संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।>>> काय??? इतक्या प्रचंड आवाजाने, पृथ्वीचा आस का काय बदलेल ना Sad
अमेरीका नाही तरी चायनात सहज ऐकू जाइल एवढा प्रचंड आवाज. Wink

त्या दिवशीचा न्याशनल प्रोग्राम - लोळणे, झोपणे, बैठे खेळ.
-----
इंटरनेट आइसियुमध्ये जाणार.

माननीय पंतप्रधान यांच्या बरोबर सहमत. हा कर्फ्यू पाळल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या करोनाची संसर्ग साखळी तूटेल असा आशावाद आहे. करोनाचे विषाणू त्या काळात मरतील आणि प्रसाराला अटकाव होईल. ऋ भाय हा धागा काढण्यासाठी धन्यवाद.

मी गेले आठवडाभर पाळतेय , अजिबात बाहेर पडले नाहीये. सरकारच्या सूचना जास्तीत जास्त पाळतेय.सगळी कामं होल्ड वर ठेवली आहेत. बाईला ही ती बसने येते म्हणून सुट्टी दिलीय. या लढ्यात माझा खारीचा वाटा !
त्यामुळे मला जरा ही जड जाणार नाहीये. माझा स्वयंघोषित कर्फ्यु रोजच आहे सध्या☺

हो म्हणजे बस आणि ट्रेन ला आराम मिळेल। शिवाय हेही सांगितले आहे कि या (पंधरवड्यात) दरम्यान कुठल्या कामगाराने किंवा मेहनती लोकांनी सुट्टी घेतली तर त्यांचा पगार कापला जाता कामा नये. बाकी २९ मिनिटाचे भाषण मीही संपूर्ण ऐकले पण मध्ये २/३ मिनिटे वॉशरूम मध्ये गेल्याने बहुदा हा भाग (सुट्टीचा ) ऐअला नाही.

#I Support Janta Curfew

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं यांच्या आवाहानाला विरोध करण्याकरता देशातील सर्व मोदी हेटर्स, रविवारी झुंडीने बाहेर पडतील.

ನಾನು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಎಳೆಗಳನ್ನು ಓದುವುದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇದು ಕರೋನವೈರಸ್ ಬಗ್ಗೆ ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಅದನ್ನು ಓದಿದ್ದೇನೆ. ಆದರೆ ನಾನು ಆರಂಭಿಕ 1-2 ಪ್ಯಾರಾಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಅರ್ಥಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಲ್ಲೆ. ಅದರ ನಂತರ ನೀವು ಬರೆದದ್ದನ್ನು ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅರ್ಥಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಇದು ವೈದ್ಯಕೀಯ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಇರುವುದರಿಂದ, ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಮರಾಠಿಗೆ ಭಾಷಾಂತರಿಸುವುದರಿಂದ ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥವಾಗಬಹುದು?

ಅವರು ಇದನ್ನು ಬೆಂಬಲಿಸುತ್ತಾರೆ ಅಥವಾ ಇದನ್ನು ಬೆಂಬಲಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಮೇಲೆ ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ ಇತರ ಎಲ್ಲರಿಗೂ, ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಗೆ ಅನುವಾದಿಸಬಹುದೇ? ಇದರಿಂದ ನಾವು ಈ ಪ್ರಮುಖ ವೈದ್ಯಕೀಯ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಸಹ ಭಾಗವಹಿಸಬಹುದು.

अभि_नव
तुमच्यासाठी मराठी अनुवाद. साभार Google Translate
--
मी आजपासून सार्वजनिक कर्फ्यूची मागणी करतो. म्हणजेच जनतेसाठी जनतेने लादलेले कर्फ्यू. देशातील सर्व नागरिकांनी रविवारी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत जनता कर्फ्यू पाळला पाहिजे. सार्वजनिक कर्फ्यू देखील आम्हाला आगामी आव्हानासाठी तयार करेल.
आम्ही 22 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवून किंवा सायरन वाजवून सेवकांचे आभार मानले पाहिजेत.

या दिवशी कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडून रस्त्यावर जाऊ नये, किंवा लोकलला जाऊ नये. परंतु जे महत्त्वाच्या कामात व्यस्त आहेत त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. सार्वजनिक कर्फ्यू देखील आम्हाला आगामी आव्हानासाठी तयार करेल. कर्फ्यूची अंमलबजावणी झालीच पाहिजे याची काळजी घेण्यासाठी मी राज्य सरकारांना आवाहन करेन.

