कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील महानगरे ३१ मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36

आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद

खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के

बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद

उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह

अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरेतर उद्धवजींंचे वडील स्व.बाळासाहेब ठाकरे अत्यंत थोर व्यक्तीमत्व असूनही उद्धवजींंनी कधीच "बडे बाप का बेटा" असल्याचा माज,गर्व,अहंकार,दर्प दाखवला नाही. किंबहुना ते स्वतःला सर्वसामान्य माणूस समजतात.
पूर्वीचे मुख्यमंत्री म्हणजे अहंकाराचे मूर्तीमंत रूप होते. वक्तृत्व शून्य.(आठवा:"मी पुन्हा येईन"च्या आरोळ्या)
अर्थात हेमावैम.
सूचना:यात पक्षविचार नाही फक्त व्यक्तीविचार आहे.

बाकी, पत्र खूप आवडले.

छट्. आज फडणवीस असते तर चित्र कितीतरी वेगळे असते. हे कुबड्या लावलेले ठाकरे म्हणजेच दात आणि नखं काढलेले वाघ आहेत. सोनियांना लिहून दिल्याने मुळचा बाणा आपोआप गुंडाळून माळ्यावर ठेवून दिला आहे. ज्या भुजबळनं यांची जिरवली होती त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली यांच्यावर. पत्रकार हे तोंडपुंजे असतात काही तरी फेवर मिळाला की तळी उचलून धरतात.

फडणवीसांच्या काळात करोनासारखे काही झाले असते ( अर्थात आता जे काही चाललय ती वेळ जगावर पुन्हा येऊ नये हीच माझीही इच्छा आहे) तरच त्यांची व ठाकरेंची तुलना होऊ शकली असती. आता यापुढे ठाकरे हमीभाव, आत्महत्या, घसरती भूजल पातळी, जातीयवाद याबाबत काय करतात ते पहा नी मगच तुलना करा.

मियां एकभी नही. तुम तो गाली खाकर भी नहीं सुधरे. तूम कभी नहीं सुदरेगा. गंदी सोच हे तेरी...

मोदी एकटे पुरेसे नाही का तुमची घरची परिस्थिती हाताळायला. अमित शहा कुठे आहेत हा लकडा लावला आहे तूम्ही.

कोरोनाला पकडून एका रूममध्ये बंद करून महाराष्ट्राच्या लेडी गागाची मेरे रुह के परिंदे आणि तत्सम गाणी ऐकायला व व्हिडियो बघायला लावले तर तो अजूनही गयावया करून माफी मागेल व पळून जाईल.
बहुधा फडणवीस हीच ट्रिक वापरत असल्याने 5 वर्षात महाराष्ट्रात कधी कोणि व्हायरस फिरकला नसावा.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1243162938124300288
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
"सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे."
मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

हे काय कळलं नाही. सध्या लोकांना सकाळी ८ ते १२ बाहेर पडण्याची परवानगी आहे. मग दुकानं २४ तास उघडी ठेवून काय फायदा? कर्फ्यू उठवला तरच लोक ह्या निर्णयाचा फायदा घेऊ शकतील. म्हणजे मूळ उद्देशालाच हरताळ फासायचा.

मुंबै पोलिसांनी ते ८ ते १२ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. मागच्या पानांवर तशी लिंक दिसली .तेव्हा मुंबैत तरी तसं नाही.
आपापल्या जिल्ह्याच्या पोलीसांचं twitter handle follow करा
आमच्या सोसायटीला जिल्हाधिकाऱ्यांकडून circular हस्ते परहस्ते आलंय.
रहिवाशांच्या गरजा इंटरकॉमवरून जाणून घ्यायच्या. एकाने जाऊन जवळच्या दुकानांत यादी द्यायची. सामानाची डिलीव्हरी गेटवर. तिथून सेक्यूरिटीकरवी घरोघरी. किंवा सभासदांनी गेटवरून गर्दी न करता घ्यायची

.

.

एक बातमी

___

महाराष्ट्राच्या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

ताजी बातमी: न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या ११,००० कैद्यांना महाराष्ट्र सरकार पॅरोल वर सोडणार - गृहमंत्र्यांनी केली घोषणा.

सर्वसामान्य परिस्थितीत असे निर्णय बरेचदा घेतले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेत सवलत, माफी देखील दिली जाते. त्याबद्दल तक्रार असण्याचे कारण नाही.

मात्र भारत देशच नव्हे तर संपूर्ण जग करोना व्हायरसच्या साथी मुळे भयंकर संकटात सापडलेले असताना आणि देशात लॉक डाऊन - संपूर्ण संचारबंदी लागू असताना महा विश्वासघातकी आघाडीच्या सरकारला असा अत्यंत बेजबाबदार, घातकी निर्णय घेण्याचे का सुचावे?

ते सर्वजण सुटका झाल्यावर अर्थातच आपापल्या घरी जातील. म्हणजेच त्या ११,००० कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेचा जीव करोना व्हायरसच्या प्रसारामुळे धोक्यात येईल ह्याची किंचितही जाणीव राज्य सरकारला असू नये?

