संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सध्या पडतोय तो अवकाळी पाऊस. मान्सून सुरू होण्याआधी आणि मान्सून परतताना पूर्वेकडून येणाऱ्या पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात.

देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आज आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं होतं. आता आपल्याला २१ दिवसांत करोनाविरोधातील युद्ध जिंकायचं आहे.

_________

महाभारत 18 दिवसात जिंकले हेच एक मिथक आहे

रोज सकाळी 7 ते संध्या 6 पर्यंत मोठमोठी शस्त्रे घेऊन लढणे , परत रात्री कोण कुठे पडला ते बघत फिरणे , असे सलग केले असते तर 4 दिवसात त्राण जाऊन सगळे आपोआपच मेले असते.

म्हणून ते अलटरनेट डे लढत होते
एकूण लढाई 36 की 37 दिवस चालली होती

पावसाळा सुरु होण्याआधी उन्हाळ्यात पडतो तो वळवाचा पाउस. सप्टेंबरमध्ये परतीचा मान्सून पडतो.

ओह असे आहे का? माझी अशी समजूत होती कि, उन्हाळ्यात ढग गडगडून वगैरे जो पडतो तो वळीव, मोसमी वाऱ्याने येतो तो पावसाळा आणि हे दोन सोडून इतर वेळी लागला (जसे कि हिंवाळ्यात) तर अवकाळी.

हीरा हा वळीवच आहे. मार्च च्या शेवटी आणि मे च्या शेवटी अश्या दोन वेळा वळीव होतात.
बाकी आमच्याकडे म्हातारी हरभरे भरडते त्याचा आवाज होतो.

हबा कोण?

मौसमी पावूस पश्चिम दिशेकडून येतो
<<
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे पाऊस आणतात. साऊथ वेस्टरली विंड्स.

सध्याच्या मोसमात 'गड धुण्याचा पाऊस' २ ३ वेळा पडतो. हा वळीवच आहे.

गुढीपाडव्यानंतर सप्तशृंगीची यात्रा असते. त्याआधी देवीचा गड या पावसाने धुतला जातो अशी समजूत आहे. याच काळात आसपास अनेक लहानमोठ्या यात्रा / जत्रा भरतात. होपफुली यंदा लोक पायी गडावर जाण्याचा मास मॅडनेस करणार नाहीत अशी आशा आहे. साहेबांनी धार्मिक स्थळे बंद असे सांगितले आहे म्हने..

महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं होतं. आता आपल्याला २१ दिवसांत करोनाविरोधातील युद्ध जिंकायचं आहे.
<<

पुराणातल्या अन काव्यातल्या कथांची उदाहरणे करोनाशी लढायला पुरेशी नाहीत. महाभारताचे युद्ध, लक्ष्मणरेषा असल्या कॅचेसिझम मधे अडकून पडलो तर काही खरे नाही.

या पुराणांवर अवलंबून राहूनच आपण पुरेश्या हेल्थ केअर इक्विपमेंटचा साठा केला नसावा काय?

काही देशाच्या प्रमुखांनी पॅनिक न पसरवता, लोकांना पुरेसा वेळ देऊन अगदी स्पष्ट आणि मोजक्या शब्दांत लॉकडाउनची घो षणा केल्याची उदाहरणं आहेत.
<<
एक्झॅ़क्टली.

पण रात्री ८ वाजता सांगायचं, मित्राँ, कल से तेरे पैसे खतम. किंवा फुल लॉकडाऊन.

अन तरीही इथले तथाकथित पढतमूर्ख त्याची तळी उचलायचा प्रयत्न करतात हा महामूर्खपणा पाहून जीव हळहळतो. हे असले धुतलेले मेंदू पैदा करण्यासाठी लहानपणापासून शाखेतच जावे लागते. ते ही पिढ्यान पिढ्या.