22 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता आपण दार, बाल्कनीतून काम करणार्‍यांचे आभार मानू या. कसे? टाळी वाजवणे, बेल वाजवणे. स्थानिक प्रशासनाला सायरन वाजवून सर्वांनी हे कळवावे असा माझा आग्रह आहे.

मला अजून एक विनंती करायची आहे. लाखो लोक रुग्णालये, विमानतळ, कार्यालयांमध्ये व्यस्त आहेत. लोकांनी इतरांच्या हितासाठी काम केले आहे. धोका असूनही त्याने सातत्याने काम केले आहे. हे लोक व्हायरस आणि देश यांच्यातील सुरक्षिततेसारखे आहेत. संपूर्ण देश त्यांना अभिवादन करतो.

हा सार्वजनिक कर्फ्यू या विषाणूविरूद्ध लढण्यासाठी आपण किती सज्ज आहे हे जगाला दर्शवेल.

पीएम मोदी म्हणाले की, एका व्यक्तीने इतर दहा लोकांना जनता कर्फ्यूची आवश्यकता सांगावी.

मी एनसीसी, एनएसएस आणि धार्मिक संस्थांना विनंती करतो की सार्वजनिक कर्फ्यूबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगावे.

ममो Happy मी सुद्धा आमच्या बाईला तीन दिवस येउ नको सांगितलं, सुट्टी कापणार नाही हेही सांगितले.
पंतप्रधानांनी चांगलं पाउल उचललय

मी पाळणार कर्फ्यु. आज बऱ्याच लोकांना मध्ये जी पॅनिक अवस्था आहे ती कालच्या पंतप्रधानांच्या भाषांना नंतर बऱ्याच अंशी कमी झाली असेल. युद्धाच्या प्रसंगी जसा सेनापती वॉर क्राय देऊन सैनिकांचे मनोबल वाढवतो तसेच वाटले.

आमचे वर्क फ्रॉम होम शक्य नाही त्यामुळे आता आम्ही दोन टीम बनवून एक दिवसा आड ऑफिसला जाणार.
ऑफिस शनिवार रविवारीही चालू राहणार.
या रविवारीही ऑफिस असले तर जनता कर्फ्यूचे काय हा प्रश्न पडलाय...

https://youtu.be/aTe0MjAZvMU

Mars attack म्हणून सिनेमा होता, त्यात एलियन्स हल्ला करतात. एक आज्जी म्युजिक वाजवत असते , त्याने ते मरतात.

टाळ्या वाजवा, थाळी वाजवा , घंटा वाजवा , ह्यातूनही असा काहीतरी इफेक्त होऊ शकेल का ?

नमोनमो

टाळ्या वाजवा, थाळी वाजवा , घंटा वाजवा , ह्यातूनही असा काहीतरी इफेक्त होऊ शकेल का ?
नमोनमो
नवीन Submitted by BLACKCAT on 20 March, 2020 - 03:56
>> तू मात्र हीच कॅसेट वाजवत रहा प्रत्येक ठिकाणी. नमोरुग्ण कधीच बरे होत नाहीत, एकवेळ करोनाचे रोगी बरे होतील.

जगातील इतर करोनाग्रस्त देशाचे पंतप्रधान,
स्वत:च्या देशाची अर्थव्यवस्था कशी सांभाळता येईल यासाठी आर्थिक तरतुदी करण्यात व्यस्त आहेत. आणि भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना देखील, भारताचे पंतप्रधान जनतेला घंटा, थाळ्या, ताट, वाट्या व सायरन वाजवायचे सल्ले देत आहे.

Whatsap forward
_ _______

*रविवार २२ मार्च च्या एक दिवसीय जनता कर्फ्यूने काय होणार?*

एक दिवसीय कर्फ्यूचा उद्देश जाणूया. कोरोना विषाणूचे आयुष्य काही पृष्ठभागांवर १२ तासांपेक्षा कमी आहे आणि जनता कर्फ्यू १४ तासाचा, म्हणजे या १४ तासांमध्ये ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी कॅरोना चे विषाणू आहेत अशा ठिकाणी किंवा पॉईंट्सना नक्कीच स्पर्श केला जाणार नाही व आपोआप ही *साखळी तुटण्यास* मदत होईल.

बरेचजण आॅफिसवरून शनिवारी रात्री घरी पोहोचल्यावर बाहेर पडणार नाहीत असे गृहीत धरूया. रविवार सकाळपासून जनता कर्फ्यू रात्री 9 वाजेपर्यंत लागू होईल. रविवारी रात्री 9 नंतर कर्फ्यू संपला तरी बहुसंख्य जनता घरातून बाहेर पडणार नाही असे गृहीत धरायला हरकत नाही.

