संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सरकार ने काहीही प्रयत्न केले तरी हे असले माठ लोक असल्यावर का नाही सगळीकडे पसरणार?

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/thousands-...

https://www.esakal.com/pune/coronavirus-pune-pimpri-eight-doctors-escape...

सरकार एवढे प्रयत्न करतेर तरी बघा आपली लोक काय करताय??

ती कनिका कपूर ऐअरपाॅर्टवरून पळून आली..नंतर एका फंक्शनला गेली तिकडे 500 लोक होती...ती तिची आई पाॅसिटीव्ह आहे तरी...

काय म्हणायचं अशा लोकांना?? दुसर्याचा जीव धोक्यात घालणार्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे...

अमितव, प्रतिसाद पटला नाही. आता हे सर्वमान्यच आहे की हा रोग पसरण्याचा कर्व्ह एक्सपोनेंशियल आहे. त्या कर्व्हच्या सुरुवातीलाच जर उपाययोजना केल्या तर त्याचा एक्सपोनंट खाली येतो. जपान, हॉंगकॉंग प्रभृती देशांनी वेळेत पावले उचलली, त्यामुळे त्यांचा वाढीचा दर हा इतरांपेक्षा कमी आहे. तिथे आरोग्यसेवांवर एरवी जेवढा ताण असता त्यापेक्षा बराच कमी आहे.

कर्व्हच्या सुरुवातीलाच उपाय केले तर ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात करायची गरज पडत नाही, कारण magnitude कमी असते. अनेक विकसित देश सध्या कम्युनिटी ट्रान्समिशन च्या बऱ्याच पुढच्या अवस्थेत आहेत, जिथे अनेक मानव शरीरात तो गेला असण्याची शक्यता आहे आणि तिथे तो 14 दिवसांपर्यंत राहू शकतो. दुर्दैवाने अनेक विकसित देशांनी उपाय योजना सुरू करायला बराच उशीर केला. भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन वाढण्याचा धोका असला तरी सध्या सरफेस ट्रान्समिशन ची शक्यता जास्त आहे, त्यामुळे 14 तास वाल्या त्या पोस्ट मध्ये काही अंशी तथ्य असावे. तरीही सरकारने सर्वांनाच शक्यतो काही आठवडे घरून काम करायला सांगितले आहेच.

आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्याकडे लॉक डाऊन करायची वेळ आली तर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात याची कल्पना यावी (दोघांना, सरकार आणि नागरिक) म्हणूनही हा ड्रिल असावा. कारण एकंदरीतच स्वयंशिस्त पाहता आपल्याकडे सगळा सावळा गोंधळ आहे. निदान त्या त्रुटी तरी समजून येतील.

केवळ 1 दिवस कर्फ्यु करून रोगाची साखळी तुटेल, असे मलातरी वाटत नाही. पण त्या निमित्ताने जनजागृती झाली आणि लोकांना या रोगाचे गांभीर्य कळले तरी फायदा आहे.

मी निसर्गासाठी !!!

जनता कर्फ्यु एकदा पाळू
आणि
*'इको कर्फ्यु'* म्हणून सुरू ठेऊ !

*निसर्गाचा संकेत आहे, जरा ‘वेग’ कमी करा !!!*

वेग कमी झाला आणि चीनमधे दिसले स्वच्छ आकाश, कमी प्रदूषण पातळी. युरोपमधे दिसले मासे आणि हंस, तर जपानमधे शहरात हरण. केवळ माणसाची हालचाल काही दिवस कमी झाल्याचा हा परिणाम...

माणसाचा हव्यास, उपभोग जर जागतिक पातळीवर कमी झाला तर निसर्ग पुनरुज्जीवन सहजसाध्य होऊ शकेल.

यासाठी आपला सर्वत्र, सतत, वेगाने होणारा ‘संचार’ जरा कमी करूयात, नियमित करूयात!...

चला तर, हा ‘जनता कर्फ्यू’ एका *'समंजस संचारबंदी’त* रूपांतरित करुयात... स्वखुशीने *इको कर्फ्यु* पाळूयात !
*दर महिन्याच्या पहिल्या रविवारी* !

