संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

साधना>> सहमत,
भारतात कोरोनाची साथ सेकेंड स्टेज आहे. थर्ड आणि फोर्थ स्टेज टाळण्यासाठी साधेसुधे वारंवार हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, यांसारखे सहज पाळण्याजोगे नियम स्वतःवर प्रत्येकाने घातले तरच कोरोनापासून वाचण्याची शक्यता वाढेल.

. आज रात्री ८ वाजता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला संबोधित करणार आहेत. आता जनता त्यांचेच म्हणने गांभीर्याने घेईल. त्यांनीही याचे भान राखून ठोस संदेश द्यावा अशी अपेक्षा

मलाही २२ तारखेचे टाळ्यावगैरे वाजवणे एक उत्सव, ईवेंट, रिचुअल वाटलं. गांभीर्य नव्हतंच. पाच वाजण्याच्या आधीच दहा मिनिटं ढोल, फटाके, झांजा, थाळ्या, कोनाड्यातल्या देवळातल्या घंटा, शंख वाजवणं सुरू झालं होतं. लोक एकत्र तो दणदणाट एंजॉय करत होते. सेल्फी, एकमेकांचे फोटो वगैरे माहौल होता. आणि हे सगळं ५- २० पर्यंत सुरू होतं. अर्थात सर्वच ठिकाणी असं घडलं नसेल. नसणारच. आणि आनंद उत्साह जरूर होता, फक्त गांभीर्य नव्हतं इतकंच. अवेअरनेस होता की नाही ते कळायला मार्ग नाही.
इमारतींमधून मात्र बाल्कन्या, गच्ची, इथूनच टाळ्या आणि थाळ्या वाजवताना लोक मला माझ्या दृष्टीच्या मर्यादित टप्प्यात दिसले.

मोदींनी घोषणा केली हे खूप छान झाले. त्यांचा करीश्मा पाहता आता योग्य रीतीने पाळले जाईल. लोकंही मनावर घेतील.

आशा करूया. जगभर लोक येडे झाले आणि नंतर रडले. आपल्याकडे आता तरी शहाणे होतील.

भाषणात अन्न धान्य आणि एखाद्या व्यक्तीला इतर आजारांसाठी / नियमितपणे लागणार्‍या औषधांबद्दल किंवा कोणी आजारी पडल्यास काय करावं याबद्दल काही सांगितलं का?

आज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी सांगितले की आम्ही अंगणवाडी सेविकांना ट्रेनिंग देतोय. म्हणजे सरकार हजारो केसेस येणार व त्यांना तोंड द्यायची तयारी करतेय.

तुम्हाला त्या हजारोंमध्ये सामील व्हायचे नसेल तर घरात बसा.

भाषणात अन्न धान्य आणि एखाद्या व्यक्तीला इतर आजारांसाठी / नियमितपणे लागणार्‍या औषधांबद्दल किंवा कोणी आजारी पडल्यास काय करावं याबद्दल काही सांगितलं का?

>>काय करावं याबद्दल काही सांगितलं का?<<
या व्यतिरिक्त, अजुन पुढे २१ दिवस लॉकडाउन केल्याने होणारा एकनामिकल इंपॅक्ट आणि त्यावर सरकारची काय उपाय योजना आहे; नागरिकांना त्यात हातभार कसा लावता येइल यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे. साधारण महिनाभर कारभार ठप्प झाल्याने, डेली वेजेसवर काम करणार्‍यांबरोबर सगळ्याच बिझनेस, नोकरदारांवर आर्थिक समस्येचं आभाळ कोसळणार आहे...

Sorry to repeat.. but I had same question. My Marathi keyboard is off.

भाषणात अन्न धान्य आणि एखाद्या व्यक्तीला इतर आजारांसाठी / नियमितपणे लागणार्‍या औषधांबद्दल किंवा कोणी आजारी पडल्यास काय करावं याबद्दल काही सांगितलं का?....

काहीही नाही. राज्य सरकार सांगेल की. स्थानिक पातळीवर निर्णय राज्ये घेतील. सगळी राज्ये सहकार्य करताहेत. ठाकरे रोज येताहेत टीव्हीवर. ते सांगतील काय ते.

साठवणूक करू नका म्हणून सांगितले होते

त्यामुळे आता लोकांना नियमित अन्न पूरवाईची जबाबदारी सरकारची आहे.

निर्मला सीतारामन यांनी बॅंकिंग चार्जेस कमी करण्याची सवलत जाहीर केलीय ना?

ट्रंप व मोदी - समस्येची एकदम १८० अंश वेगळी हाताळणी. बघू कोण देश अधिक सुरक्षित ठेवतो>>>

ट्रम्पने काय व्यवस्था केली आहे?

आहे ती साधन सामग्री वापरून लोकांचे प्राण वाचवणे ह्याला सरकारने प्राधान्य दिलेले आहे. इकॉनॉमी नंतरही सावरता येईल. जान है तो जहान है!

>> भाषणात अन्न धान्य आणि एखाद्या व्यक्तीला इतर आजारांसाठी / नियमितपणे लागणार्‍या औषधांबद्दल किंवा कोणी आजारी पडल्यास काय करावं याबद्दल काही सांगितलं का?
+111
Same I too want to know

जीवनावश्यक वस्तूंची यादी ठाकर्यांनी जाहीर केलेली आहे. त्यातले सगळे नियमित मिळणार आहे. कोणीही आता शॉपिंगला धावू नका. तुम्ही येताना व्हायरस घेऊन आलात तर तुमच्या कुटुंबाला भारी पडेल.

>>>ट्रंप लवकरच लॉकडाऊन उठवणार.>>> माझे बाबा म्हणतायत 'कम्प्लीट सुइसाईड' Happy जे की तसच वाटतय ब्वॉ. इटलीचे उदा बघता.
_________
भस्मासूर होउन बसायला नको.

१.आज १२ नंतर कोणीही घराबाहेर पडणार नाही
२.सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल.
याचा अर्थ कळेल का?
(जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील की दुकाने ठरावीक वेळेत चालू राहतील?)

जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील की दुकाने ठरावीक वेळेत चालू राहतील>>

बहुतेक ठराविक वेळेत चालू राहतील.

आमच्या इथे आज दुकानात गर्दी करू देत नव्हते. दोर घेऊन दारात माणूस होता. इतकेच आत जाउद्या, ते बाहेर आले की पुढची बॅच. बाहेर उभे असलेल्याना योग्य अंतर ठेवून उभे राहा सांगत होते. हे शेजाणिकडून ऐकले. मी काल शेवटची गेले होते. महिनाभर पुरेल इतका साठा आहे.

Pages