म्हणजे तसं पाहिलं तर शनिवार रात्रीचे 9 पासून जास्तीत जास्त लोक *24 तास* *+* रविवार रात्री 9 पासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत *10 तास* *= 34 तास* घरात असतील. (इथे गृहीत धरले आहे की सोमवारी सकाळी 7 वाजता व्यक्ती कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली आहे.)

14 तासाच्या (किंवा वरीलप्रमाणे पाहिलं तर 34 तासांच्या) जनता कर्फ्युमुळे आपण स्वतःला व आपल्या परिवाराला या महाविषाणूपासून सुरक्षित करण्याचा चांगला प्रयत्न करीत आहोत.

प्रत्येक विषाणूला जिवंत राहण्यासाठी HOST लागतो. *इथे HOST म्हणजे मानवी शरीर* असे म्हणूया. तर जनता कर्फ्यूमुळे HOST न मिळाल्याने विषाणूंच्या फैलावास अटकाव होईल. यालाच म्हणतात... *"BREAKING THE CHAIN."*

म्हणून प्रत्येकाने जनता कर्फ्यू मध्ये सामील होऊन स्वतःला, आपल्या परिवाराला व आपल्या शेजार्‍यांना आणि आपल्या देशवासीयांना सुरक्षित करायचे आहे.

जर आत्ता हे झाले नाही तर मग भविष्यातील LOCK DOWN सारख्या इतर कडक उपायांना सामोरे जाण्यापासून दुसरा पर्याय शिल्लक नाही. (सध्या ईटली व स्पेन या दोन देशात LOCK DOWN सारखी स्थिती आहे.)

चला तर मग, आपण प्रामाणिक प्रयत्न करुया. तोडूया ही साखळी.
*Let's BREAK THE CHAIN.*

हायला 14 तास आहे होय! मी उगाच स्वतःला १४ दिवस सेल्फ कोरंटाईन करून बसलोय! या विकसित देशांना कोणीतरी सांगा रे हा जालीम उपाय!

कोरोना व्हायरस प्रतिबंधित करा .. त्यासाठी प्रत्येकाने कर्फ्यू निर्णयाचा आदर केला पाहिजे. राजकीय विषयावर संघर्ष करण्याची ही योग्य वेळ नाही..
मानवता विसरू नका

सर्वांना शुभेच्छा. ऋन्मेषचा प्रतिसाद वाचुन काहीतरी उपयोग होईल असे वाटते आहे. जे करता येईल ते प्रयत्न करावेच लागतील. मलेरियावर वापरण्यात येणार्‍या २ औषधांना एफडीएनी मान्यता दिली म्हणे, त्याचाही खरंच उपयोग होवो अशी प्रार्थना.
अमितव, “विकसित देशांना कोणीतरी सांगा रे हा जालीम उपाय!” >>> का बरे? विकसीत होणारे ढ च असतात व विकसीत अगदी हुषार , त्या ना सर्वच माहिती असते का? Happy .... सगळे आपापल्या परिने उपाय करत आहेत. त्याचा जितका उपयोग होईल तो होईल पण मानव जातीला धोका तर नाही होत या कर्फ्युमुळे.

मला वाटते सोशल अवेअरनेस हा सर्वात मोठा फायदा आहे या ऊपक्रमाचा. आधी काहीतरी करणे गरजेचे आहे ही नियत तरी जागी झाली पाहिजे. एकदा ती जागी झाल्यावर सरकारनेही योग्य त्या योजना राबवायला हव्यात. जेवढे सरकार सिरीअस तेवढे जनता सिरीअस.
आज आमच्याकडे वर्क फ्रॉम होम जे कधी स्वप्नातही शक्य नसूनही जेव्हा सर्वांच्या सिस्टीमची पॅकिंग सुरू झाली तेव्हा ऑफिसातल्या कित्येक सुशिक्षित ज्नतेलाही पहिल्यांदा जाणावले की कोरोना हे एक गंभीर संकट आहे.

सगळे भारतीय जरी घरी बसले तरी शाहीन बाग अजून चालूच आहे. तिथून करोनाव्हायरस पसरणारच. देशभरातील मोठी देवळं बंद केली, चर्चला टाळं लावलं पण मशिदींमध्ये नमाज होतातच आहेत.
मग हे असले उपाय करुन कितीसा फरक पडणार?

मशिदींमध्ये नमाज होतातच आहेत
.>>
आज उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. आमच्याईथली नमाज थांबली. उद्यापासून बंदमध्ये सारे सामील

Pages