ते सर्व कैदी करोना व्हायरसचे वाहक बनतील वा न बनतील पण सद्यस्थितीत पोलिसांवर प्रचंड ताण आणि दडपण असताना शिक्षा भोगणारे ११,००० गुन्हेगार बाहेर मोकाट सोडून समाजात अफरातफरी, अराजक माजविण्याचा मानस आहे का ह्या सरकारचा?

देश संकटात असताना राजकारण बाजूला ठेवा हा सल्ला १००% मान्य. पण राज्यात आणि देशात हाहा:कार माजेल असे निर्णय घेणारे सरकार असताना नागरिकांनी मूग गिळून गप्प बसावे अशी अपेक्षा बाळगणे साफ चूक आहे.

११,००० लोकांना सहा फुटावर राहता येतील असे तुरुंग बांधण्यापेक्षा हेल्थकेअर वर पैसा आणि श्रम खर्च करणे आज गरजेचे आहे. ११००० लोकांना करोना झालेला नाही आणि त्यांना परोलवर सोडलंय. चांगला निर्णय.

हे हार्श वाटेल. पण परदेशातील लोकांना विमानं पाठवून किंवा सामान्यपणे परत आणून आणि इथे आल्यावर ट्रेन, विमान प्रवास करू दिल्याने देशात आधीच हाहाकार माजला आहे. त्यातल्या अनेकांनी आयसोलेशनमध्ये राह ण्याचे आदेश धुडकावले. कुठे तपासणीतून सुटण्यासाठी विमानातून उतरण्यापूर्वी शरीराचं तापमान कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचं वाचलं.

त्या कैद्यांपेक्षा या बातमीतला माणूस कैक पटींनी जास्त डेंजरस आणि गुन्हेगार आहे.
https://www.hindustantimes.com/india-news/ias-officer-jumps-covid-19-qua...

काही ठिकाणी तुरुंगांत दंगे झाल्याच्या बातम्या आहेत.

दुसरीकडे गरीब, निराधार मजुरांना हजारो किमी अंतर उपाशीतापाशी पायी कापायला लागतंय. वर पोलिसांचे दंडुके झेलायला लागताहेत.
करोना मुळे लोक बळी जाऊ नये म्हणताना ते अन्य कारणाने गेलेले चालणार आहेत का?

<< करोना मुळे लोक बळी जाऊ नये म्हणताना ते अन्य कारणाने गेलेले चालणार आहेत का? >>
खरं आहे तुम्ही म्हणताय ते. फक्त थोडे दिवस थांबा अजून. करोनामुळे टपटप माणसे मारायला लागली ना, की तुम्हीपण म्हणाल की पोलिसांनी पुरेसे दंडुके का मारले नाहीत वेळच्या वेळी.

विपर्यास केलाच पाहिजे का? की विमानाने फिरणार्‍या लोकांपेक्षा या पायी जाणार्‍या लोकांच्या आयुष्याची किंमत कमी आहे म्हणूण?

माझं म्हणणं इतकंच होतं की परदेशात अडकलेल्यांसाठी जशी विमानं पाठवली जातात तसंच शहरांत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी किंवा ते जिथे राहतात तिथे अन्नपाण्याची सोय करण्याची गरज होती. हे आता होतंय. पण सगळ्यांपर्यंत पोचेल का ? कधी ? हे प्रश्न आहेतच.

वरच्या बातमीतल्या आय ए एस ऑफिसरला दंडुके पडणार आहेत का?

नोकरी जाईलच त्याची.
भारतासारख्या देशात आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण करण्याचा उद्योग राजकारण्यांनी केला. गरीबी हटाव नारा देत आपल्या कार्यकर्त्यांचीच फक्त गरिबी हटवली. आताच्या काळात सुध्दा भ्रष्टाचार होऊन श्रीमंतांना उपचार मिळतील. गरीबांना रस्त्यावर मरण्यासाठी तसेच सोडून दिले जाईल. भरत तुम्ही भारतातील पुढं होणाऱ्या करोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या आर्थिक स्तर कोणता होता याची आकडेवारी गोळा करून अभ्यास करा.

नवीन Submitted by भरत. on 27 March, 2020 - 08:10 >>

मोदिविरोधकांचा "जलोना". फारच उफाळून आलेला दिसतोय.

Ias ऑफिसरला दंडुके पडले तर त्याने नक्की काय फरक पडणार? काल एक पुजारी स्टॅम्प असतानाही देवळात गेला म्हणून बातमी आली. आज काही मुस्लिम शुक्रवारच्या नमजासाठी मशिदीत गेले अशी बातमी आली. लोकांना अक्कल नाही तिथे सरकार काय करणार? अशा वेळी ओल्याबरोबर सुके जळते तसे गरिबांची पायपीट चालू आहे.

