दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

YouTube वरील पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आहेत. त्या शिवाय YouTube वरील " ईंडीया स्पिक्स डेली " चे संदिप देव !!

बातमीच्या मुळा मध्ये कोण आहे त्याचा उलगडा करण्यात मातब्बर !!

येस बँक चा मालक "राणा कपुर " ला मा मोदी सरकारने जाळ्यात कस पकडल त्याची कहाणी !

येस बँक गेले काही वर्षे डबघईला आलेली होती. रिझर्व बँकेने लाल झेंडा अगोदरच दाखवलेला असल्याने सरकारने येस बँकेला रिस्ट्रक्चर करण्याचा निर्णय घेतला. मुळ मालक "राणा कपुर " ला बदलुन नविन निवेशक बोलावले. दरम्यान येस बँक चा मालक "राणा कपुर " लंडनला पळुन गेला. दर वेळेला निवेशक येऊन सरकारच्या अटींची पुर्तता करुन वाटाघाटी सफल होत आहेत अस असताना निवेशक माघारी जात होते. तिन निवेशक परते गेल्यावर सरकारला ह्यात काही तरी गडबड असल्याचा संशय आला. तपास केल्यावर येस बँक चा मालक "राणा कपुर " ह्या निवेशकांना चिथवत असल्याच समोर आले. आपल्या मालकीची बँक हातची जाऊ द्यायची नसल्याने येस बँक चा मालक "राणा कपुर " काड्या घालण्याच काम करत होता.
लंडनला पळुन गेलेल्या राणा कपुरला भारतात आणुन बेड्या ठोकायच सरकारने ठरवल. त्या प्रमाणे मिडीया पासुन लपवुन " रेड कॉर्नर" नोटीस दिली गेली. सरकारने लंडन मध्ये असलेल्या "राणा कपुर " ला निरोप पाठवला की येस बँकेसाठी निवेशक तयार नाहीत त्यामुळे तुच येऊन आपली बँक सांभाळ ! राणा कपुर ला तेच पाहीजे होते.
त्या दरम्यान एस बि आय बँक ला येस बॅक २४०० कोटीत विकायचा निर्णय नक्की झाला. २०,०००कोटी पेक्षा जास्त अ‍ॅसेट्स असलेली बॅक कर्ज वसुल न झाल्याने डबघईला आलेली होती. एस बि आय बँक ला पुर्ण बँक फक्त २४०० कोटी मध्ये मिळाली.
राणा कपुर भारतात येऊन पोहोचला मग त्या वर कायद्याचे चक्र सुरु झाले. सरकारचे ध्येय लक्षात आल्याने रा णा कपुर परत लंडनला पळुन जाण्याच्या प्रयत्नात होता. पण सरकारने त्याच्या बंगल्याच्या सेक्युरीटीलाही स्पष्ट ताकिद दिलेली असल्याने तो पळुन जाऊ शकला नाही

https://www.youtube.com/watch?v=CaOtWUUjRBc

विवेक दिव्यकृती यांचा, अनुच्छेद ३७० आणि ३५-अ, ०३:२२:४० चा YouTube वरील अतिशय सुंदर video आहे. यामध्ये अगदी सुरुवातीपासून म्हणजे फाळणीच्या आधीपासून ते ३७० रद्द होईपर्यंत सर्वांगाने वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ३७० रद्द होण्याविरोधात न्यायालयात ज्या केसेस दाखल केल्या गेल्या आहेत त्यांच्यावरही न्यायालय काय करू शकते तेही भाष्य केले गेले आहे.
यात स्पष्टपणे सांगितले आहे कि कलम ३५-अ, कधीही संसदेच्या पटलासमोर मांडले गेले नाही, एव्हढेच नाही तर संविधानाच्या सर्व प्रतींमध्येही ३५-अ सापडत नाही. काही काही प्रतींमध्येच ३५-अ समाविष्ट केले गेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=TvXPVkw3E3w

सचिन पगारे ंजी चे आधुनिक चाणक्य या वयात ही राज्यसभेची एक जागा अडवायला "फारम" भरुन आले म्हणे.

