दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपल्या शेठजीनाच समभाळायची गरज आहे.

ओ साहेब, शेटजी इटलीला जात नाहीत. चिंता नसावी.

सारखे चीनला जातात की

अं हं, गफलत करताय कुठे चीन मधला वुहान नी कुठे इटली कुठली बरोबरी??????

>>>>>>भारताच्या भावी पंतप्रधानांना (श्री. राहुलजीगांधीजीं) नम्र विनंती. नुकत्याच वाचलेल्या एक वर्तमान पत्रात अस लिहीलय की वुहान नंतर इटली हे सर्वात कोरोना व्हायरसने पीडीत अथवा मृत्यु होणारे दुसरे ठिकाण आहे. त्यांनी तेथे जाण्याचे टाळावे. <<<<<
अन्यथा भारताच्या विनोदी विश्वात न भरुन येणारी पोकळी निर्माण होईल !

निवडणूक आली की मेरी जान को खतरा है,
दंगल पेटली की ताजमहाल बघायचे,
करोना आले तर उंडगणे बंद.

बाहुबली मध्ये कुमार वर्मा असतो , तो चकमक सुरू झाली की छपरावर चढून भाषण देत असतो

Proud

हैद्राबादच्या अखेरच्या नवाबाने चांगली थोबाडात हाणलीय सेक्युलर्सच्या. कोणाला व्हिडीओ मिळाला तर बघा. स्वतः मुस्लिम असुनही त्याने योग्य ते समजावले आहे.
नवीन Submitted by रश्मी.. on 9 March, 2020 - 16:31
>><<

तो हैद्राबादचा नवाब, सेक्युलर्सच्या दॄष्टीने आता RSS चा माणुस झाला असणार.
तर त्याचे म्हणणे कश्याला ऐकतील तथाकथित ढोंगी सेक्युलर्स !

काळ्या मांजरा,
तुझे कागद, तुला सापडले का ?

कारण कितीही नौटंकी, तुझ्या जिहादी जातभाईनी केली तरी कागद तर शेवटी दाखवावेच लागतील.

भारताच्या भावी पंतप्रधानांना (श्री. राहुलजीगांधीजीं) नम्र विनंती. नुकत्याच वाचलेल्या एक वर्तमान पत्रात अस लिहीलय की वुहान नंतर इटली हे सर्वात कोरोना व्हायरसने पीडीत अथवा मृत्यु होणारे दुसरे ठिकाण आहे. त्यांनी तेथे जाण्याचे टाळावे. >>>> ओ ते आधीच जाऊन आलेत. रांगेत उभे होते रेल्वेचे तिकीट काढायला. तिथे हाफ चड्डी घातली होती. त्यांना त्या हाफ चड्डीचे वावडे भारतातच असते.

https://www.youtube.com/watch?v=0cBWsA533I8>>>>> यातल्या कारखानीस काकु म्हणजे राहुलबाबा आहे. Laughing Happy Cat

उत्तर प्रदेशात दंगा करुन सार्वजनीक मालमत्तेच नुकसान करणार्या समाज कंटकांना हेरुन पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरु केली. त्या अंतर्गत केलेल्या नूकसानीची भरपाई दंगे करणार्यांकडुन करण्यासाठी जागोजागी त्यांचे होर्डींग लावण्यात आले होते.
लखनौ हाय कोर्टाने स्वःता लक्ष घालुन ह्या
होर्डींग म्हणजे दंगे खोरांच्या प्राईव्हसीवर अतिक्रमण आहे अस म्हणत सरकारला आदेश दिले की होर्डींग हटवावेत !
हाय कोर्ट आहे का तमाशा ?
https://youtu.be/znY1RbNRbmo

हाय कोर्ट आहे का तमाशा ?
>><<

ही न्यायालये सध्या, सरकारी कामकाजात फारच लूडबुड करु लागलीत. ज्या तीन करोड केसेस भारतीय न्यायालयात पेंडीग आहेत (संदर्भ, जॉली एलएलबी सिनेमा) त्याआधी क्लियर करा व मग नसत्या उचापत्या.

