्व प्रकारची मदत करण्याचे आवाहन.
*प्रत्येक जिल्ह्यात सेवादलाचे 50 प्रशिक्षित कार्यकर्ते तयार*
मुंबई, दि. २८ मार्च २०२०
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्यामुळे काँग्रेस पक्षही लोकांच्या मदतीसाठी सक्रीय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांना सर्व पातळ्यांवर लोकांना मदत करण्यासाठी पत्र पाठवून आवाहन केल्यानंतर आज त्यांनी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते, जिल्हाध्यक्ष, आमदार व पदाधिका-यांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. गरिब जनतेला, हातावर पोट असणा-या कामगारांना, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे.
थोरात म्हणाले, अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची काँग्रेसची परंपरा आहे. राज्याच्या. प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला मदत करण्यास काँग्रेस सेवादलातर्फे ५० प्रशिक्षित कार्यकर्ते तयार आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून १० हजार बाटल्या रक्त जमा करण्यात येत आहे. तसेच युवक काँग्रेस मार्फत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे गरजूंपर्यंत पोहोचवली पाहिजेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सोशल डिस्टन्शिंग आणि सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करत हे काम करावे. ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांच्या घरात अन्नधान्य शिल्लक नाही ज्यांना जेवणाची भ्रांत आहे अशा लोकांची संख्या मोठी आहे. आपल्या भागातील अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना घरपोच जेवण किंवा अन्नधान्य पोहोचविले पाहिजे. एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटात राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आमदार कुणाल पाटील आमदार झिशान सिद्दिकी यांनी अत्यंत चांगले काम केल्याचे सांगून प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, परिस्थिती गंभीर आहे अडचणींच्या काळात लोकांना मदत कशी करता येईल ते पहावे. जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून समन्वय ठेवावा. सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे. मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बांधकाम मजुरांना महामंडळामार्फत रो़ख रक्कम तात्काळ मिळवून देण्याबाबत प्रयत्न करावेत. गरिब लोकांचे हाल होत आहेत त्यांना मदत पोहोचवली पाहिजे, विविध सामाजिक संस्थांशी समन्वय साधून प्रभावीपणे मदतकार्य करावे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाचे हे संकट शतकातले सर्वात मोठे संकट आहे. विमानवाहतूक बंद करेपर्यंत १ जानेवारीपासून १२ लाखांपेक्षा जास्त प्रवासी परदेशातून आले आहेत. कोरोनाची लक्षणे १५ दिवस दिसत नसल्याने लोक क्वारंटाईन करून घेत नाहीत. आपल्या आसपास कोणी परदेशातून आलेले असल्याची माहीती असल्यास त्यांना डॉक्टरकडे नेऊन त्यांची तपासणी करावी. शहरातून शेकडोच्या संख्येने गावाकडे परत जाणाऱ्या मजुरांना त्रास सहन करावा लागतो आहे. मजूर वर्ग शहरांच्या बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करावी.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये फ्ल्यू ओपीडी सुरु करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार असून पुढचे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.
यावेळी सर्वच नेत्यांनी सरकारच्या सूचना व सोशल डिस्टन्शिंग पाळून प्रशासनाशी समन्वय ठेवून गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले.
श्रीनिवास बिक्कड
माध्यम समन्वयक
लोक मुर्ख आहेत. योगीच
लोक मुर्ख आहेत. योगीच रामराज्य सोडून का बरे दृष्ट केजरीवालच्या राज्यात नोकरी काम धंद्या ला जावे?
असे म्हणतात,
असे म्हणतात,
"एक बिहारी, सौ बिमारी". ही म्हण दिल्लीतील आनंद विहार बस स्टॅडवर युपी व बिहारी भैय्ये सत्य करून दाखवत आहेत.
दिल्ली सरकारने राहायची व जेवायची सोय करूनही हे बिंडोक भैय्ये 15000 च्या संख्येने जमा झाले आहेत.
एकीकडे सरकार करोनाची चेन तोडण्याकरता उपलब्ध सर्व उपाय करत आहे व इथे असंस्कृत जनता सरकारच्या प्रयत्नांना हरताळ फासत आहे.
एक बिहारी सौ पे भारी अशी म्हण
एक बिहारी सौ पे भारी अशी म्हण आहे.
Pages