आजच The Wire चा YouTube वरील दातखाऊ (Teeth Eater) करण थापर आणि JNU अर्थतज्ञ् प्राध्यापिका जयती घोष यांची मुलाखत बघितली. यात मोदी सरकारने २१ दिवसांची जी टाळेबंदी (Lock Down) जाहीर केली आहे त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे.
कोणतीही व्यक्ती सदासर्वकाळ सर्वांना आनंदी ठेऊ शकत नाही. कोणताही निर्णय घेतांना किंवा राबवितांना काहीतरी उणिवा राहतातच. कोणतीही योजना हि कधीही शत प्रतिशत परिपूर्ण असू शकत नाही. भारतीय शासन किंवा इतर कोणतीही शासन व्यवस्था ही उपलब्ध पर्यायांमधून जास्तीत जास्त लाभदायक आणि कमीत कमी हानिकारक पर्याय निवडत असते. आणि जसे जसे त्यातील उणीव किंवा कमतरता उघड होतात त्याप्रमाणे तात्पुरते उपाय योजले जातात. याचा अर्थ असा नसतो की शासन व्यवस्थेने त्यांना दुर्लक्षित केले आहे, आता जे युद्धापातळीवर करायचे उपाय असतात त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
जर सरकारने टाळेबंदी (Lock Down) जाहीर केले नसते तर याच मंडळींने दुसऱ्या कोणालातरी चर्चेला बोलावून, सरकार कोरोना बाबतीत असंवेदनशील आहे म्हणून सरकारला दोषी धरले असते.
ज्यांना कोणाला आधी कांजण्या झालेल्या असतात त्यांचा मज्जासंस्थेत varicella-zoster हा विषाणू सुप्तावस्थेत राहतो आणि पुढे कधीतरी जेव्हा Nervous Breakdown होतो तेंव्हा नागीण रुपात परत अवतीर्ण होतो. (याचा मोदीविरोधकांशी काहीही संबंध नाही)

सर्वांनी काळजी घ्या.
आमच्या गावात लॉकडाऊन होऊ शकते या विचाराने लोकांनी २-३ महिन्याचा साठा करुन ठेवला. यात अशीही माणसे होती ज्यांनी बहुतेक दहा वर्षाचा टोयलेट पेपर व मास्क व हॅण्डसॅनीटायजर्स चा साठा केला Sad .... पण ‘सरकारने’ लॉकडाऊन आहे हे सांगायची वाट न पहाता सावध होऊन पावले उचलली.

न्युयॉर्कमधे भयंकर पद्धतीने वाढ झाली तशी आमच्या राज्यात अजुन होत नाहिये. पण सावध आहेत लोक. केसेस वाढु शकतात. टेस्टिंन्ग निकाल आले नाहीत सगळे.
१२-१३ मार्चपासुन खुप कंपन्यांनी घरुन काम सुरु केले. (सॉफटवेअर). शाळा १० तारखेपासुन बंद केल्या. आम्ही १५ दिवसाची भाजी आणुन, कापुन फ्रिझरमधे टाकली. कम्युनिटीमधे खुप लोकांनी आपणहुन वयस्कर लोकांना मदतीचा हात पुढे केलाय. खुपजणांनी आम्ही किराणा आणायला जाऊ तेव्हा कोणालाही काही हवे असेल तर आणु असे सांगितले आहे. सरकारला शिव्या घालण्यात वेळ घालवत नाहीयेत कारण स्वतचा जीव मह्त्वाचा आहे जो स्वतःला सुरक्षित ठेवण्यात घालवत आहेत. अजुनही लॉकडाऊन नाहीये पण मनाची तयारी आहे. हॉस्पिटलमधे मास्क , ग्लवज कमी पडताहेत.
भारतात पण लॉकडाऊन अवघड असणारच आहे. पण तो नाही केला तर भयावह परिस्थिती होईल हे बाहेरच्यांना पण माहीत आहे, तुम्हाला तर कितीतरी अधिकपणे माहिती असेल. म्हणुन राजकारण मधे आणुन इथला द्वेष अजुन वाढवु नका, आपसांत फुट पाडु नका. एकमेकांना आपण मदत करायची आहे इतकेच महत्वाचे नाही का?