जो पर्यंत केस कोर्टाच्या समोर अधिकृतरित्या येत नाही तोपर्यंत कोर्टाने अश्या प्रकरणात लक्षच का घालावे ? आणि युपी सरकारने दंगा करणार्‍या जिहादींचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावले असेल, तर त्यांच्याकडे काहीतरी ठोस पुरावा असेलच.

Proud

नागरिक शास्त्र वाचलेले दिसत नाही.

हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टास एक्स्ट्रा पॉवर असतात , ते फक्त केसची सूनवाई करण्यास बसलेले नाहीत.

पेपरात आलेली बातमी किंवा निनावी पोस्टकार्ड ह्यावरही ते तपासणीचे आदेश देऊ शकतात.

>:>>>>>>>>>>>>युपी सरकारने दंगा करणार्‍या जिहादींचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावले असेल, तर त्यांच्याकडे काहीतरी ठोस पुरावा असेलच. <<<<<<<<<<
युपी सरकारने दंगा करणार्‍या जिहादींना रितसर कोर्टातुन समंस / नोटिसा पाठवलेले आहेत. पण ह्या नोटीसांची भिती ह्या मोठ्या धेंडांना नसतेच ! सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावले असल्या लोकांत बरीच मोठी धेंड आहेत ज्यात एक स्त्री काँग्रेसी नेता आहे जीची ओळख एन डी टी व्ही ने एक सामाजीक कार्यकर्ता व सिनेमा कलाकार अशी केलेली होती. त्याचीच लाईन कोर्टाने सुद्धा घेतलेली आहे.

आपल्या निवाड्यात कोर्ट म्हणते आहे की अश्या सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स मध्ये काही मोजक्या लोकांचेच फोटोच का लावले गेले ? ह्या न्यायाने लोन चे हप्ते न भरणार्या शेतकर्याचे फोटोही पेपरात नोटीस बोर्डवर लावायची पद्धत आहे. पण गरीब शेतकर्याची बाजु घ्यायला न्यायालयाला वेळ नाही , पण सार्वजनिक ठिकाणी दंगे करुन सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार्या मोठ्या नेत्यांसाठी स्व:ता लक्षघालण्या साठी वेळ आहे. ते सुद्धा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कोर्ट ह्या केसवर निकाल द्यायला बसले. निकालात कोर्ट पुढे म्हणते की कोणाचेही फोटो सार्वजनिक करणे चुकीचे आहे. असे करण्या पुर्वी सरकारने ह्या दंगे करणार्या लोकांची परमिशन घ्यायला पाहीजे होती. कमाल आहे !
कोर्ट पुढे म्हणते की ह्या केस मध्ये सरकारने कारवाई करताना अधिकाराचा चुकीचा वापर केलेला आहे. तात्पर्य हे की अश्या मोठ्या काँग्रेसी नेत्यांना शि क्षा देण्याचे कोणतेही अधिकार सरकारला नाहीत.

>>>लखनौ हाय कोर्टाने स्वःता लक्ष घालुन ह्या

नाही, लखनौ हायकोर्टानं असला अर्ज , दंगा-सपोर्टरांचा फेटाळून लावला होता मागे.
आत्ताची बाब अलाहाबाद हायकोर्ट च्या बाबतीत आहे; लखनौ हायकोर्टाचा मागचा अनुभव बघता दंगा-सपोर्टरांनी अलाहाबाद हाय्कोर्टात पिटिशन केलं होतं ...

हे फारच महान आहे..सगळ्या अतिरेक्यांचा उमाळा असलेल्या केसेस सुट्टीच्या दिवशी, विकेंडला, मध्यरात्री, भल्या पहाटे कशा काय चालतात कोर्टात?
इतर इतक्या केसेस चा बॅकलॉग असताना अतिरेक्यांच्या अर्जांवर कोर्ट अशा वेळेस का आणि कोण उघडतं?