येस बँक चा मालक "राणा कपुर " ला मा मोदी सरकारने जाळ्यात कस पकडल त्याची कहाणी !
युनिस, मोदीसरकारने हे अतिशय चुकीचं केलं. त्यालाही पळुन जायचा अधिकार दिला गेला पाहिजे.... विजय मल्ल्याला कसं जावु दिलं मग यानेच काय घोडं मारलं.

यावर उत्तर देताना शाह म्हणाले, ‘दिल्लीत ३६ तास हिंसाचार सुरु होता या काळात दिल्ली पोलिसांनी हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा माझ्या मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे मी तिथं उपस्थित असावं हे देखील आधीच ठरलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रम्प दिल्लीत होते तेव्हा मी तिथल्या कुठल्याही कार्यक्रमात उपस्थिती लावली नाही. त्यावेळी मी दिवसभर दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीच्या परिस्थितीबाबत चर्चा करीत होतो.”

“या काळात मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हिंसाचारग्रस्त भागांना भेटी देण्याची विनंती केली. मी स्वतः तिथं भेटी दिल्या नाहीत कारण माझ्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस यंत्रणा तिकडे वळवली जावी, असं मला वाटतं नव्हतं” असंही शाह यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, दिल्ली पोलीस हिंसाचारावेळी रस्त्यावर होते. त्यामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील आणि येत्या काळात त्याचा अहवाल देतील. या काळात दंगल इतर भागात भडकू न दिल्याबद्दल मी दिल्ली पोलिसांचे आभार मानतो, असे शाह यावेळी म्हणाले.

छान

आज शहांनी संसदेत बोंबलणाऱ्यां लडदुंना मस्त spanking केलंय.

-------------------------------
. ४% क्षेत्र,१३% लोकसंख्येपुरती हिंसा मर्यादित. २०० पैकी १२ पोलिस स्टेशनच्या हद्दीत दंगे, ३६ तासात दंगे आटोक्यात. मी ट्रम्पच्या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी गेलो जेव्हा कोणतीही घटना घडली नाही... मी काही ताजमहाल बघायला गेलो नाही. २४ तारखेला ट्रम्प दिल्लीत आले असताना मी सकाळ ते रात्र एकाही कार्यक्रमाला गेलो नाही. २५ तारखेला सर्व बैठका माझ्या अध्यक्षतेखाली झाली. अजित डोवलना मीच विनंती केली. वेळेवर पोलीस तसेच राखीव दलांना पाचारण केले नाही हा आरोप अमान्य. २७ तारखेपासून ७०० FIR दाखल केले आहेत. २६४७ लोकांना अटक केली गेली आहे. २५ हून जास्त कॉम्पुटरवर CCTV विश्लेषण होत आहे. जनतेने हजारोंच्या संख्येने लोकांनी व्हिडीओ पाठवले आहेत. अंकित शर्माच्या मृत्यूचे गूढ लोकांनी पाठवलेल्या व्हिडिओतूनच उलगडणार आहे. सरकारी डेटाच्या मदतीने सॉफ्टवेअरद्वारे चेहऱ्याची ओळख. ३०० हून अधिक लोक यूपीहून आले, हा व्यापक कटाचा भाग आहे. हवाला माध्यमातून पैसे आले. तीन फायनान्सरना अटक केली आहे. दंगा करणारे पळून जाऊ शकत नाहीत. १४ डिसेंबरला रामलीला मैदानावर रॅली. घरातून बाहेर निघा, नाही निघालात तर भेकड म्हणवाल. त्यांनतर शाहीन बाग बसली. १७ फेब्रुवारीला रस्त्यावर यायचे आवाहन केले गेले, २४ तारखेला दंगे झाले. वारीस खान पठाण १९ फेब्रुवारीला म्हणतो - जे मागून मिळत नाही ते हिसकावून घ्यावे लागते. आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी पडू. ६० सोशल मीडिया अकाउंट २२ तारखेला सुरू झाले, २६ तारखेला बंद झाले.

आणखी बरंच काही..
_--------+------

आजचा "जगात पहारा" मधील भाऊ तोरसेकरांचा लेख
हुकूमशाहीला आमंत्रण?