मॉल नको, दुकान नको, बाग नको, टीव्ही – मोबाइल तर नकोच. घरी राहून कुटुंबियांना वेळ देऊयात, वाचन करू, चित्र काढू, खेळ खेळू, आजीशी गप्पा मारू ! मजेत राहू !

तुमचाच !!
*निसर्ग* !

#Eco_curfew
आयकियॉस कडून आलेला संदेश

संचारबंदी बद्दल मोदी रुग्ण आणि टमरेल गॅंग वाल्या लोकांची मनोवृत्ती

A senior minister in West Bengal indicated the state government might not back the move. “If a Prime Minister is saying like this how can I agree? This sounds like a RSS programme,”
"There is subtle hindutva in ringing the bells. I am disappointed" said Subrata Mukherjee Senior trinamool congress leader and a cabinet minister
https://epaper.hindustantimes.com/Home/ShareArticle?OrgId=a1110aad&image...

उपाशी बोका, सहमत. साखळी एक दिवसात तुटणे अशक्यच आहे (ती काय माझी बिजागरी आहे का Wink ), पण लोकांना सिरीयसनेस येणे आणि आणखी फायदा झालाच तर मी मागे म्हटल्याप्रमाणे exponant खाली येणे झाले तर उत्तम. Exponant ने संख्या खाली येणार नाही, पण वाढीचा दर कमी होऊ शकेल.

>>पण वाढीचा दर कमी होऊ शकेल.<< +१
सद्यपरिस्थितीत तुम्ही म्हणतांय तो कर्व फ्लॅट करण्याकडे सगळ्यांचा फोकस अस्णं जरुरी आहे. उद्रेकांच प्रमाण आत्ताच आटोक्यात ठेवता आलं नाहि तर पुढे होणारे दुष्परिणाम किती भयानक असतील याची कल्पनाहि करवत नाहि...

थाळ्या टाळ्या शंखनाद... उत्स्फुर्त प्रतिसाद.. वेगळाच माहौल अनुभवला आज.. गेले काही दिव्स घरातच कोंडले गेलेल्या पोरांनी आज बाल्कनीतना का होईना फार एंजॉय केले. मला वाटते हे रोज व्हायला हवे जो पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. फक्त काही लोकं मुर्खासारखे रस्त्यावर ऊतरलेले ते टाळायला हवे..

थाळ्या टाळ्या शंखनाद... उत्स्फुर्त प्रतिसाद.. वेगळाच माहौल अनुभवला आज. >>> अगदी अगदी.

आपल्यासाठी २४ तास राबणाऱ्या सर्व यंत्रणांना salute आणि कृतज्ञता सामुहिकरीत्या व्यक्त करता आली त्या निमित्याने. सर्व नागरीकांनी आता आपापली जबाबदारी ओळखून वागायला हवं. ज्यांना खरोखर बाहेर पडायची गरज नाहीये त्यांनी पडू नये, फक्त आजच नाही तर हे संकट आटोक्यात येईपर्यंत.

सर्वांनी आपापली आणि समाजाची काळजी घ्या, सुरक्षित रहा.

ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांची काळजी वाटते, त्यांच्यासाठी काय करू शकते माझ्या छोट्याशा लेवलवर ह्याचा विचार करतेय.

ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांची काळजी वाटते, त्यांच्यासाठी काय करू शकते माझ्या छोट्याशा लेवलवर ह्याचा विचार करतेय.>>>

नेटवर अजून काही वाचले नाही पण काल रेडिओवरील बातमीपत्रात रेशन कार्डावर वाढीव धान्य मिळणार व तेही फुकट असे ऐकले. कदाचित चुकीचेही ऐकले असेन.

5 वाजता थाळीनाद हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा जरा विचित्र वाटले.. आपण घरी सुखरूप राहावे म्हणून जे घराबाहेर पडून 24 तास काम करताहेत त्यांचे आभार मानायला हवेतच पण ही पद्धत जरा विचित्र वाटली. विशेषतः आभारप्रदर्शन स्वीकारायला समोर कोणीही नसताना आपण आभार मानायचे कसे हाही प्रश्न पडला.