>>>असे करण्या पुर्वी सरकारने ह्या दंगे करणार्या लोकांची परमिशन घ्यायला पाहीजे होती. कमाल आहे !

मस्त, उलटा चोर कोतवाल को डांटे. डेटा प्रोटेक्शन अ‍ॅक्ट?? वा वा वा

अतिरेक्यांना 'ह्युमनाइज' करण्याचे जे जीव ओतून प्रयत्न चालू आहेत ते बघून खरच किळस येतेय. हा काय हेडमास्ताराचा मुलगा, तो काय मॉडेल, ह्याला काय पबजी खेळायला आवडतं, त्याला काय सिनेमे बघायला आवडतात... वा वा वा

खरच कोर्टावर आता लोकांच प्रेशर आलच पाहीजे.
खास लोकांसाठी सुट्टीच्या दिवशी कोर्ट चालु ठेवणार्या जजवर शेमिंग करायला पाहीजे. त्यांची कसुन चौकशी व्हायला हवी.
जनतेला अश्या गोष्टी समोर दिसायला पाहीजेत म्हणजे जनमानसाचा दट्ट्या कोर्टावर येईल

उत्तर प्रदेश सरकार कायदा करून किंवा अध्यादेश आणून हे पुन्हा करू शकते.
कारण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे असतात त्यांच्याकडून ती वसुली केली जाणार असा कायदा आधीच तिथे आहे. त्यात सुधारणा करून सरकार असे नंतर करू शकते. मग त्या विरुद्ध या दंगलखोरांना खुप प्रयत्न करावे लागतील. आणि जर केंद्र सरकारने केला तर...

त्या न्यायाधीशाविरूध्द फतवा काढला पाहिजे. साले न्यायाधीश पगारी नोकर आहेत पण फारच माज दाखवतात. उद्या म्हणतील खिसेकापूंचे पोस्टर लावू नका.

मोदींना हिटलर म्हणून हिणवणारे त्यांनी हिटलर बनावेच म्हणून दंगे करत आहेत. एकदा का हिटलर ( मोदीजी किंवा इतर कुणी) तयार झाला की मग कळेल हिटलर कसा असतो ते.

अजित पवार प्रकरणात तोंड पोळलेले भाजप समर्थक सध्या तरी गृहीत धरत आहेत की भाजप सरकार एमपीत बनणार नाही!

अंबरीश फडणवीस यांचा जुना "फडणविशी" ब्लॉग गुगल ने काहीही न सांगता काढून टाकला, त्यामुळे असंख्य लेख नष्ट झाले. archives आणि cache मधून त्यांनी जे लेख वाचवू शकले, त्यांना या नवीन ब्लॉगवर टाकले आहे.
http://fadanvishi.blogspot.com

पाकिस्तान का मतलब क्या - या समस्येचे विश्लेषण
http://fadanvishi.blogspot.com/2017/05/blog-post.html
या लेखात खालील मुद्द्यांचा ऊहापोह आणि परामर्श केला आहे.

  • भारताचा भूगोल आणि त्याचा इतिहासावर झालेला परिणाम
  • या समस्येला ला मदत करणारे क्रिमिनल घटक
  • पाकिस्तान ची सांप्रत काळातील समस्या
  • इंग्लंड-रशिया ग्रेट गेम
  • दुष्टचक्र

हि ऐतिहासिक साखळी आहे. हि साखळी प्रत्येक भारतीयाचा आयुष्याच्या प्रत्येक भागास जवळून स्पर्श करते. यात क्रिमिनल नेटवर्क आले, भूराजकीय समीकरणे आलीत, तेलाचे राजकारण आले, वोट बँकेचे राजकारण आले, भारताची अंतर्गत हलाखी, सांस्कृतिक आणि राजकीय दिवाळखोरी आली, त्यातून उद्भवणारा भ्रष्टाचार आला. हे सगळे आतून जोडल्या गेले आहे. आणि या समस्येचे पूर्ण ज्ञान व्हायला या मोठ्या चित्राची जाणीव होते आवश्यक आहे.