शाहीनबाग येथे देशातल्या कायदा अंमलबजावणीला पायदळी तुडवण्याला संविधान बचाव नाव दिले जाते आहे. अराजकाला कायद्याचे राज्य म्हटले जाते आहे. मुठभर बुद्धीमंत चिकित्सक वर्गाला त्यातून समाधान मिळत असेल. पण कोट्यवधी सामान्य जनता त्याला कंटाळलेली आहे आणि यापेक्षा हुकूमशाही लष्करशाही बरी असे तिला वाटू लागले तर नवल नाही. निर्भयाच्या न्यायाची विटंबना बघून लोकांना हैद्राबादची चकमक आकर्षक वाटली, तो भयंकर संकेत आहे. न्यायाधीशांना व अभिजनवर्गाला तो संकेत कळला नाही, तर ते हुकूमशाहीला आमंत्रण ठरू शकणार आहे.

इंग्रज किंवा चिनी असते तर शाहिनबागची जालियनवाला बाग झाली असती. महान भारतीय संस्कृतीचा अंत पाहून काय साधणार या मुर्खांना.

फूरोगामि कंपुच माबोवर पुनरागमन झालेले आहे. त्यांना ज्या धाग्याची भीती वाटत होती तो धागा मी वर आणत आहे. बघुया इथे दिल्ली दंगलींवर चर्चा करतात की नाही ते... धागालेखक तर एव्हढ्या मोठ्या शॉक मध्ये गेलेत की निवडणुकीनंतर इथे धाग्यात सोडा, माबोवरसूद्धा फिरकलेले नाहीत.

मग आता बिर्याणीचे दिवस सरले वाटते. आलात परत. करोना आणला नाही ना सोबत? सवंगडी वाळीत टाकतील करोनाग्रस्त समजल्यावर.

>>>>>>>>>> फूरोगामि कंपुच माबोवर पुनरागमन झालेले आहे. <<<<<<<<<<<<<

कुठे झाले आहे हे पुनरागमन ?

करोनामुळे रस्त्यावर सामसुम झालेली आहे. कोणाच लक्ष नाही अस पाहुन त्यावेळात मायबोलीवर लपत छपत याव लागलेल आहे !!

Biggrin

२०००

बघुया इथे दिल्ली दंगलींवर चर्चा करतात की नाही ते.
Submitted by मी-माझा on 26 March, 2020 - 10:59
>>>>>>>
पण या धाग्याचे शीर्षक तर "दिल्लि निवडणुक-२०२०" असे आहे ना

अगदी २०० टक्के अपेक्षित प्रतिसाद स्वप्नील भौ !.. मग धाग्याच्या विषयाशी समर्पक चर्चेला फुरोगामी येतील अशी भाबडी आशा तुमची असेल तर दिल्ली दंगलीवर एक धागा काढा पाहू....

धाग्याच्या नावावर काही नसतं. चर्चेची गाडी सुटली की आपोआप वेगवेगळ्या गावांना थांबत पुढे जात राहते. मध्ये फाटे फुटतात मग तिकडे जाते.

मग धाग्याच्या विषयाशी समर्पक चर्चेला फुरोगामी येतील अशी भाबडी आशा तुमची असेल तर दिल्ली दंगलीवर एक धागा काढा पाहू....
>>>>>>>>>
कोणी कोणती चर्चा करावी हे मी ठरवू शकत नाही, पण विषयाला धरून चर्चा व्हावी ही अपेक्षा करणे यात गैर काय?

__________________________________________________&

धाग्याच्या नावावर काही नसतं. चर्चेची गाडी सुटली की आपोआप वेगवेगळ्या गावांना थांबत पुढे जात राहते. मध्ये फाटे फुटतात मग तिकडे जाते.
>>>>>>>>
हो,आणि मग मायबोलीच्या सुजाण वापरकर्त्यांना ती गाडी रुळावर आणायला लागते

उचलून?
>>>>>>>>
योग्य दिशा दाखवून

बरं, आमची फुरोगाम्यांबरोबर दिल्ली दंगलीची चर्चा संपली की आम्ही नक्की धाग्याच्या विषयावर चर्चा करू... तोपर्यंत वाट बघुया, कुठला फुरोगामि इथे फिरकतोय का याची...

Pages