पण 4.56 पासूनच आजूबाजूच्या बच्चे कंपनीने व मोठ्यांनी ठणठणाट सुरू केला. सकाळपासून मृतवत असलेल्या वातावरणात एकदम चैतन्य आल्यासारखे वाटले. ज्यांची मुले दहाच्या आतल्या वयोगटातली आहेत त्यांना मुलांना आज घरात गुंतवून ठेवणे किती कठीण झाले असणार. अशा मुलांना थाळी वाजवून एक रिलीफ मिळाला असणार. पाच मिनिटे का होईना, त्यांची दिवसभराच्या लादलेल्या तुरुंगवासातून मानसिक मुक्तता तरी झाली. खरेच, मला वाटले होते त्यापेक्षा प्रत्यक्ष खूप वेगळे घडले.

नेटवर अजून काही वाचले नाही पण काल रेडिओवरील बातमीपत्रात रेशन कार्डावर वाढीव धान्य मिळणार व तेही फुकट असे ऐकले. >>> हो ते रेशन धान्य, कांदे बटाटे मिळणार आहेत असं परवा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तो स्तुत्य उपक्रम आहे.

आपल्याला जमते तितके करायचे. कामवाल्या बायांचे पगार कापू नका म्हणून इतरांना सांगता येईल, आपण कापणार नाहीच. कचरा घेऊन जायला येणाऱ्यांना काहीतरी देता येईल का बघता येईल. घरात काही काम सुरू असेल तर त्या मजुरांना वेगळे पैसे थोडे देता येतील.

हो साधना, गुड आयडिया. ओळखीचे म्हणजे हेच सफाई कामगार, सोसायटी watchmans. रोज मीच काम करते घरात. पण एक ताई येतात कधीतरी मदतीला, आठवड्यातून एकदा. त्यांना येऊ नका सांगितलं आहे, पगार कापणार नाहीये. तरी त्या येऊन गेल्या मागच्या आठवड्यात.

Sorry जरा अवांतर विषय झाला ह्या धाग्यावर पण हे हल्ली मनात येतं, सगळेच संकटात तर त्यांना होणारा त्रास किती असेल, म्हणून पटकन लिहिलं.

आपल्याला जमते तितके करायचे. कामवाल्या बायांचे पगार कापू नका म्हणून इतरांना सांगता येईल, आपण कापणार नाहीच. कचरा घेऊन जायला येणाऱ्यांना काहीतरी देता येईल का बघता येईल. घरात काही काम सुरू असेल तर त्या मजुरांना वेगळे पैसे थोडे देता येतील.>>>>> 1111
खूप भारी वाटलं ......
वातावरणात लं चैतन्य व उत्साह बघून भरून आलं.
आमच्या मावशी 31 पर्यंत येणार नाहीत. आम्ही कधीच ह्यांचे पगार कापत नाही.

इटलीतील लोकांनी टाळ्या वाजवल्या मुळे तेथील सरकारचे अपयश झाकले गेले. आपणही अंधानुकरण करून टाळ्या वाजवून कोरोना प्रसार रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचे अपयश झाकले. म्हणे नमस्ते करायच्या आपल्या संस्कृतीमुळे आपल्याला कोरोना ची भीती नाही. आता आत घुसल्यावर जनतेला घरात कोंडून ठेवलंय. श्रीमंतांना विमानतळावरच रोखले असते तर हा संसर्ग पसरलाच नसता. हातावर पोट असणाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे पुढील आठवड्यात बरेच हाल होतील.

हे सगळं ठीक आहे पण सध्या आपण अटळ परिस्थिती फक्त पुढे ढकलत आहोत. एरवीसुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय सुविधांची आपल्याकडे कमतरता आहे. इटली, वुहान सारखी परिस्थिती होण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा हा वेळ आपल्याला मिळाला आहे त्याचा तात्पुरत्या वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी करायला हवा आहे. वुहनला २ आठवड्यात १००० खाटाचे इस्पितळ उभारावे लागले. आपल्या इथे ते कठिण आहे तर तयार रिकाम्या इमारतींचा उपयोग त्यासाठी करता येउ शकतो. गेल्या आठवड्यात पेपरात वाचल्यासारखे वाटते आहे की एवढ्या मोठ्या मुंबईसाठी केवळ १००० वेंटीलेटरच उपलब्ध आहेत. कोरोनाच्या टेस्ट करण्यासाठी केवळ १५०००० टेस्ट कीटच उपलब्ध आहेत. मास्क सॅनिटायझरबद्दल तर आपण ऐकतच आहोत. इतर औषधांचा पण स्टॉक घेतला गेला पाहिजे.
ह्या द्रुष्टीने सरकारी पातळीवर विचार होत असेल अशी आशा गेल्या काही पत्रकार परिषदांमधे केलेल्या भाषणातून वाटली नाही. सध्या तरी पावले प्रोअ‍ॅक्टीव न वाटता रिअ‍ॅक्टीव वाटत आहेत.
इथे कुणाला काही माहीत आहे का?