ख्रिस्ती आणि मुस्लिमांमध्ये असलेला ज्यू विरोध - कारणे आणि इतिहास - २०११ मधील लेख
http://fadanvishi.blogspot.com/2017/05/blog-post_21.html
सध्याच्या जगात, इस्राईल हा भारताचा मित्र आहे. आणि ज्यू हे हिंदूंचे मित्र आहेत. जर इस्राईल नष्ट झाले अथवा ज्यू तिथून परत हाकलल्या गेले तर भारतावर पुन्हा बिकट परिस्थिती येईल.

नवा अफगाणिस्थान - भारतापुढील ऑप्शन - हे लफडं सफल होईल काय?
http://fadanvishi.blogspot.com/2017/05/blog-post_8.html
भारत मराठ्यांकडून शिकत नाही. स्वतःला इंग्रजांचा आणि मोगलांचा उत्तराधिकारी म्हणवतो पण इस्ट-इंडिया-कंपनी देखील अशीच वाढली, हे लक्षात घेत नाही. मोगल लुटीवर वाढले. पण मराठे आणि इंग्रज याच मिलिटरी-फायनान्स कॉम्लेक्स वर वाढले. भारताला वाढायचे असेल तर हि वृत्ती आणि हे स्वदेशी मिलिटरी-इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स निर्माण करून ते वाढवावे आणि जतन करावे लागेल.

नरसंहार - हिटलर, युरोपीय युद्धे आणि उपखंडातली परिस्थिती.
http://fadanvishi.blogspot.com/2017/05/blog-post_2.html
हे सगळे आसपास घडत असताना, गाफील राहणे नि "आम्ही पण हे करू शकतो" अशी विश्वासार्ह-धमकी देऊ न शकणारे राष्ट्र आणि समाज एकतर स्वायत्तता गमावतो किंवा नष्ट होतो. हि धमकी देता येणे आणि गरज पडल्यास ती खरी करून दाखवता येणे हि खरी ट्रिक आहे. ती जर जमली तर कमीतकमी बळी "घेऊन" मुद्दा सिद्ध करता येतो आणि शांती आणि स्वायत्तता अबाधित राखता येते. नाहीतर पुढे ते मोठ्या प्रमाणावर करावेच लागते.

पी.व्ही.नरसिंहराव - आधुनिक भारताचा राष्ट्रपिता
http://fadanvishi.blogspot.com/2017/05/blog-post_0.html
पी.व्ही.नरसिंह रावांना आज कॉंग्रेस मध्ये काहीही स्थान नाही. जग त्यांना विसरले आहे. भारत त्यांना विसरला आहे. अगदी जाणीवपूर्वक. पण, आधी म्हंटल्या प्रमाणे सर्वगुणदोषांसकट ते आजच्या भारताचे खरे राष्ट्रपिता आहेत. आजचा भारत रावांचा भारत आहे.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर - काही मते.
http://fadanvishi.blogspot.com/2017/05/blog-post_80.html
१८५७ चे स्वातंत्र्यसमर हे थोडक्यात मराठा मॉडेल पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न होता. ते मराठा मॉडेल जे महादजी शिंदेंनी १७८८ मध्ये अस्तित्वात आणले. तसे पाहिले तर मोगल बादशाही मराठ्यांवर १७३७ पासून कमीअधिक फरकाने विसंबून होती. पण १७८८ मध्ये ते ऑफिशियल झाले आणि मोगल बादशाह ला पेन्शन ठरली. थोडक्यात १८५७ चे इंग्रज-भारतीय युद्ध १८०२ पूर्व राजकीय समीकरण पुन्हा प्रचलित करायचा भारतीयांचा प्रयत्न होता.