कोणीतरी, वर न्युझिलंडचे उदाहरण दिले आहे की ‘काही देशाच्या प्रमुखांनी पॅनिक न पसरवता, लोकांना पुरेसा वेळ देऊन अगदी स्पष्ट आणि मोजक्या शब्दांत लॉकडाउनची घो षणा केल्याची उदाहरणं आहेत‘. >>>> एक लक्षात घ्या. न्युझिलंची लोकसंख्या ४७ लाख. व भारत १३५ कोटी. तरीही सरकारने आधी बंद जाहीर करावा व २-३ दिवस द्यावेत , मगच मी सामान आणणार अशी अडमुठी भुमिका घेणे योग्य?
आरारा, नेहमी शाखेबद्दल वाईट लिहीत असता पण शाखेत नाही गेलेले तुमच्यासारखे सतत वाईट आणि वाईटच लिहीत असतात असे म्हणावे का?

>> पाटलांची तर सुंदर आहेच पण हबांची वळीव.... डोळ्यातून वळीव काढला तिने....
>> https://www.maayboli.com/node/25019
>> Submitted by साधना on 25 March, 2020 - 22:01

हे भगवान! काय अप्रतिम लिहिलंय हे !!

म्हातारी जिजा आणि पोपट्याला घेऊन आत पळतानाच " खुरुड्या गेल्या बगे पोरे पळ..." म्हणून ओरडायची.

हा हा हा... अगदी अगदी. माझे सगळे बालपण घेऊन आली हि कथा... आणि शेवटी खरंच डोळ्यातून वळीव काढला Sad Sad

एक लक्षात घ्या. न्युझिलंची लोकसंख्या ४७ लाख. व भारत १३५ कोटी. तरीही सरकारने आधी बंद जाहीर करावा व २-३ दिवस द्यावेत , मगच मी सामान आणणार अशी अडमुठी भुमिका घेणे योग्य?
<<
अहो ताई,

भारतात तुम्हाला मेडिकल दुकानात जाऊन एक मास्क विकत मिळतोय का सध्या?

डॉक्टरांना पीपीई उर्फ हॅझ-मॅट सूट्स पैसे देऊन विकत मिळतील अशी शक्यता दिसते आहे का?

कोणत्या आडमुठ्या भूमीकेबद्दल बोलत आहात? रात्री ८ वाजता सांगायचं की आज मध्यरात्रीनंतर लॉकडाऊन.

इथे लोकांनी मग विचार करायचा, की आता मी किराणा तर आणलाय, पण, एटीएममधून कॅश, मेडिकलमधून माझ्या बापाच्या डायबेटीस बीपीच्या गोळ्या, गाडीचं पेट्रोल, हे सगळं आणायचं बाकी आहे. यात आडमुठेपणा कुठे आला?

मी म्हटलूय की वर, पढतमूर्ख येतील तळी उचलायला.

मुंबईत 4प्लाय सर्जिकल मुखवटे भरपूर मिळत आहेत 30 रुपयाला एक आणि 2000 रुपयाला 100 चे पाकीट.
मी आताच ऑर्डर दिली
उद्या सकाळी मिळेल

सकाळी 7 ते 12 किराणा दुकाने व्यवस्थित उघडी होती. दूध सहज मिळते आहे. सगळेच्या सगळे केमिस्ट उघडे आहेत.
मी दवाखाना तातडीच्या रुग्णांसाठी दोन्ही वेळेस चालू ठेवला आहे.
जगायचं कसं
कण्हत कण्हत
की
गाणं म्हणत

असतील आपल्या घरी

तुम्हाला कशाला हवे आहेत?

मुळात सारखं सारखं सांगितलं जातंय कोणकोणती जीवनावश्यक दुकान उघडीच राहणार आहेत तरी गर्दी का करतात लोक?? अगदी 21 दिवस कोणत्याच कारणाने बाहेर पडताच येऊ शकणार नाही असा विचार करणारेच मूर्ख नाहीत का?

Pages