आज अनेक ठिकाणी मोठमोठ्या सख्येत लोक जमा होऊन सोशल डिस्टन्सिंगला चुना लावला. फटाके कशा साठी उडवले?? सगळा बेजबाबदार पणा. प्रेस वाले तेवढेच बलिश.
मला टाळ्या अन थाळ्याविरुध्द काहीच नाही ... ते चांगले साधन होते पण लोकांना गाभीर्य कधी कळणार देव जाणे. लहान मुलांना कॅमेर्^यासमोर नाचवत होते... कहर आहे...

इटलीतील लोकांनी टाळ्या वाजवल्या मुळे तेथील सरकारचे अपयश झाकले गेले. आपणही अंधानुकरण करून टाळ्या वाजवून कोरोना प्रसार रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचे अपयश झाकले.>>>>>

वा.... तुम्ही बाहेर फिरा आणि सरकारला दोष द्या. मोदींनी टाळ्या वाजवायला सांगितल्या, तुम्हाला घराबाहेर पडा म्हणून सांगितले का??

सरकारमुळे घरात वसावे लागले.>>>>

हम्मम.... म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही... असो. देव तुमच्यासकट तुमच्या परिवाराला सुखरूप ठेवो.

आज अनेक ठिकाणी मोठमोठ्या सख्येत लोक जमा होऊन सोशल डिस्टन्सिंगला चुना लावला. फटाके कशा साठी उडवले?? सगळा बेजबाबदार पणा. >>> हे असं जिथे जिथे झालं, हि खरंच खेदाची गोष्ट Sad .

घराच्या दारात, बाल्कनीत, खिडकीत येऊन कृतज्ञता व्यक्त करा, असं सांगितलेलं मोदीजींनी. बाहेर पडू नका, गर्दी करू नका सांगितलेलं. आमच्या जवळपासच्या तरी बऱ्याच लोकांनी ह्याचं नीट पालन केलेलं दिसलं.

स्वतः उद्धव ठाकरे पोलीस गराड्यात उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्यांना संदेश नीट समजला नाही का.
आग्या यांनी वर लिहिलं आहे तोच प्रश्न मलाही पडलाय की बाकी देशांचं उदाहरण समोर असूनही आपण विमानतळ तपासणीत फारच हलगर्जीपणा दाखवला हे खोटे नाही का. बाहेरून येणारी विमाने आत्ता बंद झाली. त्या आधी फक्त चीन मधून आलेल्या लोकांना तपासत होते. दुबईहुन आलेल्या लोकांना तसेच सोडून दिले. काही परदेशीं पर्यटक इटलीहून थेट जयपूरला आले. त्यांचीही तपासणी झाली नाही असे मी वाचले. चौदा दिवस लक्ष ठेवणे इतक्या लोकांवर शक्य नाही हे समजण्यासारखे आहे पण शिक्का मारण्याचा जो उपक्रम गेल्या काही दिवसात अंमलात आणला ते आधीच करणे शक्य नव्हते का. जेव्हा शाळा बंद केल्या तेव्हाच एका रविवारी हा करफू ठेवला असता तर अनेक ऑफिसनी आधीच वर्क फ्रॉम होमची तयारी सुरु केली असती आणि लोक एकंदरीत आधीच गंभीर झाले असते. जे होऊन गेलंय ते बदलणं अर्थात शक्य नाही पण आपल्याला इतर देशांकडे बघून शिकण्यासाठी वेळ होता आणि हा रोग देशात येऊच नये याची तजवीज आपण करू शकलो असतो का असे वाटत राहते.