बाकी आहे त्या परिस्थितीवर उपाय सांगण्याऐवजी किंवा लोकांना लॉकडाऊन चे नियम पाळायला सांगण्याऐवजी किंवा लोकांचे मनोधैर्य वाढवण्या ऐवजी सरकारवर टीका करणे फार सोपे आहे.

काँग्रेसी गुलाम तर अशा प्रतिक्रिया देऊ लागलेत जसे काही गेली कित्येक वर्षे हे लोक अशा रोगांच्या साथिंचे व्यवस्थापन करत आलेत. करोना बाबतीत सरकारने हलगर्जीपणा केला हे असेच पेटंट वाक्य. सरकारने नक्की कधी लॉकडाऊन करायला हवं होत आणि "का" याचं उत्तर कोणाकडे असेल तर द्या जरा...

सरकार त्यांचं काम करतेय आणि चांगल्या प्रकारे करतेय. प्रत्येक घटकाला खुश करणं कोणालाच जमणार नाही, पण त्यातही मदत पॅकेज व रेशन इत्यादीच्या माध्यमातून सरकार लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतच आहे..

कृपया काहीतरी फालतू खुसपट काढून मोठ्या प्रमाणावर केलेल्या जाणाऱ्या चांगल्या कामावर टीका करत बसू नका. त्याचा कोणालाही काहीही उपयोग होणार नाही.

पुण्यात हॉटेल बंद झाल्याने पुलाखालच्या जागी राहणाऱ्या हॉटेल स्टाफला अनेकांनी नाश्ता जेवण पुरवले आहे.
असंच मजुरांबद्दल करता आलं, किंवा त्यांना नीट वेगळे पास असलेले ट्रक करून कुठे सोडता आलं(लक्षण चाचणी दनपास झाल्यावर) तर बरं होईल.
मला वाटतं याबद्दल आधीच पावलं उचलली गेली असतील.

चीनमधून इतर देशात जेव्हा हा व्हायरस पसरला तेव्हाच सरकारने आंतर राष्ट्रीय विमानसेवा बंद करायला हवी होती. आपल्या वैद्यकीय सुविधांच्या मर्यादा सरकारला ठाऊक होत्या. त्यामुळे नंतरचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घ्यायला हवा होता. आताच्या लॉक आऊट मुळे मोठे नुकसान होत आहे.

मोदिविरोधकांचा "जलोना". फारच उफाळून आलेला दिसतोय.
बाकी आहे त्या परिस्थितीवर उपाय सांगण्याऐवजी किंवा लोकांना लॉकडाऊन चे नियम पाळायला सांगण्याऐवजी किंवा लोकांचे मनोधैर्य वाढवण्या ऐवजी सरकारवर टीका करणे फार सोपे आहे.

काँग्रेसी गुलाम तर अशा प्रतिक्रिया देऊ लागलेत जसे काही गेली कित्येक वर्षे हे लोक अशा रोगांच्या साथिंचे व्यवस्थापन करत आलेत.
>>>>सहमत मी-माझा जी
त्याचं काय आहे ना की मोदी आल्यावर काळे धंदे बंद करावे लागले आणि नोटाबंदीमुळे तर पैसे खाण्यावरच गदा आली. मग काय, या लोकांना सगळीकडे मोदींच्या नसलेल्या चुका दिसून येतात आणि मग ते सर्व फेसबुक, ट्विटर,व्हॉट्स app वर आपली खदखद काढून सगळ्यांना पकवत बसतात.यातले काही नमोरुग्ण माबोवर शिरले आहेत आणि प्रत्येक धागा नासवत आहेत.
मला राजकीय नसलेल्या धाग्यावर राजकीय चर्चा करणे पटत नाही पण नमोरुग्णांना तिथल्या तिथे सुनवणे गरजेचे वाटले.

काही ठिकाणी डॉक्टर्सना तसेच एअरलाईन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना भाडेतत्वावरील घर सोडण्यास सांगण्यात येत आहे:

https://edition.cnn.com/2020/03/25/asia/india-coronavirus-doctors-discri...

https://www.maharashtranama.com/maharashtra/story-if-doctors-nurses-aske...

नोटबंदी सारखे जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून, रविवार चा जनता कर्फ्यू लावण्याचं आवाहन केले गेले तेव्हाच " गरज पडल्यास संपूर्ण देश पुढील काही दिवस लॉकडाऊन करावा लागू शकेल" असा सुचनावजा इशारा दिला असता तर लोक आपापल्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले असते. या अगोदर गुप्त रितीने भाजीपाला, किराणा, दूध प्रत्येकापर्यंत पोहोचेल याचं नियोजन विविध यंत्रणा, सामाजिक संस्था यांच्या वर जबाबदारी देऊन नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती. पंधरा करोड लोक करोनाला घाबरत नाहीत असे दिसत आहे. त्यांना वगळून इतरांना सर्व सेवा सुविधा घरपोच मिळायला हव्यात.
आपल्या कडे खूप खूप वेळ हाती होता. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायानं पावलं उचलली गेली पाहिजे होती.

Pages