याव्यतिरिक्त अजूनही बरेच काही लेख जुन्या ब्लॉगवर होते.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धावरील एका लेखात सदाशिवराव भाऊंचा मराठी मनाचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून वेध प्रयत्न केला होता. थोडक्यात सारांश असा कि मराठे उत्तरेकडे फार मोठा लवाजमा आणि बाजारबुगण्यांची फौज घेऊन निघाले होते. कदाचित उत्तरेत मराठी सेनेची आणि मराठी जनतेची एक नवीन वसाहत करण्याचा उद्देश होता. प्रत्येकवेळी महाराष्ट्रातून मोठी सेना दिल्लीच्या रक्षणासाठी पाठवणे खर्चिक आणि वेळेचा अपव्यय करणारे ठरले असते.
सदाशिवराव भाऊ शेवटपर्यंत अब्दाली तह करेल यावर विश्वास ठेऊन होते. कारण अब्दाली भारतातील उन्हाळ्याला मनस्वी घाबरत होता, आणि त्याला त्याआधी मोहीम उरकून लगोलग परत जायचे होते. परंतु परिस्थितीवर असणारी नजीबची पकड भाऊ समजू शकले नाही. तसेच अवध आणि बंगाल साफ न करता मराठे उत्तरेत गेले होते. मराठ्यांच्या धसमुसळ्या वर्तनाने, बऱ्याच सहयोगी साथीदारांना दुखावल्या गेले होते.

सच्चा, खूप खूप धन्यवाद, ते ही अगदी मनापासुन. ब्लॉग वाचत आहे. नरसिंहरावां बाबत सांगायचे झाले तर यांची उपेक्षा सोनिया गांधींनी प्रथम केली. कोणाचा विश्वास बसणार नाही पण एखाद्याच्या पत्रिकेत कर लग्नी प्रथम स्थानी शनी जर असेल तर अशी माणसे ( बायका सुद्धा ) अतीशय महत्वाकांक्षी व सत्तेची लालसा बाळगणार्‍या असतात. शनीमुळे पेशन्स येतो, पण अंगातली रग जात नाही. माझेच खरे अशा वृत्तीची असतात.

सोनिया गांधी यांचे कर्क लग्न व लग्नात शनी आहे. कॉम्ग्रेस आता पर्यंत तरली ती ज्येष्ठ व अनूभवी नेत्यांमुळे, बाळराजांमुळे नाही. आज ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडतायत त्याचे कारण हेच.

रश्मी.. जी खऱ्या धन्यवादास पात्र तर भाऊ तोरसेकर, अंबरीश फडणवीस, एस. एल. भैरप्पांची आवरण, आदित्य कोरडे ज्यांचे काश्मीरप्रश्नावरील लेख आहेत, Mediacrooks चे रविणार, आणि YouTube वरील पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आहेत. त्यांच्या मार्गदर्शक लेखांमुळे विचारांना दिशा मिळाली. बऱ्याच बाबतीत भारतीय मनांमध्ये ढोंगी पुरोगाम्यांमुळे जो न्यूनगंड जोपासला गेला होता, तो कमी होण्यास हातभार लाभला, आपल्या संस्कृतीविषयी अभिमान वृंधिंगत झाला.
मी तर फक्त त्यांचे लिखाण सादर करत आहे.

नरसिंहरावांसोबत जे घाणेरडे राजकारण सोनिया उदयानंतर झाले, अतिशय उबग आणणारे होते. त्यांच्या मृत्यूनंतरही, दिल्लीत त्यांच्या अंतिम क्रियेसाठी जागा नाकारण्यात आली. या माजी पंतप्रधानाच्या अंतिम यात्रेत काँग्रेसमधील मोठे नेते कोणीही नव्हते.

सच्चा,

खूप खूप धन्यवाद, ते ही अगदी मनापासुन. ब्लॉग वाचत आहे.

धन्यवाद !!

Pages