कर्फ्यु ला साथ,
ते भान्डी वाजवणे जरा अती वाटलं उगाच इतरान्ची नक्कल केल्या सारखं Sad

Apollo chain of hospitals have released a self assessment test to assess the level of risk in exposure to Covid 19. You can access through the below link......

https://bit.ly/2WylPf9

चंपा, तुम्ही योग्यच लिहिले आहे. पण सरकारात तपासणारे, स्टॅम्प मारणारे वगैरे सगळे लोक आपली जनताच आहे ना? जे काम आपल्याला दिलेय त्याचे गांभीर्य ओळखून काम नीट करणे ही जबाबदारी आपली आपण ओळखून काम नीट करायला नको? मुळात काम करणारे कमी, त्यात जे काम करताहेत ते नीट करताहेत की नाही ह्यावर लक्ष ठेवायला अजून जादाची माणसे कुठून आणणार? ह्या कामांवर माणसे तीच आहेत जी इतरत्र इस्पितळात काम करत होती. सरकारने अचानक जास्तीची माणसे कुठून आणायची? की नेहमीसारखे शिक्षकांना वेठीला धरायचे? तश्याही शाळा बंदच आहेत म्हणून त्यांना ड्युटीला लावायचे का??

देश आपलाच आहे समजून काम करणे भारतीयांनी कधी शिकून घेतले नाहीच. आता जिथे ढिलाई दिसतेय ती अशा लोकांमुळेच...

त्यातही चांगल्या बातम्या येताहेत. अंधेरी विमानतळावर उतरलेले 15 पंजाबी तपासणी होत असताना निसटले. त्यांना यंत्रणेने खार स्टेशनात पकडले. हे असे पळून जाणारे आपले शिस्तप्रिय नागरिक.. यांना शोधून पकडून आणायचे कामही सरकारी यंत्रणा करतेय व त्यात किती वेळ फुकट जातोय.

धारावी झोपडपट्टीत पहिली केस सापडली. ही घरकाम करणारी बाई आहे, परदेशातून आलेल्या कोरोनाग्रस्तांच्या घरी काम करून अजून दोन तीन घरे ती करत होती. घरी आल्यावर आजूबाजूला गप्पा वगैरे... सरकारी यंत्रणेला आता किती डोकेदुखी, हा सगळा ट्रेस शोधून काढायचा.. त्यांनी काय काय करायचे?? त्यात ही बाई, तिचा मुलगा कोणीच सहकार्य करायला तयार नाही.

लोक सरकारवर टीका करायला पुढे आहेत पण आपण काय करतोय हे पाहताहेत का?? काल कित्येकांनी 5 वाजल्यानंतर जे केले ते सरकारने करायला सांगितले होते का?? जे करायला सांगताहेत ते कोणी करत नाहीय, जे करू नका म्हणून सांगताहेत तेच बरोब्बर करताहेत. सरकार काय करणार अशा स्थितीत.

अमेरिकेत 50 तासात 10,000 नव्या केसेस तयार झाल्या असे आताच लोकसत्तात वाचले. आपल्याकडे हा दिवस दूर नाही.

चंपा, तुम्हाला व्यक्तिगत उद्देशून वरचे काहीही नाही. तुम्ही कृपया व्यक्तिगत घेऊन राग मानू नका... बाहेर जे सुरू आहे त्याचा राग आलाय इतकेच...

काल पाचनंतर रस्त्यावर आलेल्या काहींच्या हाती तिरंगेही होते. तेव्हा त्यांच्या देशभक्तीबद्दल संशय घेणंं योग्य नाही.

वर चंपा यांनी म्हटलंय की दुबईहून आलेल्या लोकांना तसेच सोडून दिले, हा पॉलिसी डिसिजन होता. तसंच परदेशातून आलेल्या लोकांना सेल्फ डिक्लरेशन द्यायला सांगितले होते. हे शिक्के मारणार्‍या बाबूपेक्षा बरंच वरच्या पातळीवर ठरतं.

जनता कर्फ्यूचा असा फज्जा उडालेला असताना काही जण मात्र अमक्यातमक्याने थाळी वाजवली का? कशी वाजवणार? ते खरे भारतीय नाहीतच असली दळणं दळण्यात मग्न आहेत.

Pages